STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Drama Romance Inspirational

3  

pranaliprashant vaidya

Drama Romance Inspirational

एक अजीब दास्तान... भाग 3

एक अजीब दास्तान... भाग 3

4 mins
399

  आज अनपेक्षित असंच काही घडलं होत...एकतर आधी जबरदस्ती डान्स करायला भाग पाडलं... तो कसा तरी सांभाळून केला आणि त्यात ही दुसरा नंबर विराज ला आश्चर्यच वाटलं.


" काय जादू झाली कोणास ठाऊक ?" विराज स्वतःशीच पुटपुटला


मानसी मात्र आज खूप खुश होती विराज जवळ जाऊन ती म्हणाली , " Thank you so much , तू साथ दिली नसतीस तर इतका सुंदर डान्स झालाच नसता ."


" अ ग तू छान आणि सोप्या स्टेप्स दिल्या आणि त्या मी निभावल्या ह्याचाच मला आश्चर्य वाटतं. माझ्या नावाची चिट्ठी दिलेली ऐकून मी जरा नाराजच होतो पण तू सांभाळून घेतलंस त्याबद्दल Thanks ." विराज


" हा सकाळी जसा वाटला तसा मुळीच नाहीए मी उगाच गैरसमज करून घेतला त्याच्या बाबत. " मानसी मनातच बोलत होती .



  दोघांनीही रिसॉर्ट कडून दिलेल्या बुके आणि बक्षिसाचा स्वीकार केला....सर्व नातेवाईकांनी ही दोघांच्या डान्स च भरभरून कौतुक केलं. विराज ने ह्या डान्स च श्रेय पूर्णतः मानसीच असल्याचं सर्वांसमक्ष मान्य केलं. ह्या डान्स मुळे का होईना दोघांना एक चांगला मित्र आणि मैत्रीण मिळाले होते.


   ह्या स्पर्धे नी संपूर्ण वातावरण हलकं फुलक झालं होतं तरुणानं बरोबर मोठी मंडळी ही मज्जा घेताना दिसत होती.


  श्वेता ला सगळ्या जणी चेतन वरन चिडवू लागल्या ...


" काय ग....चेतन काय ?" हम्म


" बर बाबा एका मुलीच आता काही खरं दिसत नाही."

आणि इथे मुलं ही काही कमी नव्हती चेतन आणि विराज ला चांगलीच सतावत होती...


" अरे बाबा नो ... खरच अस काही नाही रे का उगाच बात का बतंगड करता आहात ?" विराज


" हो का .... आम्हाला नाही बुआ जमला चांगला डान्स.....नाचता येत नाही म्हणतो आणि मानसी च्या तालावर बारा नाचला. " सुदीप


" अरे नुसता नाचला नाही....दुसरं बक्षिस ही मिळवलं पठ्यांन." विजय


" अरे मला नाचता येत नाही असं स्पष्ट बोललो होतो मी तिला ..... ती डान्सर आहे so मला जमतील अशा सोप्या स्टेप्स दिल्या तिने बस इतकंच..." विराज


" हम्म s s" सर्वजण


अशा मस्त धमाल मस्तीत आजचा दिवस पार पडला


"उद्या सकाळी 9 वाजता निखिल आणि पल्लवी च्या लग्नाची मेहेंदी आणि संध्याकाळी संगीत असा कार्यक्रम असेल असं घोषित करण्यात आलं.


    सर्व कुटुंबीय जेवण आवरून आपआपल्या रूम करता रवाना झाले. मुलांची दंगा मस्ती अजून चालूच होती.


   आजचा दिवस इतका धमाल गेला होता तरी मानसीच्या डोळ्यात अजून झोप नव्हती. बेड वर तसच पडून कंटाळा आला म्हणून ती रूम बाहेर पडली..... लॉन वर येऊन पाहते तर समोर समुद्रा कडे तोंड करून उभा असलेला विराज तिला दिसला.


" काय रे ..... झोप नाही आली का तुला? असा एकटा च उभा आहेस ." मानसी


"तू ?" " तू काय करतेस इथे ह्या वेळेला? आणि हा प्रश्न मी तुला विचारायला हवा." विराज म्हणाला


" अरे झोप नव्हती येत , नुसतं बेड वर पडून कंटाळा आला वाटलं जरा बाहेर पडून पहावं , म्हणून इथे आले तर समोर तू दिसलास." मानसी


" हो ग... मला ही झोप नव्हती लागत so आलो इथे ." विराज


" किती छान वाटतंय ना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि वर आकाशात असंख्य चांदण्या.....wow किती रोमँटिक वातावरण आहे ." मानसी


हे ऐकून विराज हसला


" का रे हसलास ? तुला नाही का वाटत ? "


" अग तस नाही तुझ्या अशा ह्या वातावरणात आपण दोघे....उगाच कोणी पाहिलं तर गैरसमज व्हायचा म्हणून हसलो ." विराज


" अरे गैरसमज कसला ? " मानसी


" म्हणजे ?" विराज


" अरे आपण फ्रेंड आहोत त्यात गैरसमज कसला ? " मानसी


" हम्म " विराज


" विराज.... तुला असेल ना गर्ल फ्रेंड ?" मानसी


" हो आहे ना....तू ." विराज


" काय ? " मानसी


" मग काय....तू गर्ल आणि आता फ्रेंड झालीस so गर्ल फ्रेंड...." विराज


"अरे तशी नाही रे ...." मानसी


" मग कशी ? " न कळण्याचा आव आणत विराज बोलला.


" तुला मी काय विचारलं ते कळलंय उगाच न कळण्याचा आव आणू नकोस ."


" हम्म ... नाही असं कोणीही नाहीये माझ्या आयुष्यात सध्यातरी....पुढचं पुढे बघू...


" का ग? तू का इतकं विचारतेस? तुला आहे का माझ्यात इंटरेस्ट ?" विराज ने हसत विचारलं


" अरे असंच विचारलं..... तू पण काहीही बोलतोस ."


अस बोलून दोघ ही हसू लागले...पण का कोणास ठाऊक दोघांना एकमेक मनातून आवडले होते...


" तू काय करतोस ? " मानसी


" माझा MBA finance चा result लागतील आता ." विराज


" Ohh...great " मानसी


" तू काय करतेस ? " विराज


" मी सायकॉलॉजि मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतेय . " मानसी


" वा.... छान ." विराज


" चल जाऊया...तू आधी रूम मध्ये जा इथे उगाच एकटी थांबू नकोस ." विराज


" हम्म...चल ... सकाळी पुन्हा लवकर तयार व्हावं लागेल...नाही तर झोप लागायची." मानसी


" तू आधी रूम मध्ये जा मग मी जातो." विराज


मानसी रूम मध्ये गेल्याची खात्री करून मग विराज त्याच्या रूम मध्ये गेला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama