ऋण
ऋण
सविताच्या ऑफिसमध्ये आज मिटिंग होती. सकाळी लवकर ऊठून घरचे सर्व पटापट आटोपून दहा मिनिटे आधीच ऑफिस साठी निघाली. निघतांना घाईघाईत तिची ओढणी स्कुटीत अडकली. थोडीशी फाटली,पण त्याची पर्वा न करता निघाली सविता. उगाच सर्वात शेवटी पोहचून आपणच चर्चेचा विषय व्हायला नको ! याच विचारांच्या धुंदीत सविताची स्कुटी रस्त्याला लागली. घरापासुन थोडे अंतर जात नाही तोच रेणूने जोराने ओरडून सविताला लिफ्ट साठी हात दिला. नाईलाजाने सविताला गाडी थांबवावी लागली.
"सविता, आज राहुलचा result आहे. आधीच उशीर झाला. please मला त्याच्या शाळेत सोड. तुझ्या रूटवरच आहे. प्लीज "सविताने हो नाही म्हणायच्या आताच रेणू मागच्या सीटवर बसली सुद्धा. रस्त्याने तिची अखंड बडबड सुरु होती. राहुलच्या शाळेजवळ गाडी थांबली."थँक्स, ह सविता !तुझं मागच्या जन्माचं माझ्यावर काहीतरी ऋण असेल, म्हणून प्रत्येक वेळी अशी माझ्या मदतीला येतेस तुला उशीर तर नाही झाला ना?' रेणूच्या बोलण्या कडे फारस लक्ष न देताच सविताने ऑफिस कडे स्कुटी पिटाळली. सविताच्या ऑफिसला काहीतरी कारणांनी तिन दिवस लंगातर सुट्ट्या आल्या होत्या. योगायोगाने तिच्या ओमलाही उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होत्या. दोघ माय लेकरं येणाऱ्या तिन दिवसांच्या सुट्टीत धमाल एन्जॉय करायचं प्लॅंनिंग करत होते. ओमनी तर बॅग भरली होत
ी. सोबत त्याची लाडकी मावशी आणि त्याची प्रिया ताई, संकेत दादा येणार होते. तेवढ्यात सविताची चुलत जाऊ तापाने फणफण करत अली. सोबत दीरही होते. जाऊचे करायला कोणीच नसल्याने त्यांचे प्रत्येक दुखणे सवितालाच करावे लागते. शेवटी ओमला त्याच्या मावशीसोबत पाठवून सविताने जाऊचे सर्व केले. चार आठ दिवस राहून शेवटी जातांना जाऊ म्हणाली "सविता तुझं माझ्यावर मागच्या जन्माची काहीतरी ऋण असेल ग !म्हणूनच तर तू माझं एवढे करतेस.
सविताने जातांना जाऊला नमस्कार केला. असे प्रसंग सविताच्या आयुष्यात नेहमी घडतात .त्याला कारणही तसेच ! सविता आणि तिचे मिस्टर दोघेही सेवाभावी वृत्तीचे. प्रसंगी स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करून सर्वांचं करणारे. ऑफिस असो, नातेवाईक असो, मित्र मैत्रिणी असो ,घरातील कामवाली असो,कोणाला मदत करायला नाही म्हणणार नाहित.पण सविताच्या सेवाभावी वृत्तीचा ,तिच्या चांगुलपणा चा सबंध लोक मागच्या जन्माचे ऋण फेडायचे बाकी राहिले. अस समजुन कृतघ्न होतात . याचा आता तिला राग येतो. सविता आणि तिच्या मिस्टरांचं जन्म फक्त काय मागच्या जन्माचे ऋण फेडण्यासाठी झाला का ? या जन्मात त्यांनी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा नाही का ? सतत परोपकारी वृत्ती ठेवायची का? त्यांच्या परोपकारी वृत्तीचा फायदा घेऊन इतरांनी मात्र स्वतःची पोळी भाजुन घ्यावी !