तो आणि ती एक अधुरी प्रेम कहाणी
तो आणि ती एक अधुरी प्रेम कहाणी
15 जून 2015, तो या दिवशी खूप खुश होता, आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता. त्याला त्याचे जुने मित्र भेटणार होते आणि नवीन ओळख होणार होती.
पहिल्या दिवशी त्याच्या वर्गात तीन नवीन मुले आली ज्यांची नावं जयेंद्र, राजन आणि होती. जयंत लठ्ठ होता बाकीचे दोन सडपातळ होती. त्या मुलाचं नाव विकास. तो ही अगदी सडपातळ. अभ्यासातही हुशार आणि नेहमी प्रथम क्रमांकावर विराजमान असलेला. त्याच दिवशी रवीना नावाची नवीन मुलगी बाजूच्या वर्गात आली, अगदी साधी सरळ ,अभ्यासातही हुशार, त्याच्यासारखीच. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला, पण तिला सांगायला घाबरला .
असे दिवसांमागून दिवस जात होते. रवीना तिच्या वर्गातल्या एका टपोरी मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाचं नाव होतं रमेश. तो एकदम व्यसनी होता आणि घाण शिव्या देणारा होता. तिच्या मैत्रिणींनी तिला वेळीच सावध केलं, पण ती जिद्दी होती. तिने त्याला प्रपोज टाकला आणि त्या क्रूर रमेशने होकार दिला आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
ही खबर जेव्हा विकासला लागली, जो रवीनाच्या प्रेमात पडला होता, तेव्हा तो मनातून पूर्ण तुटला पण तिच्यावरचं त्याचं प्रेम काही कमी झालं नाही, त्याला वाटलं ही रमेशच्या नादाला लागली म्हणजे ही बिघडणार, पण सुदैवाने तसं काही घडलं नाही. काही दिवसातच रमेशच खरं रूप पाहिल्यावर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. तिचा प्रेमभंग झाला होता, तिचा प्रेमावरचा विश्वास उडाला होता.
पहिल्या घटक चाचणीत 9वी ब वर्गातून विकासचा प्रथम क्रमांक आला, तर 9वी अ वर्गातून रविनाचा प्रथम क्रमांक आला, एकमेकांना समजताच परस्परांशी ते परस्परांशी बोलायला लागले व परस्परांची घट्ट मैत्री झाली.
नंतर नंतर प्रेमात पडल्यामुळे तिच्या अभ्यासावर प्रेमभंगाचा परिणाम झाला होता. ती प्रथम क्रमांकावरून तृतीय क्रमांकावर फेकली गेली ,पण विकास कायम प्रथम क्रमांकावर राहिला. प्रेमाचा काहीच परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला नाही.
बघता बघता नववी संपली आणि दहावीला पूर्ण वर्ग एक झाला. यावेळी विकासला आनंद झाला की रवीना आपल्या वर्गात आली, पण विकासच रवीनाबद्दलच प्रेम अजून वाढलं. ते दोघे अजून एकमेकांच्या जवळ आले. हे त्यांच्या शाळेतल शेवटचं वर्ष होतं, त्यानंतर कोण कोणाला भेटणार नव्हतं, त्यामुळे यावर्षी मजा पण करायची आणि अभ्यास पण... शाळेचा पहिला दिवस उजाडतो.......
शाळेचा पहिला दिवस उजाडतो. सगळे एकमेकांना भेटतात . मग त्यांच्या गप्पांची मैफिल रंगते. दिवसामागून दिवस जात असतात . प्रथम घटक चाचणी परीक्षा येते, त्यात साहजिकच विकासचा प्रथम क्रमांक येतो पण काही अपरिहार्य कारणामुळे त्याला दिव्याला स्थलांतर करावे लागते. विकासचे कुटुंब दिव्याला स्वतःचे घर घेतात. नंतर काही दिवसांनी रवीनाच्या कुटुंबाचे पण दिव्याला स्थलांतर होते परंतु ती भाड्याने राहत असते. ही गोष्ट जेव्हा एकामेकांना समजते तेव्हा त्यांना खूप आनंद होतो.
ते आता दिव्या वरून शाळेत सोबत येऊ जाऊ लागले. ट्रेन मधून तर त्यांची गप्पांची ,विनोदांची मैफिली रंगत असे. हळूहळू त्यांच्या या घनिष्ठ मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, हे त्यांना सुद्धा कळले नाही. ते जेथे राहत होते ती चाळ पण एक होती आणि त्यांच घर शेजारी होत. त्यामुळे ते दोघे एकच खेळायचे आणि अभ्यास करायचे आणि घर शेजारी म्हटल्यावर विकास च्या कुटुंबियांचं रवीनाच्या कुटुंबियांशी घट्ट नातं जमलं होतं. रविनालासुद्धा विकास आवडला होता, पण पहिलं आपलं प्रेम व्यक्त करणार कोण, हा प्रश्न होता.
ते दोघे सोबत अभ्यास करायचे, म्हणून सहामाही परीक्षेत रवीनाच्या अभ्यासात भलतीच प्रगती झाली. सहामाही परीक्षेत प्रथम क्रमांक विकास आणि रविना या दोघांना विभागून देण्यात आला. मग ते समजून चुकले की देवाने आपल्या दोघांच्या प्रेमाच्या गाठी या स्वर्गात असतानाच बांधून ठेवल्या आहेत.
एक दिवस ते असेच शाळेतून येताना ट्रेनमधून प्रवास करत असतात तेव्हा विकास रविनाला साहजिकच विचारतो की 'तुझा प्रियकर रमेश होता ना? मग तुमचं काय झालं?' यावर रवीना रडायला लागते . विकास तिला शांत करतो आणि तिची माफी मागतो. त्यादिवशी नंतर विकास तिला तिच्या प्रेमाबद्दल कधीच काही विचारत नाही.
वर्ष सरता सरता पूर्वपरीक्षा कधी होऊन जाते, तेच कळत नाही. येथे नेहमीप्रमाणे विकासाचा पहिला क्रमांक, तरी रविनाचा दुसरा क्रमांक येतो. मग बोर्डाची तोंडी परीक्षा सुरू होते आणि 22 फेब्रुवारी पासून त्यांना सुट्टी पडते. यावेळी त्यांचा निरोप समारंभ 23 मार्चला म्हणजेच बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर होणार होता.
आता बोर्डाची परीक्षा तोंडावर आली होती, त्यामुळे अभ्यास सुरू झाला. जसजसे दिवस पलटत होते तसतसे पेपर जात होते. वेळ कोणासाठी थांबत नाही, तसेच बोर्डाचा शेवटचा पेपर कधी होऊन गेला, त्यांनाच समजलं नाही.
आता उजाडला होता तो निरोप समारंभाचा दिवस. दोघेही आज सकाळी लवकर उठले. आज विकासचा पक्क ठरलं होत. तो तिला आज प्रपोज मारणार होता, परंतु कोणास ठाऊक, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. निरोप समारंभाच्या वेळी दोघांनी अनुभव कथन केलं, शिक्षकांच्या पाया पडल्या, खूप खूप नाचले आणि रवीना शेवटी शाळेच्या आठवणीत रडू लागली. शेवटी मग विकासने तिला शांत केलं. निरोप समारंभाची सांगता झाल्यावर अख्खा वर्ग जुहू चौपाटीला फिरायला गेला.
आणि अखेर तो क्षण आला,जेव्हा विकास रवीनाला सगळ्या मुलांसमोर गुडघ्यावर बसून तिच्या हातात तिच्यासाठी आणलेली अंगठी घालून प्रपोज करत विचारलं "तू माझी होशील का कायमची?"
हे दृश्य पाहिल्यावर सगळीकडे टाळ्या वाजतात. तिचं त्याच्याबद्दलच्या प्रेम त्याला स्पष्ट दिसत असतं. पण त्यावेळी रवीना ती अंगठी काहीही न बोलता स्वीकारते. त्यानंतर ते दोघेही गुपचूप असतात. ट्रेनमधून कधी येताना सुद्धा बाजूबाजूला बसूनही कोण कोणाशी बोललं नाही.
मग ते एकदाचे घरी पोचले आणि नाचून खेळून खूप दमल्यामुळे झाले पण रवीनाच्या डोक्यात काय विचारचक्र चालू होतं कोणास ठाऊक. विकास फ्रेश होऊन रवीनाच्या घरी त्याच्या प्रेमाचा उत्तर मागायला गेला (हो की नाही), तेव्हा ते दोघेही त्यांच्या घरी एकटेच होते कारण त्यांचे आई-बाबा कामावर जात असत. विकासने रवीनाच्या घरी पाऊल ठेवल्यावर त्याला जे काही दृश्य दिसलं त्याने तो एकदम हडबडून गेला, कोलमडून गेला. पण का?? काय पाहिलं असेल असं त्याने???
विकासने पाहिलं कि पंख्याला गळफास लावून घेतलेल्या रविनाला, जिच्यावर तो खूप मनापासून प्रेम करत होता. तिलाच असा पंख्याला लटकलेला पाहून तो तिला मिठी मारून तिथेच ढसाढसा रडू लागला. नंतर त्याला तिथे एक पत्र मिळालं त्यात असं लिहिलं होतं की,
प्रिय विकास,
प्लीज रडू नकोस, जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असशील, तर तू रडणार नाहीस. मी तुला अस रडताना नाही रे पाहू शकत. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, पण काय करू? आधीच मी एका राक्षसावर प्रेम करून चुकले, पण मला माहिती आहे कि तू तसा नाही आहेस. मी त्या राक्षसावर प्रेम करून बरबाद झाले.
आज तू मला ज्या पद्धतीने प्रपोज केलेस, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल खरं प्रेम दिसत होतं ते, पण मी तुला नाही बोलून तुझं हृदय तोडु शकत नव्हते रे, म्हणून हा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला इतका मोठा. आजच्या या मानव जन्मी का होईना, पण देवाने पुढची सात जन्म आपल्या दोघांच्या प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधून ठेवल्या आहेत. इतकं लिहून या जगाचा निरोप घेत आहे मी, निरोप घेत आहे
फक्त तुझीच आणि तुझीच
रवीना
हे इतकं पत्र वाचून तो पूर्ण येडा पिसा होतो आणि हातावर सुरीने शीर कापून तिथेच आपला देहांत करण्याचा प्रयत्न करतो.
याच दिवशी रवीनाची आई कामावरून लवकर सुटते आणि वेळेच्या अगोदर घरी पोहोचते. त्यावेळी विकास आणि रवीनाला त्या अवस्थेत पाहून ती घाबरते, पण तिची आई धीट असल्यामुळे न डगमगता जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करते. नंतर डॉक्टर सांगतात की "तुम्ही प्रसंगावधानता राखल्यामुळे विकास वाचू शकला. पण वेळ निघून गेली आहे, ती मुलगी वाचू शकली नाही. हे ऐकून रवीनाच्या आईला धक्का बसतो आणि ती विकास आई-बाबांना दूरध्वनी करून बोलावते.
रवीनाच्या आई-बाबांना अश्रू अनावर होतात की आपली मुलगी ही 'मृत' घोषित झाली आहे. विकास जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा त्याला कळते की जिच्यावर आपण दोन वर्ष मनापासून प्रेम केले , तीच या जगात नाही. या खबरमुळे त्याला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो आणि त्यातच त्याचे निधन होते.
ही वार्ताहार त्यांच्या शाळेपर्यंत पोचते तेव्हा सगळ्यांना खूप दुःख होतं, ते सगळे हॉस्पिटलमध्ये पोचतात पण त्यांची ती अवस्था पाहून कोणीही काहीही करू शकत नसतं. ही होती. शेवटी यांची प्रेम कहानी पूर्ण न होता अधुरीच राहते कायमची!
