Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal Pawar

Others

4.0  

Vishal Pawar

Others

घर

घर

1 min
187


इमारतीच्या या तोबा गर्दीत,

घर कुठेतरी हरवलं आहे,

फक्त चार भिंती आहेत 

आणि त्यावर छप्पर बसवलं आहे //धृ//


एका छपराखाली असली तरी

नाती हि सारी अबोल आहेत,

ओलावा सरत चालला आता 

अंतर नात्यातले वाढवलं आहे //१//


सगळे आता ऑनलाईन झाले

शुभेच्छा हि त्याला अपवाद नाहीत,

असले मित्र लाखो तरी 

खऱ्या मैत्रीला मन आसुरलं आहे //२//


प्रत्येकाकडे मोठे घर आहे

दमून घरी परतण्यासाठी, 

मात्र शांत झोपेसाठी 

अंगाईला मन मात्र तरसलं आहे //३//


पालकांना नि आता वेळ नाही 

चिमुरड्यांना आपल्या देण्यासाठी,

जगण्याच्या या धडपडीमागे 

बालपण पहाणे आपण चुकवलं आहे //४//


विचार करा यावर थोडा 

नाजूक या रेशीम गाठींवर,

वेळ सरली कि सुटतील साऱ्या 

नातं ज्यावर विसावलं आहे //५// 


Rate this content
Log in