तिची माझी भेट.......
तिची माझी भेट.......
तुझ्याविना ही मैफिल माझी सुनीचं आहे,
त्या सुन्या मैफिलिची आठवण जुनीच आहे.
आज जॉबवर कामाचा ताण जास्तच होता. गेल्या सहा महिन्यापूर्वी या नवीन कंपनीत रुजू झालो होतो. काम संपवून कसा बसा कंपनी मधून बाहेर निघालो. बाईक चालू करून परतीच्या प्रवासाला लागलो असताना अर्ध्या वाटेतचं अचानक पावसाचे आगमन सुरु झाल्यामुळे घाई गडबडीत बाईक थोडया पुढे असलेल्या नाक्यावर थांबवली.अर्थात तो नाका नाशिक हायवे लगत कल्याणच्या दिशेने जाणारा नाका होता.बाजूलाच असलेल्या झाडाखाली मी उभा रेनकोट घालत होतो.तेवढ्यात माझी नजर समोर रस्त्याच्या पलीकडे छत्री घेऊन उभ्या असलेल्या तरुण मुलीकडे वळली आणि मी स्तब्ध झालो.तिच्याकडे एकटक पाहत राहिलो.तिच का? ही ती नसेल? ती इकडे कशी काय? असे अनेक प्रश्न मनात उठत होते. खूप दिवसांनी तिला पाहत होतो एकंदरीत एक दीड वर्षांनी.हो पण ती,तीच होती.मी कधीच तिला विसरू शकणार नाही.पहिलं प्रेम आहे ते माझं! मी तिच्याकडे पाहत होतो पण तिची नजर अजून माझ्याकडे वळलीचं नव्हती.इतक्यात कल्याणच्या दिशेने येणारी प्रवासी बस त्या नाक्यावर येऊन थांबली.अन ती त्या बसमध्ये चढली.बसमध्ये चढताना मात्र तिची थोडी नजर माझ्या बाईकवर पडली. बाईकवर असलेला गुलाबाचा रेडीयम केलेला चित्र तिच्याही ओळखीचा होता.ती माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती पण बस सुरु झाली आणि त्या झाडाच्या बाजूलाच उभा असलेला मी तिला दिसलोच नाही.कल्याण दिशेने जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या बसकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिलो.ती बस नजरे आड झाली पण मनात माझ्या आठवणींचे वादळ उठु लागले.भूतकाळातल्या आठवणी ताज्या होत होत्या.
नको तुझ्याविना हे आयुष्य
असं लागलंय आज वाटाया,
आज पुन्हा तूझ्या आठवणींचं
वादळ लागलंय उठाया.....
पडणाऱ्या पाऊसाचे थेंब काही अंगावर पडले आणि मी भानावर आलो.अंगावर रेनकोट चढवून मी पुन्हा बाईक चालू केली आणि घराकडे जाण्यास निघालो. मन काही थाऱ्यावर राहीना.राहून राहून तिचीच आठवण येऊ लागली.खरंतर मी अजून पर्यंत विसरलोच न्हवतो तिला.आज ती अचानक नजरे समोर आली आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. आजही अचूक आठवतो तो दिवस तो क्षण जेव्हा मी तिला पाहिलं होतं.मी एका नामांकित कंपनीमध्ये तीन वर्षा पासून डेटा एंट्रीच काम करत होतो.त्या कारणाने मी आता बऱ्यापैकी काम शिकलो होतो.त्यात काही दिवसांनी कंपनी ऑनलाईन असल्यामुळे सेल चालू होणार होता.बरीच नवी मुले आणि मुलींची कंपनीत भरती करण्यात आली होती.आता मला फक्त ह्या नवीन मंडळींना ट्रेनिंग देण्याचं आणि सिस्टीम ऑपरेट करणं शिकवायचं काम होते.
तुझ्यासाठी काही लिहावंस वाटलं
म्हणून लिहित आहे माझी लेखणी,
तुझं रूप मनामध्ये कायमच साठल
तू ग लाखात एक देखणी
माझ्या आयुष्यातला मी कधीही न विसरणार तो दिवस 15 ऑगस्टचा होता.कंपनीत काम चालूच होते. स्वातंत्र्य दिन असल्या कारणाने कंपनीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच दिवशी मी सकाळी तिला पाहिलं. पांढरा ड्रेस, ब्लु ओढणी परिधान केलेली ती दिसायला ही सुंदर होती.तिला पाहताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो.हे तिला लगेच सांगायचं कस? इतक्यात सांगणं योग्य होईल का? मी पूर्ण वेळ त्याचा विचारात होतो.इतक्यात कंपनीत स्पीकरद्वारे सांगण्यात आले की सर्वांनी डॉक नंबर तीन जवळ जमायचं आहे.सर्व कामगार आणि साहेब मंडळी तेथे जमली.अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले.सहभागी सर्वाना काही गिफ्ट देण्यात आले.इतक्यात मागून मित्राने आवाज दिल अरे चेतन आज एक कविता होऊन जाऊदे.मी कविता लिहतो हे सर्वाना माहित होते. मग सर्वांच्या विनंतीला मान देऊन एक कविता सादर केली जी नुकत्याच झालेल्या पूर स्थितीवर आधारित होती. सर्वाना ती कविता आवडली.सर्वांनी टाळ्या शिट्या वाजवल्या कौतुक केलं. कविता म्हणताना सर्व समुदाय शांत ऐकत होता.त्या कवितेत पूरस्तिथीच्या भावना प्रत्येकाच्या मनाला भीडत होत्या.बक्षीस म्हणून एक कॅडबरी चॉकलेट मला देण्यात आले.आता ते चॉकलेट एकट्याने खाणे मला योग्य वाटल नाही म्हणून मी साऱ्या मित्रांना थोडं थोडं वाटलं.शेवटचा तुकडा बाकी होता आणि समोर तीच मुलगी उभी होती जिच्या मी प्रेमात पडलो होतो.आता काय कराव हिच्या सोबत बोलावंसं तर वाटतंय पण बोलायचं कस ? तिच्यासाठी तर मी अनोळखी.मग हातातल्या चॉकलेट वर नजर गेली आणि ते तिला देण्यासाठी पुढे झालो.मनात प्रश्न होताच ती बोलेल का? पण हिम्मत केली अन दिले तिला चॉकलेट.मी मनात खूप घाबरलो होतो कारण की या पूर्वी मी कधीच अनोळखी काय ओळखीच्या मुली सोबत सुद्धा कधी बोललो न्हवतो. समोरून तिचा गोड आवाज अभिनंदन म्हणून ऐकू आला. सोबतच तिला मी सादर केलेली कविता आवडली. हे ही ती ने सांगितले. मी खूप खूष झालो. ती माझ्याशी पहिल्यांदाच बोलली होती. तिचा स्वभाव शांत, संयमी छान होता.
परतीच्या प्रवासात मी हे सारं आठवत होतो. आता मी घरी पोहचलो. गाडी बाजूलाच लावून घरात प्रवेश करताच सोफ्यावर बसलो आणी पुन्हा त्या साऱ्या आठवणी नजरेसमोरून फिरत होत्या. त्या आठवणीत मी इतका गुंतलो होतो की पायातील बूट देखील घरा बाहेर काढायचा विसरलो. इतक्यात आईचा आवाज आला, बाळा आलास. जा अंघोळ करून घे. तो पर्यंत मी चहा करते.एवढं बोलून आई किचन मध्ये गेली आणि चहा करू लागली. तो पर्यंत मी ही अंघोळ करून बाहेर आलो आणि पुन्हा सोफ्यावर बसलो. जॉब वरील कामाच्या तणावात खूप थकलो होतो. चहाचा घोट घेतला त्यात आईचा रोजचाच प्रश्न काय रे काय विचार केला आहे. करून घे ना लग्न अजून किती थांबणार आहेस. तुझ्या जोडीच्या सर्व जणांची लग्न झाली. मी अगोदरच तिच्या विचारात गुंग आणि आईचा रोजचाच प्रश्न.मी कंटाळून रूमच्या दिशेने जाण्यास निघालो आणि आईला सांगितलं मला डिस्टरब करून नको. मी काम करतोय.आत खोलीत जाऊन मी पंखा चालू केला आणि बेड वर येऊन बसलो. पुन्हा विचार तिचाच येऊ लागला. तीचं ते बघणं,सजनं सारं काही जणू समोर दिसू लागलं. तिचा चेहरा नजरे समोरून जातच न्हवता.
विसरणार नाही तुला कधीच मी
मनात जागा तुझी खास आहे,
तू नभातली चांदणी पण हा चंद्र उदास आहे...
दिवसामागून दिवस सरत होते आणि माझी तिला प्रपोज करायची तळमळ ही वाढली. तिला सिस्टीमवर काही ट्रिक शिकवत असताना तिने माझा मोबाईल नंबर मागितला. त्या ट्रॅकर आणि ट्रिक मोबाइलवर समजाऊन घेण्यासाठी तिने माझा मोबाईल घेऊन त्यात तिचा नंबर सेव केला आणि आम्ही ट्रिक समजू लागलो. मला खूप आनंद झाला होता. जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतोय ती आज खूप वेळ माझ्या सोबत बोलत होती. मग आमचं ऑनलाईन बोलण वाढलं. जॉब वर कमीच बोलण व्हायचं. मग व्हाट्सएप वर तिला उद्देशून स्टेटस कविता ठेवायचो. कंपनीत दोन मित्रांना ही गोष्ट माहित झाली. ते कुणालाही बोलले नाही. असेच हसत खेळत दिवस जात होते. एकदा ती काही फाईलचं काम करत होती. मी बाजूने चाललो होतो. इतक्यात समोरून माझा मित्र विशाल आला. त्याला मजाक करायची सवय ही होतीच आणि त्याने मला मजाक मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा असा म्हंटल. मी त्याला हात मिळवत मस्ती करत आम्ही दोघेही तिथून निघून गेलो. थोड्यावेळाने लंच ब्रेक झाला. ती जेवायला बसली होती. मी ही समोरच्या टेबलवर जेवणाचं ताट भरून बसलो होतो. मला तिच्या बरोबर बोलायचं होतं. बाजूला सर्व मुलं असल्यामुळे मी तिच्याशी संवाद साधू शकत न्हवतो. ऑनलाईन बोलण्याचा प्रयत्न केला. ती ही ऑनलाईन होतीचं. मी तिला काही विचारताचं,ती म्हंटली की माझ्या बरोबर अजिबात बोलून नका आणि नाक मुरडत ती मोबाइल लॉकरला ठेऊन ऑफिस मध्ये निघून गेली. मी विचारात घुटमलत राहिलो की काय झालं असेल,माझं काही चुकलं की, कोणी काही हिला सांगितलं असेल.मी जेवणाचं भरलेलं ताट तसाच ठेवलं आणि न जेवता कंपनीत आलो काम करून लागलो.पण मन कामात ही लागत न्हवत.आपल्याला आवडणारी व्यक्ती जेव्हा आपल्या सोबत न बोलता निघून जाते त्यावेळी होणाऱ्या वेदना आपल्यालाचं माहित.तिची सुट्टी झाली, माझी एक तास उशिराने सुट्टी होणार होती.बस मध्ये बसताचं ती ऑनलाईन आली मी केलेलं मॅसेज तिने पहिले, त्यात लिहले होते की ठीक आहे मी तुमच्या बरोबर बोलणार ही नाही पण माझी चुकी तर सांगा,तिने पुन्हा रागाचं स्टिकर पाठवलं.आणि बऱ्याच वेळानंतर मला सांगितलं की, तुमचा आज वाढदिवस होता मग सांगितलं का नाही, मी गिफ्ट दिल असत असं ती बोलत होती.तेव्हा कुठे जीवात जीव आला,मी उगाच भलताच विचार करत बसलो होतो.मी तिला सांगितलं की माझा वाढदिवस हा सतरा तारखेला असतो.त्या विशालने मजाक केली होती, आणि त्यामुळे मी दुपारी जेवलो सुद्धा नाही किती तणावात होतो.तिने हसत सॉरी वगैरे म्हणतं काही तरी खाऊन घ्या,उपाशी नका राहू असं म्हणतं भरपूर वेळ ऑनलाईन बोलत होती ती.आता माझी सुट्टी झाली होती.मी ऑफलाईन झालो.
ती पाहून हसली
अन सुरु झाला नजरेचा गेम,
तीचं माहित नाही मला
पण मी करतो तिच्यावर एकतर्फी प्रेम.
शेवटी काही दिवसांनी तो दिवस उजाडला ज्या दिवशी माझा वाढदिवस होता, आदल्या पूर्ण रात्र मी झोपलोच नाही वाढदिवसाच्या सकाळी सकाळी साधारण साडे सहाच्या सुमारास ती ऑनलाईन आली आणि मी मनातलं सारं काही तिच्या बरोबर ऑनलाईन चॅटिंग वर बोलून टाकलं आता फक्त तिचं काय मत आहे हे कळायचं बाकी होतं. ती कंपनीत पोचल्या कारणाने ती ऑफलाईन झाली. मी वाट पाहत राहिलो की कधी रिप्लाय येतो म्हणून पण तिचा रिप्लाय काही आलाच नाही. त्या दिवशी माझी शिफ्ट चेंज झाली होती. माझी रात्रीची शिफ्ट होती. तरीही मी दुपारी तिला पाहण्यासाठी कंपनीत गेलो. ती सेकुरीटि डेस्क बाजूलाच ती आणि तिची मैत्रीण उभी होती. तिने मला विचारलं वाढदिवसाची पार्टी पाहिजे कधी देतो. मी म्हंटल चाला आता देतो. ती ने नाही म्हंटल आता नको नंतर करू पार्टी म्हणून सांगितलं.अर्धा तास मी कंपनीत तिला पाहत बसलो होतो. बाजूलाच बसलेल्या सरांना जाऊन मी भेटलो. आज मी रात्री कामावर उशीरा येईन माझा वाढदिवस आहे असे सांगितले आणि सरांनी ही बिनधास्त ये म्हणून सांगितलं. मी तिला बाय करून घरी निघून आलो. पण तिचा रिप्लाय काय हे अजून कळलं न्हवत? ती ऑनलाईन कधीही येईल म्हणून पूर्ण वेळ मोबाइल हातातून घेऊनच बसलो होतो. तिचा रिप्लाय ही आला नाही आणि ती ऑनलाईन ही आली नाही. घरात माझ्या वाढदिवसाच्या निमित्त केक देखील आणला होता, वाढदिवस साजरा करायची माझी मुळीच इच्छा न्हवती. नाईलाजाने आईच्या आग्रहाने केक कापायला लागला. मग मी सुमारे पाऊणे बाराच्या सुमारास जॉब वर जायला निघालो तरी अर्ध्या वाटेत ही मी मोबाईल चेक करत होतो. कंपनीचे गेट वर पोचलो आणि तिचा मॅसेज आला.
रात्रीचे बरा वाजले होते. बरंच काही बोलत होती ती. तिच्या बोलण्याने तिचा राग झलकत होता. ती बोलत होती की माझं नाव तुम्ही पूर्ण कंपनीत खराब केलाय. ते सेकुरीटी मला काहीही बोलले.... बरंच काही ती मला बोलत होती. तिच्या हे लक्षात आलं नाही की दुपारी सेकुरीटी डेस्कवर ती माझ्याकडे पार्टी मागत होती हे त्याने ऐकले होते. त्या मुळे तो तिला बोलला की आज चेतन तुम्हाला पार्टी देईल म्हणून. आणि एखादा मुलगा आणि मुलगी बोलायला लागली की लोकांना अफ़वा पसरवायला किती वेळ लागतो. हे मी तिला पटून सांगितले, पण ती भलत्याच रागात होती. मसेज करून नका. माझ्याबरोबर बोलू नका, असे बोलून ऑफलाईन झाली आणी बोलायची बंद झाली. मनाला खूप वेदना होत होत्या, पण तिला ते सांगणं आता अवघड होतं. पूर्ण रात्र जॉबवर तणावात होतोच. सकाळ झाली. मी कंपनीचा गेट बाजूलाच तिची वाट बघत उभा होतो. ती बस मधून खाली उतरली, पण फायदा काहीच नाही झाला. तिने माझ्या कडे रागाने चेहरा करून मला न पाहताच नाक मूरडत कंपनीत गेली. मी ही दुःखी मनाने जॉब वरून घरी आलो. मन कशातच रमत न्हव्हते. त्यात ती बोलायची ही बंद झाली. दोन दिवस झाले झोप काही लागत न्हवती. पूर्ण वेळ विचार तिचाच होता. दररोज तेच जॉब वरून निघताना तिच्या बसची वाट पाहत उभं राहणं. तिला पाहणं पण ती माझ्याकडे ना पाहताच निघून जायची.
इतक्यात रूमचा दरवाजा बाहेरून आईने उघडलला. मी पुन्हा आठवणीतून बाहेर आलो. जेवण तयार होतं, पण माझी जेवायची इच्छा न्हवती. आई मी नंतर जेविन तू जेऊन घे. आईच ती तिने थोडं जेवायला लावल. जेवताना विचारलं काय झालं? तू आल्या पासून चिंतेत दिसतोस ? कामावर काही झालं का? की तुझी तब्येत बारी नाही ? असे अनेक प्रश्न आई मला करत होती. मी माझ्याच विचारात. नाही तस काही नाहीं मी थकलोय खूप, दोन घास खाऊन मी झोपायला रूममध्ये गेलो. आई ही काम आवरून झोपी गेली. आता मला काही झोप लागत न्हवती. का काय माहित पण आज तिला खूप दिवसांनी पहिल्यापासून मी वेगळ्याच विचारात होतो. सारखं नजरे समोर तिचाच चेहरा येतो होता. मी अजूनही तिला विसरलो न्हवतो. तिच्या आठवणीत कित्येक कविता मी लिहून ठेवल्या आहेत. पहिल्या तीस दिवसात तर एकूण सत्याहतर कविता मी तिच्या विरहात लिहिल्या होत्या. ते माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं म्हणूनच.पहिलं प्रेम कोणी सहज विसरत नसतोच.
सप्टेंबर सतरा तारखेला मी तिला प्रपोझ केला होता पण ती एवढी रागावली होती की माझ्याकडे पाहत सुद्धा न्हवती. मी वेडा तिला पाहण्यासाठी त्याच जागेवर रोज उभा राहायचो. ती पहिल्या शिफ्टला आणी मी रात्रीच्या शिफ्टला. कमीत कमी विस दिवसानंतर चार ऑक्टॉबरच्या रात्री अचानक माझ्याकडून तिला मॅसेज सेंड झाला. माझ्या लक्ष्यात येताच मी तो मॅसेज डिलिट केला. आणी मी कामात व्यस्त झालो. सकाळ झाली शिफ्ट संपायला अर्धा तास बाकी होता. इतक्यात मोबाईल वरची मॅसेज टोन वाजली. मी चेक केला तर तो मॅसेज तिचाच होता. ती बोलत होती की का मॅसेज डिलिट केला? काही बोलायचं आहे का? काही बोलायचं असेल तर बोला. आता चार पाच दिवसचं राहिलेत. मी विचारलं तिला की असाच सेंड झाला मॅसेज, पण तुम्ही कशा आहात. चार पाच दिवस कशाला तर तिने सांगितलं की मी जॉब सोडणार आहे. मला माहित होत की चार पाच दिवसांनी तिचा वाढदिवस आहे म्हणून ही अशी बोलत असणार.
मी विषय बदलला की काय बोलणार मी, तुम्ही बोलायचं बंद झालात. एवढा राग धरलात माझ्यावर आणि तुम्हाला पाहण्यासाठी मी बाहेर उभा असतो. तर फार रागाने पाहता तुम्ही. तिकडून तिचा रिप्लाय ओ असा का मग आज स्माईल देते बरं का तिथेच थांबा तुम्ही जिथे माझी रोज वाट पाहत उभे असता, असं तिने मला सांगितलं. दोन मिनिटात जॉब सुटलं आणि मी कंपनी बाहेर तिची वाट बघत उभा राहिलो, पण आज तिची बस उशिराने आली. मी वाट पाहत तिथेच उभा होतो.बस मधून ती उतरली. मी तिला पाहिलं तिने ही आज विस दिवसांनी माझ्याकडे पाहिले आणि गोड अशी स्माईल केली. कंपनीत जातानाही ती पाठीमागे वळून पाहत होती. मी पुन्हा कंपनीत गेलो आणि तिला आतमध्ये जाताना पाहत राहिलो मग तिने मला इशारा करून घरी जायला सांगितले. मी मनातच खूप खुश होतो. ती मला मनापासून आवडत होती. दोन तीन दिवस झाले. रोज पहिल्यांदा सारखं ऑनलाईन बोलण सुरु झालं. दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मी तिला शुभेच्छा दिल्या आणि घरी आलो. रात्रीच्या शिफ्टला असल्यामुळे मी दुपारी झोपी गेलो. संध्याकाळी मी कंपनीत पाचच्या वेळेत कामानिमित्त मित्राला भेटायला गेलो असता तिथे कळलं की तिने आज जॉब सोडला. ती खरं बोलत होती की चारपाच दिवसांनी ती जॉब सोडणार आहे. ती मला गेट वर बसमध्ये जाताना दिसली पण मी तिला काही विचारु शकलो नाही कारण तिथे बरीच मुलं होती. ती बसमध्ये बसली आणी मी तिला कॉल केला. विचारलं तिला की असा का केलात. माझ्यामुळे जॉब सोडलात ना ? मी नाही सतावनार तुम्हाला. तुम्ही जॉब नका सोडू. ती म्हंटली की मला घरचे जॉब करू नाही देत म्हणून मी जॉब सोडत आहे. त्यात तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही स्वतःला काही दोष देऊ नका आणि आनंदात रहा भेटू आपण कधीतरी एवढं बोलून तिने कॉलकट केला. कदाचित तिचेही डोळे पानावले होते आणि माझेही. त्यानंतर तिने भेटायला बोलावलं ही.मी तिला भेटायचं प्रयत्न ही केला पण तिच्या सोबत घरातली मंडळी असल्या कारणाने तिला भेटताही आलं नाही. काही दिवस ऑनलाईन चॅटींग.काही दिवसांनी तिचा कॉल आला. मी उचलायच्या आत कट झाला. मी प्रयत्न करत होतो पण तिचा कॉल लागला नाही. तिचा मॅसेज आला की कॉल आणि मॅसेज करून नका. मोबाईल दादाकडे असतो. मी वेळ मिळाला की कॉल किंवा मॅसेज करेन. विश्वास आहे ना माझ्यावर एवढं बोलून ती ऑफलाईन झाली. एक वर्ष पूर्ण झालं. अजून तिचा कॉल किंवा मॅसेज आला नाही. आता माझे ही मन त्या कंपनीत लागत नसल्याने मी ही तो जॉब सोडला. त्या नंतर आज ती थेट एवढ्या दिवसांनी मला दिसली. मनात पूर्वी पेक्षा जास्त हुरहूर लावून गेली. चेहरा पुन्हा नजरे समोर दिसू लागला. आज पुन्हा कॉल करायचा प्रयत्न केला, पण नंबर बंद...आता कोण जाणे ती दिसेल की नाही तिची माझी भेट होईल की नाही. आयुष्याच्या या वळणावरचे प्रश्न अनुउत्तरीत आहेत....
आनंदात होतो एकटाच मी
नकळत कसा वेड लागला हा प्रेमाचा,
दोष कोणाला काय देऊ मी
मीच साला फाटक्या नशिबाचा.
(क्रमशः)
