kalpana sawale

Inspirational

3.5  

kalpana sawale

Inspirational

तिने स्वतःला सावरलं

तिने स्वतःला सावरलं

3 mins
365


''जीवनाच्या या वाटेवर

दुःखाची सुखाशी आहे गुंफण

उदास मन जरी असले

तरीही आनंदाची होते उधळण

होतील बऱ्याच गोष्टी नकारात्मक

जीवनाची एक एक पायरी चढताना

पण सगळं काही डावलून

सुखाचे दार उघडते सकारात्मकता"


त्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो. आणि अचानक तन्मयने प्रश्न विचारला,

"कसं आहे ना आयुष्य?"

रचना म्हणाली, "खूप सुंदर".

लगेच प्रियंका म्हटली,

"काय सुंदर! किती प्रॉब्लेम आहेत आयुष्यात आणि म्हणे सुंदर!"

तन्मय म्हणतो "अरे ये जिंदगी ना मिलेगी दोबरा! जी भर के जियो दोस्तों".

"किमया, अगं तुला काय झालं? तू काहीच बोलली नाहीस.उलट तुझ्याकडे किती आहे बोलायला. आज बोलून मोकळी हो".

"काय बोलू मी रचना, उगाच तुम्हाला त्या आठवणी सांगून दुःखी करू"

"दुःखी कसं होणार,आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे,तू आमची मैत्रीण आहेस आणि तू कोणत्या परिस्थितीला हरवून बाहेर आलीस".

प्रियांका म्हणते, "अगं सांग किमया काय झालं होत? अगं मी ऑफिस मध्ये नवीन आहे.तू काल आलीस आणि ऑफिस मधला प्रत्येक जण आनंदी दिसला.तुला बघितल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आले". "अगं मला बघून सगळ्यांना आनंद झाला.आणि मी आले,ऑफिस जॉईन केले म्हणून तुम्ही माझे स्वागतासाठी जी पार्टी ठेवली त्यासाठी धन्यवाद सर्वांना". "हो सांगते,बरेच लोक नवीन आहेत ऑफिसमध्ये. पण आज मी तुम्हाला भेटू शकले तर केवळ माझ्या छोट्याश्या लेकीमुळे. ती फक्त दहा वर्षाची. पण आज मी जे काही आहे ते फक्त तिच्यामुळे.मागच्या वर्षी आम्हाला दोघांना करोना झाला. कार्तिक आणि मी,आम्ही दोघं हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. मी बरी झाली पण कर्तिकची तब्बेत जास्त बिघडली आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि तो" किमया रडायला लागते रचना तिचे अश्रू पुसते आणि म्हणते.

"अगं सावर स्वतःला" "आणि तो गेला मी खूप डिप्रेशन मध्ये गेले होते, खान पिन सोडलं होत.खरं तर मला एक मुलगी आहे, हे सुध्दा विसरले होते मी.आई वडिलांनी मला खूप समजून सांगितले.पण मला काहीच कळतं नव्हतं". "एका रात्री पीहु माझ्याजवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "मम्मा तू अशी रडत राहते हे पप्पांना आवडेल का गं? तू अशी गप्प राहते मी कुणाकडे बघू गं.सावर स्वतःला.तू आधीसारखी मस्त्या करणारी, खळखळून हसणारी आई मला हवी आहे.अगं मलाही दुःख झाल पण, आजीकडे बघितलं का? ती बिचारी मुलाच दुःख बाजूला ठेवून सगळं करते पण तुला बघितलं की रुममध्ये जाऊन एकटीच रडते गं. अगं त्यापेक्षा आपल्या सर्वांना करोना झाला असता तर बरं झालं असत ना".

"त्यांनतर मी तिला कुशीत घेऊन ढसाढसा रडले. मग स्वतःला सावरलं कारण भूतकाळ कितीही दुःख, नकारात्मकता देवून गेला असेल पण लेकीच उज्वल भविष्य दार ठोठावत होतं, मग सकारात्मक विचारांनी मला घेरलं होतं आणि खरचं आयुष्यात मनुष्य लहान असो वा मोठा तो आपल्यावर एक वेगळी जादू करतो आणि त्या माझ्या चिमुकलीने मला खूप काही शिकवलं,धीर दिला,बळ दिलं. आज मी जे काही तुमच्या समोर आहे ती फक्त तिच्यामुळे आणि ऑफिस मध्ये सगळेजण दोघींचं कौतुक करतात.आणि तिच्या नवीन सुरू झालेल्या आयुष्याच्या प्रवसाला शुभेच्छा देतात.

"खरं आहे ना,किती दिवस घरात रडत बसायचं. जेव्हा बाहेर निघतो,सगळीकडे बघतो तेव्हा कळतं खरच आपलं दुःख फार कमी आहे आणि मग आपण सकारात्मक विचार करायला लागतो.आणि हा विचारच आपल्याला जगण्याचं बळ देतो".

माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा आणि अजून नवीन लेख वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.

धन्यवाद!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational