तु मला हात लावायचा नाहीस...
तु मला हात लावायचा नाहीस...
आज पाऊस येऊन गेल्यावर उगाचच मला भास झाला ती आल्याचा, दारावरची बेल वाजली स्वप्नात असल्या सारखीच ती माझ्या समोर उभी होती चिंब भिजलेली. ती आत अली दार लावलं.
"किती भिजलीस.."
'तुझ्याच साठी भिजले'
"माझ्या साठी"
'हो तुझ्या साठी'
मी हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिने अलगद तो दूर केला आणि म्हणाली
'आपलं ठरलंय ना?'
"काय.."
'तू मला हात लावायचा नाहीस.'
मी हाताश होऊन बसलाच बघून ती माझ्या पुढे आली, तिने अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवले. मी हळूच ते दूर सारण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणाली
'काय करतोस..'
"अगं आपलं ठरलंय ना.."
'हो.'
"मग"
'तू मला हात लावायचा नाहीस पण आता
मी लावते आहे.'
लढाईत शास्त्र गळून पडलेल्या योध्या प्रमाणे माझी परिस्थिती झालेली पाहून ती हसली, हलकेच समोर येत माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तिचे उष्ण श्वास मला अलवार स्पर्श करू लागले. मी मात्र शब्दांच्या बेडीत अडकलेल्या कैद्या सारखा निमूट बसलेलो.
'काय झालं..'
"नाही काही नाही..."
आणि तिने हलकेच तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले, मी मात्र तसाच मूर्ती स्वरूप होऊन बसलेलो, हळूच माझ्या कानाच्या खाली मानेवर जिभेने तिने रेघ ओढली. अचानक वीज कोसळवी तशी शिरशिरी माझ्या अंगात अली अचानक हात तिच्या कमरेवर जाताच ती म्हणाली
"आपलं ठरलंय ना तू मला हात लावायचा नाही..."
आणि ती दूर जाऊन हसत बसली...