sangita tathod

Tragedy Inspirational

3  

sangita tathod

Tragedy Inspirational

उंबरठ्याआतील चिऊ

उंबरठ्याआतील चिऊ

2 mins
417


एक होती चिऊ. पंख असुन उडू न शकणारी. डोळे असुन सृष्टीचे सौंदर्य न पाहु शकणारी. चोच असुन हवं ते खाऊ न शकणारी. तिच घर हेच तिचं बंदिस्त जीवन. घराचा उंबरठा हिच तिच्यासाठी लक्ष्मण रेषा ! का असं या चिऊच बंदीस्त जीवन ? सारखी वटवट करणाऱ्या, लहानगिला कोणीतरी चिऊ म्हटले आणि तिचं घरातील नाव चिऊ झाले.

लहानाची मोठी होतांना चिऊ भरपूर मनसोक्त उडली.मनाचे बंधन सोडले तर ,इतर कुठले बंधन तिला नव्हते.


शालेय जीवनात अनेक बक्षिसे मिळवणारी चिऊ, आता कॉलेजमध्ये जाऊ लावली. नवतारुण्याचे तेज खुलले होते. येणारा, जाणारा नजर फाडून बघेल असे सौंदर्य! पण त्या चिऊला त्याचे काही नाही. ती तिच्याच मस्तीत, बेधुंद उडणारी. पण थोडी घाबरट. जरा कुठे खुट्टं वाजलं की, आपल्या घरट्याकडे धावणारी. थोडं खरचटलं तरी, त्याचा

बाऊ करणारी. नाजुक तनाची. संस्कारी मनाची, सात्विक गुणाची .अशी ही चिऊ.   


त्या दिवशी चिऊ कोचिंग क्लास संपवून घरी येत होती. नेहमी सोबत असणारी लिना आज सोबत नव्हती. दुपारची वेळ. रस्ता रोजचाच पण थोडा सामसूम. तिची ओढणी चाकात अडकली म्हणुन ती काढण्यासाठी तिने गाडी थांबविली. ओढणी काढुन होत नाही तोच, मागुन हिरो होंडावर चार मुलं तिला येतांना दिसली. ती चौघे जोरजोरात हसत होती. गाणी म्हणत होती. सामसूम रस्त्यावर चिऊला भीती वाटली. तिने गाडी सुरु केली. नेहमी 40 च्या स्पीडने गाडी चालवणारी चिऊ. ही मुलं आपल्याला काहीतरी करतील या भीतीने 60 च्या स्पीडने गाडी चालवू लागली. मागचा पुढचा काही विचार न करता वेगात निघाली. मेन रोडवर आली तशी, तिची गाडी समोरून येणाऱ्या सिटी बसवर आदळली.

चिऊ शुध्दीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. या अपघातात, तिला कायमचे अपंगत्व आले होते. डोळ्याची दृष्टी अधू झाली. मुखातील मोत्यासारखे दात पडले. व्हीलचेअर नशिबी आली. तिची वटवट बंद झाली. फडफड बंद झाली. घराचा उंबरठा, तिच्यासाठी बॉर्डर झाला, ती पार करणे एकटीला अशक्य झाले.


काही दिवसानंतर त्या चार मुलांची सखोल चौकशी झाली. त्या बिचाऱ्यांचा या घटनेत काहीच दोष नव्हता. त्यातील एकाचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने, ती रस्त्याने मौजमजा करत, गाणी म्हणत जात होती. चिऊला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्याचे असे झाले की....


वर्तमानपत्रात नेहमी येत असणाऱ्या स्त्री अत्याचारावरील बातम्या वाचुन वाचुन, चिऊच्या मनात धास्ती बसली होती. सामसूम रस्त्यावर एकटी असल्याने, ती प्रचंड घाबरली. ही मुलं आपल्याला नक्कीच त्रास देतील या विचाराने, तिने गाडी घाबरलेल्या अवस्थेत जोराने पिटाळली आणि स्वतःचा मोठा अपघात करून घेतला. स्वतःच्या घराचा उंबरठा न ओलांडता येणारी चिऊ आता बंदिस्त झाली. पुरुषांच्या विषयी मनात असणाऱ्या भितीने तिचा घात केला. प्रत्येक अडचणीत असणाऱ्या स्त्रीला पुरुष आपला

मित्र वाटायला हवा तरच चिऊचा चिवचिवाट अखंड सुरू राहील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy