Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SHUBHANGI SHINDE

Horror Romance Thriller

4.7  

SHUBHANGI SHINDE

Horror Romance Thriller

काहूर (प्रेम कथा)

काहूर (प्रेम कथा)

26 mins
3.1K



दिपक आज भलताच बिझी होता, आज अॉफीसमध्ये खास announcement होणार होती. दिपकवर यासर्वाची खास जबाबदारी होती… आॅफीसचा पूर्ण मेक ओवर करण्यात आला होता…. खास सजावट करण्यात आली होती. रिसेप्शनला पत्रकार सुद्धा जमा झाले होते… दिपकसह सगळाच स्टाफ उत्सुकतेने वाट पाहत होता…..

एकदाची काळी कोरी करकरीत मर्सिडीज गाडी गेटवर उभी राहिली. आधी गाडीतून पाठक उतरले, तसा दिपक पुढे आला…. ” Good morning.. Sir, please welcome ” …..पाठक नी मान डोलाउन त्याला थांबण्याचा इशारा दिला… पाठक हे राठोड गृप आॅफ कंपनीचे फार जूने आणि विश्वासू सहकारी आहेत….


गार्डने गाडीचं मागच दार उघडलं, तश्या सर्वांच्या नजरा खिळल्या…. एक पंचवीसीतील तरुणी गाडीतून उतरते, पायात ब्लॅक हिल्लसचे शूज, ब्लॅक स्कर्ट आणि पांढरा शुभ्र शर्ट, गळ्यात स्कार्फ, हातात नाजूक पण तितकच महागडं घड्याळ, रोल केलेले मोकळे केस खांद्यावर सोडलेले आणि त्यात भर म्हणजे तिच्या गोर्‍यापान चेहेऱ्यावर ब्राउन रंगाचा गॉगल, थोडा हटके होता पण तरीही, ती जाम भारी दिसत होती…. दिपक तर पहातच राहिला…..

सगळीकडे कॅमेराची फ्लॅश लाइट चमकायला लागली आणि दिपक भानावर आला….


पाठक : मॅडम…. ” this way please ” (वाट दाखवत )

गार्डने आणि दिपकने वाट करून दिली….


सगळे conference Hall मध्ये जमा झाले… टेबलवर already माईक बसवले होते…..

आता पाठक काय सांगणार आणि हि बाई कोण याकडेच सर्वांच लक्ष लागून होत..

पाठक : Good morning, everyone.. आज आपल्याला ईथे, आपल्या राठोड गृप अॉफ कंपनीच्या नविन मालकाची खास ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे…. Please welcome our new managing director, “मीरा राठोड”…..


सगळे आश्चर्यचकित होऊन टाळ्या वाजवतात…. सगळे आपसात कुजबूज सुरू करतात.

अरे हि मीरा राठोड आहे???? ….सरांची वाईफ ???….. येवढी यंग??? Mr. राठोड च्या अर्ध्या वयाची पण नाही …

दिपकही विचार करु लागला हिलाच वैतागून सर कुठेतरी निघून गेले???? कि हिनेच काही केलय…. सरांनी तर आधीच आपल्या मुलालाही बेदखल केलय, त्याला तर कोणी पाहिलसुद्धा नाही, तो पण कूठे आहे काय माहीत … आता ही काय कंपनी सांभाळणार… साधा फोरमलवर गॉगल निवडता येत नाही हिला….

माईकची धुरा स्वतःकडे सांभाळत…..


मीरा : (डोळ्यावरचा गॉगल काढत) Good morning, everybody ….. यापुढे आपल्याला एकत्र येऊन काम करायच आहे, अपेक्षा करते तुम्ही मला साथ द्याल… तुम्ही म्हणाल ही पंचवीशीतली मुलगी हा एवढा मोठा business empire काय संभाळणार जिला साधा गॉगल निवडता येत नाही …. हो ना मि. दिपक???? ( एक कटाक्ष टाकून) (दिपक पूरता गोंधळतो)


माझी कामाची पद्धत वेगळी आहे….. So!!!…. be careful ….


मग पत्रकारांशी संवाद साधून पाठक आणि मीरा केबिन मध्ये गेले……


पाठक : या मीरा मॅडम…. बसा.. तुमची खुर्ची सांभाळा….


मीरा : (खूर्चीवर हात ठेवून) नाही, ही जागा माझी नाही…. याचा खरा हकदार Mr. राठोड यांचा मुलगा आहे… पण जो पर्यंत तो सापडत नाही तो पर्यंत मी फक्त एक care taker आहे…. पण जगासमोर ही गोष्ट अजूनही आपल्याला अज्ञातच ठेवावी लागणार….

(इतक्यात दिपक दारावर नॉक करतो)


दिपक : May I come in….Madam ???

मीरा : Please come…. Mr. दिपक बोलताना विचार करत जा आपण कोणाबद्दल बोलतोय ते…. मला माणसाचा चेहरा पाहून कळत त्याच्या मनात काय चालले आहे ते… .

दिपक : I am sorry, Madam!!!


ईथे घरी आल्यावर दिपक भलतीच चिड चीड करतो, त्याची चीड चीड बघून त्याचा रूम पार्टनर समर त्याच्या या वागणुकिच कारण विचारतो .. दिपक त्याला सकाळपासूनची सगळी घटना सांगतो…. आता तुच सांग “समर” का चिडचीड नको करु???

पण काही बोल समर एक नंबर फटाकडी आहे यार ती…. आम्ही यंगस्टर काय मेलो होतो जे हिने या बापाच्या वयाच्या माणसाशी लग्न केलं आणि सर….. God knows… ते कुठेत …… by the way तुझी आज बॅंकेत मिटींग होती ना ?? काय झालं तुझ्या प्रपोजलच???

समर : काही नाही… .better luck next time…..

समर राजपूत ज्याला मोठा बिझिनेस करायचाय…. येवढच नाही तर त्याला राठोड गृप अॉफ कंपनी आपल्या नावावर करायचीए…. By hook or by crook……


गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे खूपच नुकसान झाले होते.. .कंपनीचे शेअर्स बाजारात खूपच खाली घसरले होते… आता कंपनीला नवीन strategy ची गरज होती…. मीराने कंपनीची धूरा हातात सांभाळल्यावर लगेचच एक तातडीची बैठक बोलावली. सगळ्या सिनिअर ला हजर राहण्यास सांगितले…. प्रत्येक डिपार्टमेंटल हेड कडून कामाचा आढावा घेऊन काही चेंजेस सांगितले…. मिटींग संपल्यावर दिपक आणि पाठकला थांबवून घेतले…..

मीरा : आपण गेली कित्येक वर्षे तोच तो बिझिनेस चालू ठेवला आहे….. पण माझ्यामते आपण आता नवीन पर्याय शोधायला हवा… तुम्हाला काय वाटतं ???

पाठक : नवीन अस काय करणार मॅडम, आपण सगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहोत…..

दिपक : मॅडम आपण, लोकांकडून बिझिनेस प्रपोजल मागवू, म्हणजे idea मिळेल …..


पाठक : आता काय आपण लोकांकडून Idea घ्यायच्या…. “The Rathod Group of companies” आहे ही, हे विसरु नको….



दिपक : मला तस म्हणायच नव्हत सर…..


पाठक : आपण आधी आहे ती परिस्थिती सांभाळूया ….


मीरा : मला त्याच टेंशन नाही….(काहीसा विचार करून) दिपक एक काम करा , राठोड गृप कडून एक स्पर्धा आयोजित करा , नविन बिझिनेस प्रपोजल सादर करायला लावा, ज्यांच प्रपोजल उत्तम असेल त्याला आपण फायनान्स करू, सहा महिन्यात स्कोप वाढला तर पार्टनरशिप करु.. .


दिपक : Great idea, “Mam”…. मी लगेच कामाला लागतो आणि या स्पर्धेसाठीचे नियम, अटी व पात्रता पूर्ण डाटा तुम्हाला ईमेल करतो….

मीरा : Good, कामाला लागा.. .आणि Mr. पाठक तुम्ही यात लक्ष नका घालू , तो करेल मॅनेज सगळ…..

you may go now….


बाहेर आल्यावर पाठक दिपकला त्याच्या या सल्ल्याबद्दल त्याची कान उघडणी करतात… तुला काय गरज होती फालतू idea देण्याची… जास्त पुढे पुढे करु नकोस… Just stay in your limits…..

दिपक काही न बोलता मुकाट्याने कामाला सुरुवात करतो…..

(रात्री घरी आल्या आल्या)


दिपक : अरे साल्या … कामाला लाग. . तुझ्यासाठी कमाल opportunity आलीये… हि स्पर्धा तुच जिंकावी भावा….. पार्टी तो बनती हे मेरे यार। (आणि तो स्पर्धेबद्दल समरला सांगतो) …..

दोघेही पार्टी करायला घराच्या बाहेर पडतात…. बाहेर पार्टी करून घरी येत असताना त्यांची बाईक खराब होते . मग ते दोघे पायीच चालत येत असतात.. .

(दिपकला दारु जरा जास्तच चडते, किंबहुना त्याला झेपत नाही अस म्हटल तरी चालेल)

दिपक : यारररर सम्या!!! तु हि बाईक विकून टाक यार, नेहमी टांग देते….

समर : हो हो.. . आधी सावर स्वतःला…. कशाला पितो रे येवढी?? ?


दिपक : मी कुठे प्यायलो?? फक्त विस्कीचे दोन………

समर : अरे सावर स्वतःला. ..

समर दिपकला पकडणार तोच समोरून येणाऱ्या गाडीला दिपक धडकतो … ड्रायवरने वेळीच ब्रेक लावल्याने अपघात टळला.. गाडीतून तावातावाने एक मुलगी बाहेर येते.. .. हलक्या गुलाबी रंगाची साडी, काळ्या रंगाचा चकाकणारा स्लीवलेस ब्लाऊज, कानात खड्याचे कानातले, हातात नाजूक डायमंडचा कडा, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक…. (समरची आणि तिची नजरभेट झाली)

Useless ….. कळत नाही का समोरून गाडी येतेय ते???

दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालता…(ती अजूनच चिडते )


समर एक वेगळाच अटीटयुड दाखवून काहीच न बोलता दिपकला उचलायला जातो.. .

ती : काही manners नावाची गोष्ट आहे की नाही, चुका करून सुद्धा attitude किती??? ती सरळ जाउन गाडीत बसते. तोच तिच लक्ष दिपकवर जात… ती खाली उतरून मदत करायला जाते…

समर तिची मदत नाकारतो आणि टॅक्सी थांबवून दिपकला घरी घेऊन येतो….


सकाळी दिपकला उठायला उशिर होतो, तो घाईतच तयारी करून आॅफीसला निघतो…. समर त्याला नाश्त्याला थांबवतो पण तो उशिर झाल्यामुळे निघतो….

अॉफीसमध्ये पोहचल्यावर निरोप मिळतो ताबडतोब मॅडमच्या केबीनमध्ये हजर राहण्याचा…..




मीरा : दिपक आजचा माझा शेड्यूल लाइन अप करा आणि मला आपल्या नवीन प्रोजेक्टचे अपडेट द्या….


दिपक : (आश्चर्याने) फक्त एवढंच????


मीरा : हो…… का??? अजूनकाही अपेक्षित होतं????


दिपक : नाही…. काही नाही…. .(मनात म्हणतो वाचलो बुवा)

मीरा : “एक मिनिट Mr. दिपक” सिनियर ने अस उशिरा अॉफीस मध्ये येण शोभत नाही…..

(आपल्या लॅपटॉपवर डोक घालत म्हणाली)… आपल्याला जेवढी झेपते तेवढीच घ्यावी….. (मनातल हसू न दाखवता)


दिपक : अ…. हा…. (गोंधळून बाहेर येतो) च्यायला त्यादिवशीसारख आज पण हिने मनातल ओळखल आणि हिला कस माहीत की काल मला जास्त झालेली….

(तो विचार करत बाहेर पडला)


दिपक एक फाइल घरीच विसरतो म्हणून समर ती फाईल घेऊन दिपकच्या आॅफीसमध्ये येतो…. तो रिसेप्शनला विचारून मागे वळतो तोच त्याची टक्कर मागून येणाऱ्या मीराला लागते ….. मीरा काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजतो आणि समरला राग देत निघून जाते…..


दिपकला येण्यास उशीर असतो म्हणून समर फाईल रिसेप्शनला देऊन निघून जातो….


दुपारी समर एका बँकेत जातो त्याच्या बिझिनेस प्रपोजल संबधी मिटींग असते…. मिटिंग संपवून तो निघतो आणि लिफ्टची वाट बघत असतो…. मागून मीरासुद्धा येते…. दोघेही लिफ्टमध्ये चढतात आत already दोनतीन जण असतात… लिफ्ट अकराव्या मजल्यावर आल्यावर अजून गर्दी जमा होते…लंच टाईम झाल्यामुळेच सगळे एकत्र निघाले असतात…



आता त्या गर्दीचा जरा त्रास व्हायला लागतो मीराला…. ती अजून मागे सरकते तर मागे समर असतो… पुढेही पुरुषमंडळी आणि मागे हा…. तिला खूप अवघडल्यासारखे होते….



दहाव्या मजल्यावर आली तरी गर्दी काही कमी होत नाही, समरला तिची घुसमट कळते तो तिला मागे जागा देउन पुढून येणारा लोढ स्वतःच्या अंगावर घेतो आणि समोर मीरा…



मीराला त्याच प्रोटेक्ट करण अजिबात नाही आवडल…. तिला एक युक्ती सुचते, ती उलटी येण्याच नाटक करते तस अकराव्या मजल्यावर सगळी गर्दी भरभर उतरते……




आता लिफ्टमध्ये फक्त मीरा आणि समर…. दोघेही एकमेकांकडे चोर नजरेने बघत गालातल्या गालात हसतात…. लिफ्ट आठव्या माळ्यावर येताच बंद पडते…. कोणीच कोणाशी बोलत नाही…. त्यांचा “ego” मध्ये येत असावा…. तासाभराने लिफ्ट परत सुरू होते….




इमारतीच्या आवारात येताच समोरून दोन इसम बाईकवरून जाताना मीरावर गोळी झाडतात, हे लक्षात येताच समर तिला मागे खेचतो आणि तोल जाऊन तो खाली पडतो….. तिथे एकच गर्दी जमा होते….मीरा थोडक्यात बचावते…..




समर : Are you ok???




मीरा : ya… I am fine…. तु ठिक आहेस ना????




समर : Hmm… . I am OK….




थोड्याच वेळात पोलिस तिथे येतात, सगळी छानबीन करून मीराला, गार्डसोबत ठेवण्याचा सल्ला देतात आणि समरला शाबासकी देतात. ….. मीरासुद्धा समर चे आभार मानून निघते …….




काही दिवसांनी राठोड गृपची बिझिनेस प्रपोजलची स्पर्धा सुरू होते…. वेगवेगळे हजारो अर्ज येतात, त्यात फायनल पाच सिलेक्ट होतात…. या पाच अर्जात समरही असतो. आता या पाचही जणांची मुलाखत स्वतः मीरा घेते ….. शेवटी फायनल विजेता घोषित केला जातो…. तो विजेता समर असतो…..




समरच बिझिनेस करायच स्वप्न पूर्ण होत आणि आता तो पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करतो……




आज त्याच्यामुळे राठोड गृप ब्युटी प्रोडक्टसमध्ये आपल नशिब आजमवनार… . कोणी विचारही केला नव्हता की राठोड गृप या बिझिनेस क्षेत्रात प्रवेश करेल…. सगळ्यांनी मीराला मूर्ख ठरवल पण मीराला पूर्ण खात्री होती की यात यश नक्की मिळणार……




सहा महिन्यांनंतर खरोखरच समरची कल्पना आणि मेहनत फळाला आली आणि राठोड गृपसोबत स्पर्धेच्या अटीप्रमाणे पार्टनरशिप साईन झाली….. आणि बघता बघता बिझिनेस चांगलाच वाढला…. कंपनीचे शेअर्स बाजारात परत वाढले….




दिपक : (दारावर नॉक करत) मी आत येऊ का????




मीरा : ohhhh, please come…..




दिपक : मॅम…. .आतातर तुमच्या मनासारख झाल मग आता आपण हे घोषित करू शकतो की समरच या कंपनीचा वारस आहे….




मीरा : नाही दिपक अजून वेळ आहे…. राठोड सरांचा खरा गुन्हेगार बाकी आहे आणि अजून समरला खूप काही “achieve ” करायच आहे… यावेळेस सत्य बाहेर आल्यास त्याच्या जिवाला धोका आहे … आपली दोन वर्षाची मेहनत वाया जाईल जी आपण समरला शोधण्यापासून त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी घेतली….




दिपक : But मीरा समर…..?




मीरा : राठोड सरांनी त्याच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळे त्याला बेदखल केल होत पण आता तो पूर्णपणे सुधारला आहे आणि आता तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय….. त्याला या प्रोपर्टीचा अजिबात मोह नाही, नाहीतर याआधीच त्याने ते सरळ काबीज केल असत…. तो वारस म्हणून हक्क दाखवू शकला असता….




दिपक : हममम्

मीरा : bye the way .. . आपली नविन माॅडल ” रिया” कधी येतेय…


दिपक : येईलच इतक्यात……


रिया : Think of the devil?? & devil is here….


मीरा : (अगदी आनंदाने मीठी मारून) welcome back dear…. आत्ता येतेयस तू???


रिया : after all एवढ्या मोठ्या कंपनीची मॉडेलिंग आॅफर कोण नाकारेल????

मीरा : ओळख करुन देते दिपक ही माझी बाल मैत्रिण.. .आम्ही लंदनला एकत्र होतो….

रिया : Hiii दिपक….


(दिपक पूर्ता स्वप्ननगरीत हरवला)

मीरा : (त्याला चिमटा काढून स्वप्नातून उठवते) हिची समरशी ओळख करून दे आणि बाकीचे काम पूर्ण करुन घे….



दिपक : हो हो….




इथे मीरा पोलिसांशी काही पुरावे सापडले का यासंबंधी चौकशी करते….

आमचे प्रयत्न सुरू आहेत येवढच उत्तर तिला मिळत ….




समरच्या नवीन प्रॉडक्ट लाँचसाठी रिया मॉडेलिंग करणार असते…. बराचसा वेळ ते कामानिमित्त एकत्रच असतात,

याच दरम्यान समर आणि रियाची जवळीक वाढते…. मीराला ते जाणवत, ती नेहमी त्या दोघांना चोरून बघत असते…… त्याचं तिच्या जवळ असणं, तिच त्याच्याशी लगट करन आता मीराला चीड देत होत…. समरने मीराची चिडचीड बरोबर ओळखली… त्याला कळल होत की मीरा त्याच्यात गुतंली आहे ते पण तो स्वतः व्यक्त होत नव्हता…. किंबहुना त्याला ते मान्य नव्हत…..




असेच काही दिवसांनी रियाचा वाढदिवस आला…. रियाने तिच्या घरी बर्थडे पार्टी ठेवली होती आणि सगळ्यांना बोलवल होत…. रियाच घर छान समुद्रकिनारी होत… संध्याकाळी पार्टी सुरू झाली….

लाल रंगाचा वनपिस ड्रेस घालून मीरा आली होती… कानात लांब चैनवाले कानातले घातले होते आणि केसांचा झुबका डोक्यावर बांधला होता त्यात कमी होती ती, तिच्या smile ची…, कारण पार्टीत आल्यापासून तिची नजर समरला शोधत होती….




थोड्यावेळात दिपक आणि समर आले… समरची आणि मीराची फक्त नजरभेट झाली…..




समर : (रियाला) hey gorgeous, happy birthday…. This is for the most beautiful lady in the world….. (गिफ्ट दिल आणि त्याची नजर मीराला शोधू लागली )




रिया : ohhh….. thank you so much flutter…. (त्याचा गाल ओढत)




दिपक : अरे!!! केक कधी कापणार???? Let’s cut the cake……




सगळे केक कट करण्यासाठी आणि बर्थडे गर्लला चिअर करायला जमा झाले…..




Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Riya…. Happy birthday to you…..




समर रियाला केक भरवतो, चुकून थोडासा केक रियाच्या गालावर लागतो, समर मीराकडे बगत रियाच्या गालावरचा केक स्वतःच्या ओठांनी उचलून खातो…. मीरा हे सगळ बघत असते पण राग आवरून गप्प राहते…..




म्युझिक चालू होत आणि समर रियाला घेऊन डान्स फ्लोअरवर जातो….




दिपक येऊन मीराला डान्ससाठी विचारतो आणि ते दोघेही एकत्र जातात… डान्स सूरू असताना समर आणि मीराची नजर मात्र एकमेकांवर होती…. प्रेम दोघांचही होत पण कबूल मात्र करत नव्हते….




पार्टनर चेंजिगचा डान्स सुरू झाला… दहा कपल्स डान्स करत होते, पार्टनर बदली होऊन समर आणि मीरा एकमेकांसमोर आले, पण समर डान्स फ्लोअरवरून निघून बार काउंटरवर गेला ..

त्याने एक पेग मारला नी, रियासोबत परत नाचू लागला…..




ईथे मीराला खूप राग आला होता ती पण बार काऊंटरवर गेली आणि रागाच्या भरात असताना नकळत पाच ते सहा पेग मारुन घराच्या बाहेर पडली, तिला वाटेत दिपकने अडवले त्याला काहीस कारण देऊन ती निघाली…. समर हे लांबूनच पाहत होता……तो तिच्या मागे मागे गेला…..




मीरा समुद्र किनारी फिरत होती, पाण्याच्या लाटेबरोबर आत शिरत चालली होती, पाणी ढोपराच्या वर चढत होत इतक्यात तिचा तोल गेला तोच समरने तिला मागून कमरेला धरून स्वतःकडे ओढल….. तिचा स्पर्श होताच तो तिच्यात हरवून गेला, तिच्या कडे एकटक पाहत बसला…. त्या चांदण्या रात्रीत ती खूपच सुंदर दिसत होती…. कदाचित त्याच्या मनातल्या भावनाना वाट मोकळी झाली होती, त्याने तिला कमरेत हात घालून अजून जवळ ओढल, तिचे बांधलेले केस मोकळे केले, त्या मोकळ्या केसात आपला उजवा हात फिरवत तो तिच्या ओठांजवळ गेला तीही त्याला भरल्या नजरेने पाहत होती…. त्यावेळेस कोणाचाही विरोध नव्हता, दोघेही त्या क्षणात हरवू पाहत होते, पण अचानक समर ने मीराला दूर लोटले……



त्यावेळेस कोणाचाही विरोध नव्हता पण अचानक समर ने मीराला दूर लोटले…

दोघेही आपापल्या विचारात मागे झाले, मीरा पाण्यातून बाहेर पडून परत घराच्या दिशेने निघाली तोच तिला घिरकी आली, समरच लक्ष जाताच त्याने तिला सावरली…. मीरा almost शुद्ध हरपून बसली होती,




सकाळ झाली तेव्हा मीरा रियाच्याच घरी होती, इतक्यात रिया तिच्यासाठी कोरा चहा घेऊन येते, रात्री बेशुद्धावस्थेत समरच तिला घेऊन येतो हे रियाकडून मीराला समजते …..




रिया : काय ग??? काल अचानक “drink and all” खरच चालू केलीस कि….????




मीरा : shut up….. चल मला उशीर होतोय….




रिया : हमममम….. Next week conference आहे… जाणार आहेस ना???? समर पण आहेच की सोबत….




मीरा : ना…. दिपकला पाठवीन…..




रिया : Why?? चांगली सोबत आहे… मस्त संधी आहे…. तेवढच समजून घ्याल तुम्ही एकमेकांना ….. आणि इथे मी दिपकला….. (नजर चोरत)




मीरा : अच्छाजी…. तुला समजून घ्यायचय दिपकला…. हमम् कबसे चल रहा हे, ये सब????

(मीरा काहीसा विचार करून….) रिया…. I am totally confused yarrrr….. समरच्या मनात काय चालले आहे याचा नेम नाही लागत आहे….. मी त्याच्या जवळ असूनही दूर असल्यासारखी आहे…..I really don’t know…..




रिया : मला तरी वाटत तुझ जाण गरजेचं आहे कंपनीसाठी तरी आणि अंकलना पण भेटून ये…..




मीरा : I think you’re right…. Bt only for Uncle…




(मीरा आणि समर लंडनला कंपनीच्या महत्वाच्या कामासाठी रवाना होतात)




लंदनला कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये दोघेही थांबतात, छान थंडगार वातावरणात मीरा सुखावून जाते…




लंडनमध्येही मीरा आणि समर कामाव्यतिरिक्त काहीही बोलत नाही…




एक दिवस मीरा मिटींग संपल्यावर बाहेर निघून जाते… तिला परत यायला बराच उशीर होतो, मीरा अजून आली नाही म्हणून समर घराबाहेर पडतो…




वाटेत एक ठिकाणी मीरा दिसते, तिची गाडी रस्त्यात बंद पडते आणि म्हणून तिला उशीर झालेला असतो…..




समर पुढे जाणार तेवढ्यात काही कॉलेज स्टुडंट तिला तिची गाडी दुरुस्त करायला मदत करतात, गाडी दूरुस्तही होते पण पुढच्याच क्षणाला ते लोक तिला एकटीला पाहून, तिची छेड काढत तिला सतवायला लागतात….

समर पुढे जाऊन त्यांना दमदाटी करत एकाच्या कानशिलात लगावतो, तशी ती मूल दूर जातात… मीरा मनोमन खूश होऊन समरला thanks म्हणते….

समर : No need to thanks…. तुझ्या जागी कोणीही असत तरी मी हेच केल असत….


मीराला वाटत तो आतातरी कबुल करेल की, त्याला मीरा आवडते आणि त्याच तिच्यावर प्रेम आहे….. पण समरच बोलण ऐकून तिला खूप राग येतो आणि ती ताडकन त्या मुलांच्या दिशेने जाते जे मगाशी तिची छेड काढत होते…

त्या मुलांना एक एक किक मारून खाली पाडते…. समरला बघून ती त्या मुलांना अजून मारते… समर आश्चर्याने तिला बघत असतो.. ..




मीरा : (रागाने) Look Mr. Samar… I really don’t need your help…. I can protect myself….


तिची ती मुलांसोबतची लढत बघून समरला हा तर अंदाज आलाच कि ती well trained कराटे चॅम्पियन आहे….. पण तो अजूनही तसाच खडूस with attitude……


समर चालायला लागतो…. मीरा गाडी सुरू करून त्याच्या पुढे उभी करते असं दोनदा झाल्यावर तिसऱ्यांदा तो गाडीत बसतो…..




मीरा गाडी स्टार्ट करते, हळूहळू गाडीचा वेग वाढवत जाते, समर हे सगळं बघत असतो आणि एका क्षणाला येऊन तो मीराला गाडी थांबवण्यास सांगतो पण मीरा अजूनच रागात गाडी चालवत असते…




गाडी घरापर्यंत पोहचते, तरी मीरा गाडीचा वेग कमी करत नाही, आणि गाडी समोर आदळणार इतक्यात मीरा गाडीचा ब्रेक दाबते…. गाडी थांबल्यावर समर मीराला बाहेर खेचून एक कानाखाली मारतो आणि जायला लागतो….




मीरा : I love you Samar…. Why don’t you understand???? तुला जर माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर का माझी इतकी काळजी घेतोस?? बोल ना???




समर काहीच बोलत नाही हे बघून मीरा घरात जायला निघते…..




इथे समर रागाच्या भरात गाडीच्या काचेवर जोरदार पंच मारतो… काच फूटल्याचा आवाज ऐकून मीरा मागे वळून बघते तर समरच्या हातातून रक्त वाहत असत…. मीरा पुढे निघून जाते….





समर आत जाऊन बघतो तर मीरा First aid kit घेऊन बसलेली असते, समर गप्पपणे जाऊन तिच्या बाजूच्या सोफ्यावर बसतो ….. मीरासुद्धा शांतपणे त्याला मलमपट्टी करते आणि “sorry” बोलून रूममध्ये निघून जाते…… ती रात्रभर रडत बसते, रडता रडता कधी झोप लागते हे तिला कळलंच नाही……




सकाळी उठल्यावर मीरा कॉफीसाठी मेडला हाक मारते पण कोणीच हाक देत नाही म्हणून ती स्वतः किचनमध्ये जाण्यास निघते… .रूमचं दार उघडताच तिच्या पायाशी एक सफेद फुलांचा गुच्छ आणि एक ग्रिटींग मिळत….. त्यावर “sorry ” लिहीलेलं असतं, ती ते रागात फाडून टाकते आणि फूल फेकून देते…..




मेडला हाका मारतच हॉलमध्ये येते तिथे तिला टी-पॉयवर पिवळ्या फुलांचा गुच्छ मिळतो आणि ग्रिटींगसुद्धा…. परत “sorry ” चा मेसेज….. ती ते ग्रिटींगपण फाडून टाकते आणि परत फूलही फेकून देते…..




किचनमध्ये गेल्यावर पण तेच…. डायनिंग टेबलवर छान कॉफी ट्रे सजवलेला असतो ….. लिलीची फूल कॉफी कपच्या बाजूला ठेवलेली असतात….. मीरा कप उचलायला जाते तेव्हा तिच लक्ष कॉफीच्या फेसावर लिहीलेल्या “sorry ” कडे जात…. ती कॉफी न पिताच फूल परत फेकून निघते, बाथरूममध्ये शॉवर घेताना विचार करते…… “मी जरा अती नाही ना केल….. उगाच आपण ती फूल फेकून दिली, कार्डस पण फाडून टाकले”…… एक मन सांगत होत की नाही .. . जे केल ते बरोबरच केल….. मला नाही बोलायच त्याच्या बरोबर…. .




आज काहीच मिटींग नसल्याने ती अगदी निवांत होती….. इतक्यात मेड तिच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते आणि एक सुंदर पॅकिंग केलल गिफ्ट, रेड रोझेस चा गुच्छ आणि मोठ ग्रिटींग कार्ड तिला देते ……




मीरा काहीच प्रतिक्रिया न देता गप्प नाश्ता करुन घेते….. मनातून तर खूप ईच्छा असते ते गिफ्ट पाहण्याची पण …. राग मध्ये येतो……




ती रियाला फोन करून रात्रीपासून ते आत्तापर्यंतचा सगळा प्रकार सांगते……




रिया : (खूप exited होऊन) याररर जाम लकी आहेस ….. नको येवढा भाव खाऊस….. हायययय !!! How romantic …




मीरा : My foot ….. Romantic म्हणे…




रिया : तुलाही हेच हव होत…. मग आता काय झालं.. ..काश दिपकला अस काही सुचेल …..




मीरा : तो फक्त सॉरी म्हणतोय …. अजूनही काही स्पष्ट बोलत नाहीये….. आणि हो स्वतःच्या तोंडुन सॉरी नाही म्हणाला ……




रिया : OK….. पण तरीही एकदा विचार कर… We never know पुढे काय होईल…..




मीरा फोन ठेवून देते आणि एकटक त्या गिफ्ट व गुलाबाच्या फुलांकडे पाहत बसते….. शेवटी न राहवून ती आधी गुलाबाची फुलं हातात घेते.. ..डोळे बंद करून मन भरून त्यांचा सुगंध घेते…. डोळे उघडते तोपर्यंत तिचा राग बऱ्यापैकी निवळलेला असतो….. आता ती, ते ग्रिटींग वाचायला घेते,


Dear, मीरा…..

      

      I am extremely sorry…..

Please give me a one chance to prove myself….. माझ्या मनातलं ओळखायला मला थोडा वेळ लागला, पण काय करू मी असाच आहे गं…..

तुझा राग गेला असेल आणि अजूनही तुझ्या मनात माझ्यासाठी जागा असेल तर…..

Be ready, sharp 5 pm…. I am waiting for you….. Hope so, की हि गुलाबांची फूले आणि ड्रेस तुला आवडेल……


                      – समर




मीरा भरल्या डोळ्यांनी वारंवार तेच तेच वाचत बसते… .ती घाईने ते गिफ्ट उघडते, त्यात बेबी पिंक कलरचा गाऊन होता …. खूपच सुंदर होता गाऊन….. मीरा आनंदाने बेभान

होऊन जाते….. मनात गाण गुणगुणत ती गुलाबाची फुलं घेऊन नाचायला लागते…..


“अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख़्याल है क्या कहूं प्यार में दीवानों जैसा हाल है दीवानों जैसा हाल है …”




ती फूलं स्वतःवर उडवून, ती स्वतःला बेडवर झोकून देते….आणि रियाला फोन करते …

मीरा : रिया … रिया…. रिया. …. (आनंदाच्या भरात)


रिया : Now what ??? (आश्चर्याने)


मीरा : you are too good, म्हणून मी तुझ ऐकते… .

मी आणि समर डेटवर चालोय……


रिया : ohhhh Wow!! ….. Wish you a good luck… आपण नंतर बोलु आता खूप काम आहेत, please…




मीरा : Ok ….. Bye…




मीरा संध्याकाळी पाच वाजता तयार होऊन वाट बघत असते….




ड्रायव्हर गाडी घेऊन येतो तिला समर ने दिलेल कार्ड देतो….




मीरा कार्ड वाचते. .. “come fast, I am waiting ”




ड्रायव्हर निघायचे का गाडी रेडी आहे अस विचारतो… .




मीरा होकार देत गाडीजवळ जाते…. गाडीच दार उघडते तर सीटवर पुन्हा रेड रोज च बुके असतो… . मीरा खूप खुश होते आणि exited सुद्धा …..




मीराला घेऊन गाडी एका चर्चजवळ थांबते…. मीरा गाडीतून उतरते…… एक लहान मुलगी तिच्या जवळ येऊन तिला परत एक गुलाबाच फूल देते आणि मीराचा हात धरून चर्चमध्ये एका ठिकाणी येऊन तिला सोडून निघून जाते ….




मीरा फक्त आश्चर्याने बघत असते, समोर समर पाठमोरा उभा असतो…. मीराच्या काळजाची धडधड वाढायला लागते …..




समर मागे वळून आपला हात पुढे करतो, मीरा फक्त एकटक त्याला बघत बसते…. ती अलगद आपला हात त्याच्या हातात देते… तो तिला सोबत घेऊन प्रेअर करतो आणि मग तिच्यासमोर गुडघे टेकून डायमंड रिंग पुढे करतो…. पण तो अजूनही गप्पच…. मीरा फक्त आश्चर्याने बघत असते की हा आताही गप्पच ….




समर : मीरा….. माझी होशील???? कायमची?? ??




मीरा : (फक्त मान डोलावून होकार देते) हममम्




समर दोन्ही हात पसरवून तिला आपल्या मिठीत घेतो. सगळे क्षण जणूकाही त्यांच्यासाठी इथेच थांबले…..




थोड्यावेळाने टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला…. तसे दोघेही भानावर आले.. . आसपास गर्दी बघून मीरा पूर्ती लाजली…. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला…




मीरा गर्दीतून वाट काढत बाहेर पडत होती, अगदी लाजत. .. मनात आता गाणं घुमायला लागल होत तिच्या….. 




समरही तिच्या मागोमाग बाहेर पडला…. दोघेही खूप खुश होते…. तेथून निघून रात्रीचे जेवण बाहेरच करून घरी परतले….. इथे अजून सरप्राइज बाकी होते…. .




गाडीतून उतरताच समोर गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या …. सुंदर, सुगंधित मेणाच्या दिव्यांनी घर उजळून निघाले होते …. समर खरच इतका रोमँटिक असेल अस त्याच्या खडूस स्वभावावरुन अजिबात वाटत नव्हतं….




मीरा फक्त त्याच्यात हरवून जात होती…. तिने एकदाही हा विचार नाही केला कि समरमध्ये अचानक हा बदल कसा झाला…. ती फक्त त्याच्या प्रेमात वेडी झाली होती ….. ते क्षण मनभरून अनुभवत होती….




समरने तिला जवळ ओढले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले…. मीराही त्याच्यात वाहवत गेली…. ती रात्र दोघांच्या प्रेम वर्षावात गेली…..




आपली आढवडाभराची लंडन टूर संपवून एकदाचे दोघे भारतात परतले….


आता कंपनीला नवीन नवीन प्रॉजेक्ट मिळायला सुरुवात झाली होती…. इथे कामाचा व्याप वाढत चालला होता…. समरने स्वतःची कंपनी राठोड गृप मध्ये समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली….. त्याने फायदा दोन्ही कंपन्यांना होणार होता…. मीरानेही होकार देऊन procedure पूर्ण करण्यास सांगितली….




असाच कामामध्ये काही दिवस निघून गेले…. मीराची तब्येत ठीक नसल्याने ती आज घरीच थांबणार होती….. तिने तसा निरोपही आॅफीसमध्ये दिला होता ….




दु़पारून मीराला दिपकचा फोन येतो …..




दिपक : मीरा ताबडतोब अॉफिसला निघून ये…..




मीरा : काय झालंय??? Is it necessary ???




दिपक : मीरा please…. तु आधी इकडे ये. .. तुला सगळं कळेल…. .




मीरा : OK…. ok …. मी येतेय… ..




दिपकच्या आवाजात आज वेगळाच गोंधळ होता…. हे ओळखून मीरा लगबगीने आॅफिसला निघाली……




गाडी आॅफीसच्या गेटवरच थांबली…. आजूबाजूला पत्रकारांची गर्दी होती.. .. मीराला कसलाच अंदाज येत नव्हता ती गाडीतच बसून होती ….




दिपक येताच ती गाडीतून उतरली.. . तसे पत्रकार तिच्या भोवती गोळा झाले.. . दिपक आणि गार्डने मीराला वाट मोकळी करत आत नेले. …




मीरा : दिपक what happened?? ? काय चाललंय हे????




दिपक : सगळं सांगतो तु आधी केबिन मध्ये चल…..




मीरा : तु मला आधी सांगशिल का??? काय झालंय????




दिपक : तु चल ना……




मीरा आणि दिपक केबिनमध्ये जातात…. समोर समर बॉसच्या खुर्चीवर बसलेला असतो …..




(मीरा आणि दिपकला आत येताना बघून)




समर : नॉक करून आत यायच असत… Manners…. विसरलात का????




मीरा : ( आश्चर्याने) समर… ???




समर : समर नाही…. ईथे सर ….




इतक्यात पोलिस येतात…..




Mrs. मीरा राठोड…., राठोड गृपचे सर्वेसर्वा Mr. राठोड यांचे अपहरण आणि कंपनीचे खोटे मालकी हक्क दाखवण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत…. Please cooperate…..




मीरा फक्त शांतपणे समरला बघत राहते….




पोलिस तिला घेऊन जातात…..




दिपक समरला विनंती करतो की त्याने हे सगळं थांबवाव… पण समर त्याच काहीच ऐकून घेत नाही….. मग दिपकही त्याला समजावत न बसता पोलिस स्टेशनला निघून जातो….




इथे मीराची चौकशी सुरू होते….




पोलिस : Mrs. राठोड , पाठकने आम्हाला तुमच्या बद्दल सगळं सांगितले आहे, तो माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार आहे, पण Mr. राठोड यांना तुम्ही कुठे लपवून ठेवले आहे, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. … तुम्ही ते निमूटपणे सांगा अन्यथा????




इतक्यात दिपक तिथे वकिलांना घेऊन येतो…..




दिपक : Inspector साहेब… तुम्ही मीराला अस torture नाही करू शकत…. हे मीराच जामीन पत्र…..




पोलिस : तुम्हा मोठ्या लोकांच हे बर असत…. जामीन लगेच तयार होतो… काही formalities आहेत.. ते पूर्ण करा आणि मग घेऊन जा…..




काही वेळाने दिपक आणि मीरा पोलिस स्टेशनमधून बाहेर पडतात…. बाहेर पत्रकार वाटच बघत असतात … कोणाला काहीही उत्तर न देता मीरा आणि दिपक तिथुन निघतात….




थोड्या अंतरावर दिपक ड्रायव्हरला उतरवून स्वतः गाडी चालवतो…. मीराला तो रियाच्या घरी घेऊन येतो…




मीरा काही बोलणार इतक्यात दिपक तिला सांगायला सुरुवात करतो.




दिपक : मीरा……समरची कंपनी आपल्या राठोड गृप मध्ये समाविष्ट करण्यासाठी जे कागदपत्रे तयार केले गेले, ते खोटे होते, समरने तुझी खोटी सही करून राठोड गृप स्वतःच्या नावे केली…..आपण समरला सगळ खर सांगून टाकू …..




मीरा : त्याने काय होणार आहे, आपला पुरावाच बेशुद्धावस्थेत आहे….. पाठकला हे माहीत आहे की मी फक्त या प्रोपर्टीची केअर टेकर आहे तरी त्याने समरला सांगितले नाही…. त्याने मुद्दाम समरला हे सांगितलं की राठोड यांच मी अपहरण केलय…




दिपक : पण मग पाठकला कस कळाल की Mr. राठोड कुठे आहेत हे तुला माहीत आहे, आणि तु अपहरण केल अस का सांगितलं ….. त्यांना आपला प्लॅन नाही ना कळला???




मीरा : दिपक…. Mr. राठोड शुद्धीवर येईपर्यंत कोणालाही कळता कामा नये कि ते कुठेत….. Please be careful… त्यांच्या जीवाला धोका आहे अजून….




दिपक : पण समर????




मीराला परत अस्वस्थ वाटायला लागते, दिपक तिची अवस्था पाहून तिला आराम करण्याचा सल्ला देतो…. तिच्यासाठी काही औषधे मिळतात का ते, तो बघत असताना त्याला डेस्कवर एक फाइल सापडते…. फाइल वाचून तो मीराजवळ जातो….




दिपक : (मीराला फाइल दाखवत) मीरा??? हे काय आहे??? Are you pregnant ??? हे कधी आणि कस??? कोण आहे तो मीरा???




मीरा : (खिन्न नजरेने) I am in love with समर…




दिपक : तरी सुद्धा आज त्याने, तुझ्यासोबत अस वागाव??? मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो….




मीरा : No…. दिपक!! त्याला यातल काहिच माहित नाही आणि तु त्याला काहिच सांगणार नाही, चूक माझी होती… मीच त्याच्या प्रेमात वाहत गेले… त्यावेळेस मला त्याच्या नजरेत माझ्यासाठी प्रेम दिसल…




दिपक : पण मीरा… त्याला हे कळायला हवं…





थोड्यावेळाने तिथे समर येतो…. तो तिथे रियाला भेटायला येतो…. पण रिया काही कामामुळे लंडनला गेली आहे…. हे त्याला आता दिपककडून कळत….




(समर परत जातच असतो तेवढ्यात)




मीरा : समर….. एक मिनिट….. प्रॉपर्टी हवीच होती तर मागायची होती…. सर्वस्व दिल होत तुला, प्रॉपर्टीही दिली असती… फसवणूक कशासाठी????




समर : (मागे वळून) फसवणूक झाल्यावर कस वाटत हे कळण्यासाठी….. माझ्या बाबांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, खोटे कागदपत्रे बनवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलीस आणि त्यांना जेव्हा हे कळल तेव्हा तु त्यांच्यावर हल्ला केलास???




दिपक : हे सगळं खोटं आहे समर….




समर : तु तर काहीच बोलू नकोस…. माझा मित्र होतास ना हिला भेटायच्या आधी??? तुही हिला शामिल झालास आत्ता ?? ते तर नशिब की मीराच्या डेस्कमध्ये मला लंडनच्या हॉस्पिटलची फाइल सापडली आणि Dad चा पत्ता मिळाला…. मी पाठकला लंडनला रवाना केलय…. मीही आता तिथेच निघालोय….




(दिपक आणि मीरा आश्चर्याने बघत असतात, समर तिथुन निघून जातो…. )




मीरा ठप्प होऊन खाली बसते…. दिपक तिला सावरतो…. मीरा खूप रडायला लागते….. दिपक तिला थांबवत नाही, तीच मन मोकळं करू देतो…




मीरा : (पाणावलेले डोळे पुसत) दिपक तु आत्ताच्या आत्ता लंडनला नीघ…. पाठक तिथे पोहचला तर?????




दिपक : मी तुला अस सोडून नाही जाऊ शकत…..




(इतक्यात दिपकचा फोन वाजतो) हॅलो…..




फोनवरच संभाषण संपवून




दिपक : मीरा बँकेत ज्याने तुझ्यावर हल्ला केला होता तो माणूस पकडला गेला आणि पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत…. लवकरच तो कोणासाठी काम करत आहे हे कळेल….




मीरा : हमममम्…




(मीराच्या फोनची रिंग वाजते, समोरच्याच निरोप ऐकून ती फोन ठेवते)




मीरा : Mr. राठोड शुद्धीवर आलेत….. रियाचाच फोन होता…..




दिपक : “Thank God “…. ते शुद्धीवर आले…. आता पुढे काय???




मीरा काहीच बोलत नाही बेडरुममध्ये निघून जाते ….. तिला जास्त डिस्टर्ब न करता दिपक हॉलमध्येच झोपून जातो…..




इथे समर लंडनला पोहचला असून तो थेट हॉस्पिटलला रवाना झाला….. रिसेप्शनला चौकशी करून तो Mr. राठोड यांच्या स्पेशल रूममध्ये मोठ्या उत्साहाने गेला…..




आज कितीतरी वर्षांनी तो त्याच्या वडिलांना भेटणार होता, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेल्या यशाच कौतुक तो, त्याच्या बाबांकडून करून घ्यायला उत्सुक होता…. पण दार उघडून आत गेल्यावर त्याने पाहील…… पाठक बाजूच्या सोफ्यावर शांत बसलेला होता …. बेडवर कोणीतरी होत…. संपूर्ण चेहरा चादर ओढून झाकलेला होता…. ती चादर रक्ताने माखली होती….. समरच्या काळजात चर्ररर झाले…. तो तसाच मागच्या भिंतीला टेकून उभा राहिला….. आपल्या बाबांसोबतच्या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यांभोवती फिरु लागल्या…. आणि…. बाबा…… हा एकच हंबरडा त्याने फोडला…..तो धावत जाऊन त्या बेडला बिलगला…. Dad… Dad….बाबा…. बाबा उठाना मी नाही तुम्हाला ” Dad ” हाक मारणार….. बाबा उठाना…… बाबा……




इतक्यात समरच्या डोक्यावर हलका घाव बसतो, तो वळून बघतो तर पाठक मागे उभा असतो त्याचे दोन्ही हात वर करून……., त्याच्या हातात बंदूक असते…. आणि पाठक च्या मागे रिया उभी असते……, पाठकवर बंदूक ताणून………




समरला काही समजायच्या आधीच पोलिसही आत येतात….. त्यातले दोघेजण पाठक आणि त्याची बंदूक ताब्यात घेतात, त्यांच्यातला सीनिअर अॉफीसर रियाला सॅल्युट करतो….




रिया : Officer’s take it him away…. I will join you later….




पोलिस : OK Madam …. (आणि ते निघून जातात)




समर : (आश्चर्याने) रिया???? हे काय होत…. ??? ते पोलिस तुला एकदम सॅल्युट वैगरे???? आणि माझे बाबा????




रिया : Relax!!! Mr. राठोड एकदम ठीक आहेत…. बाहेर चल…. निवांत बसून बोलु ….




रिया आणि समर हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये येऊन बसतात….




समर : आतातरी सांगशील, की… हा सगळा काय प्रकार आहे???





रिया : (एक दिर्घ श्वास घेत) I am Riya Thakur…. Special Officer from “Crime Branch” …..




समर : What???? Crime Branch??? Special Officer????




रिया : हो…. हा माझा आणि मीराचाच प्लॅन होता….




अंकलनी म्हणजे Mr. राठोड यांनी त्यांच्यावर हमला झाला तेव्हा मीराला फोन केला होता…. पण काही कळायच्या आतच फोन कट झाला…. मीरा जेव्हा तिथे पोहचली तेव्हा अंकल तिला जखमी अवस्थेत आढळले…. बेशुद्ध होण्याआधी त्यांनी पाठकचे नाव घेतले….. तिथे तिला एक मोबाईल फोन सापडला त्यावर नुकताच एक फोन आला….. “काम झालं असेल तर मुंबईत निघून ये”…..




मीराने आधी त्याना अ‍ॅडमिट केले आणि मला घडलेला प्रकार सांगितला…. मग मी इथे त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सांभाळली आणि मीराने कंपनीची….. पण त्याआधी मी आमची माणसं कामाला लावून पाठक आणि अंकलच्या फॅमिलीची संपूर्ण माहिती काढली…..




अंकलची दूसरी पत्नी म्हणजे तुझी सावत्र आई ही हल्ल्याच्या दिवसापासूनच गायब होती…. ते दोघेही इथे फिरायला आले होते… योगायोगाने तिच नाव सुद्धा मीरा होत…. म्हणून आपल्या मीराला अंकलची वाईफ मीरा बनवून पाठवले…. तुझ्याबद्दल माहिती मिळवन थोड कठिण होत… एकतर तुला त्यांनी बेदखल केल होत…. तु इथे राहतही नव्हतास आणि तू त्यांची ओळख म्हणजे तुझ नाव “समर रजपूत राठोड” ऐवजी फक्त ” समर रजपूत ” अस लावत होतास…. लेकीन हमारे “crime branch ” वाले दिमागने तुम्हे धूंडही लिया |




समर फक्त आ… वाचून ऐकत होता, हे सगळं त्याच्या समजण्याच्या पलीकडे होत….




रिया पुढे सांगू लागली….




मीराने जेव्हा अॉफीसमध्ये प्रवेश केला तेव्हा पाठक जाम खूश होता… पहिल्याच दिवशी आमचा प्लॅन फेल होणार होता कारण मीराने स्वतःला केअर टेकर म्हणून सांगितले आणि तुझा शोध घेतला पाहिजे असे सुचविले तसा पाठकला संशय आला पण दिपक आत आला आणि विषय टळला….. दिपकला विश्वासात घेऊन मीराने त्यालाही या प्लॅन मध्ये शामिल केले…. हा… पण …दिपकला माझ्याबद्दल काही माहित नाहीये… त्याच्या स्पर्धेच्या कल्पनेमूळेच तुझी भेट झाली…. आमच्या सोबत नशिबाची साथ इतकी जोरदार होती की तुझा रूम पार्टनर नेमका दिपक होता….




कंपनीची खडानखडा माहिती दिपक कडून मिळत होती आमची एक टीम त्या मीराला शोधत होती….




समर : पण मग माझा पत्ता सापडलाच होता तर मला बाबांबद्दल का नाही सांगितलं???




रिया : (गोड हसून) कारण आमचा तुझ्यावरही संशय होता….




समर : म्हणजे????




रिया : प्रोपर्टीतून बेदखल केल होत…. मग त्याच प्रोपर्टीसाठी मुलगा बापावर हल्ला करू शकतो…. ही शक्यता नाकारता येत नव्हती…




समर : My God…. How… cheap…..??




रिया : “Cheap ” काय त्यात??? असे गुन्हे घडलेत…. मी जवळून पाहिले आहेत असे लोक….




समर : मग आतातरी विश्वास आहे का????




रिया : (परत तेच गोड हसून) तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठीच तर माझी entry झाली….त्याच निमित्ताने माझी मॉडलिंगची इच्छा पूर्ण झाली….. मी तुझ्यावर सतत पाळत ठेवून होते…. याच दरम्यान अंकलच्या तब्येतीत सुधारणा होत होती…. तुमच्या लंडन वारी दरम्यान मीरा अंकलनाच सायंकाळी भेटायला जायची… आणि तुमच प्रेमही त्याच दरम्यान फूलल….




समर : तो सुद्धा तुमचा प्लॅन होता म्हणा… (रागाने)




रिया : wait a minute…..(रियापण भडकते) तुमच प्रेम प्रकरण… आमच्या प्लॅनचा भाग नव्हता….. मीराच खरच तुझ्यावर खूप प्रेम आहे….. पण तुच तिला दगा दिलास…..




समर : नाही… म्हणजे…




रिया : असो…. आमच्या माणसांनी त्या गायब झालेल्या मीराला शोधून काढले…. तिच्याकडून आम्हाला अस कळाल की ज्याने तिला हे काम करण्यासाठी सांगितले तो पाठकचा माणूस होता….


पाठकने पार्टनरशिपच्या नावाखाली खूप फ्रॉड केले होते आणि आता तो संपूर्ण कंपनी गिळंकृत करण्याच्या तयारीत होता पण मीरा म्हणजे पाठकने जिला पाठवले होते ती, तुझ्या बाबांच्या चांगूलपणामूळे त्यांनाच पाठक विरूद्ध मदत करत होती….. अंकलवर जेव्हा हल्ला झाला तो त्या मीरासाठी होता….. तो तिच्या जुन्या वाईट काळातील दुशमनीतून झाला होता….. ते नंतर सिद्ध झाले….. त्यातून ती बचावली आणि अंकल जखमी झाले….




समर : मला बाबांना भेटायचं आहे…..




रिया : हमम्….. चल…..


दोघेही Mr. राठोड यांना भेटतात……



Mr. राठोड : समर….. बेटा…. (काकूळतीने)


समर : डॅड… (आपलीच जीभ चावत) बाबा….



रिया : चला अंकल…. मी निघते…. माझी इथली ड्युटी संपली…..

समर : बाबा… मी आता तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही….

Mr. राठोड : समर… तु पण आता मोठा businessmen झालास… रियाकडून सगळं समजल मला…. रिया आणि मीरा खूप हुशार मुली…

आपल्या शिमलाच्या आश्रमात शिकणाऱ्या मुली… तुझ्या आईला या दोघी खूप आवडायच्या…. ती नेहमी खास यांना भेटण्यासाठी यायची… त्यादिवशी मी चुकून मीराला फोन लावला, पण ती ताबडतोब धाउन आली माझ्यासाठी आणि दोघींनीही किती जिकरीचे काम केले…

आपला कोणताही जवळचा संबंध नसताना त्यांनी केवढी आपली मदत केली….पण मीरा कुठेय???? आज आली नाही इथे???

रिया : I don’t know Uncle …. ती निघून गेली….. आणि संबंध कसा नाही आमचा तुमच्याशी???? …..

आमच्या आश्रमाचे पालक आहात तुम्ही…




समर : (आश्चर्याने बघून….. ) म्हणजे??? कुठे गेली मीरा????


रिया : (समरकडे रागाने बघत) Bye bye Uncle….. मी निघते…


रिया बाहेर पडून जायला लागते…. समर तिच्या मागे मागे हाक मारत जातो….


समर : रिया थांब….. (तिचा हात पकडून) रिया…. मीरा कुठेय???



रिया : ती गेली….. आता कशासाठी हवी आहे ती???? तिला काहीच बोलू न देता, तु तिला अपराधी ठरवलस…. तीला साधी स्वतःची बाजूसुद्धा मांडू दिली नाहीस…..




समर : माझी चूक झाली रिया…. पण लंडनला जे काही झालं ते नाटक नव्हत…. मीरा खरचं मला खूप आवडते…. प्रेम आहे माझ तिच्यावर…… त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हते… तिथून आल्यावर पाठकमूळे माझी फसगत झाली….. मी मीरावर असा अविश्वास दाखवायला नको होता…. Please…. रिया…. मला सांग…. मीरा कुठेय????




रिया : समर…. मीरा…. pregnant आहे…




समर : काय??? पण… तिने मला का नाही सांगितलं????




रिया : ती तुला त्या दिवशी सांणारच होती पण …. … 


“What ever yarr ” जे झालं ते सोड…. जा मनव तिला…. शिमला!!!….. त्याच आश्रमात गेली आहे ती…. तोच आश्रम संभाळायला…..




समर : Thanks रिया….. (आनंदाने मीठी मारून)




समर निघाला आपल्या मीराला मनवायला…. तिला कायमच आपल करायला……




समाप्त..




(सदर कथेच्या लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा शेअर करायची असल्यास नावासकट शेअर करावी.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल )


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror