STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Drama Romance

3  

pranaliprashant vaidya

Drama Romance

एक अजीब दास्तान - भाग 1

एक अजीब दास्तान - भाग 1

3 mins
350

    " मानसी तुझं सगळं सामान नीट भरलंस न ग? आणि सगळं भरून झालं असेल ते तुझी बॅग हॉल मध्ये आणून ठेव." आई ने(ज्योती) आवाज दिला.


   मानसी एक स्वप्नाळू डोळ्यांची गोड मुलगी , बघता क्षणी कोणालाही आपलंसं करणारी , स्वतःची मत ठाम पणे मांडणारी- न कोणाला घाबरता.... कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारी , गाणं नृत्य तर तिचा आवडता प्रांत...तिच्या स्वप्नाळू डोळ्यात स्वप्न ही तितकीच सुरेख असत...तिचा हा स्वप्नाळू पणा स्वतः पुरताच मर्यादित नव्हता...इतरां करता ही ती अशीच स्वप्न बघे....त्यामुळे कधी कधी नकारात्मकतेला गेलेले तिचे मित्र मैत्रिणी तिच्या या स्वभावा मुळे लवकर सावरत असत.तिचे स्वप्न दाखवणे त्यांना उद्यासाठी बळ देत असे....कोमेजलेल्या मनावर ती खूप सुंदर फुंकर घालत असे आणि म्हणूनच की काय ती सर्वाना हवी हवीशी वाटे....प्रत्येक जण तिच्या कडे आपलं मन मोकळं करत असे...अशी ही गोड मानसी ज्योती आणि अनिल देशमुखांची एकुलती एक मुलगी होती. ती जितकी लाडकी होती तितकीच ती जबाबदार स्त्री म्हणून कशी घडेल याची काळजी घेऊन तसेच संस्कार दोघांनी तिच्यावर केले होते.


   तसं हे गोड...त्रिकोणी कुटुंब भाचीच्या लग्ना करता अलिबाग ला जायला निघाल होतं... मानसी च्या एका बागेच्या जागी दोन बॅगा झालेल्या पाहून ज्योती आणि अनिल ला तर आश्चर्य वाटलं.


" अ ग पल्लवी च लग्न आहे , तुझं नाही ." ज्योती


" काय ग आई असं बोलतेस... लग्नाला लागणाऱ्या ड्रेस शिवाय इतर ड्रेस लागणार नाहीत का? तू पण ना..."मानसी


"ह्या लग्नात सगळ्यांनी धमाल करायची असच ठरलंय आमचं"...मानसी


दोन मोठ्या लगझरी बस भरून वऱ्हाड अलिबाग करता रवाना झालं... ते एक डेस्टिनेशन वेडिंग होत म्हणून अलिबाग च्या समुद्र किनारी असलेलं "रॉयल गार्डन" रिसॉर्ट लग्न स्थळ म्हणून निश्चित केलं होतं...

प्रवासा दरम्यान धमाल मस्ती , गाण्याच्या भेंड्या , जोक्स नी बस नुसती दणाणून गेली होती. सर्व नातेवाईक मंडळी जरी असली तरी त्यात काही मित्र परिवार देखील सोबत होताच दोन्ही कडची घरं मोठी होती आणि म्हणूनच हे डेस्टिनेशन वेडिंग होतं...


    मुली कडच वऱ्हाड रिसॉर्ट वर पोहोचलं तर मुलाकडच यायला जरा थोडा उशीरच होता. घरच्या महिला मुलाकडच्या स्वागता करता तयारी ला लागल्या तर बाकी सर्व तरुणाई नी सर्व सामान नोकरांच्या मार्फत ज्याच्या त्याच्या रूम मध्ये पोहचवलं. इतक्यात मुला कडंच वऱ्हाड रिसॉर्ट वर पोहचल्याचं कानावर आलं... तस रिसॉर्ट कडून बँड पथक स्वागता करता सुरूच झालं...मूला मुली कडच्या सर्वानीच बँड आणि डान्स चा मनसोक्त आनंद लुटला. सर्व तरुणाई बँड वर थिरकत होती आणि त्यातल्या त्यात छोटी नोक झोक ही सुरू झाली होती एकूणच जल्लोषाच वातावरण होत , सगळेच जण आनंदात होते आणि तरुणाईच म्हणाल तर ते एका वेगळ्याच विश्वात होते हे सांगायला नकोच.


   मानसी आणि तिच्या चुलत बहिणी श्वेता,सोनाली,कविता कोण कोणाला सूट करतय म्हणजे थोडक्यात जोड्या जुळवा असा खेळ खेळत होत्या, इतक्यात रिसॉर्ट कडून आज संध्याकाळ च्या एका स्पर्धेची घोषणा करण्यात आली....घोषणा होती एका नृत्य स्पर्धेची आणि त्याकरता आपल्या नावाची चिठ्ठी आपण ज्या टीम मधले असून त्या टीमच्या नावाच्या बाउल मध्ये टाकावी... हे ऐकून सगळ्यांमध्ये एक उत्साह संचारला.जवळपास सर्वानीच आप आपल्या नावाच्या चिठ्या बाउल मध्ये जमा केल्या..

पण टीम निखिल (नवरा मुलगा) मधल्या काही जणांच बोलणं मानसी ने ऐकलं...त्यात विराज म्हणून एक मुलगा दुसऱ्या मुलाला बोलत होता..." मला नाही आवडत रे आणि मला नाही येत असा डान्स करायला तरी तू का टाकलं माझं नाव?"...


घोषणे प्रमाणे संध्याकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार होती.दुपारच्या जेवणा दरम्यान सगळ्यांची आपापसात जुजबी ओळख झाली....


टीम पल्लवी- श्वेता,सोनाली,कल्याणी,कविता,मानसी,मंगेश,राहुल,रोहन,जय,दीपक,स्वप्ना


टीम निखिल-

सुदीप, चेतन, शामा, रोहिणी, मंदार , भूषण , विजय , विराज , उमा , नीता , नयना

 चला झाली ओळख परेड हा किंवा ही कोण आणि त्याच वा तिचं नाव काय? हे आता सर्वानाच कळलं होतं.मुली जशा दिसायला सुंदर होत्या तशी मुले ही देखणी होती. मानसी आणि श्वेता तर आपल्याला कोण पार्टनर मिळेल आणि कसे , काय आपण नृत्य करू याची स्वप्न त्या पाहू लागल्या होत्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama