vinit Dhanawade

Fantasy

3  

vinit Dhanawade

Fantasy

" वाढदिवस " ......... भाग २

" वाढदिवस " ......... भाग २

9 mins
1.6K


          आणि ३ जानेवारी पासून " उमा " junior accountant म्हणून कामावर रुजू झाली. महेशला किती आंनद झाला होता. " आजकाल देव जर जास्तच खूष आहे वाटतं माझ्यावर " तो मनातल्या मनात म्हणाला. आणि तिकडे महादेवाने स्मितहास्य केलं. दिवस असेच जात होते. " उमा " खूप छान होती. दिसायला आणि स्वभावाने सुद्धा. अगदी मनमिळावू होती ती एका कंपनीच्या Boss ची मुलगी असूनसुद्धा तिला त्याचा गर्व अजिबात नव्हता. सगळ्या office मध्ये ती छान वावरायची. सगळ्यांना सांभाळून घ्यायची. ती आल्यापासून एक वेगळच चैतन्य आलं होतं office मध्ये. महेश तर स्वप्नातच होता. एकच महिना झाला होता. पण खूप वर्षापासून मैत्री आहे असं वाटतं होतं त्याला. खरं तर तो तिच्या प्रेमात पडला होता. तिच्या मनातलं त्याला काहीच माहित नव्हता. इकडे Boss त्या दोघांच्या कामावर खूष होता. त्यांची मैत्री अजून घट्ट झाली होती. एकत्र यायचे, एकत्र lunch करायचे, एकत्र निघायचे. १० फेब्रुवारी, " आज तिला आपल्या मनातलं सांगूनच टाकू. काय होते ते बघू नंतर." असे ठरवून महेश office ला निघाला. पण देवळात जायला तो विसरला नाही.  


         " देवा, आज एक मोठ्ठ पाऊल उचलतो आहे. ती मला खूप आवडते रे. प्रेम आहे माझं तिच्यावर आणि आज मी तिला लग्नाची मागणी घालणार आहे. Boss काय बोलेले ते माहित नाही मला. पण तीच माझी बायको व्हावी, असं मला मनापासून वाटते.", " तथास्तु "....... महेश office मध्ये आला. ती सुद्धा आज लवकर आली होती. छान ड्रेस घातला होता तिने. महेशाला बघून ती छानसं हसली. महेशचा confidence एकदम वाढला. तिनेच पुढे येउन " बाहेर जाऊन कॉफी घेऊया का ? " असं विचारला. तो थोडीच नाही म्हणणार होता . तसे ते दोघे गेले कॉफी घ्यायला. महेशनेच कॉफीची order दिली. कॉफी येण्यास थोडा वेळ होता. तसेच बसले होते दोघे शांत. मग तिनेच विचारलं ," काय झालं ? आज गप्प का ? " ," मला तुला काही विचारायचे आहे. विचारू का ? "   ," विचार ना .... "...... शांतता , महेश गप्प. उमा गप्प. आणि एकदम उठून महेश बोलला, "लग्न करशील माझ्याशी ?" तशी ती त्याच्याकडे बघतच राहिली. " बोल ना . करशील का लग्न ? " तिने मानेनेच होकार दिला. तसा महेश नाचायला लागला. आज त्याची अजून एक इच्छा पूर्ण झाली होती. त्याला मधेच थांबवत उमा बोलली," मीच तुला विचारणार होते. Dad ला पण सांगितले होते मी. Dad सुद्धा तयार आहेत." आता तर महेश बेशुद्धच पडायचा बाकी होता. कैलास पर्वतावरून गणेश आणि माता पार्वती ते बघून हसत होते. 


       " चला, मोठी गोष्ट झाली. आता एक घर घ्यायला हवे ना. तिला काय लहान घरात जमेल का ? उद्या नाहीतरी सुट्टीच आहे. उद्या जाऊन घरासंबंधी चौकशी करावयास हवी." मनातल्या मनात बोलून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्याने उमाबद्दल घरात सांगितले. सगळ्यांना आनंद झाला. लवकरच लग्न करू असे सगळ्यांच मत ठरलं. " बघू " म्हणत महेश घराबाहेर पडला. रोजप्रमाणे महादेवाला नमस्कार करण्यासाठी तो देवळात गेला. " देवा , आज माझ स्वतःच घर बघायला जातो आहे. आशीर्वाद दे मला." नतमस्तक झाला देवासमोर. तो देवळातून निघाला काहीही न मागता. हे काही स्वर्गात बसलेल्या भगवान विष्णूला आवडले नाही. त्यांनी टिचकी वाजवली. तसं महेशच्या मनात एक विचार आला. तो परत वळला ," देवा, मी तर बघतोच आहे घर. पण Boss ने थोडी मदत करावी , असं मला मनापासून वाटते.", " तथास्तु " म्हणत महादेवाने आशीर्वाद दिला. तो पुढे जाणार इतक्यात त्याचा Mobile वाजला ," Hello, हा सर बोला........... हो... हो..... येतो मी लगेच. " Boss ने त्याला घरी बोलावले होते, तसा तो Boss च्या घरी गेला. Boss ने त्याला बसायला सांगितले." एक गोष्ट सांगायची आहे तुला. उमा माझी एकुलती एक मुलगी आणि ती माझ्या खूप जवळ आहे. ती कधी माझ्यापासून लांब जाईल असं मला कधीच नाही वाटलं. आता तिचं तुझा बरोबर लग्न होणार आहे. ती सुखी राहावी हीच माझी इच्छा. "," मला काहीच कळले नाही सर.", " हे बघ तुझ्या घराची परिस्थिती मला माहित आहे. तुझं घरही तेवढा मोठ्ठ नाही आहे. माझी सगळी संपत्ती " उमाचीच " आहे ना . म्हणून मी ठरवला आहे. आमच्या बंगल्याच्या बाजूला जो flat आहे ,तो उमाच्याच नावावर आहे तर तो आता तुझ्या नावावर करत आहे. " महेशला काय बोलू तेच कळत नव्हता. तरीही " कशाला सर ? त्याची काहीही गरज नाही ." , " अरे असू दे . उमाचे पण तेच म्हणणे आहे. शिवाय आता तू माझा जावई होणार आहेस. तर चांगलं आणि मोठठ घर पाहिजे ना. आणि तुझा आई - वडिलांना सुद्धा आनंद होईल." लवकरच महेश आणि उमाचा साखरपुडा झाला. त्याचं समारंभात महेशला घराच्या चाव्या मिळाल्या. खूप आनंदात होता तो. लवकरच त्याने आपले सामान flat मध्ये हलवले. आई वडील सुद्धा मोठ्या घरात राहायला मिळाले म्हणून महेश वर खूष होते. पण त्या घरापासून शंकराचे मंदिर थोडे लांब होते. office आणि मंदिर अगदी विरुद्ध दिशेला. तरीही महेश प्रथम मंदिरात आणि नंतर office ला जायचा. छान दिवस चालू होते. एप्रिल मध्ये लग्नाचा मुहूर्त निघाला. आणि छान वाजत गाजत लग्नही पार पडले. महेश उमा बरोबर लग्न झालं म्हणून खूष तर त्याचा Boss मुलीचं लग्न होऊनही ती आपल्याजवळच आहे म्हणून खूष. 


      सगळं कसं छान चालू होतं. महेश नेहमी प्रमाणे मंदिरात आला. छान दिवस होता तो. महेशच्या मनात तो college मध्ये असल्यापासून एक विचार होता, नोकरीपेक्षा कसला तरी business करायचा, आपणही कोणत्यातरी कंपनीचा " Boss " असावं अस त्याला वाटे. पण तेव्हा त्याची परिस्थिती चांगली नव्हती. आता तर तो चांगला कमवत पण होता आणि पुरेसे पैसेही जमा झाले होते. Job सोडून कसला तरी business चालू करावा असे त्याला वाटतं होते म्हणून तो देवाला सांगावयास आला होता. " देवा तुझा कृपेने खूप चांगले दिवस आले आहेत. असेच येऊ दे. माझी खूप इच्छा होती business करण्याची. पण ती काही कारणास्तव पूर्ण होत नव्हती. आता तुझ्या आशीर्वादाने मी माझा business सुरु करू शकतो. मी कोणाचा तरी Boss असावे , असं मला मनापासून वाटते. आशीर्वाद दे देवा. " ," तथास्तु "...... मंदिराबाहेर पडला महेश तेव्हढयात त्याला उमाचा फोन आला," कुठे आहेस तू ? लवकर ये. पप्पांना "heart attack" आला आहे."," अरे बापरे, काय झालं हे" तो धावतच पोहोचला हॉस्पिटल मध्ये. तिथे उमा पप्पांच्या बाजूलाच बसली होती. " काय झाल सर ?" ," अरे काही नाही, normal आहे मी "," काही नाही हा पप्पा. आता जागेवरून हलायचे नाही." तेव्हढयात डॉक्टर आले " नॉर्मल attack होता. जास्त tension मुळे होते असे. पण आराम तर करावाच लागेल हा."," बर मग, महेश... manager ला बोलावून घे जरा." Boss ने महेशला सांगितले " महेश आता तुला सगळ्या कंपनीची माहिती आहे, कसा व्यवहार चालतो, कोण कोण काय काय काम करतो आणि तुझा व्यवहार कौशल्य सुद्धा चांगला आहे. सोबत उमा पण आहे. डॉक्टर तर मला आता office मध्ये जाऊ देणार नाहीत.", " निदान एक महिना तरी ", "बघितलस ना. तर पुढचा एक महिना तरी तू आपलं office सांभाळावास असं मला वाटते. नाही म्हणू नकोस. " तेव्हढयात Manager आले. " मी सगळं सांगितलं आहे महेशला. तो तयार आहे. पुढचा एक महिना तो कंपनीचा " Boss " असेल." सगळं कसं अचानक घडलं. महेश तर गांगरूनच गेला. पण कोणीतरी office सांभाळालच पाहिजे ना. म्हणून तो तयार झाला.       एका दिवसात senior accountant वरून महेश कंपनीचा Boss झाला होता. स्वर्गात तर त्याच्या नशिबावर सगळे खूष होते. " काय नशीब आहे त्या मुलाचं. साक्षात महादेवाने त्याला वरदान दिलं आहे. मजा आहे त्याची." सगळ्या देवामध्ये चर्चा चालू होती. इकडे पृथ्वीवर , महेश मात्र खूप मेहनत करत होता. पप्पांना बेडरेस्ट सांगितल्यामुळे उमा सुद्धा महेशला मदत करत होती. त्याचा फायदा असा, त्या महिन्यात कंपनीला जरा जास्तच फायदा झाला. त्यामुळे इकडे Boss खूष आणि तिकडे महेश सुद्धा खूष. Boss आजारी असल्याचा कोणताच तोटा झाला नव्हता. एका महिन्यानंतर जेव्हा ते office मध्ये आले तेव्हा office चे बदलले रूप बघून त्यांना आनंदच झाला.महेश तर खूप खूष होता. लवकरच त्यांनी महेशला कंपनीचा पार्टनर करून घेतले. जून महिन्यापासून तो officially कंपनीचा Boss झाला. अनेक मोठी कामे तो अगदी सहजरीत्या पार पडायचा. त्यामुळे कंपनीला फायदाच होत गेला. जून पासून सप्टेंबर पर्यंतच्या ४ महिन्याच्या कालावधीत त्याच्यामुळे कंपनीला जवळपास दुप्पट फायदा झाला होता. त्याच बरोबर कंपनीची दुसरी Branch " open " करायची असा प्रस्ताव त्याने मांडला. Boss ला ही ते आवडले. लगेचच त्यांनी जागाही बघितली आणि काम सुरूही केले.      ऑक्टोबर महिन्यात त्याची दुसरी Branch सुरु झाली. पण ती जागा लांब होती. मग तिकडेच महेशने एक बंगला विकत घेतला. सगळे तिकडेच राहावयास गेले. मात्र ते महादेवाचं मंदिर आता खूप दूर गेला त्याच्यापासून. तसा तो रोज जायचा मंदिरात. पण आता तो दुसऱ्या शहरात राहायला आला होता. महेशने एक शक्कल सुचवली. बंगला खूप मोठा होता. त्यातली एक रूम कोणीच वापरायचे नाही. मग त्यालाच त्याने मंदिराचे रूप दिले. अगदी तशीच महादेवाची मूर्ती त्याने तिथे विराजमान केली. बंगल्यातच त्याने महादेवाचे मंदिर वसवले. आता त्याला एवढया लांब जायची गरज नव्हती. महादेव आणि माता पार्वती या दोघांनाही ते पाहून खूप आनंद झाला. 


    नवीन कंपनी तर सुरु झाली पण गेल्या १० दिवसापासून रोज तोटाच होत होता. महेश अगदी निराश झाला होता.काय करावं तेच त्याला उमगत नव्हत. शेवटी तो देवघरात जाऊन बसला शांतपणे. देवासमोर जरा बोलावसं वाटलं त्याला. " देवा , तुझा कृपेने नवीन कंपनी तर उघडली. परंतू नुकसानच होते आहे रे. मोठ्या उमेदीने सुरु केलं होते मी. काय करू कळत नाही मला, काहीतरी चमत्कार घडावा आणि माझं नुकसान भरून यावं , असं मला मनापासून वाटतं."," तथास्तु "...... त्या रात्री त्याला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी office मध्ये गेल्यागेल्याच त्याला एक मोठी news मिळाली. एक मोठ्ठी assignment मिळाली होती कंपनीला. सुखद धक्का होता तो. महेश पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला. पुढच्या काही दिवसात अजून मोठी कामे कंपनीला मिळाली. नुकसान तर केव्हाच भरून निघाला होता. फायदाच फायदा होत होता. खूप फायदा आणि त्याच बरोबर आनंदही . ऑक्टोबर ते डिसेंबर , या दोन महिन्यात किती फायदा झाला होता त्याची तर गणतीच नव्हती. कंपनी अजून मोठी झाली दोन महिन्यात. सगळी महादेवाची कृपा. आणि तेवढी त्याची मेहनतही होती. या सगळ्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्याने. " ३१ डिसेंबर. वर्षाअखेर आज. आणि उदया वाढदिवस माझा. उदया सगळ्यांना सुट्टी देऊया. आणि पार्टी करूया." असं त्याने ठरवलं.


      १ जानेवारी, आज महेशचा वाढदिवस आणि महादेवानी दिलेल्या वरदानचा शेवटचा दिवस. ठरल्याप्रमाणे कंपनीला सुट्टी होती. पण महेशने सगळ्यांना घरी बोलावून मोठ्ठी पार्टी दिली. सकाळीच तो महादेवासमोर नतमस्तक झाला होता नेहमी प्रमाणे, त्यांना कसं विसरणार तो. त्याने आज काही मागितला नाही देवाकडे. सगळं तर मिळालं होतं त्याला. काही मागायची गरजच नव्हती. त्याचे आईवडील खूष , उमा चांगला पती मिळाला म्हणून खूष, उमाचे पप्पा म्हणजेच महेशचा Boss " चांगला , मेहनती जावई मिळाला , कंपनी मोठी केली म्हंणून खूष. सगळेच खूष. सगळेच छान. सगळा दिवस छान गेला आज. तिकडे स्वर्गात सुद्धा आनंद होता सगळ्याच्या मनात. " छान झालं महेशच. " ब्रम्हदेव म्हणाले. महादेव शिवाय गणेश , माता पार्वती सुद्धा खूष होती. 


दिवस संपून रात्र झाली. रात्रीचे ११. ४५ वाजले होते. वरदान संपायला अजून १५ मिनिटे बाकी होती. महादेव नेहमीप्रमाणे डोळे मिटून शांत बसले होते. मात्र गणेश ,माता पार्वती तसेच बाकी सर्व देव जरा tension मधेच होते," रोज लवकर झोपणारा, आज कसा काय जागा आहे ? उगाचच त्याने काही मागितले नाही पाहिजे आता ? " माता पार्वती बोलली. 


      घरातले बाकी सगळे कधीच झोपलेले,महेश मात्र galary मधे उभा राहून विचार करत होता." गेल्या वाढदिवसाला मी फक्त एका कंपनीचा junior accountant होतो, घर लहान होतं. आज..... आज एका कंपनीचा मालक आहे, छानशी बायको आहे, मोठ्ठा बंगला आहे. सगळं कसं छान छान झालं एकदम. एका वर्षात कुठल्या कुठे पोहोचलो मी. सगळी महादेवाची कृपा." असं म्हणून एकदा महादेवासमोर नतमस्तक व्हावा अस त्याला वाटलं. " आता कशाला जातो आहे, उद्या जायचे ना सकाळी." भगवान विष्णू मनातल्यामनात बोलले. १२ वाजायला अजून ५ मिनिट बाकी होती, महेश देवघरात आला आणि महादेवाच्या मूर्ती समोर बसला. 


" देवा, गेल्या वर्षभरात खूप काही झालं. सामान्य माणसापासून एक मोठा माणूस झालो. सगळं तुझ्या कृपेने झालं. आता काही मागणं नाही तुझाकडे. फक्त माझ्या सगळ्या मित्रांना , नातेवाईकांना खूष ठेवावं, असं मला मनापासून वाटते. "," तथास्तू " महादेवाने पुन्हा डोळे न उघडताच म्हटले."चला, काहीतरी चांगला मागितल याने. माता पार्वती म्हणाली. आणि सुटकेचा निश्वास टाकला. गणेश , विष्णू तसेच बाकीचे सर्व देव सुद्धा " tension Free " झाले. इकडे पृथ्वीवर, महेशच्या सर्व मित्राची, नातेवाईकांची सगळी दुःख क्षणात नाहीशी झाली. १२ वाजायला अजून २ मिनिटे बाकी होती. 


      महेश अजून देवघरातच होता." मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. मी कोण होतो आणि आता काय आहे. खरच, देवाची लीला अगाध आहे."," नाहीतर, हे एक स्वप्न असावे. मी घरात झोपलेला असेन आणि झोपल्या झोपल्या एक गोड स्वप्न पाहत असेन. खरच, हे सगळं मी झोपेत पाहत असलेलं एक स्वप्नच असावं, असं मला मनापासून वाटते. " ...... झालं..... . तिकडे भगवान विष्णूने डोळे मिटून घेतले, माता पार्वती तर मट्कन खाली बसली, महादेवाच्या नंदीला चक्कर आली आणि गणेशाने कपाळावर हात मारून घेतला.       भगवान महादेवाने डोळे उघडले. अजून १२ वाजायला ५ सेकंद बाकी होती. महादेवांनी हलकेसे हास्य केले आणि म्हटले.......... " तथास्तु "  Rate this content
Log in