Shweta Barkade

Romance Others

3  

Shweta Barkade

Romance Others

तिला स्विकारताना

तिला स्विकारताना

30 mins
1.0K

  सूर्य अस्ताला जाण्याची ती वेळ... सारे पक्षी त्यांच्या घरट्यांकडे परत निघालेले.... समुद्रही आज थोडा शांतच होता... मंद आणि गार वारा सुटलेला... आणि त्या किनाऱ्यावर बसलेले ते जोडपं....

       निरव आणि मिनल दोघेही त्या किनाऱ्यावर शांत बसलेले होते. मिनल त्या समुद्राच्या लाटा पाहत होती... कशी ती लाट येताना काही गोष्टी घेऊन येते आणि परत जाताना असंख्य गोष्टी घेऊन जाते... जणू ती लाट येताना सुख किनाऱ्यावर ठेवत असेल आणि जाताना मात्र अनंत दुःख ती घेऊन जात असेल आणि त्या सागरात जाऊन ती नष्ट करत असेल. ती त्या लाटा पाहण्यात मग्न होती आणि इकडे निरव मात्र त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत होता. लालबुंद झालेला तो सूर्य कसा आता निरोप घेत आहे.. त्याला बघता बघता तो मिनलला म्हणतो: 

  "बघ ना..!! तो सूर्य कसा आपला निरोप घेतोय ते.. तो कधी कोणाला वचन देत नाही की पुन्हा याच वेळेला याच ठिकाणी मी तुम्हाला भेटेल, पण तो रोज याच ठिकाणी दिसतो मला आणि मी रोज त्याला निरोप देतो." 

त्याच म्हणणं ऐकताच ती त्याला म्हणते: "अहो.. पण सुर्यालाही ग्रहण लागतच की, तर कधी नभ दाटून येतात तेव्हा कुठे दिसणार तुम्हाला तुमचा सूर्य..???"

  निरव थोडा शांत होतो आणि काहीवेळाने म्हणतो: 

  "तो जरी मला काहीवेळेला दिसत नसला न तरी तो तिथेच असतो.. फक्त त्याला काही गोष्टी झाकतात. जसं की पावसाळ्यात ते दाटून आलेले नभ. पण त्या नभांच्या मागेही तो असतोच न.." मिनल निरवकडे पहातच बसते, निरव अजूनही त्या सूर्याकडेच पाहत असतो. मिनल त्याचा हात त्याच्या हातात घेते... तसा निरव शुद्धीवर येतो. पण तो तिचा स्पर्श टाळतो आणि तिथून उठतो.. "खूप उशीर झालाय.."

असं म्हणून तो मीनलला संदेश देतो की आता आपण घरी जायला हवं. मिनलही तेथून उठते आणि दोघे जण त्यांच्या गाडीतून घरी जातात.

          निरव आणि मिनल हे नवदांपत्य. लग्नाला नुकतेच ९-१० दिवस झालेले असतात. निरव कामानिमित्त शहरातच राहत असतो. निरवसोबत लग्न करून मिनलही त्याच्यासोबत शहरात येते. या नवीन जोडप्याचा नवीन संसार चाललेला असतो. मिनल ही खूप समजूतदार आणि स्वप्नाळू मुलगी. आपला जोडीदार कसा असावा याविषयी ती नेहमीच स्वप्न रंगवत असे. ती निरवलाही तिने पाहिलेल्या स्वप्नातल्या जोडीदारासोबत जुळवू पाहत असे. मिनलला तिचा जोडीदार निर्व्यस्नी, समजूतदार आणि सतत बडबड करणार हवा असतो. तसा निरव होताही कमी फक्त एकच होती ती म्हणजे तो जास्त बोलत नसे, तो सतत कोणत्या न कोणत्या विचारात मग्न असायचा. त्याचा हा स्वभाव काही तिला आवडत नसे.पण म्हणतात ना एकदा का रेशीमगाठी जुळल्या की त्या जोडीदाराच्या सगळ्या सवयी मान्य करून त्या समजून घेऊन संसार पुढे चालू ठेवायचा...... 

         समुद्रकिनाऱ्यावरून दोघेही घरी पोहचतात. निरव घराच कुलूप उघडून नुकताच आत येतो इतक्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो: "हा दादा बोल ना... " 

निरवच्या मोठ्या भावाचा म्हणजेच सुमेधचा फोन असतो. 

"अरे मी यासाठी फोन केलेला की, तुमच पर्वाच रिझर्व्हेशन केलं आहे ट्रेनच. तुम्ही दोघे पण छान थोडे दिवस कुलू मनालीला जाऊन या.." सुमेधच बोलणं ऐकून तो थोडा नाराज होतो आणि म्हणतो: "अरे दादा.. तू मला आधी कल्पना तरी द्यायचीस ना.... असं अचानक कसं काय ठरवलंस??" 

"निरव आता मला काही एक ऐकायचं नाही. तुम्ही दोघे पण जात आहात पर्वा... बाकी मला काही माहिती नाही.." अस म्हणून सुमेध फोन ठेवतो. मिनल निरवला विचारते: "काय झालं..??" तो म्हणतो..."काय आता... चला कुलू मनालीला.. दादाने पर्वाच ट्रेनच रिझर्व्हेशन केलंय. घ्या आता बॅग भरायला.." अस म्हणून निरव रूममध्ये निघून जातो. मिनल मात्र खुश असते. ती घरातली काम करायला चालू करते. 

      कुलू मनालीला जायचा दिवस येतो. पहाटे पाच वाजताची ट्रेन असते. दोघेही प्लॅटफॉर्मवर पोहचतात. खूप थंडी असते. मिनलने स्वेटर घातलेला असतो तरीही ती कुडकूडत असते. तो त्याच्या बॅग मधून शाल काढतो आणि तिच्या अंगावर टाकतो. मीनलला प्रश्न पडतो की, हा माणूस आपली काळजी पण घेतो आणि आपल्याला टाळतो पण.... या माणसाला कसं समजून घेऊ मी.. इतक्यात ट्रेन येताना दिसते. दोघेजण बॅग उचलतात आणि ट्रेन मध्ये जाऊन बसतात. बऱ्याच मोठ्या प्रवासानंतर दोघेही मनालीला पोहचतात. सुमेधने दोघांसाठी एक हॉटेल बुक करून ठेवलेलं असते. तिथे गेल्यावर दोघेही त्या हॉटेलवर जातात. तिथे त्यांचे छान स्वागत केले जाते आणि त्यांची रूम त्यांना दाखवली जाते. प्रवासामुळे दोघेही थकलेले असतात. हॉटेलच्या मागच्या बाजूला खूप छान गार्डन असते. मिनल ते खिडकीतून पाहत असते. पाहता पाहता निरवला म्हणते "चला न आपण खाली जाऊयात त्या गार्डन मध्ये.." पण निरव खूप कंटाळलेला असतो. उद्या जाऊयात अस म्हणून तो झोपी जातो. दुसऱ्या दिवशी दोघेपण बाहेर फिरायला जातात. फिरायला गेल्यावर मिनल त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो मात्र जास्त काही बोलत नाही. हो, बरोबर, नाही... एवढंच काय ते त्याच बोलणं. मिनलही मग जास्त त्याच्याशी बोलत नाही. दोघेही सायंकाळी हॉटेलवर परत येतात. निरव आपल्याशी अस का वागतोय हे मिनलच्या लक्षात येत नव्हतं, पण तो आपल्याशी तूटक वागतोय हे तिच्या लक्षात येत होत. 

तुझे हे वागणे

समजेना रे मला..

आहे का प्रेम माझ्यावर

तूच आता सांग मला..

आज रात्री हॉटेलच्या मागच्या गार्डनमध्ये शेकोटी पेटवनार असतात. त्या हॉटेलमध्ये सगळेच लग्न झालेली जोडपी फिरायला आलेली असतात. निरव आणि मिनल रात्रीच जेवण करून त्या गार्डनमध्ये जातात. मस्त कडाक्याच्या थंडीत त्या शेकोटीची ऊब... आणि सोबत गिटारची धून जणू काही प्रेमवाराच त्या गिटारच्या धूनसोबत गान गात आहे आणि ती गाण्याची मैफील सजावया शेकोटीची साथ मिळाली आहे. सगळेजण त्या शेकोटीच्या बाजूने गोल करून बसलेले असतात. सगळ्यांच्या गप्पा चालू असतात, निरव आणि मिनल मात्र शांतच असतात. अचानक त्यांच्यातला एकजण उठतो आणि म्हणतो की, "चला आपण सगळे एक खेळ खेळूयात. इथे जमलेल्या प्रत्येकाने त्याच्या जोडीदारावर किती प्रेम आहे ते आम्हाला सांगायचे. ते प्रेम तुम्ही गाण्यातून व्यक्त करू शकता, बोलून व्यक्त करू शकता... तुम्हाला जस हवं तस करू शकता. खेळायचा का मग हा खेळ आपण." जमलेले सगळे खुश होतात. मिनलही आनंदी होते. सगळे जण त्यांच्या जोडीदारावर किती प्रेम आहे ते सांगत असतात. प्रत्येक जण त्याला जमेल तस बोलत असतो. आता बोलायची वेळ येते ती म्हणजे निरव आणि मिनलची. निरव काही बोलत नाही. मग मिनलच पुढाकार घेते. निरवकडे पाहून म्हणते: 

"माझ्या आयुष्याची रेशीमगाठ जुळवायला

मला तुझी साथ मिळाली..!!

तुझ्या माझ्या आयुष्यात येण्याने 

प्रेमनगरी माझी ही फुलली..!!"

ती बोलत असताना निरव तिच्याकडे पाहतो. मिनल त्याच्याकडे पाहत असते. ती म्हणते: "मी फक्त तुम्हालाच नाही तर तुमची सुख, तुमची सगळी दुःख यासहित तुमचा स्विकार केलाय... तुम्ही फक्त माझ्याशी मनसोक्त बोला.. मी आयुष्यभर तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत उभी राहीन....." मिनल बोलत असताना निरवच्या डोळ्यात फक्त पाणी असतं, आणि निरव निशब्द होतो. तो काहीच न बोलता तिथून निघून त्यांच्या रूममध्ये जातो. मिनलच्याही डोळ्यात अश्रू असतात. दोघांचही मन भरून आलेलं असतं. दोघांना पण मन मोकळं करायचं असतं पण ते जमत नसत. मिनलही मग निरवच्या मागे मागे रूममध्ये जाते. तिला फक्त एवढच वाटत असतं की त्याने तिच्याशी काय ते मोकळेपणाने बोलावं. 

"नकोस असा तू शांत राहूस

मनातले तू शिक बोलायला..

आले मी आता तुझ्या जीवनी

दुःख तुझे हलके करायला..."

ती रूममध्ये पोहचते.... निरव रडत असतो. त्याला अस पाहून तिचही मन भरून येत, तिलाही रडू येत... पण ती स्वतःला सावरते... आणि त्याच्याकडे जाते. ती त्याच्या शेजारी जाऊन बसते. आणि म्हणते: "नेमक काय आहे तुमच्या मनात ते तरी सांगा ना मला.. असे शांत राहू नका बोला माझ्याशी.. काही प्रोब्लेम असेल तर आपण दोघे मिळून तो सोडवू.. पण तुम्ही शांत बसू नका... मी आहे तुमच्यासोबत कायम... "

तिच बोलणं ऐकून निरव तिला घट्ट मिठी मारतो आणि खूप रडतो. त्याच्या त्या आसवांसोबत त्याच दुःखही थोड हलकं होईल म्हणून मिनलही त्याला रडून देते. थोड्या वेळाने निरव शांत होतो उठतो डोळे पुसतो आणि बाहेर निघून जातो. त्याला आपण वेळ द्यायला हवा म्हणून मिनलही त्याच्या मागे जात नाही. 

         निरव जातो आणि हॉटेलच्या एका बाकावर जाऊन बसतो. त्याचे मन त्याला खूप प्रश्न विचारत असतात. त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो. थोड्याच दिवसात त्याला मिनलचा स्वभाव कळालेला असतो. ती खूप समजूतदार मुलगी आहे हेही त्याला समजलेले असते. खरं तर नशीबवान असतात लोक ज्यांना असा जोडीदार मिळतो. आपण मिनलला काहीच सुख देत नाही आहोत. ती तीच घर तीची माणस सोडून आली ती फक्त माझ्यासाठी... आणि मी... मी काय करतोय????... ती आली तस तिला दुःखच देतोय... पण मी तरी काय करू..?? नाही विसरता येत आहेत मला त्या जुन्या गोष्टी..सतत त्या गोष्टीची आठवण होते... आणि मी जे प्रेम मिनलला द्यायला हवं ते देऊ शकत नाही... आज काहीही करून मला मिनलला सगळं सांगायला हवं. नाहीतर तिचा गैरसमजही होऊ शकतो." 

   अस म्हणून तो तिथून उठतो आणि रूममध्ये जातो. मिनल तिच्या विचारात मग्न असते. निरव तिच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो: 

           " मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला नाही माहिती की तुला काय वाटेल??.. पण मला आज तुला सगळं सांगायचंच आहे..." तो मोठा श्वास घेतो आणि म्हणतो: "मिनल माझ्या आयुष्यात याआधी एक मुलगी होती... जिच्यावर मी जीवापाड प्रेम करायचो... तिचं नाव श्रेया. श्रेया आणि मी ३ वर्षें एकत्र होतो. श्रेया एकुलती एक मुलगी. तिचे आई वडील लहानपणीच वारलेले. ती तिच्या आज्जीजवळ राहत होती. एका प्रोजेक्ट निमित्त आमची भेट झाली. पहिल्याच मीटिंग मध्ये तिने दिलेलं प्रेझेंटेशन खूप कौतुकास्पद होत. कामानिमित्त आमची भेट वाढत गेली. तिचा स्वभाव, तीच बोलणं, हसणं, सर्वांना मदत करणं, समजून घेणं, सगळच मला आवडत गेल.... आणि मी कधी तिच्या प्रेमात पडलो मलाच कळलं नाही... तिलाही मी आवडत असेन का..??? हा प्रश्न सतत माझ्या मनी पडत असे. एकदा मी तिला आज विचारायचं अस मनाशी पक्क केलं आणि तिला प्रेमाची मागणी घातली.. त्यावर ती हसली आणि म्हणाली की, : " अरे वेड्या मी तर कधीपासून या दिवसाची वाट पाहत होते.. तू जर पुढाकार घेतला नसतास तर मीच तुला विचारणार होते." श्रेया खूप छान होती. ती तिच्या प्रमोशनसाठी वाट पाहत होती. नंतर आम्ही लग्नही करणार होतो. श्रेयाच्या आज्जीला मी भेटलेलोही त्यांची काहीच हरकत नव्हती आमच्या लग्नाला. आणि तिला प्रमोशन मिळालं की मीही माझ्या आई आबांशी तिची ओळख करून देणारं होतो पण......"

हे सगळं ऐकून मिनल शांत होते. तिला काय बोलावं कळत नसत. तरीही ती विचारते: " पण काय...???" निरव मग पुढे सांगू लागतो.."श्रेयाची आज्जी वारते. श्रेया आतून खूप तुटते. आज्जीनेच तिला लहानपणासून वाढवलेले असते. तिची आई, तिचे वडील, तिची बहीण सार काही तिची आज्जी होती. आणि तीच आता या जगात आपलं म्हणावं अस कोण होत तर तो फक्त मी. मी तिला आधार दिला. मी ठरवल की आता तिच्याशी लग्न करायचं. श्रेया आता थोडी त्या धक्क्यातून बाहेर येत होती. आज्जी वारल्यावर तिची मैत्रीण आणि ती दोघी जणी राहत होत्या. श्रेयाला एक काका होते ते गावी राहायला असायचे. पण त्यांनी कधीच श्रेयाला जवळ केलं नव्हतं. थोड्या दिवसांनी मी ठरवल की आज श्रेयाला लग्नाचा निर्णय सांगायचा. म्हणून मी तिच्या घरी गेलो. पण ती तिथे नव्हती. तिच्या मैत्रिणीने सांगितलं की, थोड्या वेळापूर्वी तिचे काका तिला त्यांच्या गावी घेऊन गेले. आणि आता ती त्यांच्याचजवळ राहणार आहे. श्रेयाची इच्छा नसतानाही तिला नेल. मला काहीच समजेना की इतक्या वर्षात तिच्या काकांना नाही का आली तिची आठवण... असं अचानक कस काय ते तिला नेऊ शकतात?? तेवढ्यात श्रेयाची मैत्रीण माझ्या हातात तिचा फोन आणून देते. गडबडीत श्रेया तिचा मोबाईलही विसरलेली असते. तिच्यासोबत मी कसा contact करू काहीच समजत नव्हते. तो मोबाईल घेऊन मी घरी आलो. मी मोबाईल उघडला. त्यात मला तिच्या काकांचा नंबर सापडला. मी त्याच्यावर फोन केला पण त्यांनी उचलला नाही. मी खूप फोन केले, पण त्यांनी एकही फोन उचलला नाही. शेवटी माझा नंबर त्यांनी ब्लॉकला टाकला. माझ कशातच लक्ष लागत नव्हतं. काय करू तेही सुचत नव्हतं. सतत श्रेयाची काळजी. ४-५ दिवसांनी मी ठरवतो की श्रेयाच्या काकांच्या गावी जायचं. मी तिथे गेलो. तिच्या आडनावावरून त्यांचं घर मी शोधले. पण घरी कोणीच नव्हतं. फक्त एक मांडव घराबाहेर दिसत होता. आजुबाजूच्या लोकांजवळ चौकशी केल्यावर कळलं की श्रेयाच आज लग्न आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या श्रेयावर आणि तिने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं ती आता दुसऱ्याची होणार??? ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. काळजावर दगड ठेऊन मी त्या लग्नाच्या ठिकाणी गेलो. मला फक्त माझ्या श्रेयाला भेटायचं होत एकदा. मी तिथे गेलो आणि मला श्रेया दिसली ते नवरीच्या वेशात. काय करावं काय नाही काहीच सुचत नव्हतं. लगीनघाईची लगबग सगळीकडे सुरू होती. मी त्या लग्नमंडपात तसाच एका जागेवर स्तब्ध होऊन फक्त तिच्याकडे पाहत होतो. श्रेयाची नजर माझ्यावर पडते. तिचा तो सुकलेला चेहरा, दुःखी चेहरा आणि डोळ्यातील अश्रूच सार काही सांगत होते. मी पुढे जात होतो तेवढ्यात श्रेया मानेनेच नकार देते. ती सांगत होती की नको येऊस तू पुढे आता काही नाही उरलेल सगळच संपलं आहे. आणि हे सगळं तिचे काका लांबून पाहत असतात. ते माझ्या जवळ आले आणि मला ते बाहेर घेऊन गेले. त्यांनी मला विचारलं तूच का निरव??? मी हो म्हणालो. ते म्हणाले: "श्रेयाने तुझ्याविषयी सार काही सांगितलं आहे पण हे शक्य नव्हत." तरीही मी त्यांना म्हणालो की : "पण माझ तिच्यावर खुप प्रेम आहे." हे ऐकताच त्यांनी माझ्यासमोर हात जोडले. आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. विसरून जा तू तिला. मी त्यांचे जोडलेले हात बाजूला करून श्रेयाला शेवटचे पाहिले लांबूनच... आणि तिथून निघून आलो... आज दोन वर्ष होत आली पण अजूनही मी तिला विसरलो नाही. तिला सोडून मी कोणत्या दुसऱ्या मुलीचा विचारही नाही केला. मला तुझ्याशीच काय कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. पण घरच्यांच्या जबरदस्तीमूळे मला करावं लागलं. तुला वाटतं असेल की नवरा म्हणून जी कर्तव्य मी पार पाडायला हवीत ती मी नाही पार पाडत आहे. पण मला वेळ हवा आहे थोडा...." 

           मिनल... काय बोलणार आता ती हे सगळं ऐकल्यावर. आता तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तिला तिच्या नवऱ्याच खूप वाईट वाटत होत की त्यांना श्रेया नाही मिळाली. आणि दुसरीकडे तीच स्वप्न. तिच्या स्वप्नातला राजकुमार. काहीच नव्हतं प्रत्यक्षात तस. एका क्षणात तीच पूर्ण स्वप्न तुटलेलं. पण अश्या परिस्थितीतही ती निर्णय घेते की आत्ता निरवला तिची जास्त गरज आहे. आपण त्याला यातून बाहेर काढलच पाहिजे. मिनल म्हणते.: "तुम्ही आत्ता झोपा. खूप उशीर झालाय... आपण उद्या बोलू". या उत्तराच खर तर त्याला आश्चर्य वाटत. त्या रात्री कोणालाही झोप लागत नाही. दोघे फक्त पडलेले असतात... निशब्द.......

           दुसऱ्या दिवशी मिनल निरवला म्हणते आपण दोघे जवळच एक मंदिर आहेत तिथे जाऊयात. दोघेही तिथे जातात. तिथे गेल्यावर तो तिला प्रश्न विचारतो.."तुला वाटतं असेल ना मी तुला फसवल..??? मी हे सगळं तुला लग्नाच्या आधीच सांगायला हवं होत." मिनल हसून म्हणते : "तुम्ही आणि मला फसवलत. मला तर नाही वाटत असं. आणि तुमचा जो भूतकाळ आहे त्यात तुमची काहीच चूक नव्हती. तो सगळा नशिबाचा खेळ होता." खरं तर निरवला वाटत होत की हे सगळं ऐकल्यावर मिनल आपल्याशी बोलणार पण नाही, किंवा आपल्यावर राग धरून बसेल. पण तस काहीच झालं नाही. मिनल उलट त्यालाच समजावत होती. ही मुलगी इतकी कशी काय समजूतदार असू शकते..?? हा प्रश्न त्याला पडला. त्याने तिला विचारलं..: "काय ग तू कधी कोणावर प्रेम केलंस का??" मिनल थोडी शांत होते आणि म्हणते: " हो एक मुलगा होता कॉलेजला असताना. आमच्याच वर्गात होता. आणि तो शिक्षक शिकवत असताना पण माझ्याकडेच बघायचा. तो दिसायला पण छान होता. मला पण त्याच हे वागणं हळू हळू आवडत होत. पण....". निरव विचारतो: " पुढे काय झालं??" त्यावर ती म्हणते: "हे मला उशिरा कळालं ना.... की तो माझ्याकडे नाही माझ्या बाकावर बसलेल्या शेजारच्या मुलीकडे पाहायचा.." आणि हसू लागते. निरवही हसू लागतो. आज किती दिवसातून तिने निरवला हसताना पाहिलेलं असतं. तो आयुष्यभर असच हसत रहावा एवढच तिला वाटत असतं. 

             पहिले काही दिवस निरव नेहमी त्याला मिनलमध्ये कुठे श्रेया दिसते का ते पाहत असे. मिनल तिला काय वाटतं..., तिच्या इच्छा..., सगळ्याचा त्याग करून फक्त निरव कसा खुश राहील याकडेच जास्त लक्ष देत असे. मिनलने त्याला सांगितलं की आपण नवरा बायको नंतर आहोत.... आधी आपण चांगले मित्र मैत्रीण बनूयात. हळूहळू ते दोघेही एकमेकांना समजून घेऊ लागतात. ते दोघे चांगले मित्र मैत्रीण बनतात. अखेर कुलू मनालीची ट्रीप संपते. दोघेही परत त्यांच्या घरी येतात. घरी आल्यावर तिथल्या थंडीमुळे निरव आजारी पडतो. त्याला रात्रीचा अचानक ताप येतो. उशीर झाल्यामुळे जवळचा दवाखानाही बंद झालेला. आणि दुसरा दवाखानाही लांब. मग मिनलच त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेऊ लागते. जोपर्यंत त्याचा ताप उतरत नाही तोपर्यंत ती पट्टया ठेवतच असते. त्याचा ताप कमी येतो. सकाळी ती त्याला घेऊन दवाखान्यात जाते. ती त्याची खूप कळजी घेते. निरवलाही तिची काळजी घेणं आवडू लागत. ते दोघेही आता खूप छान मित्र मैत्रीण बनलेले. त्यांचं प्रेमही आता बहरत होत. पण ते दोघांच्याही लक्षात येत नव्हत. 

"तुझ्या माझ्या प्रेमाला 

 नाव काय द्यावं...

 थोड तू मला समजावं 

  थोड मी तुला समजून घ्यावं..

  एकमेकांना समजून घेत घेत 

   प्रेम आपल असचं बहरत रहावं.."

          त्याची तब्येत बरी झाल्यावर तो नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागतो. सगळे जण त्याला येऊन लग्नाच्या शुभेच्छा देत असतात. तिथे निरवचा एक जवळचा मित्र असतो. तो मात्र निरवला आज खूप शांत शांत वाटत असतो. निरव त्याला त्याच्या शांत बसण्यामागच कारण विचारतो. त्याच्या मित्राच्या लग्नालाही दोन तीन महिनेच झालेले असतात. त्याचा मित्र सांगू लागतो :" अरे काय सांगू आता बाबा... लग्न करून अस वाटतय पच्छाताप झालाय. घरी गेलो की जीवाला शांतीच नसते. एकतर इकडे ऑफिस मधला लोड आणि आणि तिकडे बायको. सारखच काही ना काही घेऊन या माझ्यासाठी... तुम्ही माझ्याशी नीट वागत नाहीत.... तुम्ही मला बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत.... आणि आता तर म्हणायला लागली की तुम्ही प्रेमच करत नाही माझ्यावर.... आता त्या वेडीला कोण समजवनार की प्रेम करत नसतो तिच्यावर तर तिला कधीच माहेराला सोडून आलो असतो ना. तिची काळजी केली नसती... आता ऑफिसच्या कामामुळे नाही मिळत वेळ मला. तिने पण थोड समजून घ्यायला हवं ना....". निरव म्हणतो एक काम कर वहिनींना थोडे दिवस माहेरी पाठव आणि तूही थोडा वेळ घे. सगळं काही नीट होईल. मित्र म्हणतो : " अरे नाही रे.. घरी ती नसली तरी करमत नाही... घर खायला उठतं एकट्या माणसाला... तिची ती बडबड पण चांगली वाटते... कशीही असली तरी बायको आहे ना ती माझी... होईल सगळं नीट... आता आज घरी जाताना तिच्यासाठी छान गिफ्ट घेऊन जातो... होईल खुश ती... माझ जाऊदे रे तुझ बोल काय म्हणतायत आमच्या वहिनी... "

निरव म्हणतो: " काही नाही बघ... छान चाललय सगळं.." 

"वहिनी नाहीत का हट्ट करत कधी माझ्यासाठी काहीतरी घेऊन या... मला इकडे न्या... तिकडे न्या..." निरव म्हणतो : " नाही रे आजपर्यंत ती काहीच नाही म्हणाली. उलट मला काय हवं नको तेच बघत असते. " मित्र हसून म्हणतो : " बेटा.. नई नई शादी है... पहिल्यांदा सगळं काही नवीनच असतं. मग होतात आमच्या सारखे दिवस सुरू...." निरव यावर लगेच उत्तर देतो: " नाही माझी मिनल अस कधीच वागणार नाही..." आणि मनातल्या मनात म्हणतो...: "माझी मिनल...?????"

त्याच त्यालाच कळत नसत की तो आता तिच्यात गुंतत चाललाय. तो विचारात पडतो.." की अरे तिने कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही... कधीच कोणता हट्ट केला नाही... सतत माझाच विचार करत असते.... आणि मीही कधी तिला काय वाटत ते समजून घेतलं नाही... आज तिला बाहेर जेवायला घेऊन जातो...." आणि तो मिनलला फोन लावतो. ती फोन उचलते. 

मिनल: "हा हॅलो...!! बोला.."

निरव: "ऐक आज तयार रहा. आणि रात्रीचा स्वयंपाक करू

      नकोस. आपण दोघे बाहेर जाऊयात जेवायला."

मिनल: " ठीक आहे.."

      असं म्हणून फोन ठेऊन देते. तिला कळत नाही की आज अस निरव अचानक का म्हणाले ते. पण ती खुश असते इतकं मात्र नक्की.  

       निरव संध्याकाळी घरी येतो. मिनल खूप छान तयार झालेली असते. तिने आज साडी घातलेली. निरव तिच्याकडे पाहतो आणि पाहतच बसतो.... खूप छान दिसते आज अस मनातल्या मनात म्हणतो. दोघेही छान एका हॉटेलला जेवायला जातात. जेऊन झाल्यावर छान ते समुद्राच्या किनारी बसायला जातात. मस्त चंद्राचा प्रकाश पडलेला असतो. आणि आकाशही चांदण्यांनी भरून गेलेलं.... दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. आणि ती त्याला अचानक एक प्रश्न विचारते: "श्रेया दिसायला कशी होती..???" निरवला कळत नाही तिने असा प्रश्न का विचारला. मग तो तिला त्याच्या मोबाईल मधला तिचा फोटो दाखवतो.. फोटो पाहून मिनल खूप छान आहे श्रेया... अस म्हणते. दोघेही मग तिथून घरी येतात. मिनल तर निरववर प्रेम करतच असते. आणि निरवलाही आता कळून चूकलेल की आपणही आता मिनलच्या प्रेमात पडत चाललो आहोत...

            दोन दिवसांनी व्हॅलेंटाईन डे असतो. निरव ठरवतो की त्यादिवशी आपण आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करायचं... आणि तिला कायम सुखात ठेवायच.. इकडे मिनलही त्याच्यासाठी, तो खूश होईल अस काहीतरी करायचा विचार करते. व्हॅलेंटइन डे येतो. नेहमीप्रमाणे निरव ऑफिसला निघून जातो. तो ठरवतो की आज संध्याकाळी तिला सगळं सांगायचं.. 

आणि इकडे मिनल ठरवते की निरवला श्रेया तर नाही मिळाली मग मीच आता श्रेया बनण्याचा प्रयत्न करते. म्हणून ती तो ऑफिस वरुन यायच्या आतच फोटोमध्ये जशी श्रेया दिसत होती, तसच ती स्वतःला तयार करते. निरव ऑफिसवरून येताना छान गुलाबाची फुले घेऊन घरी येतो... दाराची बेल वाजवतो... आणि मिनल येऊन दार उघडते... तिला पाहताच त्याला कळत नाही की आज ही श्रेयासारखी का तयार झाली आहे. तो घरात येतो. तिला सोफ्यावर बस म्हणतो.... तोही तीच्याशेजारी बसतो... आणि म्हणतो:- "मिनल काय हे??" ती म्हणते : "तुम्हाला श्रेया हवी होती ना... आता ते तर शक्य नाही... म्हणून ठरवलं की मीच श्रेया बनण्याचा प्रयत्न करते.... मला माहिती मी किती काहीही केलं तरी तिची जागा घेऊ शकत नाही....पण प्रयत्न तर नक्कीच करू शकते...." निरव खरच स्वतःला भाग्यवान मानतो की त्याला अशी जीवनसाथी मिळाली... मी आनंदात रहावं म्हणून ती किती करते माझ्यासाठी.... निरव तिचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतो आणि म्हणतो: "अग वेडाबाई....!!! किती करशील ग... मी आनंदात रहावं म्हणून... काही गरज नाही तू श्रेया बनण्याची... मला तू मिनल म्हणूनच आवडतेस... खूप आवडतेस मला तू... कायम तुला सुखात ठेवेन... इतके दिवस माझ्यामुळे तुला खूप मनस्ताप झाला.... पण इथूनपुढे अस होणार नाही.... इतके दिवस मी आनंदात रहावं यासाठी तू खूप काही केलेस.. आता इथूनपुढे मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार... खरंच माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर..." 

          असं म्हणून तो त्याच प्रेम तिच्यापुढे व्यक्त करतो. आणि त्याला त्याने आणलेल्या गुलाबांची गरज पडत नाही प्रेम व्यक्त करायला. दोघांच्याही डोळ्यातले आनंदअश्रूच सगळं काही सांगत होते एकमेकांना.... आज खरा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला दोघांच्या आयुष्यात. आणि आता दोघेही दोघांना समजून घेऊन, एकमेकांची काळजी घेत खूप छान संसार करत आहेत... 

"बंध विश्वासाचे तुझे माझे

आयुष्यभर न तुटण्यासारखे...

देतील प्रकाश सर्वत्र प्रेमाचा

रोज उगवणाऱ्या त्या सूर्यासारखे.."

Rate this content
Log in

Similar marathi story from Romance