Sheetal Sankhe

Romance


4  

Sheetal Sankhe

Romance


कथा पहिलं प्रेम-मला भेटलेला तो

कथा पहिलं प्रेम-मला भेटलेला तो

5 mins 2.6K 5 mins 2.6K

लघुकथा(पहिलं प्रेम)

"मला भेटलेला तो ..."

आज पुन्हा आठवणी उजळल्यासारखे वाटतेय. जीवनात प्रत्येक टप्प्यात ,कुणीतरी खास सोबती म्हणून तर, कुणी नातं जोडलय म्हणून स्मरणात आहे . मात्र "तो " ....... मला काही क्षण भेटला अन कोणतेही नाते नसताना आजही खोलवर काळजात घर करून आहे .

त्या दिवशी सकाळची वेळ होती . नेहमीप्रमाणेच मी चालत निघाली होती . शाळा अगदी सकाळी असल्यामुळे मी चालत जाऊन रीक्षा स्टँड गाठायची .अन मग शाळेचा प्रवास अवघ्या दहा मिनिटांचा असायचा.शाळेची वेळ सकाळी असायची ....आणि प्रिन्सिपॉल स्ट्रिक्ट असल्यामुळे मी म्हणजेच स्वरा , अगदी लगबगीने शाळेच्या वाटेवर निघाली होती. त्यातच आज कडाक्याची थंडी , त्यामुळे रस्त्यावर जागोजागी तिला शेकोटी दिसत होत्या ,ती त्या पाहत जरा रेंगाळतच चालली होती.

स्वरा रिक्षा स्टँडवर आली .तोवर , तिला दहा मिनिटे नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता. ती आली अन विरार स्टेशन बाजूला असलेल्या , रिक्षेत नेहमीप्रमाणे जी नंबर लावून उभी असलेल्या रिक्षेत डायरेक्टली बसली .

रिक्षावाल्याला म्हणाली ,"भय्या जल्दी चलो , आज लेट हुआ है". ती बसल्यावर रिक्षावाला मागे वळून काही बोलणार .इतक्यात त्या रिक्षेत आधीच बसलेला एक व्यक्ती , त्याला थांबवत म्हणाला," चलो भय्या". अन रिक्षा सुरू झाली .तिची धावपळ पाहून मे बी कुणी काही बोलले नाही .स्वराच्या मनात मात्र वेगळेच द्वंद्व सुरू करण , आज स्वराला नेहमीपेक्षा थोडा जास्तच उशिराच झाला होता. त्यात गोंधळलेली स्वरा घाईगडबडीने येऊन रिक्षेत बसली होती.अन रिक्षा सुरु झाली होती . स्वरा अगदी गंभीर मुद्रेत.....रीक्षेतून बाहेर पाहत होती.बाजुला कोण आहे? याचेही तिला भान नव्हते. बहुदा ,तिने फक्त ओझरते पाहिले होते . बाहेरून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्याचा अल्लड स्पर्श झाल्यावर अलगद

डोळयांच्या पापण्या मितल्या जात होत्या .पुन्हा लगेच भानावर येत स्वरा घडयाळाकडे कटाक्ष टाकत होती .ती मनाशीच विचार करत होती . आज हे अंतर कापणे किती भयंकर वाटत आहे . असा उशीर यापुढे कधीही न होवो .कधी येईल हा शाळेचा स्टॉप ?

स्टॉप जवळ येताच स्वराने आवर -आवर करत , पर्समधून पैसे काढले अन हाताच्या मुठीत ठेवून दिले .रिक्षा थांबली की,पटकन पैसे देऊन, लवकरात लवकर शाळेत पोहचीन .असे विचार तिच्या मनात रेंगाळत होते .तिच्या बोलक्या चेहऱ्यावर हे सर्व अगदी ठळक स्वरूपात मुद्रित झालेले दिसत होते . एव्हाना स्टॉप आला अन रिक्षा थांबली . स्वरा व ती व्यक्ती दोघंही उतरली .आता स्वरा हातातील मुठीत असलेले पैसे रिक्षावाल्याला नेहमीप्रमाणे देती झाली .तर , रिक्षावाला म्हणाला," मॅडम , सरांनी पैसे दिले , ही स्पेशियल ऑटो होती ". त्यावेळी स्वराला मागचे सर्व चित्र स्पष्ट झाले . रिक्षावाला मागे पाहून काही इशाऱ्यात ह्या व्यक्तीसोबत काही बोलला होता वैगेरे- वैगेरे सारे तिला आठवले .ती अगदी ओशाळलीच अन लगेच सॉरी बोलून म्हणाली ,"पण , मला हे तुम्ही आधी सांगायला हवे होते ना...!"रिक्षावाला म्हणाला," मॅडम , तुम्ही बोलायला संधीच दिली नाही"....मला माझे पैसे मिळालेत , आता मी निघतो .तुम्ही आणि सर पहा काय ते ...!!! हे बोलून तो निघूनही गेला . आता निरव शांतता ,सकाळचा गारवा अन तरीही स्वराचा वाढलेला पारा. इतकेच समोर होते .स्वरा शांत , स्तब्ध ,गंभीर झालेली .ती त्या अनोळखी व्यक्तीस पहिल्यांदाच पण, रागीट नजरेने कटाक्ष टाकत म्हणाली ," हे पहा , तुम्ही माझे पैसे घ्या अन मला जाऊ द्या".मला तसाही आज खूप उशीर झालाय .

तो म्हणाला," मॅडम , कसले पैसे घेऊ , मला तसेही जास्त पैसे द्यावे लागलेच नाहीत ".स्पेशियल ऑटो होती .त्यात तुम्हालाही घाई होती .मग एक क्षण विचार केला.दुसरी रिक्षा भरायला वेळ लागेल .त्यामुळं काहीही न बोलता पुढे जाऊया अन उतरताना सांगूया .असा प्रांजळ विचार केला .आधीच सांगितले असते तर , तुम्ही माझ्या ऑटोमध्ये आल्याच नसत्या ,आणखी उशिरा शाळेत गेला असतात . स्वरा ते विचार ऐकून अवाक होत होती. हळूहळू तिचा चढलेला पारा , खाली उतरत , निवळत होता .

स्वरा हे सर्व ऐकून म्हणाली ," ठीक आहे , तुमचा हेतू चांगला होता ".पण , आतातरी पैसे घ्या मला असे मुळीच आवडत नाही ." त्यावेळी त्यानं लगेच म्हंटले ," पण , तुम्ही तर स्वतःच ऑटोमध्ये बसलात ". स्वरा पुन्हा ओशाळून लाजली .तो हसला अन म्हणाला ," मी फक्त माझे पैसे दिले ". स्वरा म्हणाली हे पहा दुसऱ्याचे पैसे हे ओझे वाटते मला .आवघ्या पाच रूपयासाठी मला अडकवून ठेवू नका.असे ती वारंवारं सांगत होती .मग त्याने सांगितले , मॅडम मी त्या पाच रूपयांच्या बदल्यात काही मागतोय ते तुम्ही द्याल ना ...! स्वरा साशंकीत मनाने म्हणाली म्हणजे ," काय म्हणायचे आहे तुम्हाला ?" तो पुन्हा थोडा मिश्किल हसला अन म्हणाला ," अरेरे, रागावू नका".फक्त एक कंडिशन मला आठवणीत ठेवा इतकेच...मॅडम, माझे नाव मारियो . मी हॉटेल मॅनेजमेन्ट करतोय .बस, पुढे काहीच नाही .कधीतरी आपली भेट झाली होती . हे फक्त निर्मळ मनाने लक्षात ठेवा म्हणजे तुमचे पैसे फिटूस झाले असे समजा.अन हो पहा ना जर, मी पैसे घेतले तर , नक्कीच तुम्ही मला काही दिवसातच विसरून जाणार .म्हणून ,म्हणतोय ...स्वरा हे विचार ऐकत शांतपणे ,त्या विचरांचे प्रतिक मारियो याचा विचार करत राहिली.पैसे अजूनही तिच्या मुठीतच होते .मात्र मारियोला तिच्याकडून मैत्रीची एक छान मंद स्माईल मिळाली.त्यानंतर तो म्हणाला ...."फ्रेंड्स " ती फक्त हसली ...

त्यावर तो म्हणाला ," स्वभावात खूप गोडवा आहे तुमच्या , तरीही निश्चितं रहा "माझ्याकडून कधीही ,कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला, अगदी उद्यापासून मी तुम्हाला कुठेही दिसणार नाही .पण , आठवणीत नक्कि ठेवा ,ठेवाल ना ...!!! ती म्हणाली नक्की ....वचन देते . हे ऐकून तो पुढे निघून जाताना तीच नाव विचारता झाला .ती हलक्या आवाजात हणाली,"स्वरा". तो तीच नाव ऐकून निघूनही गेला .तो कित्येक वर्षात नाहीच दिसला त्याने त्याचे वाचन पाळले अन मी माझे वचन पाळतेय .त्याला माझ्या आठवणीच्या कप्यात ठेवून . विचारांचे अत्तर सुगंधित करतात ,त्याची दरवळ अगदी चिरकाळ टिकते . अन हो कोणतेही नाते नसले तरी ,तो एक विचारही व्यक्तीला जिवंत ठेवतो कायम ...एखाद्या आत्मिक वस्तीत घर करण्यासाठी...अन स्वरा पाहतच राहिली.आजतागायत तो धूसर झालेला मारियो ...कदाचित तिच पहिलं प्रेम

...सौ.शीतल हर्षल संखे ...

बोईसर , पालघर


Rate this content
Log in