AkshayRaj Temkar

Fantasy

4.1  

AkshayRaj Temkar

Fantasy

टिकली लावणारी मुलगी

टिकली लावणारी मुलगी

6 mins
17K


Musical लाईटरने तिने क्लोमिक्स सिगारेट शिलगावली आणि सुकुनने वर आसमंताकडे बघत puffs सोडले. ते puffs सोडताना सबंध दिवसभराचा थकवा ती वातावरणात विदा करत होती. तिच्या देहबोलीवरून थकवा स्पष्टपणे जाणवत होताच. पण सिगारेटचे २-३ कश तिने घाईघाईने मारले तशी ती शहारली. चंचल झालेली ती थोडी शांत झाली. सिगारेट्सच्या झुरक्यांमुळे तिचे lense चढवलेले डोळे जरा मदमस्त झाले. धुरातून तिने ३-४ रिंग्स काढल्या अन् त्या रिंग्सकडे बघत ती खोलवर विचारात बुडली.

PC (पिंक कॉर्नर)ला टपरीच्या आजूबाजूला लहान-थोर माणसांची गर्दी होती. तरुण मुलांचासुद्धा कल्ला होताच. परंतू या सर्वांच्या आश्चर्याच्या नजरेला फाट्यावर मारत ती अगदी बिनधास्तपणे 'दम' मारत होती. सवयच होती तिला. no one cares चा attitude... दिवसभराच्या कामामुळे पायही बरेच थकल्याने तिने टपरीच्यामागे असलेल्या कट्ट्यावर बसून वातावरणात धुकं टाकण्याचा विचार केला. नाहीतरी इकडे सर्वांच्या नजर तिच्यावरच खिळलेल्या असल्याचे तिला जाणवले. कॉलेजच्या इथे असे होत नाही. तिकडे वर्गातल्या मैत्रिणींसोबत आरामात झुरके सोडता येतात. उनॉनव्हेज जोक्स मारत हसता-खिदळता येतं. आजूबाजूची लोकं चोरट्या नजरेने बघत नाहीत की पोरींना सिगारेट ओढताना बघून भुवया उंचावत नाहीत. तिकडच्या high standard लोकांना याची सवय असते. परंतू middle and low class लोकांना मुलीने सिगारेट मारताना पाहण्याची सवय नसते. ते अधाशीपणाने त्या मुलीच्या हालचाली न्याहाळत बसतात, एकतर उघडपणे नाहीतर चोरट्या नजरेने तरी.

''bastard साले''.... तिने मनाशीच त्या सर्व नजरांना शिवी हासडली.

हातात असलेल्या पैंटिंग्सचा container सांभाळत टपरीच्या मागील कट्ट्यावर येऊन ती निर्विकारपणे सिगारेट्सचे झुरके मारत बसली. खरं म्हणजे ही तिची नेहमीची जागा नव्हतीच. कॉलेजच्या बाजूलाच असलेली 'ताज' टपरी ही तिच्या कॉलेज गृपची नियमित 'दम' मारण्याची जागा. पण classmates शी बिनसल्यामुळे ती कॉलेजमधून लवकर निघून घराच्या बऱ्याच जवळ असलेल्या टपरीपाशी सुकून घेत होती. गळ्याभोवतीचा स्कार्फ उतरवून तिने fossil हॅन्डबॅगेत ठेवला. आठवडाभरापूर्वी fossil ची महागडी पर्स तिच्या बॉयफ्रेंडने गिफ्ट केलेली. सिगारेट्सचे झुर्रे तिने सपासप वाढवले. सॉफ्ट लिपस्टिक लावलेल्या ओठांतून आणि side पिन लावलेल्या नाकातून puffs हवेत आळवत तिने सिगारेट संपवली. परंतू फिल्टर तिने commonly पायाखाली न चिरडता बॅगेत असलेल्या फिल्टर box मध्ये टाकला ज्यात ऑलरेडी ७-८ फिल्टर होते आणि उंच हिल्स घातलेल्या पायांनी तालेवार चालत ती तिथून घराकडे निघून गेली.

नक्कीच ती रेग्युलर दम मारणारी असावी. दिवसाला ५-६ सिगारेट्स.... नाहीतर संपूर्ण १० चा एक बॉक्स. पण hardly १ box. त्यापेक्षा जास्त पेलणारी वाटत नव्हती. निदान तिच्या शरीरयष्टी अन् अदाकारीमुळे तरी...

thrill तिच्या सिगारेट पिण्याच्या theory मध्ये नव्हता तर असली थ्रिल तिच्या characterisation मध्ये होता, तो थ्रिल इथून पुढे सुरु होतो.

cut to...

माझ्या बाजूलाना एक टिकली लावणारी मुलगी राहते. बाजूला म्हणजे माझ्या गुरुकृपा नावाच्या middle class चाळीच्या बाजूला royal villa नावाची १८ मजली आलिशान इमारत आहे, त्या इमारतीत ती राहते. आत्ताच २ महिन्यांपूर्वी ती या इमारतीत शिफ्ट झाली होती. खरं म्हणजे मी पाहाता क्षणीच तेव्हा तिच्या दिसण्यात नक्कीच काहीतरी वेगळं असण्याची जाणीव मला झाली होती. ती इतर मुलींप्रमाणे नक्कीच दिसत नव्हती, काहीतरी वेगळं होतं तिच्यात. तिचं रुपडं काहीतरी वेगळं show करत होतं. नंतर जाणवलं इतर मुली साडी परिधान केल्यानंतर rather सणावाराला टिकली लावतात पण ती ड्रेस असो, जीन्स-टॉप असो, साडी असो किंवा सलवार-कुर्ता असो कोणत्याही dressing format वर regularli टिकली लावते !!

outstanding fashion sense होता तिचा !! गौर वर्ण, उजव्या गालावर पडत असलेली खळी, one side ने उरोजांच्या दिशेने खाली सोडलेले कलर केलेले मोकळे केस, डोळ्यांवर लेन्स, दोन भुवयांच्यामध्ये exact dress code ला match करेल अशी विशिष्ट आकाराची नि रंगाची टिकली... ती टिकली लावणारी मुलगी..... मी जेव्हा जेव्हा तिला बघायचो त्या प्रत्येक क्षणी मला 'ट्रान्स' मध्ये घेऊन जायची.

चार्मिंग girl ! आधुनिक फॅशनतेची रूपरेषा तिचा मदमस्त शरीरावर झळकत होती... चमचमत होती... flash होत होती. तिचं ते मार्दव शरीर, लाघवी हास्य, बोलण्याच्या तऱ्ह, नजरेच्या अदा, वा-याने उडत असलेले तिचे भुरभुरते केस अन् अर्थातच तिच्या प्रत्येक dressing format नुसार बदलणारी कपाळावरची टिकली... या सर्व गोष्टी मला 'जन्नत' मध्ये घेऊन जायच्या. स्वर्गातल्या अप्सरा तर मी पाहिल्या नाहीत पण तिच्याकडे पाहिल्यानंतर मला त्या अप्सरांच्या रुपड्याचा अंदाज आला. rather त्या स्वर्गीय अप्सरासुद्धा तिच्यापुढे झक मारतील इतकी hard दिसायची ती. ती तिचा attitude, तिची मोहकता blind ठेवायची पण माझे हृदय मनाला विराण प्रेम show करत करायला लागले होते. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. अर्थातच तिचा attitude मला जबरदस्त भावला होता. त्यापेक्षा जास्त तिची टिकली लावण्याची अदा ! ती संस्कृती ! ती सात्त्विकता ! तो सोज्वळपणा ! वाह my boring life have taken mindblowing turn! एक २०१७ मधल्या आधुनिक मुलीची ती साक्षीदार बनून उभी होती माझ्यासमोर.

खरं म्हणजे मी त्या टिकली लावणाऱ्या मुलीला पहिल्यांदा बघितलं होतं ते पिंक कॉर्नरलाच. रॉयल ब्ल्यू रंगाच्या पंजाबी ड्रेस वर रॉयल ब्ल्यू रंगाचीच टिकली लावली होती तिने. त्या टिकलीला सोनेरी कडा होती. कसली 'रॉयल' दिसत होती ती त्यात! पिंक कॉर्नर (PC) हा चाय-दम मारण्यासाठीचा एरिया मधला सर्वात फेमस स्पॉट होता. उच्च-माध्यम वस्तीला जोडणारा हा दुवा. इथे दोन्ही स्तरावरच्या लोकांना सामान गणले जायचे. बस ईधरका एकही वसूल था फिक्रको धुवे मे उडा देने का.

तिला बघण्यासाठीच मी दररोज तिच्या येणाच्या एका ठराविक वेळेला पिंक कॉर्नरला जाऊन बसायचो, केवळ तिचं रुपडं पाहण्यासाठी. आज कोणता dressing फॉरमॅट असेल तिचा अन् त्यावर शोभणारी कोणत्या प्रकारची टिकली तिने लावली असेल याची छबी मनातच उमटवत बसायचो. तिच्याशी बोलायचं तर भरपूर होतं पण काही केल्या हिंमतच होत नव्हती. मी एक गोष्ट मात्र न्याहाळली प्रत्येक वेळी ती येताना तिच्या हातात पैंटिंगचा कंटेनर, पोर्टफोलिओ अथवा चित्रकलेशी संबंधित सामान असायचे. नक्कीच ती चित्रकलेशी संबंधित कोणतातरी कोर्स करत असावी.

वूमन्स डेला तिने पिंक कॉर्नरला टपरीच्या मागच्या भिंतीवर अफलातून दोन चित्रं काढली होती. ती दोन्ही चित्रं तिने अक्षरशः प्राण फुंकून काढली होती. तिने स्त्रिचा घुसमटता आवाज अन स्त्रिची शक्ती त्या चित्राच्या माध्यमातून बारकाईने रेखाटली होती. ते चित्र असे होते - एका मांजरीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते व तिला ६ उंदरांनी घेरलेले असते... ते ६ उंदीर मिळून त्या भल्या मोठ्या मांजरीला डिवचत असतात, तिला त्रास देत असतात, परंतू मांजरीचा डोळ्यांवर पट्टी बांधलेली असल्यामुळे मांजर काहीच करू शकत नसते... वास्तविक पाहता मांजर उंदरांपेक्षा ताकदीने व अंगाने कितीतरी पट मोठी. पंरतू हतबल असल्याने ती काहीच प्रतिकार करू शकत नव्हती... त्याच्याच दुसऱ्या बाजूच्या चित्रात तिने असे दाखवले होते की, मांजरीच्या डोळ्यांवरील पट्टी सुटलेली आहे व ती उग्र झाल्याने आजूबाजूची उंदरं जिवाच्या आकांताने पळत आहेत. खूप मोठा अर्थ तिने त्या चित्रांच्या माध्यमातून विशद केला होता. स्त्रीची दडपशाही - शक्ती - सामर्थ्य. तिच्यासंबंधित ओळखीच्या टपरीवाल्यालाच विचारले तेव्हा त्याने सांगितले ती जे.जे.स्कुल.ऑफ आर्टस् मध्ये शिकतेय. अर्थातच तिच्यामध्ये जबरदस्त creativity अन् ठासून ठासून भरलेले कलागुण असणारच. ती जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मध्ये शिकतेय म्हटल्यावर यातच सर्व काही आले.

मी मनाशीच विचार केला... खरंच ही माझ्या आयुष्यात आली तर black and white झालेल्या आयुष्यात दोघं मिळून एकत्र रंग भरू... तिच्या प्रेमाचा तुरा मला माझ्या पगडीमध्ये खोचून मिरवायचं होतं. तिच्या रूपानं माझ्या लोखंडाच्या आयुष्याला परिस मिळाला होता. ज्याच्या स्पर्शाने माझे आयुष्य सोनाने उधळून निघू शकत होते.

परंतु माझे नक्की प्रेम कोणावर ?चित्रकलेवर ?

व्यक्तीवर..... ओह म्हणजे शरीरावर? की तिच्या कपाळावर टिकली लावण्याने तिच्यात आलेल्या एका सात्विकतेवर... रुढींवर ? परंपरेवर की ,आधुनिकतेवर ? सांगता येणं अवघड आहे...

जर चित्रकलेवर असेल तर त्यातली रंगसंगती महत्त्वाची, बाकी इतर गोष्टी दुय्यम. पण तिचं स्मोकिंग हे मला स्लो-पॉइझन वाटणारच. जर तिचं दिसणं, मुरडणं, टिकली लावणं हे मला मनापासून आवडतं म्हणजे खऱ्या प्रेमापेक्षा माझं परंपरेवर प्रेम आहे... मग मला आधुनिक विचारसरणीची ती ही स्मोकिंग करणारी, पुरुषी शिव्या देणारी मुलगी कशी आवडेल?

अशावेळीसुद्धा मी तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. मनात आलं असतं तर मला तिच्याबद्दल खडानखडा माहिती मिळवता आली असती. तिच्या आवडी-निवडी, कुठे जाते, काय करते, काय खाते, काय पिते वगैरे वगैरे एखादी मुलगी मनापासून आवडल्यास तिच्या बाबतीत जी काही मिळवता मिळवणं आवश्यक असतं ती सगळी माहिती मला मिळवता आली असती. पण मी तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. ती आणि तिचे आयुष्य... ज्या झाडाची फुलं मला आवडतंच नाहीत ते झाड तरी मी का लावू?

तिचे नावही मी जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. फक्त तिची एकच ओळख माझ्या मनामध्ये कायम राहील... ती मुलगी म्हणजे 'टिकली लावणारी मुलगी'


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy