Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

vinit Dhanawade

Romance

2  

vinit Dhanawade

Romance

the original Love story

the original Love story

26 mins
9.9K


" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ",

" हो. निघतोच आहे सर आता.",

" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.",

"असं .. का सर ?",

"अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो."

"पाऊस ?.... आता ?"

" कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?",

" नाही सर . खरंच नाही माहित ",

"अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरुवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला. " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता.

एका थंड हवेच्या झोताने त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडली आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.

" आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ ऑफिस घरी गेलं होते. तो एका software company मध्ये नोकरीला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.

संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ".

" सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू " हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love Story's ". " फक्त " Love Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या " Love Story's " सगळ्यांना आवडायच्या.

college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही.

अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही,नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला,तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा group तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच famous होता college मध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता , " Love story's " college मध्ये खूप famous झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला Propose सुद्धा केलं होतं, विनूचा " प्रेम " या गोष्टी वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो " Friendship " वर आणि "सुची "वर . पण तिच्या मनात काही वेगळच होत . सुरवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीहि नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायाचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा अस वाटायच, विनू ला तिच्या मनातला काहीच माहित नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही.

असच एक वर्ष निघून गेलं. " सुची " विनूची " Friend " पासून " Best Friend " झाली होती,एकत्र college ला जायचे ,घरी एकत्र निघायचे ,एकाच डब्यात जेवायचे , एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची आणि एक गोष्ट दोघांमध्ये common होती ती म्हणजे पावसात भिजणे . एकत्रच भिजायचे . ८ जून ला तिचा वाढदिवस असायचा , त्या दिवशी तर किती मजा केली होती सगळ्यांनी ,पण केक कापण्याच्या अगोदर " सुची '' एक वाक्य बोलली, " हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील,कारण आज मला कळल कि खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे" हे अस का बोलली ती ते कोणालाच कळल नाही , त्या वाक्याचा तो रात्र भर विचार करत होता ,आणि अचानक बाहेर पाऊस सुरु झाला . मग काय , विनू बाहेर पडला पावसात भिजायला ."एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे ?" म्हणून तो चालू लागला . चालता चालता अचानक तो थांबला . विचार करता करता विनू , " सुची " च्या घरासमोर आला होता नकळतपणे . त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर " सुची " होती पावसात भिजत, तिलाही आश्चर्य वाटलं विनूच. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोडयावेळाने दोघे ही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत फक्त हातानेच " bye " केले आणि विनू घरी आला . पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता , " याला मैत्री नाही म्हणत ना , मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम ?" आज त्याला झोप येत नव्हती, एका वेगळ्याच आनंदात होता तो , दुसऱ्या दिवशी college ला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले.

" साहेब, आज घरी जाणार आहात काय ? नायतर मी दरवाजा बंद करतोय , झोपायचे आहे मला ." watchman च्या या शब्दांनी विनू भानावर आला , " निघतो आहे ५ मिनिटात ." अस बोलून त्याने त्याचं सामान उचलल आणि office च्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता , छान थंडावा आला होता ,विनूच मनही शांत झालं होत. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनी मध्ये येऊन उभा राहिला . पावसाने पुन्हा सुरुवात केली होती , " त्या दिवशी पण असाच पाऊस होता ना . ज्या दिवशी " सुची " मला पहिल्यांदा भेटली होती." आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला

.

" विनू " आणि " सुची " यांची friendship अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण college मध्ये त्यांची Friendship famous होती, विनू तिथे सुची ,सुची तिथे विनू असच झालं होत काहीसं . त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणीनाही ठाऊक होते कि दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि विनू लाही ती आवडायची मनापासून ,फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हत. विनूला मित्रांनी खूप समजावलं कि,"तू पूढे होऊन तिला propose कर " , पण त्याला ते कधीच जमलंच नाही . दिवस असेच आनंदात , मजेत जात होते , दोघे मनानी आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे . त्याने मनाची तयारी केली . फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. विनूने ठरवलं कि ८ जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती ." yes. ८ जूनलाच तिला सर्वांसमोर Propose करायचं ". तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. ७ जून हा दिवस जाता जात नव्हता , कसाबसा गेला दिवस, त्या दिवशी ती लवकरच गेली college मधून " उद्याची तयारी करायची आहे " असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद झाला होता ,कधीच सांगतो आहे मनातलं अस त्याला झालं होत.

८ जून ............... सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्या साठी मोठा दिवस होता ,Infact तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा plan ठरला होता . सकाळी वर्गात वाढदिवस करायचा , मग college सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला Propose करायचा. अगदी perfect plan होता . लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने . छानसा शर्ट ,कडक इत्री केलेला आणि निघाला college साठी बाहेर. बाहेर आल्याआल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं "आज काय पाऊस पडणार वाटत" असे विनू मनात बोलून , भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत college मध्ये आला. Group तर अगोदरच आला होता . फक्त " सुची " आली कि party सुरु . " आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही " एक कोणीतरी बोललं तसे सगळे हसले. रोज ७ वाजता येणारी आज ८ वाजले तरी कूठेच दिसत नव्हती. ८ चे ९ , ९ चे १० , १० चे १२ वाजले तरी ती आलीच नाही , त्यावेळी mobile एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले .

" संध्याकाळी भेटूया नक्की हा . मोठ्ठी party करूया . मी घेऊन येतो तिला ." असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व Group आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता . त्याने वर आभाळात पाहिले . अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता . " आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांच पावसाचं आणि "सुची" च सुद्धा." तोही घरी निघून आला . " का नाय आली ती . सगळा मूड ऑफ केला . आता भेटू दे संध्याकाळी. भांडणच करतो ." संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला " सुची "चा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला. तर दरवाजाला कूलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला . " एकटीच गेली फिरायला Family बरोबर . आणि मी कोणीच नाही का ? उद्या येऊ दे . बोलणारच नाही." डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही . त्याचा राग काही गेला नव्हता. असे ५ दिवस गेले . ती आलीच नाही college ला . आता त्याला तिची काळजी वाटू लागली . " बर नाही वाटतं तिला " college सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कूलूप तसचं होतं. " बहुतेक डॉक्टर कडे गेली असेल " असा विचार करून तो परतला. आणखी ४ दिवस गेले. ती काही college ला आली नाही की त्या दारावरच कूलूप उघडलं नाही.

विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं , शेजारी , तिच्या मैत्रिणीना, तिच्या नातेवाईकांना. कोणालाच माहित नव्हत. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता १ महिना झाला,परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळ जवळ वेडाच झाला होता . ना जेवणात लक्ष ना अभ्यासात . अगदी कोमेजून गेला होता तो . नेहमी हसरा , धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता . कोणीतरी सांगितलं कि ती तिच्या गावी गेली असावी . तसा तोही तिच्या गावी जाऊन आला , ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या. आणि शिक्षकांना विनूच असं वागण बघवत नव्हत . त्यांनी त्याच्या आई वडिलांना मुंबई ला बोलावून घेतले, त्यांना सुद्धा विनुला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनू जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनू च मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला, तिची आठवण त्याला सोडवत नव्हती, असेच महिने गेले, वर्षही उलटलं. पुन्हा ८ जून. सुची चा वाढदिवस. त्यादिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होत आणि लवकरच पावसाला सुरवात झाली ." आज तरी सुची येणार " त्याला आठवलं तिलापण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला ." कदाचित ती सुद्धा येईल भिजायला ." पाऊस आला तसा गेला , ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला कि विनू भिजायला जायचा जेणेकरून त्याला सोडून गेलेली " सुची " पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात.

" आज ६ वर्ष झाली. सुची कूठे असेल काय माहित ? " विनू विचार करत उभा होता बाल्कनी मध्ये. ६ वर्ष . ती कूठे गायब झाली अचानक. विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कूठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या ६ वर्षात अर्धे भारतभ्रमण केले होते त्याने, मनापासून प्रेम केलं होत त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिण, " Love Story " करणे कधीच मागे पडलं होत. फक्त " सुची " ला शोधायचं हेच त्याला माहित होत.

रात्रीचे १२ वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं " पहिली भेट पावसात झाली होती, मैत्री पावसात झाली होती , प्रेम कळल तेव्हाही पाऊस होता आणि........ आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता . Indirectly , आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी . तरीही पाऊसच का आवडतो मला ? " या गोष्टी वर त्याला हसायला आल. तो तसाच उभा होता पावसाला बघत, इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता , पुण्यावरून. तो पुण्याला JOB ला होता. " एवढया रात्री काय काम असेल याच ? " , " Hello…. Hello…विनू .... अरे विन्या जागा आहेस का ? " , " हो ..... रे ... काय झालं ? " , " अरे ,, एक गोष्ट सांगायची आहे .", " सांग ना.... तुझा आवाज बरोबर नाही येत आहे.…… ", " ऎक जरा…... नाहीतर फोन बंद होईल…" , " हा .... सांग ","मला पुण्यात आपली " सुची " भेटली होती रे ." , " काय ......... ? " आणि फोन कट झाला…

" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . ,

" बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला .

" आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला.

थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो ..... हो … आहे , बोल बोल , मला वाटलं भास झाला मला .",

"अरे माझ्या फोन चा problem आहे रे म्हणून कट् झाला." ,

" अरे तू काही तरी सांगत होतास ना.. ",

"अरे ...... आपली सुची भेटली होती पुण्याला... ",

"कोण ? " ,

" अरे ' सुची ' .... आपली .... तुझी ' सुची '. " पुन्हा एकदा वीज कडाडली ..... आणि शांतात ... सगळं शांत झालेलं ,..... " Hello ..... Hello ..... ." विनू फोन पकडून तसाच उभा होता . कूठेतरी हरवून गेलेला ,

" Hello ..... Hello ..... .विनू ... विन्या " ,

" खरंच भेटली होती का रे ती ?" विनू पुन्हा भानावर आला .

" कशी आहे रे ती ? ",

" छान आहे पहिल्यासारखीच , विचारात होती सगळ्यांना .... आणि तूलाही विचारला तिने , विनू कसा आहे म्हणून ." टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात," अजूनही लक्षात आहे मी तिच्या ." विनू मनातल्या मनात बोलला.

" जास्त काही बोलली नाही , घाईत होती , मी तूझा फोन नंबर दिला आहे , करेल बोलली फोन तुला . " आणि फोन पुन्हा कट्ट झाला. " सुची भेटली होती ,माझी सुची " विनूला विश्वासच बसत नव्हता, पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही . मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता , खूप वेळा "try " केला पण व्यर्थ. थोडयावेळाने विनू शांत बसला, रात्री चे १२. ३० वाजले होते. इतक्यात फोन वाजला " बर झाले , याने call केला परत." पण अनोळखी नंबर होता .

" Hello .... Hello .... अरे बोल ना .... " पलिकडून काही आवाज आला नाही . फोन तर चालू होता .

" Hello .... विनू " हळूच आवाज आला फोन मधून , तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला . सहा वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता.

"Hello .... विनू ... आहेस ना रे ... ओळखलंस का मला ?",

" तूला कसं विसरणार " ,

" कसा आहेस ? ",

" ठीक आहे , तू कशी आहेस ?" ,

" बरी आहे . " आणि दोघेही गप्प . खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत .

एकदम विनू बोलला ," मला तुला भेटायचं आहे , कधी भेटशील ?" ,

" मलाही भेटायचं आहे तुला, मी सध्या पुण्यात आहे , येशील का पुण्याला ?",

" येईन ना , कधी आणि कुठे ते सांग ?",

" पुणे स्टेशनलाच भेटूया . उदया येशील स्टेशनला , सकाळी ११ वाजता .",

" आणि १ नंबर platform च्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया " असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुची बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हता. तेवढयात त्याला आठवलं उदया पुण्याला जायचे आहे , गाडीची वेळ बघितली पाहिजे, Net वर त्याने वेळ बघितली .सकाळी ६ ची गाडी होती , मुंबईवरून. " बस्स , हीच गाडी पकडायची आणि सुची ला भेटायला जायचं ." खूप खुश होता तो. कूठलातरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही.

उदया सकाळी ६ वाजता जायचे होते , पण त्याला झोप येईल तर शप्पत. ' सूची' ला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी bag उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या त्यात,आठवणीच त्याच्या. college च्या वस्तू, सुचीने दिलेल्या. तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरी सुद्धा होती, त्यात तो दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो , खूप काही गोष्टी होत्या त्यात, मोगऱ्याचं एक सुकलेलं फूलही होतं त्यात. " सुचीला मोगरा खूप आवडायचा ना ..... " एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलचं नव्हता, किती मज्जा करायचो आम्ही college मध्ये , विनू रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं, किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं.

त्याचा group सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा. अगदी एक तास अगोदर,मग यांची गाणी सुरु व्हायची. Group ने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किवा ती उशिरा आली कि ते गाणं सगळा group म्हणायचे. तसं विनू आणि सुचीला सुद्धा गाणं ठरलं होतं पण ती दोघं एकमेकांसाठीच गाणी म्हणायचे," तुम आये तो आया मुझे याद , गली मे आज चांद निकाला " हे गाणं विनू म्हणायचा सुची साठी आणि " ये लडका हे दिवाना दिवाना " गाण विनू साठी निवडलं होतं सुची ने. सुचीला ते गाणं आवडायचं , त्याही पेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचे. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही ते माहित होतं , Infact , सगळ्या group ला माहित होतं. विनूला हसायला आलं, किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटच गेला तर त्याला एक फोटो सापडला , group फोटो . केवढा group होता त्यांचा ४० जणांचा, नाही ३९ जणांचा. एक जण नंतर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं, " जगदीश नाव होतं त्याचं , हो ...... आम्ही सगळे त्याला ' जग्गू ' म्हणायचो " तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो , त्याला विनूने खूप वेळा समजावलं होतं, तो काही ऐकलं नाही.

त्याने एकदा सुचीची मस्करी केली. ते काही विनूला आवडला नव्हता, परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने सुचीची मस्करी केली तेव्हा विनूला राग आला, रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला,"उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस. समजलं .... ?", " अरे, एका मुलीवरून तू मला group बाहेर काढतोस? काय मोठ्ठी शहाणी लागून गेली वाटते ती ." असं तो बोलला आणि ''खाड्....... " कसली थोबाडीत मारली विनूने त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं , एक दातही पडला. विनूचा तो पवित्र बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्यांच्या समोर कधीच आला नाही.

विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, सुचीने सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो , हे तिला कळल, पण तिला हे बरोबर नाही असं वाटलं. तिने विनूला शप्पत घेण्यास सांगितली , " आज पासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागावणार नाही,राग मनातल्या मनात ठेवीन , कोणालाही त्या बद्दल सांगणार नाही " असे मोठ्ठे वचन विनूने सुचीला दिले आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळल की सकाळचे ५ वाजले आहेत,झोपालाच नाही तो . गेली ६ वर्ष विनू 'शांत ' असा कधी झोपलाच नव्हता, रात्री अधून मधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि ६ ची गाडी पकडली. गाडी सुद्धा वेळेवर निघाली,त्यात त्याला आठवलं, आपण काही " Gift " नाही घेतलं सुची साठी. तरीही तिला कूठे " Gift " आवडायची .

मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते, जेव्हा गाडी पुण्याला पोहचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा कांडवळलेला होतं, विनूला जरा भीतीच वाटली ," पुन्हा पाऊस . आज तरी नको यायला हवं तू ? " . विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. " अरे आपण तिचा mobile no घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता आता ? " १० . ३० वाजत होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशन वर सुद्धा गर्दी नव्हती, मग विनू आजुबाजूच न्याहाळत बसला. अगदी platform संपतो तिकडचा बाक,तिथे फारसं कोणी नसायचं तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरु झालेलाच होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं ..... नावं नव्हतं त्यांना ,निव्वळ रानटी फुलं . वाऱ्याने डोलत होती , वर आभाळ कांडवळलेला सकाळपासून . थंड बोचरा वारा . आसपास कोणीच नाही . मन अस्वस्थ करणार वातावरण अगदी.

११ वाजत आले होते. सुची कधीही येईल आता. भयाण शांतता पसरली होती सगळीकडे. त्यातच विनूच्या कानावर एक गाणं आलं , " कूठेतरी एका चहाच्या टपरीच्या radio वर गाणं लागलं असावं बहूतेक , " Jab We Met " सिनेमातलं , " आओगे जब तुम ओ सजना अंगना फूल खिलेंगे , बरसेगा सावन.... बरसेगा सावन झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे " किती छान गाणं होतं ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं ," सुची ...... ?" सुचीच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणे होते सगळं तिथे. ती आली तेव्हा फुलं उमलली होती, पाऊस पडत होता आणि विनूच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ६ वर्ष..... ६ वर्ष त्याने वाट पाहिली होती तिची. कसा जगला होता तो त्या काळात हे कोणालाच समजणार नव्हतं.

सुची आली त्याच्या समोर, काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. अगदी तसीच होती ती अजून, जशी college मध्ये असायची. पण चेहऱ्यावरचं तेज कूठेतरी हरवलं होतं तिच्या. तिनेच विनूला " बस्स " असं सांगितला, तसे दोघेही बसले. पुन्हा शांतता, विनू तिच्याकडे कधीचा बघत बसला होता,सुची मात्र पावसाकडे बघत होती . खूप आवडायचा तिला पाऊस .

" अजूनही भिजतोस का रे पावसात ? " सुचीचा पहिला प्रश्न विनूसाठी . तसा विनू जागा झाला. त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं,पण त्याने ते दाखवलं नाही , " हो कधी कधीच.... कामातून वेळ मिळत नाही आता." खोटंच बोलला तो, नेहमी पावसात भिजायचा तो , तिच्यासाठी. " कविता , " Love story " लिहितोस का अजून ?", " नाही ग , वेळच नसतो हल्ली, कधीच सोडून दिलं लेखन ". पुन्हा शांतता. आता दोघेही पावसाला पाहत बसले होते. " तुला एक विचारू का ?" ,विनूने प्रश्न केला. तिने मानेनेच नकार दिला. " मला माहित आहे तू काय विचारणार आहेस ते ?", " मग सांग मला , का सोडून गेलीस मला , एकट्याला टाकून .?" ती काहीच बोलली नाही . " तुला माझी शप्पत आहे, सांग मला, का सोडून गेलीस ?", " नाही सांगू शकत .", " मला कळलं आता,तेव्हाही मी तुझा कोणी नव्हतो आणि आजही नाही आहे "असं म्हणून तो निघून जाऊ लागला, तसं सूचीने हात पकडून त्याला थांबवलं , " बस्स , सांगते.", " मला तुला ते सांगायचे नव्हते .", " तरीही सांग मला, काय झालं ते .", " बर ऎक......... ७ जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते , नेहमीचा रस्ता असल्याने एकटीच होते मी , अचानक ३-४ जणांचा घोळका माझा समोर आला,दारूच्या नशेत होते सगळे . मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला जाऊ दिले नाही. एकटीच होते ना तिथे . त्यांचा प्रतिकार केला मी , काहीही फायदा झाला नाही. खूप ओरडले, त्यांना मारलं मी, काहीच जमलं नाही मला. त्यांची विनवणी केली मी , नाही ऎकले माझं त्यांनी, काहीच नाही राहिलं माझ्याकडे रे.सगळं लुटून नेलं त्यांनी माझं....... ,दागिने, पैसे आणि ..... माझी अब्रू " विनू स्तब्ध होऊन ऎकत होता. त्याचं मन भरून आलं होत , सुची मात्र निर्विकार पणे सांगत होती.

