कळेना, वळेना
कळेना, वळेना
ती खूप गोष्टी डोळ्यासमोर बघत होती, बघत बघत शिकत गेली बरे वाईट अनुभवही आले. पण जरा वेगळी वाटायची पण वाईट नाही. जग सहजच एखाद्या गोष्टीशी एकरूप होऊन जाते, पण ती विचार करून परिणाम बघून योग्य,अयोग्य, बघायची. खरंतर यामध्ये ती वाचली नाही बऱ्याचदा फसली, इतरांचा विचारही करायची मेहनतीही खूप होती. कळेना आयुष्य कसं कुठे घेऊन जातंय पण जशी वाट दिसेल तसे पाऊल पाऊल टाकायची. कधी खड्डे, काटे सर्व सहन करत आयुष्याचा प्रवास गाठायची. रस्त्याला फाटे दिसायचे काही रस्ते प्रगतीचे तर काही रस्ते भावनांचे, जबाबदारीचे. शेवटी मन कुणाचे दुखवायचे नाही म्हणून जबाबदारीकडे वळा यची,पण तिथेही ओढाताणच व्हायची, आणी शेवटी बोलणे, टोमणे आरोप हेही सहन करायची. विचार करायची जे मी करते ते मला कळत नाही की इतरांना, त्रास तर कधी कुणाला देत नाही,मग का हे जग असं खेळणं करत. मग शांतच रहायची आणी हेच जग तिला अबोल समजायचं. तर कधी बोलली तर शहाणी, आणी कळून वळायची नाही तर वेड्यागत समजायचे, मग एवढं जगाला नक्की विचारावं वाटतं की आयुष्य तिचं की तुमच इतराने कसं जगावं यापेक्षा आपण कसं वागावं जगावं याचा प्रत्येकाने विचार करावा.तेंव्हा खूप सगळीकडेच सुधारणा होईल. हे प्रत्येकाला माहित आहे पण शेवटी कळेना का वळेना हे समजत नाही.
