Sheetal Sankhe

Tragedy

3.8  

Sheetal Sankhe

Tragedy

एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम

2 mins
1.3K


 " हो ...हो ...माझं तिच्यावर खूप प्रेम आहे " तो रस्त्यावर सर्वांना ओरडून सांगत होता . हे ऐकून कसंतरीच झालं . त्याच्याकडे पाहून तो मनोरूग्ण असल्याचं समजलं . त्याला असं वेड लागायला एखादी मुलगीच कारणीभूत ठरली असेल का ? मनात विचारांची वावटळ उठली . काही केल्या ते मनातून जात नव्हतं . एव्हाना माझं एका शार्ट फिल्मसाठी लेखन सुरू होतेच . ते बाजूला ठेवून मी पोलीस ह्या कैदयाला पोलिस पुन्हा पोलिसस्टेशनमध्ये का घेवून गेले . हे पाहून त्याबाबत विचारणा केल्यावर समजलं मॅडम लई डेंजर आहे . हा मनोरूग्ण ....जरा संभाळून मर्डर केलयं त्याने असं समजताच मी चपापलेच . सहज मनात विचार आला . त्याच्या प्रेमाला विरोध झाला म्हणून हे पाऊल उचललं असणार . पण , नेमकं जाणून घेण्यासाठी पोलिस आणि सोशियल वर्कर यांच्या मदतीने त्याची फाईल अभ्यासासाठी मागवली . मला त्याची माहिती मिळाली आणि त्याची रवानगी पुण्यातल्या हाॅस्पिटलमध्ये करणार अशी माहिती मिळाली. 

        आताशी अवघ्या तिस -पस्तीशीत असलेला तो ...त्यावेळी पंचवीस वर्षांचा युवक होता . रोज पारावर, चौकात बसून मित्रांसोबत टवाळक्या करणारा तो ...त्याचं नाव पर्शा होतं . दिसायचा अता पता नाही की, शिक्षणाचाही .... कुठलंही काम न करणारा ...त्याउलट ती दिसायला सुंदर देखणी .दहावी शिकून परिस्थितीने गरीब असल्याने टेलरींग शिकायला जाणारी . तिचं नाव शुभदा . तिला जाता -येता पाहणं . इतकंच काम पर्शा रोज करत असे . तिला मात्र याची खबरही नव्हती . पुण्यातीलच एका खेडेगावात दोघंही रहात होते .


     पुण्यातील एका खेडेगावात राहणारे पर्शा आणि शुभदा .रोज ती क्लासला जाताना तो तिला पाहायचा . मित्रांना काहीबाही तिच्याविषयी सांगायचा . ती मात्र अनभिज्ञ होती . ऐके दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले . शुभदा अगं तो टपोरी पर्शा मित्रांना बोलतो . ती शुभदा तुमची वहीनी . हे ऐकून शुभदाला खूप वाईट वाटले . अक्षरशः तिला रडूच कोसळले . उद्यापासून हा रस्ताच बदलून वेगळ्या रस्त्याने जावू असा मनाशी निर्धार तिने केला . तिची मैत्रीण बोलली चालेल .

      दुसर्याच दिवशी शुभदा अन् तिची एक मैत्रीण गावच्या मागच्या बाजूला पार होता .तिथून लांब पल्ला पार करत . क्लाससाठी निघाल्या. त्या दिवशी पर्शाला तो रोज जिथे उभा राहत होता .तेथे शुभदा दृष्टीस पडली नाही. तो अगदी बैचेन झाला . अन् थेट कावराबावरा होवून तिच्याघराबाहेर जावून उभा राहिला . तिला हे समजले तशी ती घरातून बाहेर पडणे टाळू लागली .पण, तो आता रोज तिच्या घराशेजारीच उभा राहत होता .तिला त्याची भिती वाटत होती . तरीही , एक दिवस त्याने तिला येताना एकटी गाठलीच . तू मला खूप आवडतेस असे जाहीर सांगितले . तिने मौन धारण करून तिथून काढता पाय घेतला . शुभदा शांत , सोज्वळ व सुंदर मुलगी होती . पर्शा मात्र गुंडागर्दी करणारा टपोरी मुलगा होता . 

        शुभदाने धावतच घर गाठले . पर्शाला तिचं मौन सहन होत नव्हतं . थोड्याचवेळात तो तिच्या घरी पोहोचला . तशी शुभदा खूपच घाबरली . आता घरी हे सर्व कळलं तर, आई बाबांना कसं वाटेल . बिच्चारी शुभदा दाराआड लपून राहीली . आईने सांगितले काय काम आहे . पर्शा म्हणाला ,"काकू मला शुभदाशी लग्न करायचं आहे ". माझं तिच्यावर खूप प्रेम आहे . हे ऐकून दुसर्या खोलीतील तिचे वडीलही समोर आले . पर्शा मात्र मागचा पुढचा विचार न करता . स्वत:च्या प्रेमाचा सर्वांसमोर उलगडा करून मोकळा झाला .


       पर्शाच बोलून झालं . सर्व अवाक् झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले . पण, एक सुज्ञ पालक ज्यावेळी जसं वागतील तसंच ...शुभदाचे आई-बाबा वागले . ते म्हणाले बाळा आम्ही इतक्यात शुभदाच्या लग्नाचा विचार नाही केला. आताशी ती दहावी झालीये . काही वर्ष तरी लग्न नाही करू शकत. शांतपणे दिलेल्या नकारावर पर्शाला रियक्ट होताच आले नाही. तो तिथून निघाला . मात्र त्याच्या मनात अवखळ वादळ ...आक्रंदत होतं . तो तावातावाने पारावर पोहोचला रिकाम्या जमलेल्या दोन-तीन बियरच्या बाटल्या आपटून काचांचा खच पाडला . तो अस्थिर ,बैचैन झाला होता . त्याच वागणं कधीही सुसंस्कृत नव्हतं .

        तिथे शुभदाच क्लासला जाणं पण , बंद झालं . तिला त्याची दहशत बसली होती . कुणीतरी प्रेम करतोय ही जाणीव खूप छान असते . पण, शुभदा बिचारी ...लपून राहायची ,घाबरायची ...जेमतेम कधीतरी मार्केटला जायची अन् लगेचच घरी येवून राहायची .एक दिवस असचं आई आजारी होती . बाबा ,भाऊ घरी नव्हते . म्हणून भाजी घेण्यासाठी तिला बाहेर पडावेच लागणार होते . पर्शा आजूबाजूला कुठेही नाही दिसत .हे लपून तिने पाहीले आणि पटकन ती घराबाहेर पडली . भाजी घेतली आणि गजबलेल्या मार्केटमध्ये परशा कुठेही दिसत नव्हता म्हणून निःश्वास सोडला . 

      पटकन ती आता घराकडे वळणार इतक्यात तेथे पर्शा आला . तिला भर मार्केटमध्ये त्यानं हाताला धरलं ....तेवढ्यात दचकलेली शुभदा किंचाळलीच.... सर्वांचे लक्ष गेले .काही क्षणासाठी सर्व थबकले . जवळच शाळा ...तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर पोलिस स्टेशन ...भर रस्त्यात आणि गजबलेल्या वातावरणात त्यानं शुभदाला हाताने घट्ट धरून तिचा गळा दाबून धरला .


     पर्शाने शुभदाचा गळा आवळून धरला सर्वांचेच लक्ष तिथे वेधले गेले . शुभदाला त्यांना ओढून गच्च आवळलं अन् लागलीच दुसर्या हाताने शर्टातील सुरा बाहेर काढला .लोक पुढे सरसावत आहेत . हे पाहून त्याने सरळ शुभदाच्या गळ्यावर सुरा धरला . आरडाओरडा सुरू झाला . तद्नंतर विकृती बळावत तिच्यावर राक्षसी प्रेमाचे ओरखडे उमटले . सपासप वार झाले . तब्बल दोन वेळा मानेवर आणि सहा वेळा शरीरावर वार झाले . ती निपचित रक्तबंबाळ होवून खाली कोसळली.एव्हाना पोलिस पोहचले . हे सर्व काही मिनिटांत झाले . त्यामुळे कुणालाही काहीही करता आले नाही. पर्शा शुभदाला घेवून जोरजोरात , वेड्यासारखा हसत सुटला . पोलिसांनी तिला दवाखान्यात नेले आणि त्याला तुरूंगात डांबले . तिला सरकारी दवाखान्यात मृत घोषित केले गेले .

       पर्शा मात्र हसत राहायचा . शुभदा आता कुणाचीही नाही . ती फक्त माझी म्हणून मी तिला संपवलं . पोलिसांनी त्याची चौकशी केली . तेव्हा समजले त्या मुलाला घरचे काहीच बॅकग्राऊंड नव्हते . आई-वडील लहानपणीच गेले . पडेल ते काम करून सोशिक जीवन जगतानाच अरेरावीपणा केला तर, सर्व पटकन मिळते . अशा भ्रमात त्यांच्याकडून नकळत टपोरी भाईगिरी सुरू झाली . तो ज्या पद्धतीने सर्व मिळवायचा त्याच पद्धतीने तो आपले प्रेम मिळवायला गेला . अन् कायमचे सर्वकाही गमवून बसला .अगदी स्वत: जिवापाड प्रेम केले ते ही अविचाराने तो गमवून बसला . असे काही अघटीत घडले की, त्याची दुरूस्ती नाही होवू शकत .

         हे सर्व ऐकून सुन्न झालेली मी ....पोलीस आणि सोशियल वर्करला त्याचं आत्ताच स्टेटस् काय आहे ? हे विचारले तर ,पोलिस म्हणाले सुरूवातीला वाटले .हे सर्व तो नाटक करतोय ...स्वत:ला वाचवण्यासाठी ...मग त्याला मनोरूग्ण म्हणून दाखल करून सर्व चाचण्या केल्या . तो मनोरूग्ण झालाय .गेल्या कित्येक वर्षात तो फक्त "ती माझी" ...."मी तिच्यावर खूप प्रेम करतो" .इतकेच बोलतो बाकी जगाचे त्याला काहीही नाही . थोडक्यात त्याचही आयुष्य त्यानं थांबवलं जागच्या जागी .त्याच तिच्यावर खूप प्रेम असेलही पण, किती चुकला तो ....मनाशी विचार करत असताना खूप अस्वस्थता निर्माण झाली माझ्या डोळ्यासमोर....!

अन् पुन्हा पर्शा मनोरूग्ण म्हणून पोलिस घेवून गेले . 

         मी माझ्या केस स्टडीसाठी हाच विषय हाताळायचे ठरवले .आजच्या तरूणांना क्षणात प्रेम होते . पण, शाश्वत नसते . आपल्या प्रेमात कोणी होरपळतोय का? अन् उत्तर हो असेल तर ,तेथे सावरावे स्वत:ला...मनाशी जोडले गेलो ना...तर, शरीराने कुणी आपलं व्हावं असं गरजेचं नसतं . पण, आजकाल ...हेच समजत नाही . चांगली पिढी आपल्यासमोर आहे .परंतू, पाश्चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत .उगाच भावी पिढी भरकटला लागलीये . सर्वांनी वेळीच सावरायला हवं . एक पर्शा मनोरूग्ण झाला . पेक्षा तो सुसंस्कृत झाला असता तर , शुभदा कदाचित त्याचीही होवू शकली असती . समाजात दुसरा पर्शा नको याच विचाराने पालक आणि समाज दोन्हींचे उद्बोधन व्हायला हवं . प्रेम मिळवणं ह्याला प्रेम कधीच म्हणत नाही .यालाच "एकतर्फी प्रेम "म्हणतात .


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy