तूच माझी
तूच माझी
उर्वशी सकाळी सकाळी च नाराज होऊन बसली होती . उत्तम तिचा नवरा खुप वेळ तीला पाहत उभा होता...काहीतरी बिनसलं आहे हीच हे तर समजत होत त्याला पण नक्की काय झालं होतं कोणास ठाऊक...
दोघांचं लव मॅरेज होत 20 वर्ष झाली होती लग्नाला ..लव मॅरेज असूनपन आजपर्यंत उत्तम तिला आय लव यु अस बोलला नव्हता ..आणि ती खंत उर्वशीला नेहमीच वाटायची....पण एक मोठा प्रश्न ना ?..जर आय लव यु नाही बोलले तर लव मॅरेज कस ?? होना??
तर त्याच झाल अस उर्वशी हे एका अप्सरेच नाव आणि ते हिला अगदी शोभेसच होत ..एका लहानश्या कुटूंबात तिचा जन्म झालेला ..दिसायला खूपच देखणी .अस वाटावं जणू इंद्राच्या दरबारातली अप्सराच.. सगळ्यात हुशार ..अभ्यास, स्वयंपाक, नृत्य, गायन, आणि बऱ्याच कला होत्या तिच्यामध्ये..पण वडील एका कंपनी मालकांच्या गाडीवर ड्रायव्हर होते ..आई कपडे शिवत असे ..त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता ..एक भाऊ होता तिला ..त्याच लग्न झालं आणि तो खुशाल त्याच्या बायकोला घेऊन वेगळा राहू लागला ..आता या वयात तिच्या वडिलांना कष्ट करावे लागत होते ..खूप वाईट वाटायचं उर्वशीला पण काय करणार ती तरी बिचारी..तिचं शिक्षण चालू होतं ..,शेवटचं वर्ष चालू होतं तीच ..इतकी वाईट परिस्थिती असून पण तात्यांनी म्हणजे उर्वशीचे वडील .. दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिल होत ..ते नेहमी म्हणत ,"माणूस शिक्षणाने मोठा होतो ...पैसा पण त्याचाच गुलाम आहे ..जो शिकतो तो जगतो ..मग तो जगाच्या पाठीवर कुठेपण सुखात राहू शकतो.. आणि जो नाही शिकत तो माझ्यासारखी दुसऱ्याची गाडी चालवतो..
उर्वशी चांगल्या मार्कानी bcom झाली आणि तात्यांनी अंकुश लवाटे साहेबाना शब्द घातला ..उर्वशी च्या नोकरीसाठी.. साहेबानी लगेचच तिला बोलावं म्हणून सांगितलं ..तिची सगळी सर्टिफिकेट घेऊन ती इतक्या वर्षात पहिल्यांदाच तात्यांच्या ऑफिसला आली होती आणि ते पण तिच्या आयुष्यातला अगदी पहिला वहिला इंटरव्ह्यू द्यायला ..खूप घाबरतच ती आली ऑफिस मध्ये ..तिला सकाळी 11वाजता यायला सांगितलं होतं इंटरव्ह्यूसाठी पण ती १०लाच हजर झाली होती ..तात्यां सकाळी स्वतः ड्युटीवर जात असताना सारख सारख समजून सांगत होते..साहेब वेळेचे खूप पक्के आहेत ग पोरी ..उशीर करू नकोस ..त्यामुळे ती अशी लवकर आली होती.
इतक्यात आपल्या एकुलत्या एक मुलासोबत अंकुश साहेब ऑफिस मध्ये आले पाठोपाठ तात्या त्यांची बॅग आणि डबा घेऊन आले...ते पाहून उर्वशी पटकन जागेवर उभी राहिली ..जस सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग विश करत होता तसच हिने पण केलं..आज मला गेस्ट मध्ये कोण ग्रीट करत आहे असा विचार करून साहेबानी मागे वळून पाहिलं ..आणि मागे बघतच राहिले ..त्यांच्या मनात विचार आला इतकी सुंदर मुलगी आहे तरी कोण ? आणि ही मला का ग्रीट करत आहे ? असाच विचार करत ते तिच्या जवळ आले , "कोण आपण ?काही काम आहे का आमच्याकडे तुमचं? "
उर्वशी घाबरतच : सर मी इंटरव्ह्यू साठी अली आहे ..तुम्ही बोलवलं होत मला ..
साहेब : होका ..नाव काय तुमचं?
उर्वशी : उ..उर्वशी जगनाडे
साहेब : जगनाडे ?ऐकल्यासारखं वाटतय ..ते विचार करू लागले .इतक्यात बॅग आणि डबा आत ठेऊन तात्या बाहेर आले ..इथे काहीतरी चुकीचं घडलं की काय या विचारात घाबरून पळतच ते त्यांच्या जवळ आले
तात्या : काही चुकलं का साहेब पोरीचं?
साहेब : तात्या तू ओळ्खतोस का या मुलीला?
तात्या : हो साहेब..ही माझी मुलगी आहे ..उर्वशी तुम्ही आज बोलवलं होत ना तिला इंटरव्ह्यू साठी.
साहेब: अरे हो ..मग त्यांनी एका ऑफिस बॉय ला बोलावलं आणि सांगितलं ,"जरा चहा कॉफी बघा काय हवंय तिला .." आणि ते हसतच स्वतःच्या केबिन मध्ये गेले .हे सगळं त्यांचा मुलगा तिथेच थांबून बघत होता .त्याला हे सगळं जरा विचित्रच वाटलं होतं ..तो ही त्यांच्या मागोमाग केबिन मध्ये गेला
उत्तम : पप्पा ..हे सगळं काय होत ? जे आत्ता बाहेर झालं?
साहेब : कारे काय झालं ?असं विचारण्यासारखं?
उत्तम : पप्पा एका ड्रायव्हरच्या मुलीची इतकी काळजी कशाला ? आता सगळेजण तोच विचार करत असणार
साहेब : हे बघ मी जगाचा विचार जास्त करत नाही.. हो फक्त जे स्वतःला पटत ते मी नक्कीच करतो.
उत्तम : ठीक आहे.. पण आता तिला कसला जॉब देणार आहात तुम्ही ? हौसेकीपिंगच का? काय काम करणार आहे ती इथे? आणि त्यासाठी तिचा इंटरव्ह्यू घ्यायची काय गरज आहे पप्पा?
साहेब : पोरा तू जरी विदेशात जाऊन शिकून आला असलास तरी आजून तुला माणस ओळखता येत नाहीत ...तिचा इंटरव्ह्यू घेताना तू इथेच थांबायचंस ..
उत्तम : छे मी नाही थांबणार ..मी चाललो माझ्या केबिन मध्ये
साहेब : एकदम कडक आवाजात ,"नाही तुला अस जाता येणार नाही ..तु तिचा नकळतपणे अपमान केला आहेस ..तिची योग्यता न जाणताच तू इतकं काही बोललास ..तुला अस जाऊनच देणार नाही मी .बस इथे माझ्या बाजूला
आता वडिलांच्या आवाजातली जरब पाहून तो थोडा घाबरलाच ..बाजूची दुसरी खुर्ची घेऊन तो साहेबांच्या बाजूला बसला.
साहेबांनी रिसेप्शन ला फोन करून त्या पोरीला आत पाठवून द्या अस सांगितलं ..आणि थोडी घाबरतच उर्वशी केबिन मध्ये आली ..शिष्टाचार म्हणून तिने दरवाजा नॉक केला ...आणि इंग्लिश मध्ये ," May I Come in sir? " अस विचारलं ..उत्तम असाच इकडे तिकडे पहात बसला होता ..पण तिच ते इंग्लिश मध्ये बोलणं , त्याला अस वाटलं कोणतरी कॉन्व्हेंट ची मुलगीच बोलली.. आणि तो एकटक तिला बघू लागला ..त्याला जाणवलं ..कमालच आहे एका ड्राइव्हरची मुलगी आणि इतकी सुंदर ..तिचे डोळे पिंगट घारे.. आणि बोलके ...ओठ लिपस्टीक न लावताच गुलाबी ..केस पिंगट आणि लांबसडक त्याची एक साधी वेणी घातली होती तिने ..अंगावर जो ड्रेस होता त्याला काही ठिकाणी बऱ्याच वेळा शिवलाय अस दिसत होतं..पायात एक साधी स्लीपर होती तिच्या ...आणि एका प्लॅस्टिक च्या पिशवीत तिने तिचे सर्टिफिकेट्स आणले होते. साहेबांच्या आवाजाने त्याची तंद्री मोडली
साहेब : ये मुली आत ये..
उर्वशी आत येऊन खुर्ची जवळ उभी राहिली
आता उत्तमला तिची मजा बघायची इच्छा झाली ...काय टीव्हीवर बघून फक्त may i come in बोलून impression नाही ना पडता येत ..आता बघतोच हिच्याकडे..
उत्तम : please sit down.
उर्वशी : thank you ! sir अस बोलून खुर्चीत बसली .तिच्यात काहीतरी नक्की होत ज्यामुळे उत्तम मनात नसताना पण तिच्याकडे बघत होता ..
साहेब : तर मुली तुझं शिक्षण काय झालंय ? तू काय काम करू शकशिल?
उर्वशी: सर तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी ..
इतक्यात पटकन उत्तम : मग उद्यापासून टेबल पुसणे , साफसफाई ही काम करा चालू तुम्ही ..
उर्वशी : हो नक्की ..चालेल सर ..मला कामाची खूपच गरज आहे ..,
साहेबांनी अतिशय रागात उत्तमकडे पाहिलं आणि तिला बोलले ..आमच्या उत्तमला ना मस्करी करायची खूप सवय आहे ..तू राग मानू नकोस ..बोल काय शिक्षण झालंय तुझं?
उर्वशी : सर माझं बीकॉम पूर्ण झालाय फ्रॉम the इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स..
साहेब : अरे वाह ! तिथे तर खुप हुशार मुलांना पण लवकर ऍडमिशन नाही मिळत तुला कस ग मिळालं पोरी ?
उर्वशी : सर मला माझ्या मेरिट वर मिळालं ऍडमिशन.. 10वीला मला 95% होते ..माझ्या शाळेत मी पहिली आली होते .
साहेब तिरक्या नजरेने उत्तमकडे पाहत हसले ..उत्तम तर एकदम कोणीतरी अचानक कानाखाली मारल्यासारखा बसला होता ...त्याला हा खूपच मोठा धक्का होता ..बापरे इतकी हुशार आहे ही ? बोलायला काय जातंय हिला ..
उत्तम : तुमचे सर्टिफिकेट्स आहेत का पाहायला ? बघू बर ..
उर्मिलाने पिशवीतले सर्टिफिकेट काढून त्याला दिले ...प्रत्येक वर्षी ही मुलगी फर्स्ट क्लास मध्ये पास झालेली ..शिवाय इतर कलागुणांचे पण सर्टिफिकेट होतेच त्यात ..आता तर उत्तम घेरी येऊन पडेल की काय असं वाटतं होत ...
(क्रमशः)

