एक अजीब दास्तान... भाग 4
एक अजीब दास्तान... भाग 4
अंथरुणावर पडल्या पडल्या मानसी विचारात पडली सकाळच्या एका प्रसंगाने आपण किती चुकीचं मत बनवलं विराज बाबत.स्वभावाने किती छान आहे तो....नेहमी जस दिसत तसच खरं असतं अस नाही....विचाराच्या तंद्रीत ती कधी झोपली तिलाच कळलं नाही.
सकाळी आईच्या आवाजाने मानसी ला जाग आली.लवकर तयार होऊन नाश्त्या साठी ती लॉन वर गेली सगळी तरुण मंडळी उशिरानेच नाश्त्या करता आली होती. आता सगळ्यात छान ओळख झालेली दिसून येत होती... सगळेच हसत खेळत नाश्ता घेत होते एकमेकांना चिडवत होते.
तेवढ्यात लॉन वरच्या पेंडॉल मध्ये मेहेंदी काढायला स्त्रियांनी जावं अस सांगण्यात आलं...पल्लवी ला मेहेंदी साठी जास्त वेळ लागणार असल्याने तिच्या मेहेंडीची सुरुवात झाली होती . ज्या मुलींना मेहेंदी छान काढता येत होती त्यांनी मोठ्या स्त्रियांना मेहेंदी लावण्यास सुरुवात केली त्यात मानसी ही होतीच. साधाच पेहराव होता तिचा पण तरी ही उठून दिसत होती सगळ्यात . कला तर भरभरून होती तिच्यात... सुंदर निखळ हास्य सतत चेहऱ्यावर होतं तिच्या.... का कोणास ठाऊक पण विराज च लक्ष तिच्याकडे ओढलं जात होतं.ठाम खंबीर असा विराज मनातून जरा हलला होता . पण आपलं अस होणं शिताफीने टाळत होता...
इथे अजून कोणी होत जिला विराज आवडला होता. पण ह्याचा कुणालाच पत्ता नव्हता.मानसी मनाने मोकळी होती पण विराजच्या मनातले भाव तिला कळलेच नाही...का कळून ही ती समजत नव्हती....आपले मेहेंदी ने भरलेले हात समोरून येणाऱ्या विराजला दाखवत ती बोलली...
"बघ कशी काढली आहे मेहेंदी?"
" खूप सुंदर ... आणि आज तू दिसतेस ही छान." विराज
" धन्यवाद...तू ही काही कमी नाहीस हॅन्डसम दिसतोस... काही खरं नाही मुलींचं ." मानसी
अस बोलून दोघे ही हसू लागले.
मानसी आणि विराज ला बोलताना पाहून कल्याणी तिथे आली.
" काय ग काय चाललंय ?" कल्याणी
" काही नाही ... उगाच मस्करी करतोय .... ये तू ही ये." मानसी
" विराज ही माझी चुलत बहीण कल्याणी आणि कल्याणी हा विराज . " मानसी
" हाय विराज ." कल्याणी
" हाय कल्याणी ." विराज
" मी निखीलचा आते भाऊ ." विराज
" ओह... आत्ता कळलं तुझं आणि निखिलच नात . " मानसी
" विराज मग आज संगीत साठी काय तयारी केली आहेस ?" कल्याणी
" कसली तयारी? " विराज
" अरे आज संगीत साठी काही डान्स बसवला असशील ना ?" कल्याणी
" नाही ग.... मी आणि डान्स ? " विराज
" अरे काल किती छान डान्स केलास तू." कल्याणी
" अग डान्स कसला सगळं श्रेय मानसी च.... तिने सोप्या स्टेप्स दिल्या त्या जमल्या बस.... मला नाही डान्स करता येत.... ह्या मुलांनी मुद्दाम माझं नाव दिल होतं ." विराज
इतक्यात सुदीप विराजला आवज देत तेथे आला.
" हाय गर्ल्स , झाल्या महंदया काढून तुमच्या ?" सुदीप
" हो आत्ताच . " कल्याणी
" मग संध्याकाळी काय स्पेशल ? " सुदीप
" बघा कळेलच तुम्हाला आणि तुमची ही तयारी झाली असेलच ना ? " मानसी
" well तयारी तर झालेय पूर्ण.... बघू कसं होतंय . " सुदीप
" विराज जरा काम होत चल ना सोबत . " सुदीप
" हो चल येतो...." विराज
" चला bye मुलींनो भेटू पुन्हा...." सुदीप
"Bye कल्याणी , Bye मानसी ." विराज
" Bye " दोघीही एकदम करतात.
विराज आणि सुदीप तिथून गेल्यावर कल्याणी मानसी ला बोलते-
" किती छान आहे ग विराज ..... तू उगाच त्याला रुड आणि अबोल बोललीस...हँडसम आहे..असे बोलत कल्याणी डोळे मिचकावते.
" हो ग झाली चूक माझ्या कडून .... मला वाटलं तसा तो नाही हे नंतर मला कळलं.... आणि तुझं काय ग? , दाल मैं कुछ काला है क्या ?" मानसी
मानसी अस बोलता क्षणी कल्याणी लाजते.
" हो ग... मला विराज आवडलाय ." कल्याणी
" काय ... काय बोलतेस ? " मानसी
" हो तू जे ऐकलं तेच बोलतेय मी.... मला विराज आवडू लागलाय.....पण तुझं काय ? " कल्याणी
" माझं काय म्हणजे ?....आम्ही छान मित्र आहोत अजून काय ? " मानसी
" हो ना ..... मग मला मदत करना .... बघ ना मला जसा विराज आवडतो तशी मी ही त्याला आवडते का ?" कल्याणी
" अ ग तुला तो आवडतो तर प्रपोज कर की त्याला...सांगून टाक तुझ्या मनातलं ." मानसी
" हे इतकं सोप्प आहे का ग? " कल्याणी
" तू करशील मला मदत ? करशील ना ? " कल्याणी
" हो करेन प्रयत्न... नक्की ." मानसी
" चल आता जाऊ आपण...मेहंदी ही सुटू लागलीये हाताची...जेऊ आणि संध्याकाळच्या संगीतच्या तयारीला लागू ." मानसी
" हो.... हो चल ." कल्याणी
मेहेंदी चा कार्यक्रम छान पार पडला असतो .... जेवणाच्या वेळेला सगळे निखिलची खेचू लागतात...
"बघू निखिल किती प्रेम आहे तुझं पल्लवी वर...तिची मेहंदी छान रंगली तर तुझं खरंच प्रेम आहे नाही तर..."
" अहो नाही तर काय ? काही काय बोलता ." निखिल
सगळे हसू लागतात...

