Sayali Diwakar

Others

4  

Sayali Diwakar

Others

निवांतपणा.

निवांतपणा.

2 mins
16.6K


आज खुप दिवसांनी निवांतपणा मिळाला, सक्तिचा निवांतपणा...हो सक्तिचा. सोसायटीत आलेल्या भाजीवाल्याची हाक ऐकू येताच नेहमिप्रमाणे घाई घाईत पिशवी ,पर्स व किल्ली घेऊन बाहेर पडले. तिच तिच भाजी पाहुन खरतर मन कडवट झाले , तरीही त्यातुन सगळ्यांना आवडेल अशी भाजी घेण्याचे कौशल्य पार पाडले व स्व:ताशीच खुश झाले.किती ! उरका आहे आपल्याला..किती काम पारपाडतो आपण पटपट, अशी स्व:ताची फुशारकी करुन .. स्व:तालाच खुश करुन घेतले.

कारण मनात पुढच्या कामाची भलीमोठी लिस्ट घोळतच होती. अग बाई! आज हे करायचय , काल आपण ते केलच नाही . अशी सतत स्व:ताला दुषण देतच असतो कीआपण.. आणि तेही सतत काम करुन ही. सतत काम काम काम ,नाही तर कामाचे विचार, अस वाटतय काय हे ,आपण काय काम करण्यासाठीच जन्माला आलोय का? कधी मनाला निवांतपणा नाही की शांती नाही, पळापळ व धावाधाव.

आज खुप दिवसांनी सोसायटीच्या बाकावर शांतपणे बसलिय ,म्हणजे बसाव लागलय. कारण मी प्रत्येक काम कौशल्याने करणारी लँचच दार घाईत लाऊन आले . आणि आता दारच उघडत नाही. खुप प्रयत्न केले पण लँच लॉक काही उघडेना. झाल का? आत्ताच तर आपण आपल्या कामाच्या कौशल्यावर खुश होता ? कुठ गेल कौशल्य ? बसा आता वाट पहात, कुणी तरी येई पर्यन्त.पण करायच काय तो पर्यन्त? आणि घरातल्या कामाचा किती खोळंबा होईल ? बाईन बिना कामाच बसायच?? बाप रे ! शांत बसल्यावर छान वाटल , पण क्षण भरच. अस वाटल काय करायच आपण? विचार केला तर मनाने कल्पनेच्या उंच उंच भरा-या घेतल्या..अस वाटल जाऊ दे चावी -बिवी मस्त भटकायला जाऊ, मग वाटल मस्त कॉफी पित बसू एकटच किंवा मैत्रिनीकडे चक्कर मारु . पण शेवटी सगळ्या कल्पनांना कलटी देत पाय आपोआप किल्लीवाल्याला शोधायला बाहेर पडले, तर काय नेहमिच्या पाहण्यातला किल्लीवाला आज नेमका उशिरा येणार असल्याच समजल. झाल ...जणू त्याला कळालेच की सायलीबाईंना निवांतपणा हवाय...

परत बाकड्यावर बसले काय करावे हा विचार करावा लागलाच नाही कारण फोन हातात होता. प्रथम विचार केला बर झाल फोन बरोबर ठेवला आता खुप दिवसांनी वेळ मिळालाय तर सगळ्यांना फोन करावा...पण छान पावसाळी हवेतिल कुंद वातावरण , सकाळची निरव शांतता, हलक्या पावसाच्या सरी..मन एकदम भरुन आल..हा सगळा आसमंद मनात साठवुन ठेवावासा वाटला..कुठले मनात विचार नकोत, कुणाची आठवण नको, कामाची लिस्ट नको. अगदी मनाला मोकळ ठेवाव, मोकळ्या अभाळागत....आणि वाटतय असच शांत बसाव...मनभरे पर्यन्त....पण कसच काय इतक छान मन दाटुन येई पर्यन्त ह्यांची स्वारी आली व क्षणार्धात दार उघडल कारण प्रत्येक काम कौशल्याने करणारी मी चुकीची किल्ली घेऊन बाहेर पडले होते.. खुप कामाचा उरका पाडणारी मी स्मार्टलेडी होते ना...


Rate this content
Log in