Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vrushali Thakur

Tragedy

5.0  

Vrushali Thakur

Tragedy

भरकटलेली

भरकटलेली

25 mins
2.0K


ती तिच्या आईबापाला झालेली चौथी मुलगी. अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या त्याच्या घरी वंशाच्या दिव्याच्या नादात पणत्यांची रांग लावली होती.आधीच घरी दारिद्र्य, मोलमजुरीवर चालणार पोट,त्यात सततच्या बाळंतपनामुळे तिची आईचा वाढता अशक्तपणा,तिची काम करण्याची असमर्थता.बापाच्या कमाईचा पैसा दारू आणि जुगारावर उधळून संपला तरच घरी यायचा मग उपवासाचीच संगत जास्त.आपल्या पोटाला आधार मिळावा तर आपले अनवाणी पाय झिजवावेच लागतील हे सत्य त्या पोरींनी अगदी कोवळ्या वयातच स्वीकारल होत.


पोटातल्या भुकेच्या वणव्यापुढे मान तुकवावीच लागते.मान,मूल्य,तत्व हे सगळे भरल्या पोटाचे चोचले. उपाश्याला फक्त भूक साद देते बाकीचे आवाज व स्पर्श जाणिवेच्या पलीकडे असतात.आईचा आधार पण तिच्याकडून मूकपने नाकारला गेला होता.आजारपणात पण आईचा मायेचा हात क्वचितच फिरला असेल डोक्यावरून बाकी तिचा सगळा वेळ नवऱ्याची मनमर्जी राखण्यात खर्च होई. वाढत्या काळासोबत दुरावाही वाढतच गेला.आई बाप असून पण अनाथाचिच वागणूक मिळायची.सरकारी शाळेत फुकटच शिक्षण होत म्हणून तेवढी तरी शाळेची ओळख. पण परिस्थितीशी झगडताना शिक्षणाचा हात कधी सुटून गेला काही समजलाच नाही.


वय वाढलं तशी भूक वाढली पण दारिद्र्य काही कमी झालं नाही.फक्त जबाबदाऱ्या आणि परिस्थितीनुरुप बंधन वाढत गेली. ती जशी मोठी होत गेली तस न सांगता आपसूक सगळं कळत गेलं.सगळ्या जबाबदाऱ्या समजूतदारपणाने अंगावर घेतल्या गेल्या का घ्याव्या लागल्या तीच तिलाच ठाऊक नसावं.

ती...तशी रंगाने काळीसावळी...गोल पण रापलेला चेहरा...बटबटीत डोळे..थोडस जास्तच पण पक्षाच्या चोचीसारखं धारदार नाक...सदैव बाहेर असणारे पुढचे दोन दात... उंचीने बुटकी...लांब पण कधी तेल न मिळालेले गवतासारखे केस...आणि कमालीचा बुजरा स्वभाव...एकूणच समाजाच्या नजरेत काही आकर्षक असं तिच्यात नव्हतं.त्यामुळे घरून आणि शेजाऱ्यांकडून कायम दुय्यम वागणूक मिळायची.नशिबात लिहिल्याप्रमाणे ती पण जमेल तशी मोलमजुरी करायची,लोकांच्या घरची धुणीभांडी करायची.पुढच्या काही वर्षात बापाने अजून पाच पोरांची लाईन लावलेली त्यामुळे फाटक्या नशिबाला ठिगळं लावण्यासाठी अजून मेहनत करावी लागणार हे डोक्यात पक्क झालेलं.मोठ्या तिघींच्या फटकळ स्वभावामुळे त्यांच्यापुढे बोलायची आईची हिम्मत नसायची मात्र हिचे जे काही 5-50 रुपये असतील ते ती अक्षरशः हिसकावून घ्यायची.तिचा मूळचा स्वभाव मग अजूनच गरीब होत गेलेला.तेव्हा बुजरेपणामुळे विरोधही करायला जमायचं नाही.सतत आतल्या आत कुढत राहणं आणि जमेल तेव्हा अश्रू ढाळत राहणं एवढच तिच्या हाती राहिलेलं. या अश्या जीव गुदमरावणाऱ्या वातावरणामुळे घरच्यांसोबत तिचा संवादच नसायचा.


मधल्या काही वर्षात आधीच्या तीन पोरींची 'दिसायला सुंदर' हि जमेची बाजू पकडून मिळेल त्याच्यासोबत लग्न उरकून बाप मोकळा झालेला. शिक्षणासाठी तर त्याने आधीच हात वर केलेले आणि त्यात आता हा तीन लग्नाचा खर्च आणि तिच्याबद्दल बापाला वाटणारा तिरस्कार ह्यामुळे बापाविषयी 'आधार' पण वाटेनासा झालेला.तिरस्काराच कारण म्हणजे हीच दिसण... हिच्या रंगरुपामुळे तिला लग्नाच्या बाजारात खपवायची चिंता म्हणून बाप नेहमीच नाराज असायचा तिच्यावर.वरून जेव्हा तेव्हा तोंडावर बोलायचा कि 'तुला पैदा करून माझ्याच गळ्यात धोंडा बांधून घेतलाय.' जन्मदात्यानी नाकारलेलंच जणू तिला.काय करावं अशात तिने??


दुनियेचे टोमणे,खाण्यापिण्याची आबाळ, बापाचा तिरस्कार ,वाढत्या गरजा आणि कुरूप असल्याचं दुःख ह्या सगळ्यानीच हतबल झालेल्या तीच मन वैशाखातल्या उन्हानं होरपळून काढावं तस पोळून निघालं होत. कसली हौस नाही कि मौज नाही.सदा न कदा राब राब राबायचं.सुखाच्या शिडकाव्याची चातक पक्षासारखी वाट बघायची पण तिच्या आयुष्यातल्या रणरणत्या वाळवंटात फक्त निवडुंगच फुलायचे. भर दुपारी उन्हात काम करून आधीच गडद रंग रापला होता.भांडी घासून तळहात पण काळे पडलेले.अश्या पोरीकडे गावच्या नजरा पडायच्या त्या तिच्या वळणदार अंगावर.आजकाल तीन त्याकडे लक्ष देणंही सोडून दिलेलं.नशिबाला ठिगळ लावता लावता अंगच्या कपड्याना लावायला ठिगळ काही उरल नव्हतं.कुठं कुठं आणि कितवर झाकायच.आपण बर आणि आपलं काम बर ह्या एकाच तत्वावर जीवन जगत होती.आपल्याला नाही मिळालं काही तर ठीक आहे पण मागच्या भावंडाना तरी एकवेळच पोटभर मिळावं म्हणून राबायची.उसंत,आराम हे शब्दच सटवाईने भाळी लिहिले नव्हते. 


नाही म्हणायला फक्त एकदा बाप तिच्याशी नीट बोलला होता गावच्या सावकाराकडे कामवालीची गरज होती म्हणून त्याने स्वतःच तिच्या बापाला तिच्यासाठी विचारलं होत.आधीची धुणीभांडी करणारी कमला लगीन होऊन गेली म्हणून त्या जागी तिची विचारणा झाली होती. सावकार तसा मोठा तालेवार माणूस.भलामोठा वाडा,वाड्याच्या भिंतीभिंतीतुन वैभव झळकायचं.मोठे शिसवी आणि बारीक नक्षीकाम केलेले दरवाजे,त्यावर चमकणाऱ्या पितळी कड्या,मोठाली झुंबर, बसायला मऊशार सोफे,पायाखाली मखमली गालिचा, भिंतीच्या कोपऱ्यात फुलदाण्या ठेवलेल्या. गावातला जणु राजवाडाच होता तो.त्यात तो सावकार म्हणजे 'मालक' राजासारखाच राहायचा.पांढराशुभ्र पोशाख,वळलेली मिशी,थोडेसे डोकावणारे पांढरे केस, बोटात जाडजूड अंगठ्या आणि पायात विलायती बूट असा त्याचा थाट असायचा.जसा थाट तशीच एक मग्रुरी त्याच्या चेहऱ्यावर असायची.तस बघायला गेलं तर तो खूप रंगेल माणूस होता पण अडीअडचणीला त्याच्याशिवाय कोणी उभं राहणार नव्हतं .त्यामुळे त्याच्या विरोधात जाण्याची हिम्मत कोणात नव्हती.आता मालकानं बोलावलं म्हटल्यावर ती पटापट तयार होऊन निघाली.तयारी तरी काय जरासे नीट कपडे अजून नीट केले.अंगभर ओढणी घेतली.केसांना जरा विंचरून वेणी घातली आणि भराभर चालत ती बापासोबत मालकाच्या वाड्यात आली.वाड्यात नोकरांशिवाय अजून कोणी नातेवाईक नसायचे.चार वर्षांपूर्वी बायको वारल्यानंतर तो एकटाच राहायचा.वाड्याच्या पायऱ्यांवर बसून ती मालकाची वाट बघत होती.थोड्या वेळाने मालक आले.त्यांचं आणि तिच्या बापाचं काहीतरी बोलणं झालं बहुतेक पैशाविषयी असेल.त्यांनी बाकीच्या नोकरांना बोलावलं.ओळख करून दिली.तिला कोणती काम करायची ते समजावून सांगितलं आणि काही पैसे तिच्या बापाला आगाऊ देऊन निघून पण गेले. घरी येतायेता बापाने जरा ठणकावूनच सांगितलं कि मालकांनी किती पण काम सांगितली तरी नाही बोलू नको.बऱ्यापैकी पैशे देणार आहेत तेव्हा ते सांगतील ते सगळं ऐकायचं. नेहमीप्रमाणे तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अजून करूच काय शकत होती. खर तर तिच्या मनात नव्हतच जायचं.मालकाचा स्वभाव पुरेपूर ओळखून होती पण बापापुढं नाईलाज होता. 


दुसऱ्या दिवशी ती वाड्यात गेली तर कोणीच नोकरचाकर दिसेना.तिला काही समजेना.आतून मालकांचा आवाज आला " आज सगळे रजेवर आहेत.तू लवकर आपली काम उरकून घे".तिने स्वयंपाकघरात जाऊन सगळं आवरायला घेतलं.मागील दारी जाऊन धुणीभांडी केली.आणि निघायच्या आधी मालकाला सांगायला त्याच्या खोलीबाहेरूनच आवाज दिला.


"थांब की जरा " मालक बाहेर येत बोलला .


"झालीत सगळी काम मालक "ती घाबरून उत्तरली .


"जरा बोलायचं आहे." थोडं दरडवल मालकानं .


त्याच्या नजरेकडे बघून ती घाबरली.कामात काही चूक केलेली काही आठवेना तिच्याने.घाबरून जागेवरच थरथरत उभी राहिली."आतल्या खोलीत चल" म्हटल्यावर ती गपगुमान त्याच्या मागे मागे गेली.मालक त्याच्या पलंगावर बसला.


"बस ग" 


ती खाली जमिनीवर धाडकन बसली.मनातल्या मनात सगळ्या देवांचा धावा चालू केला.मालकाचे शब्द कानात काही शिरेनात. 


" महादू सोबत काय चालू आहे तुझं..??शाळेतल्या खूप गोष्टी कानावर आल्यात माझ्या."मालक जोराने खेकसला.


ती चमकली.महादू तिच्या वर्गातला मुलगा.त्याला आवडायची ती पण तिला कुठे वेळ होता प्रेम करायला.घराच्या आणि कामाच्या रगाड्यातून साधी विचार करायला सवड मिळायची नाही.त्यामुळे तिला महादू आवडत असून पण ती कधी बोलली नाही. आता मालकाने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ते समजेना. 


"काय विचारतोय मी " मालक पुन्हा गरजला. 


"मालक ..ते..म्हणजे..." ती भांबावली.


"काही मोठं प्रकरण केलाय का तुम्ही ?" तिच्यावर नजर रोखून मालक ओरडला.


"नाही मालक.शाळेत फक्त चिडवतात बाकी काहि नाही,आईची शप्पथ" ती डोळ्यात पाणी भरून थरथरत बोलत होती.तिची नजर आता जमिनीवर होती.काळीज थाडथाड उडत होतं.भीतीने काही सुचेना फक्त बसून पायाला मुंग्या आल्याची अर्धवट जाणीव होत होती.अनामिक भीतीने हृदय फुटून जाईल कि काय तेच कळेना झालेलं तिला.ती आपल्याच तंद्रीत होती.


अचानक खांद्यावर झालेल्या स्पर्शाने तंद्रीतच दचकली.मालकाने तिला खांद्याला धरून उठवले आणी पलंगावर बसवले." म..मा... मालक,अहो हे..हे काय करताय?"ती जवळ जवळ ओरडलीच.मालकाने तिचा हात आपल्या हातात दाबून धरला.ती अजूनच घाबरली.आपलं अंग चोरायचा केविलवाणा प्रयत्न केला." 


"घाबरतेस कशाला?" मालक तिच्या छातीवर आपली नजर रोखून बोलला "घरी तर काही खायला प्यायला नाही तरी कशी भरलेली आहेस.खर खर सांग किती जणांनी दाबलंय तुला? कि त्या म्हाद्याने..?" मालकाचं हे रूप ती ऐकून होती पण आज प्रत्यक्ष पाहत होती.


"नाही हो मालक असं काहीच नाहिये.मला जाऊ द्या ना घरी काम आहेत हो."ती रडकुंडीस येऊन बोलली.कुठेतरी उगाच सुटकेची आशा होती .मालकाने हात अजूनच जोराने दाबला. "आह्ह्ह...आह्हह.." ती विव्हळली.मालक हसला.त्याच हसणं छद्मी आहे हे ध्यानात आ￰￰लेल तिच्या पण करणार काय???तिच्या धडपडीवर फिदीफिदी हसत मालक बोलला "हे बघ मी ह्याचे पैशे मोजलेत तुझ्या बापाला.तुझ्या आईबापाने त्यांच्या मर्जीने पाठवलय तुला.तुझा बाप काळ खुशीत जे पैशे मोजत होता ते तुझ्या सौद्याचे होते." आता तिला चक्कर यायची बाकी होती.म्हणजे कालच बापाचं गोड बोलण....मला विकण्यासाठी...माझाच बाप....शी किती किळस वाटतेय.ती भेदरलेल्या हरिणीसारखी मालकाकडे सुटकेची विनवणी करत होती.


"मला पायजे ते मी घेणारच.जबरदस्ती कि गोडीन ते तू ठरव आता.मला पायजे तशी वागशील तर पैशे मिळत जातील आणि जर विरोध केलास तर जबरदस्ती तर होईलच आणि गावभर बदनामी करेल ध्यानात ठेव." त्याचा डाव समजून पण तिच्याने विरोध करवेना. भुकेल्या वाघाकडून कधी हरणाला जीवनदान मिळालय का?? त्यात इथे तर बापानेच सौदा केलेला.विरोध म्हणजे काम नाही,पैसे नाही मग रात्रीच्या रात्री उपासात जातील आणि वर बदनामी ती वेगळीच. "बघ माझी बनून राहिलीस तर मजेत राहशील.नाहीतर गावचे टगे आहेतच टपलेले.आपल्याला जबरदस्ती आवडत नाय पण कधी कधी त्याच्यात पण लय मजा असते" असं म्हणतच त्याने तिची ओढणी बाजूला केली आणि उघड्या पाठीवर हात फिरवू लागला. तिच्या डोक्यात विचारचक्र चालू झाले.बापाने तर स्वतःच विकलंय.जरी विरोध केला तरी हा काही सोडणार नाहीच.एकदा बाई बाटली कि बाटलीच.गावभर बोंबाबोंब करेल मालक.एकूण काय नशिबात वेश्येचं जिणं लिहिलंय.ती स्वतःच्याच असहायतेवर अश्रू गाळत होती.मालक आता धुंदीत तिचे कपडे उतरवत होता.तिचा विरोध केव्हाच बंद झालेला.मालकाच्या प्रत्येक हालचाली सरशी डोक्यात आणि अंगात आग पेटत होती.बऱ्याचश्या मैत्रिणींनी हे अनुभव घेतलेत तेव्हा तर आपण आतुर झालेलो कि हे सगळं करायला.आता तर हे सगळं करायचे पैशे तर मिळणार आहेत..मग काय फरक पडतो मालक आहे कि महादू कि आणखी कोण.ती सरिता तर करते कि 'असं '.तिला मनाप्रमाणे वागता येतं तिच्या.सगळ्या सणाला नवीन कपडे, मॅचिंग टिकल्या,बांगड्या,चपला. मलापण आवडायचं ना नटायला पण ह्या बापाकडे कुठली हौस पूर्ण होणार...एकदा लहानपणी बापाकडे हट्ट केलेला बांगड्या साठी त्यावरून बापाने खूप मारलेलं तिला.ह्या अश्या बापाने पैदा करून कधी साधं एकवेळेचं पोटभर खायला नाही दिलं.फक्त मी मुलगी आहे म्हणून हे सगळे भोग आहेत ना.मग भोगायचंय मला.सूड घ्यायचाय मला माझ्या मुलगी असण्याचा.


तिच्या मनात सगळे उलट सुलट विचार गिरक्या घेत होते.स्वतःची इज्जत लाज स्वार्थ सुख सगळ्याच्या पलीकडे गेलेले तिचे विचार.

त्यांचा पण काही क्रम नव्हता.त्या तशा अवस्थेत विचारांचा गुंता अजूनच वाढतच होता बुद्धीला पटत होता आणि मनाला नाही शेवटी अचानक पोटातल्या भुकेने कौल दिला.डोळे पुसून ती उद्गारली "मी तयार आहे मालक."


मालकाने खिशातले शंभर रुपये तिच्या हातात कोंबले आणि तिच्यावर तुटून पडला.आता तिला शरीरावरच्या वेदनांची जाणीव होत नव्हती.हातातल्या शंभर रुपयांचा स्पर्श मेंदूपर्यंत पोचत होता फक्त .आणि डोक्यात१०० रुपयाचं गणित.काळजात कुठेतरी दुखत होत आणि मनात स्वतःवर सूड घेतल्याची जखम ठसठसत होती.मनसोक्त उपभोगून झाल्यावर मालक बाजूला सरला.हसला.आणि झोपून गेला.का कोण जाणे तिला लाज वाटत नव्हती.कपडे पण सावरावेसे वाटेनात.रोजच तर असं उघड पडायचं होत त्याच्यासमोर.आता हीच जखम घेऊन आयुष्य असाच भळभळत काढायचं होत.काही क्षणातच एक निलाजरेपणा आला तिच्यात.त्यादिवशीपासून एक नवीन पर्व चालू झालं तिच्या आयुष्यात.पुढे कुठे भरकटणार माहित नव्हतं.फक्त फरफटत जायचं होत...चुरगळलेल्या पानासारख... 


*********************************************************************************************************


मालक रोजच भोगायचा.आपली व्यथा आतल्या आत दाबून ती नको असताना पण त्याला साथ द्यायची.बापाने तर शाळा सोडायला लावलेली शिकून काय करणार हा सवाल.बरोबर होत त्याचपण अशा मुलीला शिकून काय करायचंय???रोज शाळेत मुलींच्या प्रश्नांना तोंड द्यायचा वैताग आलेला तिला.कोणत्या तोंडाने सांगणार होती कि ती......मात्र आईने कधीही येणाऱ्या पैशावर,तिच्या अंगावरच्या खुणांवर प्रश्न विचारला नाही कदाचित तिला समजले असावे किंवा तीपण बापाला सामील असावी.काहीही असो आता भुकेचा प्रश्न मार्गी लागलेला होता.


तिला राग यायचा आई बापाचा.घृणा वाटायची. लोकांच्या काळजी करणाऱ्या आया बघून ती आतल्या आत तडफडायची.कदाचित आपण मागच्या जन्मात काही घोर पाप केले असावे म्हणून अशी जिंदगी वाट्याला आली आपल्या ह्या खऱ्या खोट्या समजावर ती दिवस ढकलत होती .खरंतर दुनियादारी खूपच लवकर बघितली तिने म्हणूनच कि काय आताशा तिचा सगळ्यांवरचा विश्वास पण उडून गेलेला.


आजकाल मालक त्याच्या मित्रांना पण घेऊन यायचा.तिला किळस यायची.किती लाजिरवाणे प्रकार झाले असतील.पण आधारच हरवलेला ना तिचा.पहिल्यांदी घाबरणारी ती आता राजरोसपणे सगळं करू लागली.नावाने आणि कर्माने पण बदनाम होत गेली.सूड होता ना तिचा तिच्या बाईपणावर.फाटलेल्या नशिबाला कुठे सांधणारी होती ती.सांधून तरी काय साधणार होत??सामान्य माणसाची जिंदगी आपण जगू शकत नाही ह्याची पुरेपूर जाणीव झालेली होती आताश्या. 


काही वर्ष अशीच निघून गेली.मालकाची रग कमी झालेली.आणि पैशाची आवक पण.आता घरचे लोक तिच्याशी अंतर ठेऊन वागायला लागले.तिलापण जवळीक कधी नकोच होती.घरच्यांना फक्त ती आणत असलेल्या पैशाशी मतलब होता.बाकी तीच अस्तित्व असून नसून सारखच होत.ती तरी ह्या लोकांच्यात का राहत होती तिलाच माहित.कदाचित मनात जिवंत असणाऱ्या भावंडांच्या प्रेमापोटी....अशात तिच्या लहान बहिणीचं लग्न ठरवलं गेलं.हिला विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता.आज मात्र ती भडकली होती बाहेरच्या जगासाठी काहीही असुदे घरी तर ती कुणाची तरी मुलगी कोणाची बहीण होती ना.तिने इतक्या वर्षांनी प्रश्न केले.आणि उत्तरादाखल घरच्यांनी तोंडं उघडली."तू हा असा बाजार मांडलेला.तुझी ओळख कशी दाखवायची?? अख्ख्या पंचक्रोशीत माहित आहे तू मालकाची 'ठेवलेली' आहेस ते.बाहेर तोंड दाखवायला लाज वाटते आम्हाला." पहिल्यांदी गप्पपणे खाणारी तोंडे आज तिला बोलत होती.ज्या घरच्यांसाठी तिने हा मार्ग पत्करला,जेव्हा लाज सांभाळायची होती तेव्हा लाज उधळायला भाग पाडलं त्या आईबापांकडून तिला ऐकवलं जात होता.तिने स्वतःला विकलं म्हणून बाकीच्या विकल्या जाण्यापासून वाचल्या.एवढ्या वर्षाच्या कडू अनुभवानं अश्रू सुकून गेले होती.माणुसकी वरचा विश्वास फार वर्षांपूर्वी उडालेला आज तर....घरच्यांनीपण...ज्यांनी स्वतःच तिला बाजारात बसवलं तेच तिला बाजारबसवी बोलत होते...काही बोलायची इच्छाच नव्हती तिची.तिच्याच पापाच्या कमाईवर शिकलेले आणि आता कमावणारे तिला ऐकवत होते. त्यांना आता तिची असणारी गरज संपली होती.काय बोलणार?? आणि का?? पुढे काय करायचं ??? ह्या माणसांच्यात तर राहू शकत नाही.आजवर बाहेरच्यानी फक्त शरीराचे लचके तोडले होते पण इथे तर मनावर घाव पडत होते. तिने आपली बॅग भरली आणि निघाली.तिला उगाचच डोळे भरल्यासारखे वाटले.ठेवलेल्या बाईला रडायची पण चोरीच. 


ती बस स्टॅन्ड वर पोचली.पहिली कधीच ती कुठेच गावाबाहेर गेली नव्हती.कुठे जायच ह्या विचारात असतानाच समोरून साताऱ्याची बस आली काहीतरी आठवलं तिला.बस मध्ये चढली.तिकीट घेऊन सीटवर बसली.डोकं खिडकीवर ठेवलं.हवेचा मंद झुळकीने जरा बरं वाटलं डोळे बंद केले तस मन भूतकाळात कोलांट्या मारायला लागलं. मनाचा एक बंद कप्पा,आजपर्यंत अलगद जपून ठेवलेला हळूच उघडला.खूप मखमली आठवणी होत्या त्याच्यात..तिच्या प्रेमाच्या...विजय...मालकाचा भाचा..काहीतरी कामानिमित्त आलेला.आजपर्यंत खूप लोकांची शैय्या सजवलेली तिने.पण विजय काही वेगळाच होता.कदाचित तिला आवडला होता म्हणून कि काय.किती प्रेमाने बोलायचा खूप काळजी करायचा लग्न करीन म्हणायचा.मीच कपाळकरंटी....ईतक्या चांगल्या माणसाच्या सोबत मी रखेलीने संसार थाटायचा.लोक काय म्हणतील??? ह्या लोकांच्या भीतीनेच त्याच्या आयुष्यावर आपलं सावट येऊ द्यायचं नाही हे ठरवलेलच तिने.पण नियती किती अजिब असते ना...


त्याच्यासोबत घालवलेल्या रात्री तिच्या सुखद आठवणी होत्या.पहिल्यांदा कोणासोबततरी ती मनापासून एकरूप झालेली.त्याच्या शरीराचा गंध तिला वेडी करायचा.त्याच्या सध्या स्पर्शानेही ती मोहरून जायची.बाकीचे लोक जमेल तसा कार्यभाग पार पडायचे आणि थकले कि झोपून जायचे.पण विजयने प्रेमाची,प्रणयाची नवीन भाषा शिकवलेली.तिला मनभरून तृप्त करायचा.त्याच्यामुळेच तर तिला प्रणयातलं सुख गवसलं होत. अश्या कित्येक गोडं आणि सुखद आठवणी होत्या तिच्याकडे.त्या आठवणीत रमून कधी झोपून गेली तिलाच कळलं नाही..


'टिंग टिंग...'कंडक्टरने बेल वाजवली.गाडी सातारा स्थानकात पोचली होती.एवढावेळ ती तिच्या स्वप्नातच होती.स्वतःच्या येडेपणावर तिला खुद्कन हसू आलं.तिने आपला मोबाईल काढला.विजयला फोन लावला.जेव्हा जेव्हा विजय गावी यायचा तेव्हा त्याच नंबरवरून कॉल करायचा.रिंग झाली पण कोणी उचलला नाही.तिने पुन्हा प्रयत्न केला.


"हॅलो "


"मी बोलतेय तुझी जानू" विजय लाडाने तिला जानू बोलायचा.


"आता का फोन केलास मी कामात आहे "


"मी घर सोडून आलीय कायमची सातारा स्थानकात आहे.मला घेऊन चल ना आपण लग्न करूया" ती रडायला लागली. 


"अरे जानू रडू नको बाळ.तिथेच थांब मी येतो अर्ध्या तासात.इकडे तिकडे जाऊ नको."


"ठीक आहे लवकर ये" 


ती तिथल्याच एका बाकावर बसून त्याची वाट बघत होती.


विजय धावतच आला तिला भेटायला.बस स्थानकात तिला बघून त्याने आजूबाजूची पर्वा न करताच तिला मिठी मारली.त्यामिठीत ती आतापर्यंतचा सगळाच आयुष्याचा प्रवास विसरून गेली.कुठेतरी घर सोडून त्याच्या भरवश्यावर आल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होत.आलेला थकवा कुठल्या कुठे पळून गेलेला.प्रेमात इतकी ताकद असते हे आज पहिल्यांदा जाणवलेलं तिला.


"जानू भूक लागली असेल ना" 


"अरेच्च्या हो कि इतकावेळ भुकेची जाणीवच नव्हती "


तो जवळच्याच एका हॉटेल मध्ये घेऊन गेला.अगदी पोटभर जेवल्यावर ते निघाले. रिक्षा पकडली."कुठे जातोय आपण ?" ती.


"माझ्या घरी " तो. 


"तुझे आईबाबा काय बोलतील?माहितेय का त्यांना माझ्याबद्दल?माझ्या भूतकाळाबद्दल?" तिने त्याचा हातात आपला हात गुंतवत विचारलं.


"त्यांना मी आधीच सांगितलंय तुझ्याबद्दल.आणि हो तुझा भूतकाळ..तो फक्त भूतकाळ होता.मला माहित आहे ना बस्स.भूतकाळ सांगून मला तुझा वर्तमान आणि भविष्य खराब नाही करायचं ग बाळा."


"अरे पण....??"


"पण नाही आणि बिन नाही.झालं ते झालं.जाऊदे ना.आता आईबाबा पण तयार आहेत कधीचे.बस तू तयार होत नव्हतीस.तुझ्या ह्या होकाराची कधीपासून वाट बघत होतो मी.आज खूप खूप खुश आहे मी."त्याने तिला जवळ ओढलं.तिनेपण आपले डोळे मिटले आणि त्याचा गंध मनात साठवत राहिली.त्याच्या कुशीत कधी झोपी गेली तिलाच कळलं नाही.


"मॅडम उठा आता.किती स्वप्न बघणार??"रिक्षा एका घराजवळ थांबली होती.ती हळूच उतरली.त्याने दरवाजाजवळची बेल वाजवली.ती अजून पण त्याचा हात पकडून त्याच्या मागेच उभी होती.दरवाजा उघडला.एका मध्यम वयाच्या हसतमुख बाईने त्यांचे स्वागत केले.ती आई असावी विजयची.ती पाउल आत टाकणार इतक्यात त्या बाईंनी थांबवलं.ती पुन्हा घाबरली.तिने विजयचा हात घट्ट दाबला हातात.त्या बाई आत निघून गेल्या.विजयपण भांबावला."आईना आवडलं नसणार माझं असं येणं "ती रडवेली होऊन बोलली.विजय त्यावर काही बोलणार इतक्यातच त्या हातात ओवाळणीची थाळी घेऊन आल्या.तिच्याकडे प्रेमाने बघत मंद हसत त्यांनी त्या दोघांना ओवाळलं " नव्या सुनेचं स्वागत असं करतात आमच्याकडे.मागच्या चांगल्या वाईट गोष्टी मागेच विसरून उजवा पाय पुढे टाक आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर आता." त्यांनी तिला आपल्या पोटाशी धरलं.आता आनंदानं तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते.तिच्या कंठातून शब्दच फुटेना.तिच्या पाठीवर मायेने हाथ फिरवत आईच पुढे बोलल्या "काळजी नको करू मी आईच आहे तुझी.विजयचे बाबा बाहेर गेलेत जरा येतील इतक्यात." तिने मनोमन देवाचे आभार मानत हात जोडले.


तिला असं गुंग बघून विजयने टिचकी वाजवली.ती खाडकन जागी झाली.बापरे मी इथे कुठे..अजून बस स्थानकात...म्हणजे विजय आला नाही...ते सगळं स्वप्न...ती हिरमुसली.अर्धा तास बोलून आता चांगले दोन तास झालेले.अजून त्याचा काहीच पत्ता नव्हता.पुन्हा कॉल करावा का ?? फोन चेक केला त्याचा काहीच मेसेज किंवा कॉल नव्हता.तिने नंबर डायल केला समोरून फोन कट केला गेला तिने पुन्हा प्रयत्न केला पुन्हा फोन कट.आता मात्र खरंच तिला समजेना काय करावं मागच्या दोन तासापासून त्या रणरणत्या उन्हात ती त्याची वाट बघत बसून होती.पोटात भुकेनं कावळे कोकलत होते पण तो आला तर चुकामुक होईल म्हणून तशीच मुरगाळून बसून होती.


त्याची वाट बघून आता तिला रडायला येत होत.स्थानकातील लोक पण विचित्र नजरेने बघत होते तिच्याकडे.तिने हळूच एक नजर स्वतःकडे पाहिलं.हे असे कपडे,शरीराची ठेवणं,सवयीचा झालेला थोडा भडक मेकअप कदाचित ह्यांना कळलं असेल मी कोण आहे ती.तिने उगाचच पुन्हा कॉल केला.समोरून पुन्हा फोन कट झाला.वाट बघण्याशिवाय आणि ह्या नजरा झेलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.पण थोडाच वेळ एकदा तो आला कि ह्याच लोकांसमोर ताठ मानेने जाईन मी.पण कधी येणार हा???


आता अंधार पडायला आला तरी विजयचा पत्ता नव्हता.त्याचा फोन पण बंद येत होता.काय करावं काहीच सुचेना.घरपण तर माहित नाही त्याच.कुठे राहायला जायचं????एका अनोळखी शहरात,अनोळखी माणसात कोणाला विचारायचं??विजय आलाच नाही तर ??आणि मी निघून गेल्यावर आला तर ??ह्या सगळ्या जर तरच्या तरंगावर मन हिंदकळत होते.


तेवढ्यात तिचा फोन वाजला. विजयचाच फोन होता."अरे कधी पासून वाट बघतेय तुझी.कुठे आहेस ?" ती रडवेली होऊन बोलत होती.डोळ्यात आसवं जमा झालेली.


"माफ कर ग.जरा कामात होतो.काम पूर्ण केल्याशिवाय निघता पण येईना.त्यात फोनची बॅटरी.तू अजून स्थानकातच आहेस ना??मी येतोय.रस्त्यातच आहे."

"हो.लवकर ये."


आता पर्यंत गलितगात्र पडलेल्या तिच्या जीवात जीव आला.डोळ्यातील आसूंची जागा आता ख़ुशीने घेतली.डोळे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर खिळले.आता कोण कस बघतय त्याची पर्वा नव्हती.फक्त तोच दिसत होता आणि त्याच्या मिठीत शिरायला ती आसुसली होती."अग ए.."समोर थांबलेल्या रिक्षातून आवाज आला.विजयच होता तो.ती धावतच त्याच्यापाशी गेली.


"बस लवकर आत"


ती झपकन रिक्षात बसली.विजय तिच्या बाजूला अंतर ठेवून बसला होता.तिला त्याच्या कुशीत शिरायचं होत पण कस?रिक्षावाल्याच सगळं लक्ष मागेच होत.विजय समोर बघत होता.ती पण आपली बॅग पोटाशी धरून बाहेर बघत बसली.


कसल्याशा जुन्या इमारतीसमोर रिक्षा थांबली.विजयने उतरायचा इशारा केला.ती उतरली."इथे घर आहे का तुझ?"


"अं..नाही..हा लॉज आहे.घरी अचानक नाही घेऊन जाऊ शकत नं.आई बाबांना माहित नाहीये" मगाच्या स्वप्नाच्या आठवणीने उगाचच कसेतरी झाले.आयुष्य इतकं गोडं आणि सरळ नसतंच. तीच तर अज्जीबातच नाही.


तिच्याकडे न बघताच तो झपाझप पुढे निघून गेला.आता मात्र तिला राग आला.तीपण पाय आपटतच त्याच्या मागे चालू लागली. काउंटरवरून चावी घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या त्यांना दिलेल्या रूममध्ये आले.ती रंग उडालेली छोटीशी खोली बघून क्षणभरच घरची आठवण झाली.पण लगेचच धूळ झटकावी तशी झटकून टाकली.धूळ तर मीच होती की.मलाच तर झटकून टाकलय. जाऊ दे. दरवाजा बंद झाल्याच्या आवाजाच्या दिशेने बघितलं.विजय दाराच्या कड्या बंद करत होता.आता ह्याच्यावर चांगलं रागवायचच ठरवलं तिने. त्याच्या दिशेने पाठ करून त्या जुनाट मळकट बेडच्या कडेला बसून त्याच्यावर कस रागवायचं हाच विचार करत होती कि त्याने मागून येऊन तिच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घातला.तिने काहीच चुळबुळ केली नाही.


"रागावली ना जानू !" 


"हम्म "


"थोडा थकून आलेलो ना ग.असच होत माझं."


" ह्म्म्म "


"तुझ्या मिठीत विसरायचा होता थकवा.पण तूच रागावलीयस.लग्नानंतर पण असच करणार का ?"


आता ती विरघळली.फिरून अलगद त्याच्या मिठीत शिरली.त्याने आपली मिठी घट्ट केली.हीच ती मिठी.ह्याच मिठीत विरघळायची कधीपासून वाट बघत होती.पुन्हा ती त्याच्या गंधात वेडी झाली तशीच जशी आधी होत होती. आता तिला काही काही आठवत नव्हतं.चढत्या धुंदीत ती एकरूप होऊन गेली.तो मळकट जुना बेड,त्या रंग उडालेल्या भिंती,आपल्याच तंद्रीत फिरणारा पंखा आणि खिडकीतून डोकावणारा चंद्र आता त्यांच्या प्रणयाचे साक्षीदार होते.


*****************************************************************************************************


रात्री कोणत्या तरी गोंगाटाने तिची झोप चाळवली गेली.पण त्याच्या मिठीचा आणि झोपेचा अंमल जास्तच होता म्हणून कि काय तिला काही जाणीवच नव्हती.विजयचे शब्द कानात शिरले 'मी बघून येतो बाहेर'. तिच्या तोंडून फक्त हम्म असा हुंकार निघाला.ती पुन्हा आपल्या गुलाबी स्वप्नात रममाण झाली.


"आग ये उठ की.झाला कि तुझा हनीमून.आता सासरी चला."कोणीतरी जोराने मारलेल्या चापटीने ती खडबडून जागी झाली. अजुनही डोळ्यांना झोप असल्याने तिला त्यांचं बोलणं काही समजत नव्हतं.ती डोळे चोळून समोर पाहतच राहिली.खाकी वर्दीतल्या त्या बायकांनी तिला खसकन खेचली आणि ओढत नेऊ लागल्या. "अहो,मला कुठे घेऊन जाताय....विजय....विजय.....अहो माझा होणारा नवरा आहे इथे....विजय...." तिचा मदतीसाठी आकांत चालू होता.पण तिला फरफटत नेवून एका गाडी मध्ये कोंबलं.त्या गाडी मध्ये अजून भरपूर पोरी चेहऱ्याला रुमाल गुंडाळून बसल्या होत्या.त्यांच्यात हिच आरडाओरडा करत होती.बाकी पोरी शांत कश्या बसू शकतात हेच आश्चर्य होत तिला.तिला कोणीही दाद दिली नाही उलट दोन कानाखाली बसल्या.गाडी चालू झाली ती सरळ पोलीस स्टेशनला थांबली.


पुन्हा सगळ्यांना खेचून बाहेर काढलं गेलं. फरफटत खेचून कोठडीत डांबलं."हे काय चाललंय काही कळेल का मला??" ती जिवाच्या आकांताने ओरडून विचारत होती.तिच्या गोंधळाला कंटाळून शेवटी एकजण डाफरली तिच्यावर "क्यू शोर मचा रही है रे @#/#*? कबसे दिमाग कि माँ बहन कर रही है ?धंदेवाली है ना तो इतना नौटंकी क्यू @#/*, होता है पकड लेती है पुलिस कभी कभी.नयी है लगता है.ये रोज का है इनका. अभी आंटी आके छुडा के ले जायेगी.डर मत." आता आश्चर्याची पाळी तिची होती.म्हणजे मी पुन्हा फसली तर.विजय कुठे निघून गेला ? त्याला कसं सांगू मी पोलीस स्टेशनला आहे ते??सामान तर सगळं जप्त केलय.'अरे देवा '.पुन्हा तिने भीत भीत त्याच बाईला सवाल केला "मी तर.....ईधर अपने होनेवाले पती के संग...आयेली है.म्हणजे...लग्न करनेवाले है हम....उद्या....ईन लोगो का काहीतरी गैरसमज हुआ असं वाटतंय...मेरे को जाणे देणे बोल ना....वो... मला शोधत असेल...तू कूच मदत कर ना.." तिच्या ह्या मोडक्या तोडक्या विनवणीवर ती गडगडाटी हसली.त्यावर ती भेदरून गेली.हि तर मदत करणार नाही.पोलीस ऐकत नाही.काय करावं आता? नियतीने सगळेच फासे उलटे टाकलेले.डाव कोणताही असो राज्य तिच्यावरच.


" साला कोई भडवा होगा जिसके साथ आई थी तू. अगर वो तेरे से शादी करनेवाला रहता तो कभी ये बदनाम लॉज पे नही लाता.किसी भी अच्छे घर कि औरते इस एरिया के आसपास तक नही आती." एकटक तीच्याकडे ती बाई उद्गारली.


" ये थोडा स्वस्त था इसलिये..."तिने त्याची बाजू सावरायचा एक फाटका प्रयत्न केला.


" अपनी होनेवाली औरत को लेके कोई धंदेवाले एरिया में नही आता.साला #@#&* था वो.तेरे को फसा के मजे लिये और पुलिस आई तो भाग गया @#&*. तेरे से इश्क करता तो लेके भागता तेरे को." त्या बाईचे डोळे रागाने का कशाने माहित नाही पण लाल झालेले होते. 


पटत नसल तरी खरंच होत तीच बोलणं. एक मन म्हणत होत कि नाही तो फसला असेल कुठेतरी पण शोधत नक्की येईल .किती प्रेम करतो तो माझ्यावर.तर दुसर मन म्हणत होत कि नाही तसपण आजपर्यंत कोण विश्वास ठेवण्यासारखं भेटलं.बोलून चालून मी वेश्या.तिच्यासोबत रात्र सजवली जाते संसार नाही मांडला जात.....वेश्येला स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो ना.तिने फक्त दुसऱ्यांची रंगीत स्वप्न खरी करायची असतात. पण नाही येईल तो माझं मन सांगतय मला.मी विजय आल्याशिवाय कुठेही जाणार नाही.


'आंटी आयी 'कोणीतरी ओरडलं.तिने वर पाहिलं एक जाडजूड थोराड शरीराची बाई दरवाजातून आत येत होती.वाटोळा चेहरा,त्यावर भडक मेकअप,गडद लाल लिपस्टिक,कपाळावर चमकणारी चंद्रकोर,अंबाड्यावरून मानेवर रुळणारे मोगऱ्याचे गजरे, कानात खांद्यापर्यंत लोम्बणारे झुमके,गळ्यात खूप सारे नेकलेस,तशीच चमकणारी त्यातून उघडे पोट डोकावनारी लालभडक साडी आणि जोडीला तोंडात पानाचा भरलेला तोबरा व चालण्यात एक प्रकारचा माज.एकंदर दिसन्यावरून हीच आंटी असावी ती समजून गेली.तिच्या मागून अजून चार तशाच प्रकारचा पेहेराव केलेल्या बायका चालत होत्या.त्या साथीदार असतील कदाचीत.ती आंटी आत येताच पोलिसांवर शिव्यांचा भडीमार करू लागली.इतक्या साऱ्या गलिच्छ शिव्या आज पहिल्यान्दाच ऐकत होती ती.गलिच्छ शिवीगाळ,हमरीतुमरी वर आलेलं भांडण,पोलिसांकडून वापरली जाणारी घाणेरडी संबोधने या सगळ्याने संतापून तिने आपल्या कानावर हात गच्च दाबून धरले.तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू पाझरत होते.


"ये छोकरी.." कुणीतरी तिच्यासमोर टिचकी वाजवत बोलत होता.तिने डोळे पुसून वर बघितल. "बहरी है क्या बे...कब से बुला रही है." ती आंटी तिच्यासमोर उभी होती.


"वो..मै...." तिच्याने बोलवेना.


"वो शबनम बोल रे ली थी तुझे किसी @#&%* ने ईधर फसा के भाग गयेला है.सच है क्या??"


आंटीच्या बोलण्याने कससच झालं तिला.आता हि बाई का विचारतेय मला??पुन्हा पुन्हा तेच.आणि ती शबनम म्हणजे मगाशी बोलत होती तीच का? तिने शबनच्या दिशेने पहिले.शबनम हसली.


"क्या पुच रही है मै..???" आंटी दरडावली. "वो भाग नही गया.आम्ही...उद्या...शादी करनेवाले है. विजय मला शोधायला येतच असेल." तिचा एक सारावासारवीचा प्रयत्न.


"हाहाहा...." आंटी केव्हढ्याने तरी हसत उद्गारली " अच्छा और लॉज पे क्या शादी से पहले सुहागरात कि रसम मनाने आयी थी क्या?... तू बहोत भोली है छोकरी.कूच नही पता तुझे दुनिया के बारे में.शबनम ने बताया के तू फस गयी है.इसलिये पुच रही है तेरे को. "


"नाही ओ...त्याने वचन दिलय मला..आयेगा वो ...मुझे...एकदा....बात तो करने दो ना." तिच्याने आंटीसोबत बोलवत नव्हतं पण बुडत्याला काठीचा आधार पण चालतो. इथे फक्त शबनम आणि आंटीनेच तिला काही विचारायची तसदी घेतली होती.खूप आशाळभूत नजरेने आंटीकडे पाहत तिने हात जोडले.


"ओ साब,इस छोकरी का सामान दे दो जरा." आंटी तिथूनच ओरडली."जमानत के बगैर कूच नाही मिलेगा...साले इन लोग को पकडो तो सरदर्द है "खाकी वर्दीतील बाईने खेकसून उत्तर दिल."@#%&* साले " आंटी सर्रकन मान वळवून तिच्याकडे बघत बोलली "सोच ले...तू नयी है इस शहर में...मैने नही छुडाया तेरे को तो ये पुलीसवालेही तेरे को बेच देंगे किसी ना किसी को...तेरे नसीब में शायद यही है...तू मेरे साथ चल..."


"नही...मुझे नही करना ये सब...मला विजय सोबत लग्न करायचंय...सरळ साधं आयुष्य जगायचंय हो..." ती कळवळली.


"साली #%@&* रेह ले इधर हिच...वो छोकरा तो आयेगा नाही....हरामजादी...भाड में जा..." आंटी वळून तरातरा जायला निघाली. "अरी ओ शबनम, चल." "आंटी वो लडकी....?"शबनम ने विचारलं. " शादी करनी है उसको...मरने दे अपून को क्या???" आंटी ओरडली.सगळेच आल्या वाटेने निघून गेले.त्या पोलीस स्टेशनमधल्या कोठडीत आता ती एकटीच उरली. अजून रात्र सरायची बाकी होती.


***********************************************************************************************


कोठडीतल्या एका कोपऱ्यात ती अंगाचं मुटकुळं करून झोपण्याचा प्रयत्न करत होती.रात्र लवकर सरावी आणि सकाळी विजय आपल्याला शोधत घ्यायला यावा म्हणून मनोमन देवाचा धावा चालवलेला.मधूनच तिच्या डोळ्यासमोर विजयसोबतचा रंगलेला प्रणय येत असे तर मध्येच आंटी आणि शबनमचे कडवे बोल.छे !!! रात्र काही सरायला तयार नव्हती.अशा रात्री सरत नाही केवळ छळत राहतात.


दूसरा दिवस तर उजाडला पण कोणीच तिची काही खबर घ्यायला आलं नाही. विजयशिवाय येणार तरी कोण होत? त्याचा पण काही पत्ता नाही.तिने पोलिसांना विनंती करून फोन घेतला.लगेचच विजयला कॉल केला पण त्याचा नंबर सारखा बंद येत होता.सुटकेसाठी आपली कर्मकहाणी तिने ओरडून ओरडून पोलिसांना सांगितली पण कोणी तीच ऐकेना.दिवसभर तिची उगाचच येनकेन प्रकारे चौकशी करण्यात आली.शक्य होईल तेवढा मानसिक त्रास दिला गेला.त्यातच विजय सोबत संपर्क करण्याचे सारे मार्ग बंद झाले. त्याला कळणार तरी कस मी कुठे आहे ? कसा संपर्क करणार? ती आपला चेहरा ओंजळीत पकडून हताशपणे कोपऱ्यात बसून राहिली.


संध्याकाळी तिला कोठडीतून बाहेर काढण्यात आलं.तिच्यासाठी खूप आश्चर्याचा धक्का होता.हे अचानक असं.....?त्यांना आपली दया आली असेल म्हणून खुश झाली.पण साहेबांनी तिला बाहेरच्या गाडीत बसायला सांगितले."पण माझी पिशवी....?" तिने तिच्या पिशवीकडे बोट दाखवत विचारलं. "हं....घे...." खाकी वर्दीतल्या बाईने फेकलीच जवळपास आणि काहीतरी खुसफुसली.तिला ऐकूच नाही आलं,तिने गुपचूप आपली बॅग पकडली आणि सांगितलेल्या गाडीत जाऊन बसली.आता पोलिसांना विचारणार तरी कस कुठे जाताय म्हणून.कदाचित ते आपल्याला योग्य जागी सोडतील असं मनाशी वाटत होत. तरीपण विचारलच तिने एकाला " मला समजू शकत का आपण कुठे चाललोय??" "आमी योग्य ठिकाणी सोडू कि तुमाला...काळजी नका करू, नवीन हाय ना या शेरात तवा तुमाला माहित नसल ना कुठे जायचं आणि कोनी घ्यायला बी न्हाई आलं.आणि तुमि जेच्यासंग लगीन करणार होता त्याचा बी काई ठावठिकाना नाही ना.मग एकटी दुकटी बाई कुणीकड जाणार??." आता ती शांत झाली कुणीतरी होत आता तिला मदत करणारं.पण समोरच्या हवालदाराची चुळबुळ तिला अस्वस्थ करत होती.कसा एकटक रोखून तिच्या शरीराकडे भुकेल्या लांडग्यासारखा बघत होता.साहेब लोक नसते तर जणू इथेच तुटून पडला असता. तिने दुर्लक्ष केलं खरं पण राहून राहून त्याची नजर तिला त्रासच देत होती.


गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. पोलिसांनी चल म्हणताच त्यांच्या मागोमाग चालू लागली. 'इथे कुठे चाललोय हे विचारावं ' हे राहून राहून तिच्या ओठांपर्यंत येत होत पण विचारायची हिम्मत होत नव्हती.आत्ताच तर त्यांनी इतका धीर दिला मग पुन्हा कस विचारायचं??. तिने बंगल्याकडे पाहिलं.येवढा मोठा बंगला आज पहिल्यांदी पाहत होती ती.....का इथे घेऊन आले असतील मला?तिला छोट्याश्या मेंदूला मुंग्या आल्या पण काही समजेचना.विचारा विचारांमध्ये कधी बंगल्यात जाऊन पोचली तिलाच नाही कळलं.बंगल्याची भव्यता आणि ठेवण बघून काळजात धस्स झालं तिच्या.नको असलेल्या आठवणी झंकारल्या गेल्या.तो भूतकाळ...तो मालकाचा वाडा...ती श्रीमंती...मालक....त्याच्यासोबत नको असलेले पण बापाच्या भीतीने घालवलेले दिवस अन रात्री....हे सगळं पुन्हा तर नाही नं.....भीतीची पाल चुकचुकली...


जिन्यावरून कोणीतरी पुढाऱ्यासारखा दिसणारा माणूस उतरत होता.तिने मान वर करून बघितलं.तिला तोच दिवस आठवला... तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस...ज्या दिवसाने तिला सर्वसामान्य आयुष्य जगायचा अधिकार हिसकावून घेतला...आणि आज त्याच दिवसाची पुनरावृत्ती..नाही नाही...असं कस?? हे पोलीस तर मला मदत करायला घेऊन आले असतील ..देवा हे काही वाईट नको असुदे..हा सगळा माझ्या मनाचा भ्रम असुदे...परमेश्वरा...वाचवं रे...मला नाही जायचं त्या नरकात पुन्हा...बाईचा जन्म मिळाल्याची पुरेपूर शिक्षा मिळालीय...आता अजून नको देवा...काळजातलं बाईपण आणि लज्जा थोडीशी का होईना शिल्लक आहे....देवा आता तरी वाचव....तिच्या डोळ्यात आसवे गोळा होऊ लागली.पण माणुसकी असावी जगात ती स्वतःच्याच मनाला समजावत होती.

पोलिसांचा आणि त्या पुढाऱ्याचा सलाम नमस्कार चालू होता.हिच्या जीवाची वेगळीच तगमग होत होती.आपण पुन्हा चुकलोय कि काय ह्या भीतीने छाती थाडथाड उडत होती.अंग थरथरत होते. "आज मेजवानी कुटची म्हनायची??" पुढाऱ्याने ओठावर जीभ फिरवून विचारलं. "काल लयी कोंबड्या पकडलेल्या.तिथंच घावली.पण कोणत्याबी खुराड्यातली न्हाई.वाट चुकलीय की" पोलीस पुढाऱ्याच्या स्वरात स्वर मिसळून बोलला. खरंच ती वाट चुकलेली होती.चुकलेली वाट चुकवून पुन्हा चुकीचाच वाटेला चुकली. स्वतःच्या कमकुवतपनावर चीड येत होती. पण चिडून प्रतिक्रिया देण हा स्वभावच तर नव्हता. 


"बाई, प्रेमानं ऐकणार कि....??" पुढाऱ्याने तिला नखशिखांत न्याहाळत विचारलं.


"अं...त..तू...तुमचा...काहीतरी...ग..गैरसमज....मी....मी...मी...अशी...म्हणजे...हे...सगळं..न....नाही..." गडबड,गोंधळ मनाची अशी विचित्र भेदरलेली अवस्था.


"बाईंना प्रेम नाही समजत कि वो...पण आमी समजावणार..." पुढाऱ्याने मिशीवर पीळ देत तिला जवळ ओढली.मालक पण तर जबरदस्ती करायचा पण ते वय,तेव्हाचे सुडाचे विचार,तेव्हाचा बापाचा धाक ह्या सगळ्याने तिने मालकाला साथ दिली होती.परंतु कालच्या विजयच्या प्रेमाच्या स्पर्शाने ती एका वेश्येची पुन्हा प्रेयसी झाली होती.तिच्या शरीरावर फक्त तिच्या प्रियकराचा अधिकार होता.तीच विटाळलेल शरीर प्रियकराच्या स्पर्शाने पवित्र झालं होत.एकाच दिवसात ती वेश्या असल्याची तिच्या मनाची समजूत गळून पडलीच होती कि पुन्हा..कोणीतरी तिच्या कंबरेला आपल्या केसाळ राकट हातांचा विळखा घातला होता.तिच्या सुटण्याच्या धडपडीला न जुमानता त्याने आपली पकड अजूनच घट्ट केली.इतकी घट्ट कि जणू त्याचे हात तिच्या कंबरेवर रुतून पडले होते.तो जबरदस्ती तिच्या ओठांची चुंबने घेत होता.तिने प्रतिकारासाठी हात पाय झाडायला सुरुवात केली."आपली कोंबडी लय फडफडतेय रे" पुढारी ओरडला.कोणीतरी लगेच मागून येऊन तिचे हाथ बांधले.तिची हालचाल मंदावली.पुढारी आधाश्यासारखा तुटून पडला तिच्यावर.तिच्या अंगावरचे कपडे कधीच फाटून जमिनीवर पडले होते.तो एखादया गुरासारखं जोराने तिला मारत पण होता.तिच्या प्रत्येक विव्हळण्याबरोबर तो आनंदाने ओरडत होता.त्याच्या माराने तीच्या पूर्ण अंगावर लालसर वळ उठले होते.ठिकठिकाणी त्याने जोराचा चावा घेतल्याने दाताचे निशाण बनले होते.केस खेचून खेचून तिचे केस तुटून त्याच्या हातात आले होते.खूप काहीतरी किळसवाणा आणि अनैसर्गिक प्रकार चालला होता तिच्यासोबत. ती रडत ओरडत सहन करायचा प्रयत्न करत होती.पुढारी मोकळा होताच तिला सावरायचाही अवसर न देताच पोलिसही तिच्यावर आडवा झाला.सगळेजण आळीपाळीने आणि सामूहिकरित्या तिला भोगतच होते.तिचे अंग न अंग ठणकत होते.दातांच्या वळांतून रक्त निघत होत. शरीराचा कंबरेखालचा भाग वेदनेने सुन्न झालेला.आताआंटीचे शब्द तिच्या कानात घुमू लागले.खरंच जर ती काल आंटीसोबत गेली असती तर.....कुठवर वाचणार पण ??अतीव शारीरिक वेदना आणि मानसिक त्राण याने तिचे डोळे हळू हळू बंद होत गेले.शरीरातील जोर जाणवेनासा झाला. काळजातून फक्त तिच्या मदतीला धावून न येणाऱ्या परमेश्वरासाठी साद होती '￰परमेश्वरा,मागच्या जन्मात खूप काही घोर पाप केली असतील मी ज्याची ह्या जन्मात शिक्षा मिळाली.पण आता अजून सहन नाही होणार रे.कधी विरोध करताच नाही आला मला.ज्याने जस आयुष्य वळवलं तशी वळत गेली.पण फाटलेल्या नशिबाची माझी नाव भरकटतच गेली.कधी जाणूनबुजून तर कधी जबरदस्तीने जस लोटलं तशी वाहवत गेली. वाटत होत विजयच्या रूपाने भरकटलेल्या मला एक शांत किनाराच भेटला पण जवळ जायच्या आधीच ते मृगजळ ठरलं.खूप इच्छा होती लग्न करावं,संसार करावा,सामान्य माणसाचं आयुष्य जगावं.पण आयुष्यात प्रणयाच्याच रात्री जास्त आल्या.फक्त आणि फक्त एकतर्फी प्रणय... एकाने फक्त भोगत जावं आणि दुसऱ्याने ते सगळं संपण्याची वाट बघावी.कित्येक दिवस कित्येक रात्री एखाद्या प्रेताप्रमाणे कोणाच्यातरी शरीराखाली केवळ घड्याळातल्या टोलची वाट बघत घालवल्यात.वेश्येच्या नशिबीपण शृंगारिक प्रणय नसावा ह्यासारख कलंकित नशीब नसेल कोणाचं.आयुष्यातल्या काही गोड आठवणी विजयच्या होत्या पण.....तोपण आभास असावा माझा कदाचित... आयुष्यातल्या सत्यापेक्षा आभासच किती सुंदर होते.आणि त्या लॉजमधल्या रात्रीतले उत्कट क्षण...बस्स.....साठवता साठवता हे बंद डोळे उघडूच नये,देवा...आयुष्याचा दशावतार इथेच थांबवा....राखण्यासारखं आता काहीच नाही राहील....ह्या वेदना आता कायमच्या संपून जाव्यात.देवा,एक मागणी ऐक माझी....शेवटची.... ' तिच्याकडे पाठ फिरवणाऱ्या परमेश्वराने आज प्रथमच तिची हाक ऐकली.ग्लानीमुळे चढणाऱ्या गुंगीत डोळ्यासमोर विजयच्या मिठीतले क्षण आठवून ती जोराने चित्कारली....आयुष्यात पहिल्यांदा व शेवटची.....आणि सामावून गेली मृत्यूच्या मिठीत चिरप्रणयासाठी.


समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy