STORYMIRROR

Ashvini Kurmawar

Romance

3  

Ashvini Kurmawar

Romance

तो, ती आणि पाऊस

तो, ती आणि पाऊस

6 mins
325

हि गोष्ट आहे कैवल्य आणि काव्याची. दोघेही लहानपणापासूनचे जीवलग मित्र. शालेय शिक्षणाबरोबरच महाविद्यालयीन शिक्षणही सोबत झालेलं. त्यात भर म्हणून त्यांना एकाच कंपनीत जॉब सुद्धा मिळाली.  

दोघांचही एकमेकांवर प्रेम तर आहे पण अजून कोणीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. प्रेमामुळे आपण आपली मैत्री गमवू असे त्यांना वाटे. त्यामुळे कोणीही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तयार नव्हते.


तरी देखील आज काव्याने ठरवलं की जे व्हायचं ते होऊ देत पण आज ती कैवल्यला सर्व सांगणार. हाच विचार करत ती ऑफिस मध्ये आली.  

आज ऑफिसमध्ये अचानक अर्जंट मिटींग आल्यामुळे तिचा अख्खा दिवस कामातच गेला.

तिला कैवल्यशी बोलायला वेळ सुद्धा मिळाला नाही.  

पाहता पाहता ऑफिस सुटायची वेळ झाली. अन् ती घरी जाण्याची घाई करू लागली. तिला वाटलं आता सोबत घरी जाताना तरी तिच त्याच्याशी बोलणं होईल.

बाहेर येऊन बघते तर चांगलाच अंधार पडला होता आणि आभाळ गच्च भरून आलं होतं. तिने कैवल्यला फोन केला.

"अरे कैवल्य, अजून आला नाहीस मी पार्किंग मध्ये आली आहे. ये लवकर. खुप आभाळ झालंय बघ." -काव्या.


"अगं मला निघायला वेळ आहे अजून, ते अर्जंट मेल्स करायचे आहेत. तु हो पुढे, मी हे सर्व आटपून निघतो" -कैवल्य.


"बरं ठिक आहे. सावकाश ये. बाय." -काव्या


"हो. बाय."-कैवल्य


तिने फोन ठेवला. ती थोडी नाराज झाली. स्कुटी काढून ती घरी जाण्यास निघाली. ऑफिसपासून काही अंतरावर वाटेतच जोरदार पाऊस सुरू झाला. तीने इकडे तिकडे बघितलं, जवळच तीला एक कॉफी शॉप दिसलं ती तिथे गेली. तोपर्यंत पावसाचा जोर आणखीच वाढला होता. तिने कॉफी ऑर्डर केली आणि तिथेच एका टेबलवर बसून पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागली.  


मनात तिच्या पुष्कळ विचार चालू होते. आजतर ती कैवल्यला भेटली सुद्धा नव्हती. ति तिच्याच विचारात मग्न असताना तिला जाणवलं की आपल्या समोरच्या खुर्चीवर कोणीतरी येऊन बसलं आहे तिने तिकडे बघितलं तर तिथे कैवल्य होता.


"काय मॅडम, एवढा कसला विचार करत‌ आहात?"- तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवत कैवल्य म्हणाला.


कैवल्यला समोर बघून काव्या थोडी गोंधळली.

"काही नाही रे, असंच. तु कसा काय इथे तुला तर उशीर होणार होता न?"-काव्या.


"अगं हो, पण अचानक हे वातावरण बिघडलं ना म्हणून निघालो. पण काय, मध्येच लागला पाऊस. अन् म्हटलं इथे थांबावं बाहेर पण मग तुझी गाडी दिसली आत पाहिलं तर तु होतीस मग काय आलो तुझ्या सोबत कॉफी प्यायला."

डोळे मिचकावत कैवल्य म्हणाला.


"अच्छा, बरं केलंस. बघ, पाऊसपण किती वाढला. एक मिनिट, कॉफी ऑर्डर करते तुझ्यासाठी."- काव्या.


"नको, मी सांगितली आहे कॉफी. ती बघ आली सुद्धा".

वेटरकडे बोट दाखवत कैवल्य म्हणाला.


 त्यांची काॅफी येते. काॅफी पित पित काव्या पुन्हा कुठल्यातरी विचारात हरवलेली असताना कैवल्य तिला आवाज देतो

"काय ग कुठे हरवलीस मी एकटाच बडबड करतो आहे. सर्व ठीक तर आहे ना? काही टेंशन?"


"अरे काय नाही, सगळं ठीक आहे, काळजी नको करूस" कैवल्यच्या चेह-यावरची काळजी बघून थोड हसत काव्या म्हणाली.


"कैवल्य" -काव्या

"हम्म" - कैवल्य. 


"मला थोडं तुझ्या सोबत बोलायचं आहे. म्हणजे काहितरी सांगायच आहे." - थोड्या हळूच आवाजात काव्या म्हणाली.


"अगं बोल ना, विचारतेस काय?" - कॉफीचा मग बाजूला ठेवत कैवल्य म्हणाला.


"किती दिवसांपासून ठरवलं होतं तुला सांगायचं पण हिंमतच होत नव्हती. पण कसं सांगू कळत नाही आहे‌."- काव्या 


"काव्या, रिलॅक्स" - कैवल्य काव्याला एवढं गोंधळलेल बघून डोळ्यांनी शांत करत म्हणाला


"बोल आता"- कैवल्य


"आपण लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहोत. आपलं शाळा कॉलेज सोबतच झालं आणि आता ऑफिसमध्ये देखील सोबतच आहोत. आपण आपल्या आयुष्यातला बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. त्यातच तु कधी मला आवडू लागला हे कळलंच नाही." काव्या


"काव्या" - तिला इमोशनल झालेलं पाहून तो मध्येच म्हणाला.


"आज मला बोलू दे कैवल्य. खुप दिवसांपासुन वाट बघीतली या दिवसाची. प्लिज" - काव्या



"मला ठाऊक आहे तुझ्याबद्दल असं वाटणं चुकिचा आहे. तु माझा मित्र आहेस. पण मी काय करू खुप समजावलं मी स्वतःला तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचाही खुप प्रयत्न केला पण नाही, जमलं नाही मला. कैवल्य...I think......I am in love with you!" - डोळ्यातील अश्रू रोखत त्याच्याकडे पाहत काव्या म्हणाली.



थोडावेळ कोणीही काहीही बोलत नाही. दोघेही शांत असतात. बाहेर जोरदार पाऊस पडत असतो.

काव्या कैवल्यच्या बोलण्याची वाट पाहत असते. तिला वाटतं कि तिच्या फिलिंग्ज सांगून तिने चुक तर नाही ना केली? हा आता आपली मैत्री तर तोडणार नाही ना?



"तु काही चुकीचं समजू नकोस प्लीज. ह्या माझ्या फिलिंग्ज आहेत. तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. तु माझा खुप चांगला मित्र आहेस आणि राहणार आहेस शेवट पर्यंत. प्लिज, तु आपली मैत्री तोडू नकोस." - काव्या


सर्व बोलून एक लांब श्वास घेत काव्या कैवल्यकडे पाहते.

त्याच्या चेहऱ्यावर काहिच भाव नसतात.


तिचे डोळे भरून येतात. आता तिला कळत नाही काय बोलावं.


"I am sorry कैवल्य!" - मान खाली घालत काव्या म्हणाली.


आता तिचे डोळे अलगद वाहू लागले होते.


कैवल्यला तर विश्वासच बसत नव्हता कि हे खरं आहे की स्वप्न. जे इतक्या दिवसांपासून त्याला तिला सांगायचं होतं तेच तिने त्याला सांगितलं.

तिचही त्याच्यावर प्रेम आहे हे ऐकून तर तो खूपच खुश झाला होता. पण तसं त्याने चेहऱ्यावर दाखवलं नाही.



"ये वेडाबाई, सॉरी काय बोलतेस. ह्या सर्व तुझ्या फिलिंग्ज आहेत आणि त्या मी समजू शकतो. आता रडू नकोस बरं."- कैवल्य तीचे डोळे पुसत म्हणाला.


काव्या अजूनही रडत त्याच्याकडे पाहत होती.

"खरंतर बरेच दिवसांपासून मलाही तुला काही तरी सांगायचं होतं." कैवल्य


आता काव्या प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती.


"बरेच दिवस झाले, माझ एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिलाही मी आवडतो."- काहीही भाव चेहऱ्यावर न आणता तो म्हणाला.


पण हे ऐकून काव्याचे डोळे पुन्हा पाणावले.


"ती खुप सुंदर आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे.

आणि आज मी तीला प्रपोज करणार आहे. तुला मी हे सर्व सांगणारच होतो कि तु तुझ्या फिलिंग्ज मला सांगितल्यास. सॉरी यार काव्या, पण तु माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि शेवट पर्यंत राहणार." - नाराज असल्याचं दाखवून कैवल्य काव्याला म्हणाला.


कैवल्यने काव्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यांतून कधीचेच अश्रू वाहू लागले होते.


तिला असं रडताना पाहून आधी गालात तो हसला. 


कैवल्यने कपाळावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा घासला आणि काव्याकडे पाहतच तिच्या समोर गुढग्यावर बसला आणि हात समोर केला.


"काव्या प्लीज रडू नकोस ना. माहिती आहे मी तुला हर्ट केलंय आणि त्यासाठी सॉरी." - कैवल्य


काव्या कैवल्यकडे भरल्या डोळ्यांनी शांत पाहत होती. तिला तर काही कळतच नव्हते.


त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला म्हणाला.


"खर सांगू तु माझी खूप चांगली मैत्रीण आहेसच पण तु मला कधी आवडायला लागली हे कळलंच नाही. तुला भेटल्याशिवाय मला करमतच नाही. सगळीकडे मला तुच दिसत असतेस. माझ्या स्वप्नातही तु येतेस. तु हसलीस ना की मी खुश होतो. तुझं चेहऱ्यावरच ते हसू कायम असंच राहावं यासाठी प्रयत्न करतो. तु माझ्या आसपास नसलीस ना तर मी बैचेन होतो. तुला एकदा पाहण्यासाठी धडपडतो. या आधी कोणाचं विषयी असं कधीच वाटलं नाही ग मला. जर यालाच प्रेम म्हणत असेल ना तर हो माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. 

तु एक मैत्रीण म्हणून नेहमीच माझ्या सोबत उभी राहिलीस आणि यापुढेही नेहमीच राहशीलही. पण मला तु माझ्या आयुष्यात माझी जीवनसाथी म्हणून हवी आहेस. मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर वाटून घ्यायचं आहे. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करायची आहेत. तुझ्या सोबत मला आनंदाने जगायचं आहे.

काव्या, मी आयुष्यभर तुझ्यावर असंच प्रेम करत राहिलं ग अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

तुला हे सर्व आधीच सांगाव वाटायचं पण तुला, आपल्या मैत्रीला गमावण्याची जास्त भीती वाटायची. पण बघ ना आज तुझ्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना कळाल्यानंतर माझी भीती कुठल्या कुठे पळाली. I love you काव्या! माझ्याशी लग्न करशील?" - कैवल्य.


आता कैवल्यचेही डोळे पाणावले होते. तो काव्याच्या उत्तराची वाट पाहत होता.


काव्यासाठी तर हे एका स्वप्नासारखंच होतं.


काव्याने कैवल्यच्या खांद्याला धरून त्याला उभे केले. त्याचे डोळे पुसून त्याला मिठी मारली


"I love you too कैवल्य!" - काव्या


आनंदाने कैवल्यने आपले हात काव्या भोवती गुंफले आणि तिच्या केसांवर अलगद होठ टेकवले.


तेव्हढ्यात वीज कडाडली. बाहेर पडणारा पाऊस पाहून मनातल्या मनातच त्याचे आभार मानून हसत कैवल्यने त्याची मिठी घट्ट केली.

अचानक आलेल्या पावसामुळे का होईना काव्या आणि कैवल्यला आपल्या मनातील भावना व्यक्त करता आल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance