STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Drama Romance Inspirational

3  

pranaliprashant vaidya

Drama Romance Inspirational

एक अजीब दास्तान... भाग 2

एक अजीब दास्तान... भाग 2

3 mins
384

    थोड्या विश्रांती करता मोठी माणसे आप आपल्या रूम मध्ये गेली तर तरुणाई आपल्या तयारी ला लागली...रूम मध्ये गेल्यावर तर मुलींच्या चर्चांना उत आला...मानसी तर या सगळ्यात पुढे होती. कोणाला कोण सूट करेल हे स्वतः च ठरवत होती.


" श्वेता तुला चेतन कसा वाटतो?" मानसी


" छान आहे त्याची पर्सनॅलिटी, हॅन्डसम आहे." श्वेता


" म्हणजे तुला त्याच्या सोबत आवडेल ना डान्स करायला?" मानसी


" हो.. का नाही." श्वेता


" मला असं वाटत सोनाली ला सुदीप आणि कविता करता विजय परफेक्ट राहील." मानसी


" कल्याणी तुला मंदार कसा वाटतोय? " मानसी


" ए विराज पण छान आहे की ?" कल्याणी


" आहे ग छान पण तो जरा अबोल आणि रुड वाटतो." मानसी


" आणि तुला जर तोच आला तर ग?" सोनाली


" नाही ग , मला वाटत भूषण येईल मला ." मानसी


" चला ग आता आपण ठरवून काय मिळणार त्यापेक्षा तयारी ला लागू, मस्त छान तयार होऊ आणि वेळेत तिथे पोहचू..." श्वेता


" कोण कोणता ड्रेस घालताय घेऊन या इथेच , आपण सगळ्या इथेच तयार होऊ." मानसी


सगळ्या तयारी ला लागल्या एकमेकींना मदत करत...प्रत्येकीचे ड्रेस ही सुंदर होते...सगळ्याजणी तयार होऊन निघाल्या...बघतात तर मुलं आधीच हजर होती...सर्व परिसर खूपच सुंदर सुशोभित केला होता, रंगी बिरंगी दिव्यांच्या माळा झाडांवर सोडल्या होत्या...रिसॉर्ट समुद्र किनारी असल्यामुळे लाटांचा मंजुळ आवाज कानी पडत होता...मंद गतीत वारा वाहत होता...एक विलोभनीय असच वातावरण तयार झालं होतं... निखिल पल्लवी ही तयार होऊन नुकतेच सामील झाले होते....तर मोठी माणसे ही हा आनंद लुटायला प्रेक्षकांच्या भूमिकेत येऊन स्थानापन्न झाली होती. रिसॉर्ट चा मॅनेजर टीम निखिल आणि टीम पल्लवी असे बाउल घेऊन आला. सर्वां समोर ते बाउल ठेऊन त्याने प्रत्येक बाउल मधून एक एक चिट्ठी काढायला सुरुवात केली.


टीम निखिल मधून पहिली चिट्ठी निघाली चेतन


टीम पल्लवी मधून श्वेता


ते दोघे त्या स्टेज जवळ येऊन उभे राहिले . मानसी बोलल्या प्रमाणे चेतन तिला पार्टनर म्हणून मिळाल्याने ती खुशीत होती.


पुढची नाव....

सुदीप - सोनाली

कविता - विजय

शांभवी - राहुल

रोहिणी - मंगेश

नयना - रोहन

कल्याणी - मंदार

उमा - जय

नीता - दीपक

स्वप्ना - भूषण

आणि शेवट च नाव मानसी - विराज


मानसी मनातून थोडी हिरमुसली कारण तिला विराज पार्टनर म्हणून आला होता आणि तो थोडा स्वभावाने रुड आणि अबोल वाटत होता. पण करणार काय? आलिया भोगासी म्हणून पुढच्या सूचना काय देतात त्यावर तिने लक्ष केंद्रित केलं.... प्रत्येक जोडीला एक एक गाणे देण्यात आले आणि 5 मिनिट दिली...कसा डान्स करावा हे ठरावण्या करता. त्याप्रमाणे प्रत्येक जोडी आपला डान्स कसा असेल हे ठरवू लागले...


  इथे मानसी जरा नाखूष होती विराज सारख्याशी कस बोलावं ह्या पासून सुरुवात होती...कारण त्याच्या बाबत तिची काही मत आधीच ठरली होती. पण उसनं अवसान आणून तिने स्वतः च स्वतः ची ओळख करून दिली.


" हाय मी मानसी "


" ह्या गाण्यावर कसं परफॉम् करायचं ह्या बाबत तुझी काही मत असतील तर मांड" मानसी


" नाही ग , खरं तर मला डान्स असा काही येत नाही. माझ्या सारख्या दगडा सोबत तुला कसं करायचं ते तूच बघ" विराज


विराजच्या अशा बोलण्याने मानसीला जरा हाय से वाटले म्हणजे आपण काही सांगू तो हा तसंच स्वीकारेल अशी जाणीव तिला झाली.


" तुला डान्स जमत नाही तर काही सोप्या स्टेप्स मी दाखवल्या तर तू करू शकशील ना? " मानसी


" हो , प्रयत्न जरूर करेन ." विराज


मानसी ने त्या गाण्यावर काही सोप्या स्टेप्स विराज ला दाखवल्या व त्या त्याला जमतील असे वाटले. जेव्हा त्यांचा नाव पुकारलं गेलं तेव्हा...


" तू काळजी करू नकोस , एकदम बिनधास्त नाच , काही हरकत नाही आपण जिंकलच पाहिजे असं नाही....पण तू नाच...Best of Luck." मानसी त्याला बोलली.


   पाच मिनिटांचा डान्स ....ज्या काही स्टेप्स मानसी ने सांगितलेल्या कशा बशा पूर्ण करून विराज नि हुश्य केलं....मात्र मानसी च्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता...आपल्याला वाटलं तितका विराज वाईट नाही...नकळत मनात कुठे तरी हलल्या सारख जाणवलं तिला....सर्व डान्स संपले होते आणि आता निर्णयाची वेळ होती....


पहिला क्रमांक श्वेता आणि चेतन चा होता आणि दुसरा क्रमांक .... मानसी आणि विराज चा होता...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama