Gaurav Khond

Tragedy

2.2  

Gaurav Khond

Tragedy

पानगळ..

पानगळ..

2 mins
800


त्याने आयुष्याची चाळीशी ओलांडली होती, काळया भोर केस आता भरून आलेल्या अभालातल्या एखद्या पांढरा ढगाने पांढरी झाल्या सारखं दिसत होती.

तो एकटाच राहायला लागला होता, अलीप्तच स्वतः साठी जगत होता फक्त कसलीच काळजी नाही. स्वताला हवं ते हवं तेव्हा करायचा एकाकी पण आनंदी असायचा. आज त्याचा वाढदिवस होता म्हणून जवळच्या दुकानातून त्याने एक छोटासा केक आणला होता आणि हसतच स्वताला म्हणाल


'बरं केलंस देवा तू मला मृत्यूचा विसर पडायला शिकवलंस नाही तर त्याच्या भयाने मी जगूच शकलो नसतो....'


केक वर मेणबत्ती पेटवली तिला फुंकर घालणार तोच दारावरची बेल वाजली, दाराच्या आयपिस मधून बघितलं तर बाहेर बरीच मंडळी उभी आहे असे जाणवत होते, दार उघडताच happy birthday हा एकच स्वर करत सगळे आत अले. बरेच वर्षांनी आलेल्या मित्रांना बघून त्याला काय बोलावं हेच सुचेना. त्याचं आता व्यस्त पडलेला पसारा तो भरा भार उचलू लागला, तोच हातातला कागद दाराच्या बाहेर उडाला. तो उचलायला हा बाहेर जाऊन खाली वाकला आणि पायरीवर त्याला कुणी तरी स्त्री उभी आल्याचा भास झालं. तोच मागून एका स्वरात आवाज आला

SURPRISE.....


हा मात्र अता संपूर्ण गात्र गळून पडल्या गत झाला होता. मनात असंख्य विचारांचा गोंधळ झालं आपल्याला भास तर नाही ना झालं म्हणून एकदा मागे आणि परत समोर असं बघितलं. पण नाही तो भास नव्हता प्रत्यक्षात तीच उभी होती, तसेच लांब सडक केस वाऱ्याने हलकेच उडणारे.

"कविता अजूनही करतोस वाटतं..."


'करतो कधी कधी,पण त्या जगता आल्या असत्या तर बरं वाटलं असतं...'

म्हणत त्याने हातातला कागद चुर्गाळून खिशात टाकला. 


'ये ना अशी आत ये...'


काय मित्रा कसं वाटलं आमचं surprise..

आज त्याच्या कडे शब्दाचं उरले नव्हते, शब्दांच्या दुनियेचा तारा असलेला तो आज मात्र पूर्ण रिकामा झाला होता. 

'जखमेवरची खपली कुणी तरी न सांगता खसकन ओढवी आणि रक्ताचा कारंजा त्यातून बाहेर पडावा, त्या क्षणाच्या ज्या वेदना असतात ना माणसाला गुंग करणाऱ्या तसं वाटलं तुमचं Surprise...' 


कधी तरी हरफन मौला असलेला तो आता मात्र पुरता बदलला होता. 


"काय लेका कुठे गुडूप झाला होता, गेली १० वर्ष शोधतोय तुला आम्ही..."


'मी सुद्धा...'

म्हणत त्याने तिच्या कडे पाहिलं, कदाचित कुणाला नसेल कळलं पण तिला मात्र त्याच्या नजरेतला तो भाव अचूक कळला होता..


प्रेषित होऊन तो आयुष्य जगत होता जिवंत पणाच्या शोधात, हृदयातला आशेचा अंकुर आठवणींच्या ओलाव्याने जपण्याचा प्रयत्न करत....


आणि सगळे बघत राहिले त्याच्या डोळ्यातून कोसळणाऱ्या लाटांन कडे, त्याच्या हरवलेल्या अस्तित्वाच्या पनांवरची धूळ झटकत आणि ती पूर्ण कोरडी पडली होती वसंतातल्या पानगळी नंतरच्या अवनी सारखी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy