STORYMIRROR

Vishal Pawar

Others

3  

Vishal Pawar

Others

ती

ती

1 min
390

आयुष्याच्या सुंदर वळणावर,

अचानक मला तु भेटली.

प्रेम हे आंधळे असते 

गोष्ट मला तेव्हा होती पटली //१//

तुला पाहिल्यावर मला

दुसरं काही आठवत नव्हते ,

तुझ्याशिवाय मला मात्र 

दुसरं लक्षात राहत नव्हते //२//

ह्यालाच प्रेम म्हणतात का?

प्रश्न होता मला पडला

उत्तर मला सापडत नव्हते 

जीव मात्र होता तुझ्यावर जडला //३//

तुझ्या माझ्यातले अंतर हे

मिटवण्याइतके थोडे होते

पण ते तुला कसे सांगावे

हेच मोठे कोडे होते //४//

अंतर हे पार करता करता 

मनाची पार दमछाक झाली

पण तुझ्या एका हसण्याने 

प्रेमाची पोचपावती मिळाली //५//

तुझ्या त्या मिश्किल हसण्याने 

घेतला हृदयाचा ठाव होता

दोघांच्या डोळ्यांनी वसवला तेव्हा

स्वप्नांचा एक गाव होता//६//

तुझ्या सोबतीत माझा 

प्रत्येक क्षण अनमोल होता

त्या प्रत्येक क्षणाचा प्रभाव

मनात माझ्या खोल होता //७//

डाव मी जो जिंकला होता 

का अर्ध्यावर सोडून गेलीस 

वसवला होता गाव स्वप्नांचा 

का तू असा मोडून गेलीस //८// 

पण प्रत्येक लाटेला किनारा मिळेल

असे नेहमी घडत नसते

नियती पुढे मात्र

कधीच कोणाचे चालत नसते//९//


Rate this content
Log in