शाळकरी मुलं...आणि प्रेम?
शाळकरी मुलं...आणि प्रेम?
रिया...राज आणि राहुल तिघे एकाच वर्गात.... बेस्ट फ्रेंड...त्याची मैत्री खूप घट्ट...सगळ्या शाळेत प्रसिद्ध..साधारण तिसरी पासून सोबत.. आणि आता आहेत ते सहावीत...त्याची मैत्री घरच्यांनाही माहित होती.
रिया आणि राज एकाच बिल्डिंग मध्ये राहायचे... तर राहुल हा..दुसरीकडे राहायचा...परीक्षा संपली आणि सुट्या लागल्या...पण तरीही हे तिघे एकमेकांच्या घरी जायचे, भेटायचे, खेळायचे.
राहुलच्या मामाचे लग्न असल्यामुळे. तो गावी गेला. साधारण ७- ८ दिवस तो गावीच होता... तरीही तो त्याच्या काही मित्रांशी फोनवर बोलत असे... खरं तर त्याला जायचं नव्हतं...पण घरी कुणी नसल्यामुळे त्याला जावचं लागलं होतं.
राहुल घरी आला... तो आल्यावर रियाकडे गेला...दाराची बेल वाजवली रियाच्या आईने दार उघडले...राहुला घरात बोलावले...आणि रियाला आवाज दिला...मात्र रिया बाहेर आली नाही... म्हणून आई रूममध्ये गेली...रीयाने झोपेचं नाटक करून सांगितले..."आई त्याला नंतर यायला सांग...मला खूप झोप येत आहे"...
रियाची आई पण तसचं सांगते...आणि राहुल निघून जातो....तो थेट राजकडे...राज त्याला येताना बघतो... आणि घरातून निघून जातो... राहुल राजच्या घरी जातो...त्याचे वडील सांगतात.."तो आताच बाहेर गेला आहे".
अस एक वेळा नाही... दोन तीन वेळा होत... राहूलशी दोघही बोलत नाही.
रिझल्ट लागतो...तेव्हा रिझल्ट घेण्यासाठी सगळे शाळेत जातात..तेव्हा मात्र राहुल बघतो की राज आणि रिया दोघं सोबत येतात.
तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते दोघं रिस्पॉन्स नाही देत...म्हणून राहुल राजला जोरात ढकलतो.
रिया राजला उचलते....आणि म्हणते..."राहुल तू आमच्या मध्ये येऊ नको ...आजपासून आम्ही तुझ्याशी बोलणार नाही"
राहुल खूप नाराज होतो...तो त्या दोघांना कारण विचारतो...की अस ते का करताय?
ते दोघं पण बोलत नाही...पण राहुल ऐकायला तयार नसतो...तो म्हणतो मी ऐकल्याशिवाय जाणार नाही.
राज कपडे झटकतो आणि म्हणतो..."तुझं जे हे काय प्रेम बिम आहे ना रियावर ते कळलय आम्हाला सगळं...तुझा तो मित्र आहे ना त्याने सांगितलं...दगाबाज...तुला माहित आहे ना रीयावर माझं प्रेम आहे तरीही तू".
राहुलला खूप राग येतो...तो सरळ खिशातून पेन काढतो आणि राजला मारतो आणि रियाला पण मारतो...म्हणून दोघं जोरजोरात ओरडतात... म्हणून शाळेच्या आवरत सगळे जण जमा होतात...राहुल तिथून पळ काढतो...राजला जास्त लागत नाही मात्र रीयाच्या हातातून रक्त येते...म्हणून तिला दवाखान्यात नेतात.
हे थरारक दृश्य बघून सगळ्यांना धक्काच बसतो.
त्यांचे आईवडील त्यांना खूप समजावून सांगतात...आणि सुरक्षितता म्हणून सगळ्यांना वेगवेगळ्या शाळेत घालतात...रियाचे वडील तर घरही बदलतात...
"हा असा प्रेमाचा त्रिकोण...ते ही ह्या लहान वयात...शाळकरी मुलं!...ज्यांना अजून कशाचा समज नाही...त्यांच्यात प्रेम? ज्यांना प्रेम हे काय याची साधी जाणीव नाही..खरच खूपच भयावह परिस्थिती आहे ही...प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारी..नाही का???"
माझा हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि अजून काही नवीन लेख वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.धन्यवाद
