एक अदभूत कथा..
एक अदभूत कथा..
मी मीरा...छोटी असताना खूप खोडकर, मस्तीखोर लहान वयात जवळ जवळ सर्वच मूल तशी असतात मी ही तशीच एक...पण माझ्या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होत असे...मग सगळ्यांचा ओरडा खावा लागे.... मग मात्र मी एकटीच पडे... अस वाटे कोणी तरी असावं आपल्याला समजून घेणारं... ही गोष्ट जरा वेगळी वाटेल सगळ्यांना कारण मी कधीच कोणाला सांगितली नाही...हो तेव्हा पासून अस कोण मला भेटलं....तर घडलं अस...
असाच एकदा सगळ्यांचा ओरडा खाऊन खूप दुःखी होऊन मी पलंगावर पडले होते...एकटं वाटत होतं मला काही चाळा म्हणून माझा एक हात पलंगा खाली लटकत ठेवला होत... तात्काळ मला असं जाणवलं जणू कोणी प्रेमानी माझा हात धरला आहे...पण पलंगा खाली कोणीच नव्हतं...त्या अदृश्य हाताच्या स्पर्शात एक वेगळी जादू होती...एक आपलेपणा होता,माझं सारं दुःख मी विसरून गेले...त्यानंतर विना कारण पडल्या पडल्या मी हात पलंगा खाली लटकत ठेवला तर पुन्हा तोच आभास झाला तो आपुलकी चा स्पर्श...त्यावेळेस ना दुःख होत ना काही त्रास मी घाबरले आणि झटक्यात हात मागे घेतला त्यावेळेस तो हात ही दूर झाला...
आता मला त्या अदृश्य हाता ची सवय होऊ लागली होती...मला वाटेल तेव्हा त्याच्या आठवणी सरशी मी त्याला बोलावू शकत होते...जेव्हा मला भावनात्मक आधाराची गरज पडे मी मनोमन त्या आत्मीय स्पर्शाची कल्पना करू लागले आणि तो हात तात्काळ उपलब्ध होत असे ... नाही...कोणी ही खाली बसून मला मूर्ख बनवत नव्हते...
मी लहानाची मोठी झाले तरी तो हात माझी सोबत करतच होता...त्याने माझी साथ कधीच सोडली नाही...यथावकाश माझे लग्न झाले...ही गोष्ट नवऱ्याला सांगावी असे किती तरी वेळा वाटले...पण ही लहानपण ची मस्करी म्हणून ही गोष्ट उडवून लावतील म्हणून मी कधी सांगू शकले नाही...मी पहिल्यांदा आई होणार हे जेव्हा कळले का कोणास ठाऊक पण त्या अदृश्य हाताची सोबत सुटली... काय माहीत का त्या स्पर्शाने माझ्या पासून ची जवळीक तोडली...त्या पासून लांब होणं मला नाही सहन झालं...माझ्या लहानपणी चा मित्र,साथी, सोबती मला सोडून गेला...त्या स्पर्शाची उणीव मला बोचू लागली... मी सतत खूप प्रयत्न केले त्याला आठवायचे बोलवायचे पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता... जगात दुसरा कोणताही हात ना सोबत नव्हती माझ्या साठी...
बरोबर नऊ महिन्या नंतर मी एका गोंडस मुलीला जन्म दिला काही दिवसात मी आणि बाळ दोघी पलंगा वर झोपले असता अचानक त्या बाळाने त्याच्या इवल्या इवल्या हाताने माझा हात धरला आणि मला त्या जुन्या आत्मीय स्पर्शाची आठवण येऊन आत्मीय स्पर्शाची लहर माझ्या शरीरात पसरली...हो तो हाच स्पर्श होत ...मी कधीच
त्याला विसरू शकत नव्हते...हो हा तोच हात होता...त्याला विसरण्याची कशी मी चूक कारेन....
माझा अदृश्य साथी आता परत आला होता साक्षात माझ्यासाठी...माझ्या डोळ्यांतून तर आनंदाश्रू वाहू लागले...

