फक्त थोडासा वेळ हवाय
फक्त थोडासा वेळ हवाय
प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा वेळ असतो एकदा तो गेला तर गेला. म्हणून ह्या वेळेला जपायला शिका. कारण हा वेळ जर निघून गेला तर उरतो फक्त पश्चाताप. म्हणून शक्य तेवढे प्रयत्न करा, कारण प्रयत्न करून हरलात तरी चालेल, कारण हार आणी जीत ही असतेच, पण प्रयत्न जरूर करा आणी वेळेत करा. कारण एका ठराविक वेळेनंतर कोणत्याही वस्तूची वेळ संपलेली असते, आणी मग त्याला किंमत राहत नाही, कारण कालावधी संपलेला असतो. म्हणून तुम्ही वेळेला जपा वेळ तुम्हाला जपेल. वेळेला थोडासा वेळ नक्कीच द्या.