" तशीच मी घरी आले,धडपडत ,जखमी. घरी आई - वडील चिंतेत. त्यांनाही कळली माझी अवस्था,तसंच मला हॉस्पिटल मध्ये admit केलं. पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागितला, काय करणार होते मी. लाज वाटत होती मला सगळ्यांसमोर यायची,लाज वाटत होती घराबाहेर यायची, माझ्या आई-वडिलांना सुद्धा. " ,

"त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा. रात्रीच्या रात्री सगळे गेलो , साताऱ्याला. १० जूनच्या रात्री. " , " एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावसं वाटलं नाही.", " तुझ्या समोर यायची हिंमत झाली नाही माझी ", " एवढाही विश्वास नव्हता माझ्या वर, हेच ओळखलंस का मला ." पुन्हा एकदा शांतता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. सुची तशीच पावसाकडे पाहत बसली होती, कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. नेहमी हसत असणारी आज कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती.

" लग्न करशील माझ्याशी ? " विनूने सुचीला विचारलं तेव्हाही सुचीने मानेनेच " नाही" म्हटलं . " माझं लग्न ठरलं आहे, लग्नासाठीच मी पुण्याला आली आहे." आणि एकदम वीज चमकून गेली. विनूला काय बोलावं तेच कळत नव्हतं. " साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्याने सुरु करावं लागलं. त्यातच बाबांना 'paralysis' चा झटका आला, अर्ध शरीर लूळ पडलं. मग माझ्याकडे job करण्यावाचून पर्याय नव्हता. तिकडे एका call center मध्ये job ला लागली. त्या पगारात बाबांची औषधं,घरचा खर्च कसाबसा भागायचा. माझी परिस्थिती माझ्या Boss ला कळली, त्याला माझी दया आली. त्याने मला खूप मदत केली. बाबांची औषधं, त्यांचे operation, सगळं त्याच्यामूळे शक्य झालं. घरची परिस्थिती सुद्धा सुधारली. आणि ३ महिन्यापूर्वी त्याने मला लग्नासाठी विचारलं, तुझ्या एवढाच आहे तो,जवळपास तुझ्यासारखाच. एवढे माझ्यावर उपकार केले त्याने . मी त्याला " नकार " देऊ शकले नाही. माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहित असूनसुद्धा त्याने मला स्वीकारलं, त्याच्या कुटुंबाने स्वीकारलं. अजून काय पाहिजे होतं मला ?", " तू खुश आहेस ना ? .", " आहे ना. माझ्या कडे बघून तुला वाटत नाही.", " नाही." विनू बोलला, तशी सुची शांत झाली. " लग्नाला येशील माझ्या, माझ्या कुटुंबाकडून " विनूने मानेनेच " हो " म्हटलं." नावं काय आहे त्याचं ?", " यशराज", " ok, चल मी निघतो आता " असं म्हणून विनू निघू लागला. थोडा पुढे गेल्यावर सुचीने विनूला हाक मारली,तसा विनू थांबला. " घरी येतोस,आई-बाबांना बरं वाटेल." विनू तयार झाला. पाऊस तसाच कोसळत होता,विनू सुचीच्या घरी आला. बाबांना बघून त्याला वाईट वाटले,झोपले होते ते तेव्हा. सुचीच्या आईने विनूला ओळखलं ,किती आनंद झाला तिला. पण विनूला जास्त वेळ तिथे थांबवलं नाही. निघताना त्याने सुचीच्या आईला mobile no देऊन ठेवला," काहीही गरज वाटली तर मला फोन करा." असं सांगितलं त्याने. तो निघाला , तीही त्याच्या मागून आली. " तू जा आता. निघतो मी. येईन तुझ्या लग्नाला मी, पत्रिका घेतली आहे. जा तू." सुचीने पुन्हा त्याला अडवलं ," एक शेवटचा प्रश्न विचारू ?"," विचार ." ,"तू पुन्हा कोणावर प्रेम करू शकशील का ?". त्यावर विनूकडे काहीच उत्तर नव्हते. उत्तर न देता तो तसाच निघाला भर पावसात. college मध्ये एक वाक्य famous होतं ," विनू कभी हारता नाही ". तसाच होता तो,तो कूठल्याच गोष्टीत हार मानायचा नाही. जे काम हातात घेईल ते पूर्णच करायचा. त्याला हार कधी माहीतच नव्हती. पण आज तो हरला होता, नशिबाने त्याला हरवले होते. आज तो " Looser" ठरला होता.

विनूने लागलीच मुंबईला येणारी गाडी पकडली आणि तो मुंबईला आला. काहीच हाती नाही लागलं त्याच्या. घरी येऊन बसला. काहीच झालं नाही जणूकाही. दोन दिवस असेच गेले. विनू दोन्ही दिवशी कामाला गेला. नेहमीची कामं केली. नेहमीचं रुटीन सुरु झालं. " सुचीच्या लग्नाला अजून आठवडा बाकी आहे. काहीतरी घेऊया तिच्यासाठी." म्हणून तो बाहेर निघत होता. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली , तसा तो थांबला. संध्याकाळचे ४. ३० वाजले होते तरीही पावसामुळे रात्रीसारखं वाटत होतं. तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला, अनोळखी नंबर होता,

" Hello........Hello.....विनू ...... विनूच आहे ना फोन वर.. " , " हो.. विनूच आहे,आपण कोण ?", "मी सुचीची आई बोलतेय रे ", " हा बोला आई, पण तुमचा आवाज असा का येतोय ? काय झालं ", " अरे ..... सुचीचा accident झालाय. लवकर ये..... " हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीसुद्धा सावरून तो बोलला ," कूठे आहे आता ती ... मला सांगा मी येतो ."," अरे मुंबईलाच आहे, टाटा हॉस्पिटल मध्ये, तू लवकर ये . मला खूप भीती वाटते आहे ." तसा विनू धावतच निघाला, धावता धावता अडखळून पडला, डोक्याला लागलं,पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो पोहोचला हॉस्पिटल मध्ये, सुचीची आई रडत होती. विनूला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आली. विनूने त्यांना शांत केलं. सुची कूठे आहे ते विचारलं . तिला I.C.U. मध्ये ठेवलं होतं. तो तिला बघत होता काचेच्या दरवाजातून.

" कसं झालं असं ?" विनू ने तिच्या आईला विचारलं. यशराज ने ठरवलं कि कुटुंबासोबत मुंबई फिरायला जायचं, तशी त्याने गाडी बाहेर काढली. सुची नको म्हणत असताना सुद्धा ते भर पावसात निघाले. गाडीत यश , सुची आणि यशचे आई-वडील होते. मुंबई-पुणे महामार्ग तसा चांगला पण पावसामुळे निसरडा झालेला. तरी यशराज गाडी हळू चालवत होता. मागून येणाऱ्या ट्रकने overtake करण्याच्या नादात यशच्या गाडीला धडक दिली. धडक हळू असली तरीही निसरड्या रस्त्यामुळे गाडी out of control झाली आणि मोठ्ठा अपघात झाला. त्या अपघातात यश आणि त्याचे आई-वडील जागीच गतप्राण झाले. एकटी सुची तेवढी वाचली. मुंबई जवळ असल्याने पोलिसांनी तिला मुंबई मध्ये admit केला व सुचीच्या आईला कळवलं. सुची वाचली होती पण प्रचंड जखमी झाली होती. " पुढचे २४ तास खूप महत्त्वाचे आहेत " असे डॉक्टर विनूला बोलले. विनू सुचीच्या बाजूला जाऊन बसला, ती शुद्धीत नव्हती. खूप critical होती ती. डॉक्टर काही सांगतील ते विनू लगेच घेऊन यायचा, नुसता धावतच होता तो. तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता. एक दिवस असाच गेला, विनूने काहीही खाल्लेलं नव्हता की त्याने आराम केला होता. तिची तब्येत तशीच होती. दोन दिवस झाले, तसंच सगळं, विनूची झोप कूठल्याकूठे पळाली होती. पोटात काही नाही. सुचीच्या आईला ते कसस वाटत होतं. शेवटी विनूला " सुची " ची शप्पत घातली तेव्हा त्याने कूठे थोडीशी पोळी-भाजी खाल्ली. " जा. थोडावेळ पड जरासा. " आईने त्याला सांगितलं. गेले ४८ तास तो झोपलाच नव्हता.

बाजूलाच एका बेंच वर झोपणार, इतक्यात डॉक्टरने त्याला बोलावून घेतले. " तुझं नावं घेते आहे ती. जा तिच्याजवळ. " विनूला जणू काही कळून चुकलं. तो त्यावेळेला एका खिडकी समोर उभा होता. बाहेर पाहिलं त्याने. पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केलेली." यावेळी तरी माझ्यापासून दूर नको नेऊस तिला " विनूने पावसाला सांगितले. तिकडे सुचीची आई रडत होती. डॉक्टरने नातेवाईकांना बोलावयास सांगितले. विनू तिच्या जवळ जाऊन बसला. सुचीने त्याला ओळखलं होतं, किती छान हसली ती आज,अगदी मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे. विनूने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं. सुचीलाही ते बरं वाटलं. तिला काहीतरी बोलायचे होते,तसा विनूने कान जवळ केला. " पुढच्या वेळी नक्की भेटू " असे ती बोलली. विनूनेही " नक्की " म्हटलं. अलगद तिने डोळे मिटले, कायमचे. पाऊसही थांबला होता. यावेळीही त्याने डाव साधला होता, यावेळीही सुचीला तो बरोबर घेऊन गेला होता, पण यावेळी कायमचाच. विनू बाहेर आला, डॉक्टरने तिला check केला, ती केव्हाच सोडून गेलेली. तिचे नातेवाईक येणार होते. विनूने तिच्या आईला " निघतो मी " असं सांगितल आणि तो निघून आला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता.

विनू घरी आला. ४८ तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता, विनू झोपला नव्हता. तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते, तसाच तो बेड वर जाऊन पडला. पडल्या पडल्या झोप लागली त्याला. शांत झोप. ६ वर्षांनी तो आज शांत झोपलेला. शांत ...... अगदी शांत.

………………………… कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. अगदी शांत वाटत होतं त्याला. नुकताच पाऊस पडून गेलेला, छान थंडावा आला होता बाहेर. विनूचे मनही शांत झालं होतं अगदी , गेली ६ वर्ष एक वादळ त्याच्या मनात घोंघावत होतं, ते आज शांत झालं होतं, शमलं होतं. आज एकदम fresh वाटतं होतं त्याला. एक कप चहा घ्यावासा वाटला त्याला. तसा gas वर त्याने चहा करत ठेवला. अचानक त्याला काही लिहावसं वाटलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा. विनूने त्याची जुनी वही काढली. त्यात तो त्याच्या कविता , " Love story " लिहायचा. टेबलावर बसला लिहायला. त्याला एक नवीन स्टोरी मिळाली होती , त्याची Love story . त्याने लिहिलेल्या प्रत्येक Love story , शेवटी पूर्ण व्हायच्या, एक त्याचीच Love story अर्धवट राहिली होती. त्याने शिर्षक लिहिलं ," The Original Love story " . पुढे काही लिहिणार, इतक्यात जोरदार विजेचा आवाज झाला आणि पावसाला सुरुवात झाली. सवयीप्रमाणे विनुचे मन त्याला पुन्हा पावसात घेऊन गेलं. इतक्या वर्षांची सवय थोडीच जाणार होती . तसाच तो उठून बाहेर आला पावसात.

Gas वरचा चहा निवांतपणे उकळत होता, त्याची Love Story त्या नावावरच लिहायची थांबली होती , पंखा उगाचच गरगर फिरत होता. आणि विनू कूठे होता,......... तो तर कधीच बाहेर पडला होता पावसात भिजायला. पुन्हा एकदा " सुची " ला शोधायला. ती तर केव्हाच निघून गेलेली, पण त्याचं मन मात्र तयार होतं नव्हतं. म्हणून तो पावसात भिजत होता. कोणाचीतरी वाट बघत. ........ कदाचित , यंदाच्या पावसाळ्यात तरी... कधीतरी …… भेटेल ती मला.................... कदाचित


Rate this content
Log in

More marathi story from vinit Dhanawade

Similar marathi story from Romance