आयुष्य
आयुष्य
1 min
426
हास्यावर सुरवात झाली दिवसाची
हास्यावरच होवो अंत
आपलेही दिवस चांगले येतील
करु नको तू खंत
आज वेळ खराब आली
असं समज जीवनाच्या परीक्षेची सुरवात झाली
जीवनाच्या या परीक्षेमध्ये
भर तू प्रयत्नांचे रंग
कष्टांची भर घालून
कर सर्वांना दंग
ऊन-सावलीसारखी वेळ ती
तुझ्या प्रयत्नांपुढे वेळही बदलेल
ताऱ्यासारखे नशीब ते
तुझेही चमकेल
जीवनाच्या ह्या कसोटीत
खंबीर तू उभा रहा
न घाबरता संकटांना
बिन्धास तू सामोरे जा
जीवनाच्या वाटेवार येतात
सुखदु:खांचे चढ-उतार
ऊदास होऊ नकोस तू
फक्त हसत हसत कर पार
