तत्पर भावना
तत्पर भावना
भावना शाळेत शिकत असतांना तिला इतरही अनेक अनेक विषयांमध्ये आवड होती.
अशी भावना खूप ऍक्टिव्ह मुलगी होती,
तिला नेहमी वेगवेगळ्या कल्पना करायला त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडायचे,
म्हणून तिने तिची एक नोटबुकच तयार करून ठेवली होती.
काही कुठे नवीन दिसलं तर ती त्या विषयी माहिती करून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायची.
यातून ती बऱ्याच नवीन गोष्टी शिकायची.
भावना आता मोठी होऊन विद्यालयाला शिकू लागली.
तिने नेहमी तिची आवड निवड जपली,
आणी आता वेळ आली होती तिच्या करिअरची, तिच्या घरच्यांना सुद्धा तिच्यावर गर्व होता, की भावना खूप कष्टाळू आणी हुशार मुलगी आहे.
ती नक्कीच आयुष्यात एक यशस्वी मुलगी होईल.
आणी भावना आई वडिलांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक आणी जाणीवपूर्वक ऐकायची.
म्हणून भावना नेहमी प्रत्येक गोष्टीत तत्पर रहायची. जगात काय कसे सुरु आहे याकडे लक्ष न देता आपण जगात कसे वावरू शकतो याची भावनाला चांगली माहिती होती.
ती संस्कारालाही तेवढेच महत्व देणारी होती.
म्हणून तिचे लक्ष तिने पूर्ण तिच्या कामावर केंद्रित केले.आणी झालेही तसेच भावना खूप छान मार्क्स घेऊन पास झाली.
आणी भावना छान जॉबही करते.
भावनाचे आता लग्नही झाले, तिला नवराही खूप छान मिळाला. आणी ती आता घर सुद्धा खूप छान सांभाळते. आता तिला मुलेही झाले आहेत, ती तिच्या मुलांनाही तसंच छान संस्कारीत करीत आहे.
आता भावना जॉब करत नाही, कारण मुलांकडे ती लक्ष देते. तिचा नवरा जॉब करत असल्याकारणाने भावना घरच्या सर्व जबाबदाऱ्या घरातील कामं हे सर्व सांभाळते.
