Manisha Kadam

Drama Romance

2  

Manisha Kadam

Drama Romance

“वन मिनिट “

“वन मिनिट “

13 mins
96


“वन मिनिट” नाव जरा विचित्र आहे पण निराळ जेव्हा भेटयला येशील का ? म्हणून त्यांनी मला विचारल्यावर किती वेळ देणार तेव्हा एक मिनिट एवढी वेळ ठरवली होती. एक मिनिट ज्यात 60 सेकंद असतात एवढच काही ते माहित होत. पण या 60 सेंकदात आयुष्यातला सगळा आनंद एकटवता येतो हयाची काही कल्पना नव्हती.

मैत्री जगातल सुंदर नात निखळ ,निर्मळ मैत्री असण खरच भाग्याच आहे .माझ्याकडे तसे फारच कमी मित्र आहेत. त्यात बालमित्र म्हणून ज्यांच्या सोबत बालपण घालवल त्यांना तर नंतर विसरुनच गेले होते . तस ते ही त्यांच जून घर सोडून नविन घरी गेले तेव्हा आम्हा जून्या मित्रांना विसरलेच ना ? पण आज 25 वर्षांनी पुन्हा जूनी ओळख नव्याने झाली तेव्हा मात्र या नव्या ओळखीने माझ जग पूर्ण बसलून जाईल याबाबत काहीच कल्पना नव्हती.

माझ्या एका मित्राने फेस बूक वर खात उघडण्यास मला सांगितले होते. काही माहीती फेस बुक वरुन डाऊनलोड करायची होती. तोपर्यंत फेस बुकशी आपल दुरपर्यंत काही माझा संबंध नव्हता .कारण मित्रच मोजून करणारी मी त्या वाटेकडे बघू तरी कशाला कारण तिथ ब-याच फ्रेंड रिक्वेस्ट येतात. कशाला हवेत आपल्याला मित्र . माझे दोन मित्र पुरे नको ते फेस बुकच विश्व .पण नकळत का होईना त्या वाटेवर पाऊल पडल फेस बुक काय असत ते ही माहीत नव्हत किंबहुना हया जगाशी अज्ञान होते . झाल एकदाच माझ खात फेसबुक वर उघडून आणि या जगाशी माझी ओळख सुरु झाली .प्रोफाईल फोटो अपलोड केल्यावर खुपश्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या पण त्यातल्या माझ्या ओळखीच्याच लोकांशी मी कनेक्ट झाले.

असच एक दिवस फेस बुक उघडून मी फ्रेंड रिक्वेस्ट पाहत असताना सर्च मध्ये मी “पी” हे अक्षर टाकले आणि पी या नावाखाली सर्व संबंधीतांची नाव येऊ लागली . अगदी अनवधनाने मी त्यांच नाव सर्च मध्ये टाकल होत का कोणास ठाऊक मला त्यांच नाव का शोधावस वाटल .तस घरी माझा भाचा त्याच्या तोंडात सतत त्यांच नाव . गावावरुन आल्यावर तो रोज रात्री झोपताना त्यांच्या गावाकडच्या सर्व आठवणी रंगवून रंगवून सांगायचा .त्यात हयांच नाव प्रखरतेणे यायच . क्रिकेटची कॉमेट्री ते कसे देतात ते ड्रायव्हींग कसे करतात ,सगळ सगळ रोज कानावर पडत होत. म्हणून की काय मी कुतूहलाने त्या दिशेने वळेल असेन. झाल नाव अणि नंबर खातरजमा करुन मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली ,नंबरही माझ्या भाच्याच्या मोबाईल मधुन मिळवला होता. या आधी कधी वाटल नव्हत त्यांना आठवावस त्यांच्याशी बोलावस.पण ते गावाला एका छानशा प्रोजेक्टवर काम करतायत हे घरातन कळाल होत . मग एवढ सुंदर काम ते करतायत , त्यांच कौतूक कराव हो -हो त्याच उद्देशान मी त्यांना शोधुन काढल होत आणि शोधताना मार्गही सापडत जात होते आणि हया मार्गावर मी माझ पाऊल टाकत जात होते.

फ्रेंड रिक्वेस्ट करुन दोन दिवस झाले तरीही समोरुन काही प्रतिसाद नाही तेव्हा काहीस वाईट वाटल. 25 वर्ष खुप असतात एखादयाला विसरायला हा नियम खरा वाटू लागल. पण तरीही का कोणास ठाऊक कसही काहीही करुन त्यांच्याशी बोलाव हाच ध्यास घेतला . फेस बुक वरुन काही उत्तर येईना म्हणून व्हाट ऍपवर मी त्यांना गाठल.” हाय !!कसे आहात ? अशा मजकूर टाकून मी स्वत:ची ओळख करुन दिली .पण काहीही उपयोग झाला नाही साहेब तसे खूप व्यस्त असायचे व्यस्त म्हनूण “ साहेब” हि पदवी मीच त्यांना दिली होती. म्हणून काही व्हाटस् ऐपच्या मेसेजला प्रतिसाद अगदी दोन दिवसांनी मिळाला होता. सर्व मार्गा वरुन निराशाच हाती आली होती, आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी मला माझ उत्तर सापडल होत साहेंबानी व्हाटस् ऐप मेसेजला प्रतिसाद दिला होता. मला ओळखण्याची पोचपावती दिली होती . “हाय बडी!!! आय रिकगनाईज यु .... अस जेव्हा मी वाचल तेव्हा जीव भांडयात पडला .चला अजून विसरले नाहीत एवढ पटल . “कसे आहात ?” हयाच काही उत्तर मिळाल नाही कारण खूप व्यस्तना पण “ तू कशी आहे बडी “ हयाच उत्तर मजेत म्हणून दिल तुमची आठवण काढतो अस ही ठासून सांगितल एवढस आमच पहिल वहिल संभाषण त्या गोड प्रवासाची सुरुवात होती.

मग रोज गुड मॉर्निग मेसेजना सुरुवात झाली रोज न चुकता मी त्यांना मेसेज करायची त्यांना तर ते पाहायला पण वेळ नव्हता . हे त्यांच्या लास्ट सिन वरुन ध्यानात यायच पण काहीही वाईट वाटायचे नाही .कारण एवढ व्यस्त व्यक्तीमहत्व मी तरी पाहील नव्हत. तरी माझा नित्य नियम मी काही सोडला नव्हता न चुकता मी त्यांना मेसेज करायचे संदेश ,जोक्स ,प्रश्न उत्तरे काहीही पोस्ट करायचे हे माहीत असुनही की बिचा-यांना हे सर्व पहायलाही वेळ नसेल .कधी कधी माझ्यावर दया करुन ते मला प्रतिसाद पण करायचे. त्याचे प्रत्येक मेसेज वाचताना मला खूप आनंद व्हायचा .आमचा मेसेज चा सिलसिला असाच सूरु होता ,त्यात त्यांचे कमी माझेच जास्त मेसेज असायचे. वाटायचे हयांना माझ्याशी बोलायला आवडत नसाव बहूतेक ? किंबहुना हे फारच मोजून मापून शब्द टाकणारे असावेत अस काहीस .आमचा मेसेजचा दिनक्रम सुरु होता पण तो वर वरचा वाटत होता .आमची मैत्री जरी जूनी असली तरी आजच्या दिवशी आम्ही नव्याने मित्र झालो होतो .एका जुन्या पुस्तकाला नव्याने कव्हर लावावे तस काहीसा तर हा प्रकार नाही ना अस वाटत होत .पण काहीही असो जून ते सोन म्हणतात ना , शेवटी 25 वर्षाचा कालखंड मोठा आहे.त्यात आम्ही एकमेंकाचे हात सोडले तेव्हा खुपच लहान होतो आणि आज एवढ्या कालावधी नंतर बोलण सुरु केल त्यात त्यांचा स्वभाव आवडी निवडी कसाचाच मागमूस नाही .त्यामूळे पटकन काहीही बोलताना मी दचकत होते .एकादा शब्द चुकून त्यांना लागणार नाही ना ? म्हणून काळजी घेत होते .तस मैत्री खात्यात एखादी चुक त्यांनी निभावून नेली असती पण तरी नव्याची नवलाई होती ना !!!!

मेसेज करता करता एकदा वाटल आपण बोलूया का ? अशी इच्छा प्रकट केली , पण आधी बोलणार कोण ? त्यांनी मला वचन दिल उदया ना मी तुला रात्री 8.00 वा फोन करेन. म्हणून मग मी रात्री 8.00 ते 9.00 वा. पर्यंत वाट बघत होते ,पण साहेंबानी काही फोन केलाच नाही .आता फोन येईल नंतर येईल मी आपली वाट बघून बघून थकले .जाऊ दे व्यस्त असतील विसरले असतील अस स्वत:च सांतवन केल , आणि सरते शेवटी मीच फोन करण्याचा पुढाकार घेतला.दुस-या दिवशी लंच टाईम मध्ये कार्यालयाच्या लॅन्ड लाईन नंबरवरुन फोन केला .म्हटल माझा नंबर बघून फोन उचलला नाही तर ? दबकतच नंबर फिरवला , आजही तो क्षण मला आठवतो एक निराळा आनंद माझ्या चेह-यावर होता. आमच पहिल संभाषण “हॅलो !!! कसे हात !!! आणि मग त्यांच आणि त्यांच्या प्रोजेक्टच भरभरुन कौतूक केल . 25 वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला पण तो मला काही नवा वाटला नाही. कारण तो माझ्यासाठी नविन नव्हताच मूळी. पण तरीही त्या संभाषणात दोघांमध्ये एक अंतर आहे हे जाणवल .शेवटी एवढ्या अवकाशाने अचानक धक्का दिल्या सारखा मी फोन कॉल केला होता .त्यांनाही काय बोलावे सुचले नसेल बिचारे बुचकाळ्यात पडल्यासारखे जाणवत होते.

तस त्यांच्याशी बोलल्यावर माझ काम मी फत्ते केल होत. कारण हया प्रवासाची सुरुवात त्यांच कौतूक कराव एवढाच उद्देश होता. हा हेतू माझ्या दृष्टीन सफल झाला होता आता पुढे बालावे की नाही हे ठरायच होत. रोज मेसेज सुरु होतेच कधी तरी ऑनलाईन गाठी- भेटी होऊ लागल्या . त्यात ते माझा स्टेटस वाचतायत हे ध्यानात यायला वेळ लागला नाही . कारण मी एक स्टेटस ठेवला होता ‘अरे तुम्ही ऑनलाईन असून देखील प्रतिसाद देत नाही आणि आम्ही उचकी लागली तरी डेटा ऑन करतो’ आणि त्यांनी मला विचारले तुला काय माझ्या उचक्या येतात का? होय मला खरच उचक्या येत होत्या हे मी कबूल केल. हो आम्ही एकमेकांना आठवायला लागलो होतो.पण विसरलच कोण होत ते विसरले असतील पण मी माझ्या मनातल्या कोप-यात त्यांना जपून ठेवले होते. बस त्या कोप-याच दार उघडण्याचा अवकाश होता ते समोर येण्याचा अवकाश होता हे अस होईल ते ही इतक्या वर्षांनी खरच वाटत नव्हत.

आता न चुकता मेसेज करायला लागलो होतो. माझ्या प्रत्येक मेसेज ते छान प्रतिसाद देत होते. त्यांची ती टिप्पणी मला आवडू लागली होती. असच एकदा राधा कृष्णाच एक विडिओ क्लिपिंग वर मी त्यांना त्यांच मत मांडायला सांगितल. तस माझ्या मते तो विडियो तसा साधा होता. पण काकु त्याला रोमांटिक म्हणत होती . तुम्हाला काय वाटत अस मी त्यांना विचारल ?कारण काकू चुक आहे हे मत मी मांडून ठेवल होते. पण त्यांनी एवढ सुंदर उत्तर दिल त्यावेळेस त्यांच्या हुशारीच कौतूक वाटल .एवढ सम्यक उत्तर खरच खुपच पसंत आल होत. पूढे मग राधा कष्णाच्या माध्यमातून एकमेकांची मन ओळखण्याचा प्रयत्न आम्ही केव्हा सूरु केला ते आम्हाला कळालच नाही . मला वाटत हाच तो मार्ग होता जेथून आम्ही नविन वळन घेतल होत , ते ही नकळत .पुढे रोज मेसेज व्दारे आमच बोलण सुरु होतच पण कॉल करुन प्रत्यक्ष बोलण्याचा कधी प्रयास केला नाही. त्यावेळेस ते आवश्यक पण वाटत नव्हत.कारण रोज एकमेकांना आठवण करन एवढ्या पुरत हे जग आहे. एवढ ध्यानात ठेवल होत .अशातच माझ्या पदोन्नतीच परिपत्रक आल , परीक्षा देऊ की नको हाय व्दिधा मनस्थितीत होते. पदोन्नती नंतर जग मला दिसत होत. काय करावा कळत नव्हत जाणकार सगळ्यांशी चर्चा केली , वरिष्ठांशी अनुभवी लोकांशी बोलून त्यांची मत विचारली .सगळेच म्हणाले अग तु परीक्षा तर दे शेवटी एक दिवस मी त्यांनाच विचारल अहो माझ्या प्रमोशनची परीक्षा येतेय काय करु ? त्यांनीही होकारात्मक उत्तर दिल ,अग तु हुशार आहेस परीक्षा दे तु पास होशील!!! अस काहीस मग मलाही नाही म्हणता आल नाही का कोणास ठाऊक माझ्या मनात नसतानाही मी परिक्षेचा फार्म भरला परिक्षा एक महिन्यावर होणार होती. पण तरी माझ लक्ष काही परीक्षेत नव्हत. परीक्षेकरीता क्लासेस सुरु झाले मी रोज न चुकता क्लॉसला जाऊ लागले .त्यांची आठवण आली की व्हॅटस ऐप पाहायचे मेसेज स्टेटस बघायचे .पुढे अभ्यासाला जोर धरला पण मग परीक्षाच एक महिना लांबणीवर गेली . खूप आनंद झाला होता कारण परीक्षेच्या अभ्यासाची तयारी काही झालेली नव्हती .यादरम्यान गणपती करिता ते मुबंईला येणार होते मी आतुरतेणे त्यांची वाट बघत होते आणि ते मुबंईला आले .पण इकडे आल्यावरही आम्ही मेसेज करत होतो.आता तर मेसेजेची संख्या वाढली होती . आनलाँईन चॅटिंग दिवसभर तर होतच होती , पण रात्रीही सुरु झाली .मी अभ्यासाठी रात्री जागरण करत असायचे आणि साहेब या जागरणात आमची सोबत करायचे .मुंबईत येऊनही मला भेटत नाही शेवटी , त्यांनी मला विचारल तु सुट्टी घेऊ शकत नाही का? पण पुढे अभ्यासाकरीता सुट्टी घेणार होते म्हणून मला सुट्टी घेता येत नव्हती. खुप वाईट वाटत होते शेवटी मग ठरवल आपण भेटायचच . ठिकाण ,वेळ मीच ठरवली दादर शिवाजी पार्क मुहुर्त काय तर गणपती विसर्जन तरी ते बोलतायत, अग गणपती विसर्जना करीता बोलवते का तू मला ? तरी माझे डोळे उघडले नाहीत आणि नंतर खाडकन झोपेतून जागे झाल्यासारखे मी त्यांना कॉल केला “अरे होय उदया गणपती विसर्जन दादर चौपाटी वरती खुप गर्दी असले , ट्राफिक पण खुप असेल जाऊ दे मग नको भेटूया आपण अशा प्रकारे आमची पहिली वहीली भेट अपुर्ण राहीली.

जोवर ते मुंबई मध्ये होते आमच्या मेसेजेस ना थोप नव्हता , हया क्षणापर्यंत आम्ही एकमेंकात खुप गुंतत गेलो होतो. रोज रोमांटीक मेसेजेस शायरी अगदी उदंड वाहत होत्या ,त्यांनी पुढे केलेला प्रेमाचा हात मी कधी हातात घेतला कळालाच नाही. खरच खुपच रोम्यांटीक आहेत ते आजपर्यंत कमी बोलणारे म्हणून मी ज्यांना समजत होते ते आता इतके बोलायला लागले होते कि त्यांना आवरण अशक्य प्राय होत चालल होते .ज्या दिवशी त्यांचा मेसेज येत नव्हता तो दिवस खुपच उदास वाटायचा .अशातच ते परत निघून गेले आणि आपल्या विश्वात पुन्हा व्यस्त झाले , मी ही माझ्या अभ्यासात गूंतून गेले मी परिक्षे करिता 15 दिवसांची रजा मंजूर करुन घेतली होती .एकदा थट्टेने मी त्यांना म्हंटल पण रजा घेऊन मी तुमच्याकडे येऊ का? माझा छान अभ्यास होईल. पण चक्क नकारार्थि उत्तर मिळाल नको तुझ्यामूळे माझ कामात लक्ष लागणार नाही.रजेवर असताना फक्त स्वयंपाक करणे ,अभ्यास करणे आणि हयांच्याशी चॅटींग करणे एवढ काय ते काम. पुढे मग परिक्षेला चार दिवस उरले तेव्हा आपण बोलूया नको हा! अशी मी विनंती त्यांना केली .पण माझच काही खर नव्हत ,एकही दिवस त्यांच्याशी बोलल्या वाचून माझा जात नव्हता ,तर चार दिवस कसे जाणार होते . .शेवटी आम्ही बोलण सुरु केल मग ते काय थांबणार होते .शेवटचे दोन दिवस तर आमच प्रेम ओसंडून वाहू लागल इतक की माझ लक्ष अभ्यासात कमी आणि मोबाईल मध्ये जास्त केंद्रित होउ लागल होत. शेवटी दोन दिवस तर तारेवरची कसरतच चालली होती माझी चॅटिंग करु की अभ्यास शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला पेपेर तसा वाईटच गेला होता , पण सर्व उत्तर दिली होती. माझ भाग्य चांगल सर्व बरोबर होती .कधी एकदाची परिक्षेच्या वेळख्यातून बाहेर पडते असे झाले होते. दोन महिने तणावा खाली गेले होते .पण सोबत ते होते जेव्हा जेव्हा अभ्यासाचा क्षीण यायचा गणित नको व्हायच ते आपल्या पध्तीने मला गणित शिकवायचे. छोटे छोटे विनोद करुन माझा थकवा कमी करण्याचा प्रयत्न करायचे एक वेगळ नात होत आमच आम्ही अद्याप एकमेकांना पाहिलही नव्हत न बघता कोणी कोणावर कस काय प्रेम करु शकतो. शेवटी ख-या प्रेमाला अटी शर्थीच बंधन नसत ते खर आहे.

परिक्षा होऊन दोन दिवस झाले होते तेव्हा कुठे साहेबांनी विचारल पेपर कसा होता तो पर्यंत मी ही चक्क पेपर कसा तो विसरुन गेले होते . किंबहूना ते आठवायची इच्छा होत नव्हती म्हणून मी तो प्रश्न टाळला. साहेब कुठ मँगलोरला गेलेल होते , प्रवासात एकटे म्हणून की काय माझी खूपच आठवण येत होती . शेवटी ऑनलाईन मला पकडल हॉटेल मध्ये एकटा आहे आपण गप्पा गोष्टी करुया , अशी जेव्हा फर्माइश आली तेव्हा मी ही होकार दिला आणि आज चक्क कॉल करुन आम्ही बोलू लागलो. प्रत्यक्ष बोलताना केवढ धडधडत होत माझ ह्दय त्यारात्री आम्ही खूप गप्पा मारल्या खुपच आनंद झाला होता. आता तर रोजच 8.00 वा.आम्ही फोन वर गप्पा मारु लागलो होतो .यादरम्यान निकालाच्या वार्ता ऐकायला मिळत होत्या . आज निकाल आहे उदया आहे संध्याकळी नक्की अस काही. रोज भित्तीच सावट मानेवर!! काय होतय काही माहीत नव्हत .त्यांना तर काहीच कळू दिल नव्हत पण निकालाच्या दोन दिवस आधीच माझ्या मित्राने मला कॉल केला मी पास झाले म्हणून अभिनंदन केल होत आणि निकाल लागला मी मिरीट लिस्ट मध्ये आले होते. त्यांना कधीच एकदा सांगेन अस झाल होत आणि त्यांना मेसेज केला “ हे! आय किलिअर माय इक्साम “ पण रोजच्या प्रमाणे साहेब व्यस्त म्हणून फक्त अभिनंदन एवढच काय ते पदरात आल .पण नंतर त्यांना कस कळाल देव जाने की मला छान मार्क मिळाले मी मिरिट लिस्ट मध्ये आले . लगेच माझ कौतुक होऊ लागल , पार्टिचे आमिष मिळु लागल. खर तर हयांच्या सोबत चॅटिंग करता करता मी अभ्यास केला होता .पुढे मग पोस्टिंग कुठे मिळणार याच टेंशन येऊ लागल. मुख्य कार्यालयातन वरिष्ठांनकडे हट्ट करुन मी मला हवी ती पोस्टिंग करुन घेतली होती. आता परिक्षा ही झाली होती , छानशी पोस्टिंगही मिळाली होती. आता कोणताच त्रास नव्हता. फक्त एकच काम साहेबांना आठवणे आता आम्ही आमच्या प्रेमाच्या त्या टप्प्यावर होतो जिथे आता बोलणे थांबवून भेटण्याची वेळ आली होती आणि त्यांनी मेसेज केला मी मुंबईला येतोय. दोन महिन्यानंतर पुन्हा ते एकदा मुंबईला येणार होते आता तर ते मला भेटायला अधिर झाले होते.आम्ही महालक्ष्मी टेंम्पल ला भेटायच ठरवल होत पण ऑफिस सुरु असल्याने माझ्याकडे वेळ नव्हता , म्हणून आधी मी भेटण टाळल पण ते खुप विनवण्या करु लागले तेव्हा फक्त “एक मिनिट “ भेटेन अशी कबुली दिली.

भेटल्यावर पहिला प्रश्न काय विचारू “कसे आहात? “ते तर चॅटिंग करत होते त्यामुळे माहीत होते मग काय विचारु प्रवास कसा झाल ? घरी सर्व ठिक आहेत ना ? काहीच कळत नव्हत प्रश्नांच जाळ मनात तयार झाल होत. सर्व प्रश्न नावडते वाटायचे आणि मी त्यांना खोडून टाकायचे . शेवटी ठरवल जे सुचेल ते विचारु , तेवढ्यात त्यांचा फोन आला “ अग मी आलोय तुझ्या कार्यालयाच्या गेट वर उभा आहे. मी धावतच खाली आले ,गेट कडे बघु लागले मला काही ते दृष्टीक्षेपास पडत नव्हते , कसे दिसतील दोन गाडया गेटच्या मध्ये उभ्या होत्या .पण यादरम्यान त्यांनी मला पाहीले होते, अग तु मला दिसतेस पण अजूनही ते काही माझ्या दृष्टिस येत नव्हते . माझी इच्छा होती मी त्यांना आधी पाहाव इकडे तिकडे जिथे शक्य होईल तिकडे मी माझी नजर दौडवत होते , पण काहीच उपयोग होत नव्हता . पण एव्हान त्यांनी मला पाहील आणि आता ते माझी बाहेर येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात त्या दोन गाड्या बाजूला झाल्या आणि मी त्यांना पाहील खरच तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ते खरच फारच सुंदर दिसायला आहेत . त्यांना पाहातच क्षणी मी लाजून चेहरा वळवला “हॅलो” बोलायल हात पुढे केला. पुढे मग जिथे त्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती तेथे आम्ही गेलो ते क्षण श्ब्दात मांडणे मला शक्य नाही. कारण त्या क्षणी मी खुपच भाबांवले होते वाटत होते जणू “अलडश्या कोण्या क्षणी तुझी माझी भेट व्हावी!!! तळमळणा-या दोन ह्दयांची भेट अगदी थेट व्हावी “!!! त्यांच्या गाडी पाशी आल्यावर त्यांनी गाडीतून आणलेली फुल मला अगदी फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून मला प्रजेंट केली. ती फुल स्विकारताना माझ मन सूखावत होत माझा तर विश्वासच बसत नव्हता मला गाडीत बसवून त्यांनी गाडी सुरु केली .मला काहीच कळत नव्हत काय चालल आहे ते. मी अगदी आश्चर्यातच होते कुठे जातोय ते ही विचारण्याची माझी इच्छा नव्हती .त्यावेळी त्यांनी कुठेही मला नेले असते तरी माझी ना नसती . यांना पाहील आणि मी अख्ख जग विसले होते. इतकी घाबरले होते की लाजून मी त्यांच्या कडे पाहत न्व्हते , जसे काही पापण्यावरती लाजेचे दडपण ठेवल्यामूळे नजर खाली झुकलेली होती. कधी कधी नजरेच्या कोप-यातून मी त्यांना न्याहाळत होते. माझे शब्द त्यावेळेस मूकेच जणू झाले होते. एवढ्यात आम्ही वरळी सिलिंग वर पोहचलो. मला तर काही पत्ताच नव्हता मी माझ्याच धुंदित होते आणि बाहेर जेव्हा पाहील तेव्हा कळाले अरे आपण खुप दुर आलो आहोत आणि मी घाबरले भितीने मी त्यांनच शर्ट घट्ट पकडल .चला परत माघारी जाऊया खूप दुर आलो आहोत आपण तस मग त्यांनी यु -टर्न घेतला आणि आम्ही कार्यालयाकडे मागे परत आलो. त्यानां गुड बाय करुन मी परत कार्यालयाच्या दिशेने चालू लागले . तस पाठी फिरावस वाटत नव्हत पण उदया परत भेटुया असे वचन दिले होते.

आमची पहिला भेट फक्त “एक मिनिट” भेटुया म्हणुन वचन दिले होते. पण त्या एका मिनिटात मी या जगात नव्हते मूळी अगदी स्वप्नात असल्यासारख वाटत होते तेही माझ्या राज्यासोबत . तो एकांत माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण आहे . आता पर्यंतचा आयुष्यातील सगळा आनंद त्या एका क्षणात एकटवला होता , वाटत होते तो एक मिनिट कधी संपूच नये...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama