आता यशाचं शिखर चढायचंच....!!
आता यशाचं शिखर चढायचंच....!!
आजकालच्या स्पर्धायुगात या पाऊल नवीन हे पडायचंच...
एकाने साथ दिलीच तर दुसरं कुणीतरी नडायचंच...
आत्मबळाच्या जोरावर आज शिखरे चढू पाहतो...
नेटाने मग जीवन सारे ध्येयाला या वाहतो...
कुणी सुखात हसले तर दु:खात कुणीतरी रडायचंच...
एकाने साथ दिलीच तर दुसरं कुणीतरी नडायचंच...
कलियुगात या सुक्याबरोबर, थोडं ओलं हे जळायचंच...
मृगजळास किती धरून ठेवणार, कधी ना कधी ते पळायचंच...
अहो तुम्ही आम्ही लाख रोखू, विधिलिखित परि घडायचंच...
एकाने साथ दिलीच, तर दुसरं कुणीतरी नडायचंच...
का म्हणून यशाने आम्हास, नेहमी नेहमी झुलवायचं...
करता करविता तोच असला, तरी जीवन स्वतःच फुलवायचं...
सगळं मनासारखं होत असताना, घोडं कुठतरी अडायचंच...
एकाने साथ दिलीच, तर दुसरं कुणीतरी नडायचंच...
आपणच आहोत आपले विधाते, पदोपदी हे घोकायचं...
तमा नसे मग प्रतिकाराची, दूरच रिपुंना रोखायचं...
गगनास ही या करुनी ठेंगणे, गरुड पंखांनी उडायचंच...
लाख विघ्ने मार्गी येवोत आता यशाचं शिखर चढायचंच...
