STORYMIRROR

Aaditya Kadam

Romance Tragedy

3  

Aaditya Kadam

Romance Tragedy

तू फक्त माझा..!

तू फक्त माझा..!

6 mins
216

समीरनं दार उघडलं..दारात सपना थरथर कापत उभी होती. बाहेर जोरात पाऊस पडत होता. ती चिंब भिजलेली! हातात सुटकेस आणि काखेत एक झोळी लटकत होती ..केस ओले झालेले..डोक्यावरून पावसाचं पाणी टिप टिप गळत होतं..साडी ब्लाऊजमध्ये ती उभ्या उभ्या थरथर कापत होती. इतक्यात समीरनं तिला घरात घेतलं,


"एवढ्या रात्री ..तू इथे?" समीरनं विचारलं.

"अरे, समीर माझा नवरा मला लय त्रास देऊ लागलाय. आता मला तुझ्या बिगर राहवत नाय. मनून मी धावत तुझ्याकडे आलेय." त्यानं लगेच तिच्या हातातली सुटकेस हातात घेतली आणि बाजूला ठेवली. तिला बसायला खुर्ची देत तो आत किचनमध्ये शिरला. किचनमध्ये एक मेणबत्ती तेवत उभी होती.


थोड्याच वेळात समीर हातातून पाणी घेऊन आला. ती टॉवेलनं केसं सुकवण्याचा प्रयत्न करित होती. त्याने तिला पाण्याचा ग्लास हातात दिला आणि पुन्हा आत गेला. खोलीत बराच अंधार पडला होता. बाहेर पडणाऱ्या तुफान पावसामुळे त्या खोलीतलीच नाही तर आजूबाजूच्या साऱ्या परिसरातली वीज खंडीत झाली होती. समीरचं घर रस्त्याच्या कडेला असल्यानं आजूबाजूला माणसांची फारशी वर्दळ नव्हती. सपना तशीच उभी पाणी गटागटा पिऊ लागली. पाऊसामुळे सारं वातावरण थंडगार झालं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. सपना थरथर कापत खुर्चीवर कशीबशी बसली. समीर तसा घरात एकटाच राहत असे. काही तासांपुर्वीच त्यानं जेवण आटोपलं होतं आणि आता तो सपनासाठी जेवण तयार करू लागला होता. त्यानं गँसवर भात शिजवण्यासाठी कुकर ठेवला. एकीकडे तो कांदा कापत होता तर दुसरीकडे डाळ पाण्यात भिजवत होता. समीर जेवण करण्यात गुंग आहे हे पाहून सपना आत रूममध्ये गेली. सुटकेस उघडलं आणि त्यातली एक साडी नेसायला सूरूवात केली. समीर बाहेर आला. पण, त्याला सपना तिथे दिसेना. तो घाबरला. कारण, अंधारामुळे समोरचं नीट दिसू येत नव्हतं. त्यानं सपनाला हाक मारली.


"सपना, कुठेस गं?" समीरचा आवाज शांत खोलीत सपनाला स्पष्ट ऐकू गेला.

" अरे, मी आत आहे. कपडे चेंज करतेय."


"ओके." म्हणत तो पुन्हा किचनमध्ये गेला.

थोड्याच वेळात कुकरच्या दोन शिट्या झाल्याचा आवाज झाला. त्यानं भाताचा कुकर गँसवरून उतरवला आणि डाळीला फोडणी द्यायला लागला.

" अरे, तू सगळं जेवणं केलंस?" असं म्हणत सपना मोबाईचा टॉर्च पेटवत किचनमध्ये शिरली.

" नाही..तसं नाही गं. डाळीला फोडणी देतोय. डाळ झाली की जेवण तयार. आधी तू जेवून घे..मग आपण बोलू." 

" अरे, थांब की..! मी पण तुला मदत करते." 

"अगं, नको गं. आताच बाहेरून आली आहे. बाहेर जा आणि शांत बस. मी पटकन जेवण तयार करून आणतो..आणि हां, बाहेरच्या लाकडी कप्प्यात काही मेणबत्त्या पडल्या आहेत. त्यातली एक पेटव ..म्हणजे जरा अंधार कमी होईल." 


"बरं.." असं म्हणत सपना मोबाईलच्या सहाय्याने कप्प्यात मेणबत्ती शोधू लागली.


"भेटली का..?" समीरने आतून मोठ्यानं आवाज दिला.

"अरे, हो रे ..! मेणबत्ती भेटली. मी ती पेटवली आहे. मी आतातरी आत येऊ का?" सपना मेणबत्ती एका टेबलावर ठेवत म्हणाली.


"काही गरज नाही." असं म्हणत समीरनं डाळ गँसवरून उतरवली.


समीर आणि सपना शाळेत चांगले मित्र होते. शाळेच्या दिवसांपासून समीरला सपना खूपच आवडत होती. पण, तो तिला हे सांगू शकत नव्हता. तो अत्यंत गरीब घरातला..तर ती बंगल्यात राहणारी. सपनाला शाळेत जायला आणि शाळेतून घरी आणायला एक गाडी सतत येत असे. त्यामुळे आपण तिला हे सारं काही देऊ शकणार नाही या विचारानं त्यानं आपलं प्रेम तिच्याजवळ कधीच व्यक्त केलं नाही. त्या दोघांमध्ये नेहमी चांगली मैत्री राहिली ती अगदी कॉलेज संपेपर्यंत!


काही वर्षांनंतर सपनाचं लग्न झालं आणि सपना दुसऱ्या शहरात नांदू लागली. तर समीर त्याच शहरात राहून नोकरी करू लागला. पगार जेमतेम असला तरीही तो त्यात खूप खूष होता. समीरचे आईवडिल काही कारणांसाठी गावी गेलेले! आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आता घरात एकटा राहू लागला. एके दिवशी त्याला कंपनीत इंटरव्यूसाठी आलेल्या मुलींमध्ये सपना दिसली. त्यानं तिला पाहता क्षणी ओळखलं. त्यांन तिच्याकडे निरखून पाहिलं तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हतं. त्याला काहीच कळेना. तेव्हा त्याने आपल्या मित्राला सारे इंटरव्यू घ्यायला सांगितले आणि स्वतः मात्र दुसऱ्या खोलीत ऐकण्यासाठी निघून गेला. एकेक करून सारे इंटरव्यू पार पाडत होते. पण, समीर तर सपनासाठी बैचेन झाला होता. अखेर सपनाची वेळ आली आणि सपना इंटरव्यूसाठी आत निघून गेली. इंटरव्यू राऊंड सूरु झाला. इंटरव्यूदरम्यान समीरला कळलं की, तिचा नवरा तिच्या नोकरी करण्याच्या विरुद्ध आहे. सध्या ती नवऱ्याचं घर सोडून एका मुलीबरोबर खोली शेअर करून राहत आहे. हे ऐकल्यावर समीर लगेच रूममध्ये आला आणि सपनासमोर उभा राहिला. समीरला पाहताच सपना ढसाढसा रडू लागली. समीरनं तिला शांत केलं आणि तिला नोकरीवर रुजू होण्याची संमती दिली. काही दिवसांनंतर सपना आणि समीर पुन्हा एकत्र भेटू लागले. तासन्तास गप्पा मारू लागले. डबा शेअर करू लागले. त्यातच तिला कळलं की समीरचं अजून लग्न झालेलं नाही. तो घरी एकटाच राहतो आणि सारं स्वयंपाक स्वतः करतो. सपना मनोमन समीरचं भलं होवो अशी प्रार्थना करू लागली. दररोज त्याच्यासाठी डबा घेऊन येऊ लागली. सारं काही सुरळीत पारं पडत होतं. एक दिवस समीरनं चांगली वेळ पाहून सपनाला प्रपोज केलं. ती खूप खुष झाली. हे आधीच घडायला हवं होतं. पण, नियतीला वेगळंच मान्य होतं. एके दिवशी सपनाच्या नवऱ्याला सपनाच्या नोकरीबद्दल कळलं. तो तसाच रागात तिच्या कंपनीत आला आणि तिला जबरदस्तीनं घरी घेऊन गेला. तिच्यावर बरेच अत्याचार करू लागला. अगदी त्याचदिवशी समीर कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता. सपना रात्रभर रडत होती. समीरची आठवण काढत ती वारंवार समीरला कॉल करण्याचा प्रयत्न करित होती. पण, समीरच्या फोनला रेंजच नसल्यानं समीर कॉल काही उचलू शकत नव्हता. दोन दिवसांनंतर जेव्हा तो कंपनीत परतला तेव्हा त्याच्या मित्रमंडळींकडून सपनाच्या नवऱ्याचं कारस्थान कळलं. तो चवताळला आणि तसाच तिच्या घरी गेला. पण, सपना तिथे नव्हती. समीरनं तिला कॉल केले परंतू तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता.


अखेर तो नाईलाजास्तव घरी परतला. काही दिवस असेच गेले. समीरच्य मनातून सपनाचा विचार पार निघून गेला. परंतू त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. एक ना एक दिवस सपना नक्की आपल्याकडे परत येईल याची त्याला खात्री होती. त्यानंतर आज कितीतरी दिवसांनी सपना कशीबशी नवऱ्याची नजर चुकवत समीरकडे आली होती. समीरला खूपच आनंद झाला होता. आता बरीच रात्र झाली होती. बाहेर पाऊसही बऱ्यापैकी थांबला होता. आज सपना कितीतरी दिवसांनी समीरच्या हातचं गरमागरम जेवण जेवत होती. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. इतक्यात दाराची बेल वाजली.


"आता कोण आलंय?" म्हणत समीर जागेवरून उठला.

" सावकाश जा रे.. मेणबत्ती देऊ का?" सपना जेवता जेवता म्हणाली.

"अगं, कशाला? मी असा जातो आणि पटकन येतो. शेजारच्या काकू असतील..नाहीतर तोंडकरकाका सिगारेटसाठी आले असतील." समीर हसत म्हणाला.


समीरनं दार उघडलं. समोर बराच अंधार होता. दारात कोण उभे आहे हे समीरला नीटसं कळेना.


"कोण ...कोण हवंय आपल्याला ?" समीर मोबाईलची टॉर्च ऑन करत म्हणाला.


" बायको..! माझी बायको ..सपना ..माझी नजर चुकवून इथे आलीय म्हणे." एक खडा आवाज समीरला ऐकू आला. तो समजून गेला. बाहेर उभा असलेला इसम दुसरा कोणी नसून सपनाचा नवरा होता.


" सपना.. कोण सपना? इथे सपना वगैरे कोणी राहत नाही. तुम्ही जा बरं..!" समीर दार लावू लागला.

इतक्यात जोराचा कसला तरी आवाज आला. सपनाच्या नवऱ्यानं लाथेनं दरवाजा उघडला. त्या धक्क्यानं समीर जागच्या जागी कोसळला. तो इसम आत आला. खोलीत बराच अंधार असल्याने समोरचं नीटसं दिसत नव्हतं. इसम पुढे चालू लागला तसा समीरनं त्याचे पाय ओढले. तो धाडकन कोसळला. समीरनं त्याचा गळा आवळण्यास सूरुवात केली. आत बसलेल्या सपनाला बाहेर काय गोंधळ चालू आहे हे कळत नव्हते. मेणबत्तीही आता संपत आलेली.. किचनमध्ये अंधार वाढू लागला होता. मोबाईची बँटरीही जवळजवळ संपत आली होती. बाहेर दोघांमध्ये तुंबळ युद्ध सूरू झाले. शेजारपाजारी कोणीच राहत नसल्याने समीरच्या मदतीला कोणीही येऊ शकत नव्हते. सपना अंधारातून वाट काढत कशीबशी बाहेर आली. रात्र वैऱ्याची भासत होती. एकीकडे नवरा तर दुसरीकडे प्रियकर सपनासाठी एकमेकांशी मारामारी करण्यात गुंग होते. इतक्यात सपनाच्या हाताला काहीतरी लागलं. तिच्या हातात काठी होती. ती बरोबर नेम धरून दोघांमध्ये, नवऱ्याला शोधित त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली. सपनाचा नवरा मारामारीत अव्वल होता. त्यानं एका प्रहारात समीरला गारद केलं. तसा समीर बेशुद्ध झाला. सपना काठी घेत नवऱ्याला मारणार इतक्यात जागीच कोसळली. ती समीरच्या अंगावरून जात असताना समोर ठेवलेल्या टेबलावर धाडकन आदळली आणि बेशुद्ध झाली. सपनाच्या नवऱ्यानं येताना स्वतः सोबत एका गावठी बंदुक आणली होती. त्यात तो गोळी भरू लागला. काही मिनिटातच त्यानं त्या अंधाऱ्या खोलीत गोळ्या झाडण्यास सूरुवात केली. बंदुकीमधून सहाच्या सहा गोळ्या झाडल्यानंतर तो गप्प झाला आणि जवळच असलेल्या टेबलावर जाऊन बसला. त्याने चुकून ते सहाच्या सहा गोळ्या आपल्या बायकोवर सपनावर झाडल्या होत्या. बेशुद्धावस्थेतच सपनाने त्या साऱ्या गोळ्या आपल्या स्वतःच्या अंगावर झेलल्या होत्या. समीर या साऱ्यातून नेमका वाचला होता.


दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलिस समीरच्या घरी आले, तेव्हा सपनाची बॉडी तशीच रक्ताच्या धारोळ्यात पडली होती. समीर एकटक तिला पाहत तिच्याबाजूला बसलेला..! पोलिसांनी पंचनामा तयार केला. काही दिवसांनी पोलिसांनी सपनाच्या खुनासाठी तिच्या पतीला अटक केली आणि कोर्टासमोर उभे केले. अखेर न्यायलयानं त्याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. समीर आणि सपनाचं एक व्हायचं स्वप्नं अखेर स्वप्नंच राहिलं. आजही समीर सपनाच्या प्रेमात आपलं जीवन जगत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance