Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

krushnaji damle

Classics Inspirational

0  

krushnaji damle

Classics Inspirational

आम्ही कोण?

आम्ही कोण?

1 min
579


आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके

देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,

दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके !


सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;

पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया-

सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;

फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके !


शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?

पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?

ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;

ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते !


आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;

आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे !



Rate this content
Log in