STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Horror

3  

pranaliprashant vaidya

Horror

ती रात्र..

ती रात्र..

6 mins
316

     सुरभी..... सुरेश राव आणि मीना ताई यांची सुंदर , सुशील , मनमिळाऊ मुलगी तर सुजय तिच्याहुन लहान पण बहिणी वर प्रचंड माया असणारा मुलगा. छान चौकोनी कुटुंब....

     सुरेश राव BMC म्हणजेच मुंबई महानगर पालिकेत उच्च पदावर कार्यरत तर मीना ताई ह्या गृहिणी. आपलं काम बर आणि आपण बर अस इमानदारी ने काम करणाऱ्यां पैकी सुरेश राव होते. दोघांनीही आपल्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार केले होते. सुरभी इंटिरियर डिझाईनर होती तर सुजय कॉम्पुटर इंजिनिअर च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सुरभी च लग्नाच पहायला हवं म्हणून सुरेश राव आणि मीना ताई मध्ये चर्चा झाली. आपण लवकरच तिचं नाव योग्य अशा वधुवर केंद्रात घालावं अस दोघांनी ही संगमतांन ठरवलं.....मुलगी बघता बघता मोठी झाली आणि उद्या लग्न होऊन सासरी निघून जाईल ह्या विचाराने दोघांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पण योग्य मुलाच्या हाती तिचा हात सोपावण ही एक परीक्षाच होती त्यांना..उद्या सुट्टी होती म्हणून आज दोघे ही जरा उशिरा पर्यंत बोलत बसले होते.

   आज रविवार उठायला जरा उशीर च झाला होता पण तरीही मीना ताई नी लगबगीने घरातलं सर्व लवकर आवरलं होत. आज त्यांची जुनी मैत्रीण त्यांना भेटायला येणार होती. संध्याकाळी 4 वाजता सुनीता ताई आल्या.....घराचं दार सुरभी नेच उघडलं....हसून प्रेमाने तिने त्यांचं स्वागत केलं, जुजबी बोलून ती तिच्या रूम मध्ये काम करत आहे असं मीना ताईंना सांगून ती गेली....खूप दिवसांनी भेटल्या मुळे मीनाताई आणि सुनीता ताई ना काय बोलू आणि काय नको असं झालं होतं. बोलता बोलता मीना ताईची गाडी सुरभी च्या लग्नावर आलीच.....

" आता लवकरच सुरभी करता स्थळं बघायला सुरुवात करायची आहे , एका सुयोग्य मुलाशी तिचं लग्न व्हावं आणि तिने तिच्या संसारात पडावं आम्हा दोघांनाही झालंय." मीनाताई

" किती वय आहे ग आता सुरभी च ? " सुनीता ताई

" आत्ता नोव्हेंबर मध्ये 24 व लागलं तिला , एका इंटिरियर फर्म मध्ये काम करतेय 25,000 पगार आहे...आता तिचं नाव करूच रजिस्टर . " मीनाताई

" माझा भाचा आहे लग्नाचा, 28 वर्षा चा आहे, अमेरिकेत स्थायिक आहे, MS आहे... माझ्या नणंदे ला इथलिच मुलगी सून म्हणून हवी आहे."

" बघ सुरेश रावांना आणि सुरभी ला विचारून, पाहिजे तर लगेच मी अमित ची पत्रिका ,बायो डेटा फोटो मागवून घेते आणि तुला शेअर करते, तू ही सुरभी चा बायो डेटा फोटो व पत्रिका पाठव."

" थांब मी आताच विचारते , उगाच शुभकार्यात उशीर नको." मीना ताई असे बोलताच दोघीही हसतात.

"' अहो ऐकता का ? जरा बाहेर या ना.'

" सुरभी तू ही ये जरा बाहेर . "मीना ताई दोघांना आवाज देतात.

दोघ ही हॉल मध्ये येतात जिथे मीना ताई आणि सुनीता ताई गप्पा मारत बसल्या होत्या.

दोघ एकदम बोलतात " काय ग? का बोलावलस?"

" बघा सुनीता काय विचारतेय ? तिचा भाचा लग्नाचा आहे. अमेरिकेत स्थायिक आहे, त्यांना भारतीय मुलगीच सून म्हणून हवी आहे , आणि सुनीता सुरभी साठी विचारतेय पाठवायची का पत्रिका फोटो?"

दोघ एकमेकां कडे बघतात...

" आई बाबा तुम्हीच पहा काय करायचं ते." अस बोलून ती आत जाते.

" ठीक आहे पाठवून बघा , त्यांची ही पत्रिका मागवा आपणही पाहूच." सुरेश राव

लगेच हिरवा कंदील मिळाल्या मुळे दोघी मैत्रिणी खुश होतात....,सुनीता ताई आपल्या नणंदें ला व्हाट्सअप्प करतात..मीना कडून सुरभी चा फोटो पत्रिका आणि बायोडेटा घेऊन तो ही पाठवतात.थोड्याच वेळात त्यांच्या कडून ही अमित चा फोटो पत्रिका आणि बायो डेटा येतो. सुनीता ताई ते मीना ताई ना शेअर करतात...

" चला आता लवकर कामाला लागा....आणि लवकरच गोड बातमी द्या." दोघी मसीत्रिणी खुश होऊन एकमेकींना टाळ्या देतात...

दुसऱ्याच दिवशी मीना ताई त्यांच्या गुरुजीं कडे सुरभी आणि अमित ची पत्रिका घेऊन जातात....पत्रिका उत्तम जुळतात आता दोघांच्या पसंती वरच सगळं अवलंबून असतं....

स्काइप वरून दोघेही एकमेकांशी बोलतात... अमित चे आई वडील दोघे आणि सुनीता ताई सुरेश रावा कडे आले...सुरभी सगळ्यांनाच पसंत असल्याचे त्यांनी सांगितले व येत्या नोव्हेंबर मध्ये लग्नच ठरवू म्हणजे तसं अमित इथे येईल. सगळी पसंता पसंती सगळ्यांनी एकमेकांना पेढे भरवले...

  लग्नाची खरेदी जोरात सुरू झाली .... लग्न महिन्यावर येऊन ठेपले... आपली लाडकी लेक लग्न होऊन परदेशी जाणार मीना ताई आणि सुरेश रावांच्या मनांत कालवा कालव झाली....किती लवकर लहानाची मोठी झाली...अमित च्या रूपाने एक सुयोग्य वर मिळाला होता... खूप लाख मोलाची माणसे मिळाली होती...सुरभी च किती कौतुक होत होतं ते पाहून दोघेही हरखून गेले होते.बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. अगदी सालंकृत कन्यादान केलं सुरभीच दोघांनी....सर्व नातेवाईकांचे शुभाशीर्वाद घेऊन सुरभी अमित ने नव्या आयुष्यात पदार्पण केलं....

कामाच्या स्वरूपामुळे अमित ला जास्त दिवस भारतात राहणे शक्य नव्हते त्यामुळे महिन्याभरातच तो सुरभी ला घेऊन अमेरिकेला रवाना झाला.अमेरिकेतलं अमित च घर खूपच प्रशस्त होत...मोठा बंगलाच होता तो ....त्या बंगल्याच्या मागे खूप सुंदर बाग होती विविध फुलांची झाडे त्या बागेत होती.इतकं मोठं घर आजवर चित्रपटा मध्ये पाहिलं होतं सुरभी ने. व्हिडिओ कॉल वर आई बाबांना आपलं हे घर दाखवताना के दाखवू आणि काय नको असं झालं होतं सुरभी ला.मुलीच वैभव बघताना मीनाताई आणि सुरेश राव हरखून गेले होते.एका मोठ्या घरात आपल्या मुलीच लग्न झालं उत्तम नवरा तिला जोडीदार म्हणून लाभला , आपल्यावर देवाची कृपा आहे म्हणून त्यांनी देवाचे शतशः आभार मानले...

      काही दिवसातच सुरभी तिथे छान रुळली....फावला वेळ कारणी लागावा म्हणून तिने शहरातली सर्वात जुनी लायब्ररी लावली...आपलं शैक्षणिक ज्ञान ही ती अद्ययावत करू लागली... अमित चे आई वडील अजून महिन्याभराने तेथे येणार होते सगळं कसं छान चालू होतं.....

     आज काही कामा निमित्त अमितला यायला उशीर होणार होता...सुरभी ही आज जरा थकली होती. बेड वर पडून पुस्तक वाचत असताना तिला झोप लागली....काही वेळ गेला असेल तिला अचानक जाग आली...किती वाजले असतील म्हणून टेबल लॅम्प च्या दिशेने तिने हात सरकवला पण हाताला काहीच लागले नाही... असं का वाटलं म्हणून तिने डोळे नीट उघडून आजू बाजू ला पाहिलं तर आपण कुठे वेगळ्याच ठिकाणी असल्याचं तिला जाणवलं.....

" ही तर आपली बेडरूम नाही," सुरभी मनातल्या मनात म्हणाली.

सगळ्या बेडरूम च रूपच पालटलं होतं. तिचा बेड ही आकाराने लहान झाला होता आणि तो जुन्या काळातील असावा असा दिसत होता. खिडक्यांचे पडदे बदललेले दिसत होते...ती बेडरूम एका जुन्या काळातील बेडरूम सारखी वाटत होती . अद्ययावत पणाचा कुठलाही लवलेश नव्हता . घाबरून ती जागीच उठून बसली पाहते तर समोरच्या उजव्या कोपऱ्यात एक स्त्री टेबल वर काही लिहीत बसलेली दिसली अमित चा डेस्कटॉप सगळं गायब होत...आता मात्र सुरभी चांगलीच घाबरली...तिने अमित ला आवाज दिला पण अमित अजून ही आला नव्हता आणि तिच्या आवाजाचा त्या स्त्री वर काहीही परिणाम झाला नाही....पलंगावरून उठत आपली रूम पाहत सुरभी रूम बाहेर पळाली...ती इतकी घाबरलेली होती की समोरून येणारा अमित तिला दिसलाही नाही...ती जोरात त्याच्यावर आदळली...इतकी घाबरलेली सुरभी पाहून अमित ला ही आश्चर्य वाटले...बेडरूम मध्ये तिने असे काय पाहिले ज्याने ती घाबरली याचा त्याला ही प्रश्न पडला...थोडं शांत झाल्यावर तिच्या लक्षात आले की आपले घर आधी होते तसेच आत्ता ही आहे...मग बेडरूम ? अमित ला सोबत घेऊन तिने बेडरूम उघडून पाहिले तर बेड रूम जसेच्या तसे आधुनिक होते कुठल्याही जुन्या काळातील गोष्टींचा तेथे लवलेश ही नव्हता...त्या उजव्या कोपऱ्यात अमित चा डेस्कटॉप जशाचा तसा होता कोणतं ही टेबल नव्हतं ना कोणी स्त्री त्यावर लिहीत बसलेली तिला दिसली.

     हा घडलेला सर्वप्रकार तिने अमित ला सांगितला... पण अमित च्या मते तिला ते सर्व स्वप्नात दिसले असावे आणि गाढ झोप अचानक मोडल्या मुळे ती घाबरली असावी...पण सुरभी जाणून होती की तिने ते सर्व स्वप्नात नाही वास्तवात पाहिले होते... आपणच ह्या गोष्टीचा छडा लावायचा असे तिने मनोमन ठरवले...

      त्याप्रमाणे तिने तिच्या लायब्ररीत काही संबंधीत गोष्टींचा शोध घेण्यास सुरुवात केली....त्यावेळेस तिला कळले की 150 वर्षांपूर्वी त्या जागेवर जिथे आज त्यांचा बंगला आहे....तिथे एका अमेरिकन लेखिकेच घर होत.....आपल्याला दिसलेली ती स्त्री...तिच्या बाबत शोध घेण्याचा तिने अजून प्रयत्न केला तेव्हा तिच्या हाती काही फोटो लागले...त्यावेळेस तिला कळून चुकले की ज्या स्त्रीला काही लिहीत असताना तिने पाहिले ती स्त्री तिच लेखिका होती जी त्या घराची मालकीण होती....पण आपल्याला असे का दिसले ? का जाणवले ? याच मात्र तिला काहीही उत्तर मिळालं नाही.

   लायब्ररी मध्ये काय समजलं...त्या घराचा इतिहास तिने घरी येऊन अमित ला सांगितला... पण त्याला ह्या आधी अस काहीच दिसलं वा जाणवलं नव्हतं. त्यामुळे या सर्वाचच त्याला आश्चर्य वाटलं... पण त्या रात्री नंतर पुन्हा कधीही असा अनुभव घरात कोणाला ही आला नाही...ना सुरभी ला....मग त्या रात्री नेमके असे काय ? कसे? आणि का घडले हा प्रश्न मात्र आज ही अनुत्तरीतच राहिला आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror