Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Sayali Diwakar

Inspirational


2.5  

Sayali Diwakar

Inspirational


तगमग

तगमग

3 mins 16.6K 3 mins 16.6K

आज अगदी अस्वस्थ वाटत होत. तना-मनाची चांगलीच तगमग वाढली होती. बाहेर देखिल सूर्य काही कमी आग ओकत नव्हता. त्याच्या तेजाने धरणीला पण तो दिपुन टाकत होता.धरणीलाही सार असह्य झाल होत. ऊनाची तगमग आणि मनाची तगमग आज काही सोसवत नव्हती.

खर तर त्याची वाट पाहुन पाहुन जीव अगदी थकुन गेला होता.त्याची म्हणजेच त्याच्या फोनची. त्याच्या फोनकडे सारे लक्ष लागले होते.बरेच तास त्याचा फोन न आल्याने केविलवाणी अवस्था झाली होती.मला चांगलच माहीत आहे की तो किती अवखळ आहे.खर तर असा कितीसा वेळ आपण त्याच्याशी बोलतो व कितीसा वेळ तो आपल्याला देतो. खुपच कमी वेळ मिळत होता आपल्याला बोलायला.पण जो काही वेळ मिळत होता तो आपल्या दोघांसाठी सोने पे सुहागा होता. पण त्याचा फोन नाही आला तर त्याच्या आठवणीत फक्त झुरायच.हल्लीतर तो खुपच लहरी झाला होता.तसा त्याच्या कामाचा व्यापही खुप वाढला होता म्हणा. इतक्या मोठ्या व्यापातुन कसा बसा माझ्यासाठी बोलायला वेळ काढत होता.

कधी कधी अस्सा राग येतो ना त्याचा अस वाटत आपल्या रुसव्या फुगव्यांचे ह्याला काहीच कसे वाटत नाही.अस वाटत की आपल प्रेम एकतर्फी तर नाही ना? पण ते कस शक्य आहे. असे असते तर इतक्या अधीर पणे तो आपल्याला भेटायला आला असता का? सर्व व्याप, काम सोडुन आपल्यासाठी वेळ काढला असता का?

पण खुप वेळ त्याचा फोन नाही आला तर अवस्था खुप वाईट होते आपली. त्याचा फोन नाही आला तर सारखा फोन चेक करायचा,फोन ठिक तर आहे ना? सायलेंटवर तर नाही ना? आँफलाईन नाही ना? मेसेज आला तर नाही ना? इतकेच चाळे चालतात आपले. पण शी ..गेले कित्तेक तास न त्याचा मेसज न फोन,ना ही फेस बुकवर कोणती पोस्ट. सगळ शांत शांत. जसा कित्तेक तास जिवात जीव नसल्या सारख, मेल्याहून मेल्या सारख. कारण यार त्याच्या साध्या गुड माँर्निगच्या मेसेजने ही मोहरुन जाणारी मी. त्याच्या बरोबर तासन तास चँटिंग मधे कधी जातात समजतच नाही. चँटिंगला तर किती विषय. कधी भांडण

कधी रुसण

कधी हसण.

आणि चँट करताना तो कधी रोमँन्टीक मूड मध्ये असेल तर मग विचारुच नका

. सगळच हव हवस. फोनवरच्या गप्पा संपता संपत नाहीत. शंभर वेळा बाय म्हणुन ही बाय कधीच होत नाही

बायच्या ऐवजी थांब करतोच पाच मिनटात फोन.मग माझही सार लक्ष घड्याळ्यातिल पाच मिंनटांवर .पाचाचे दहा झाले की त्याची काही खैर नाही

मग रुसण, फुगण,भांडण संपतच नाही. सारच हव हवस.दर तासाला फोन लावला तरी प्रत्येक वेळी त्याचा आवाज ऐकायला मन कासाविस झालेल असत. फेसबुकवरच्या त्याच्या पोस्ट पाहायला तर मन अधीर झालेल असत.त्याची पोस्ट असेल तरच वाचायची.सारच कस मोहरुन टाकणार , रोमांचित करणार, हवहवस वाटणार.

त्याच भेटायला येण तर 🤦‍♀ कधी हळूवार तर कधी अधीर. पण त्याच सारच आवडुन जात. त्याच्या येणार या नुसत्या कल्पणेन मोहरुन जाणा-या आपण ,त्याच्या भेटीने स्वर्गिय आनंदाने जणू बेहोश होवून जातो. कारण तो आहेच तसा जगावेगळा ,ह्दयाचा गाभा-यात सुरेख तरंग उठवणारा, काळजामधे आनंदघन होऊन बरसणारा. त्याच्याशी बोलण म्हणजे आयुष्याची सोनेरी पहाट, कोकीळेची मधुर ताण. तो माझ्यासाठी अक्षय आनंदाचा ठेवा बनुन आलाय.त्याच्या आवाजाने आठवणींचे पक्षी उडत उडत मनाच्या फांदीवर डोलतात, उसळत्या पावसात फेर धरुन नाचतात आणि आठवणीतून तो जणू प्रत्यक्ष समोर येतो व मनाला भुरळ घालतो.

अग बाई ... वाजली वाटत मेसेजची रिंग.' Hii ' आत्ता जिवात जीव आला माझ्या .त्याचा Hii हा मेसेज म्हणजेच आपण ही जिवंत आहोत आणि त्याच ही सार कुशल मंगल आहे

हे विश्वास देणार. बघा ना त्याच्या नुसत्या फोनच्या रिंगने ,मेसेजने ,फेसबुक पोस्टने मनातली सारी मरगळ निघुन जाते.धो-धो पावसात धुतल्या सारखी. त्याच्या एका मेसेजने आयुष्याला पुन्हा एकदा तजेला येतो.

आता पडतिल भसाभस पोस्टस् , य़ेतिल फोनवर फोन आणि आपली ही धांदल उडेल आणि आपण ही उत्साहाने म्हणू ,अरे ....थांबणारे जरा किती अधीर होतोस, करतेच पाच मिनटात फोन आणि मी ही अधीर होते हातातिल काम उरकुन त्याच्याशी बोलण्यासाठी....


Rate this content
Log in

More marathi story from Sayali Diwakar

Similar marathi story from Inspirational