वाटचाल
वाटचाल
1 min
590
आयुष्य हे जगायचे असते
मागे वळुन पहायचे नसते
हसत हसत काढायचे असते
हार कधी मानायची नसते
सुख हे भोगायचे असते
दु:खात निराश व्हायचे नसते
उघडया डोळयांनी स्वप्न पहायचे असते
प्रत्यक्षात साकर करायचे असते
पाऊलावर पाऊल टाकायचे असते
यशाची पायरी चढायची असते
काटयातुन वाट काढायची असते
संकटांवर मात करायची असते
जिवनाची मजा लुटायची असते
पण इतरांना कधी विसरायचे नसते
सर्वांना बरोबर न्यायचे असते
इतरांची बरोबरी करायची नसते
ध्येय हे गाठायचे असते
हक्कांसाठी लढायचे असते
तारयांसारखे चमकायचे असते
आपणांसही तारे व्हायचे असते
आयुष्य हे जगायचे असते
आयुष्य हे जगायचे असते