STORYMIRROR

Asmita Rajesh Meshram

Inspirational

3  

Asmita Rajesh Meshram

Inspirational

स्वयंभू ती ..

स्वयंभू ती ..

10 mins
367

अनू आज जरा लवकरच उठली.. लवकर म्हणणे बहुतेक चुकीच ठरेल कारण संपुर्ण रात्र तिने तळमळतच काढली होती. आता तर पहाट झाली होती.. तिच्या मनांत आले, इतक्या सकाळी तर बाबा उठतात आणि फिरायला जातात.. गावी गेली ती नेहमी ठरवते की यावेळेस लवकर उठून बाबां सोबत रोज फिरायला जाऊत..पण ते कधीच झाले नाही .. उठून तिने चेहऱ्यावर गार पानी मारले अनं तिची आवडती फिल्टर कॉफी बनवून बाल्कनीत आली.. 

ऐन डिसेंबर ची सुरवात असल्यामुळे हवेत गारवा होता.. बाहेर येऊन बसल्यावर तिला जरा मोकळे वाटले.. रात्रभर झोप न झाल्यामुळे अंगातला शीण थोडा कमी वाटत होता.. पहाटेचा हा शांतपणा आणि गारवा तिला खूपच बार वाटत होता.. आकाशात अजूनही चांदण्या ओझरत्या लुकलुकत होत्या अनं समोर आकाशात तांबडी किनार दिसायला लागली होती .. वातावरण तर अगदी सुखद होतं पण तिच्या चेहऱ्यावर उदास छाया होती .. मनात विचारांची घालमेल सुरू होती. लहानपणापासूनच ती एक अत्यंत निग्रही वृत्तीचा, खंबीर वृत्तीची मुलगी होती.. तिच्यात निर्णय क्षमता हा गुण जन्मजात होता.. पण यावेळेस तिचा मन आणि हृदय याची गुंतागुंत झाली होती. 


ती एक उच्च शिक्षित आर्किटेक्ट होती , एक नामांकित कंपनी मध्ये चांगल्या पदावर होती. आयुष्यात तिने आता पर्यंत सगळेच निर्णय तिने फार विचारपूर्वक घेतले होते आणि त्याचा तिला अभिमान होता. ज्या वयात मुला मुलीना कॉलेज मध्ये कोणता विषय निवडावा या मध्ये गोंधलेले असतात त्यावेळेस तिला माहिती होता तिला कशा मध्ये करियर करायचे आहे.. आई-बाबाना एकुलती एक मुलगी पण व्यवहारद्यानच बाळकडू लहानपणातच पाजलेल होत.. तिच्या आई बाबाची मान अभिमानाने ताठ होती कारण तिने आपला आयुष्यं असाच घडवला होतं. मग आज ती इतकी का दुबळी का पडली होती.. “त्याच्या विषयी मी इतकी आंधळी बनून का राहिले .. मला कधी दुसरी बाजू जाणून घ्यायची का गरज वाटली नाही.. मी इतकी का प्रेमात आंधळी झाले .. “ 


“तो” – एक तरणा बांड , उंच , सुधरूड गोरापान हुशार तरुण .. भव्य कपाळ अँड भेदक डोळे .. या पेक्षाही अनूला त्याची मुलीना आदराने आणि बरोबरीच्या वृत्तीने वागवण्याची वृत्ती खूप आवडली होती .. तिच्याच ऑफिस मध्ये वरच्या पदावर.. बरेच प्रोजेक्ट सोबत केले होते .. सोबतीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले होते.. जेव्हा त्याने ही सांगितले की त्याचे लग्न झालेले आहे तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता पण त्याने त्याची बाजू सक्षमपणे मांडली होती. शिक्षण झाल्या झाल्या त्याच्या बाबानी त्याचा लग्न त्याच्या मनाविरुद्ध ठरवल. त्याच्या वडिलांचा शब्द हा शेवटचा असतो तरीही विरोध करूनही काही उपयोग झाला नाही. तही त्याने परिस्थिशी जुळवून घेण्याचा त्याच्यापरीने प्रयत्न केला, पण त्याची बायको त्याच्याशी जुळवून घेत नव्हती कारण तिचंही मनाविरुद्ध लग्न होत. नेहमी भांडण , राग , त्रागा असा सारखा सुरू होत. ती त्याच्या सोबत इथे राहायला तयार नसे. मागे एकदा गेली तर परत आलीच नाही. फार मानसिक त्रासातून गेला होता तो . या सर्व गोष्टीमुळे त्याचे त्याच्या आई बाबांसोबत चे संबंध पण खराब झाले.पण आता तो तिच्या पासून कायद्याने वेगळा होण्याचे प्रयत्न करत होता. ही सांगताना त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिला फार वाईट वाटले होते. स्वतःहून सांगितले होते त्यामुळे तिने डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला होता.. कारण तिच्यासाठी अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नव्हता.. पण जो पर्यंत तो तिच्या पासून कायदेशीररित्या वेगळा होत नाही तोपर्यंत अनू आपल्या आई बाबांना त्याच्याबद्दल सांगणार नव्हती. 

त्याच्या खरे बोलण्याच्या प्रवृत्तीने ती त्याच्यावर अधिकच प्रेम करायला लागली होती.. 


पण.. काल जे घडलं त्यानंतर परिस्थिति बदलली होती.. काल ती त्याला आश्चर्यचकित कराव म्हणून सकाळी ऑफिस ला जायच्या वेळेत त्याच्या घरी गेली.. कारणही तसंच होता.. लायब्ररी ची पुस्तक तिला परत करायचं होता जी त्याच्या घरच्या वाटेवर होता.. पुस्तक परत करून त्याच्या घरी जावं आणि मग तिथून सोबत ऑफिस जाऊत म्हणून ती त्याच्या घरी पोहचली होती .. दार उघडताच तिला पाहून त्याचा चेहऱ्याचा रंग उडाला होता.. 

आत आल्यावर तिला एक स्त्री दिसली .. तिच्याच वयाची होती किवा लहान असेल.. त्याने लगेच तिला आत जाण्यास सांगितले.. 

“कोण रे ही?” तिने प्रश्न केला. 

थोडस थांबून अडखळत “माझी नवी मोलकरीण..” 

“बरं “ 

“तू चहा घेशील की आपण निघायचं.. माझी तशीही महेश सोबत महत्वाची मीटिंग आहे.. आज एक प्रेझेंटेशन द्याचा आहे आणि अजून ते तयार नाही आहे” 

“चहा असू दे.. चल निघूयात हवतर” 

“बरं “ म्हणून तो आत गेला. 

अनूला पुसटस कानावर आला की तो त्या स्त्री वर हळू आवाजात रागावत होता .. “उद्या च्या गाडी ने निघ” असं काहीतरी.. 

बाहेर आला तेव्हा चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता .. अनूला फार विचित्र वाटले.. बाहेर निघताना तिची त्या स्त्रीशी नजरा नजर झाली तेव्हा तिचे डोळे पाणवलेले होते आणि सुजलेले देखील जणू ती रात्रभर रडली होती.. 

गाडीत तो तिच्याशी फारसा काही बोलला नाही .. गप्प-गप्पच होता.. 

“काय झालं तुला आज .. मला पाहून तुला आनंद नाही झालं दिसतय नेहमी सारख.. दोन दिवसापासून ऑफिसला आला नाहीस तर मी विचार केला तुला सर्प्राइज द्यावा” 

“अगं तसं नाही .. तब्येत थोडी बरी नाही आणि आज ते प्रेझेंटेशन आहे न त्याचा पण टेंशन आहे जरा.. “

अनू काहीच बोलली नाही .. पण तिच्यामनात काहीतरी वेगळेच विचार येत होते.. 


ऑफिसला पोहचल्यावर तिच्या मनात काय आले कुणास ठाऊक.. ती ठळक बाहेर आली , कार बूक करून त्याच्या घरी पोहचली . तो प्रेझेंटेशन मध्ये दोन तास तरी बिझी राहणार होता त्यामुळे तिच्या कडे वेळ होता. 

त्याच स्त्रीने दार उघडले.. 

“तुम्ही ?” तिने किंचित घाबरून विचारले..

“हो.. माझी पुस्तक राहिलं इथे..” ती थोडीशी घाबरली

“ तो नाही आहे सोबत तेव्हा.. काळजी करू नकोस.. ” असं म्हणून अनुने तिचा हांत धरून जवळ बसवले. 

ती अजूनच घाबरली... 

“घाबरू नकोस.. तुझं नाव काय ? तु कोण आहेस ? तुला मी इथे अगोदर कधी पहिलं नाही .. “ अनू म्हणाली.

तिच्या डोळे पाणावले आणि थोडी अस्वस्थ झाली.. 

तिच्या खांद्यावर हांत ठेवून अनू म्हणाली “घाबरू नकोस .. मी त्याला नाही सांगणार.. मला तुझी बहीण समज” 

ते शब्द ऐकून तिला एकदम भरून आले आणि घळा घळा तिच्या डोळ्यातून असावं वाहू लागली.. 


“ताई.. मी रेणुका .. त्यांची बायको.. आमच्या लग्नाला चार वर्ष झाली .. पण त्यांनी मला कधी पत्नी म्हणून वागवल नाही .. बायकोच सन्मान नाही दिला.. माझे वडील आणि त्याचे वडील जिवलग मित्र .. माझी आई मी लहान असतानाच वारली.. याच्या आई बाबानी मला नेहमी मुली सारखं वागवले..काही वर्षापूर्वी माझे वडील पण मरण पावल्यानंतर.. यांच्या बाबानी काळजीपोटी आमच दोघंच लग्न लाउन दिला. यांचा अगोदर पासूनच लग्नाला विरोध होता पण वडिलांपुढे यांच काही चाललं . हे दिसायला सुंदर मी अशी साधारण , रंगाने काळी सावळी . यांना खूप सुंदर पसंतीची मुलगी मिळाली असती पण नियतीने काही वेगळच लिहिल होत. यांनी मला कधी आपलं मानलं नाही.. बायकोच स्थान दिलं नाही.. नेहमी तुसडेपणाने वागत आले .. हेटाळणी केली.. नेहमी माझ्या रंगावरून माझा राग करत आले.. पण मी नेहमी त्यांना कशी आनंदी ठेऊ याचा विचार करत आले.. त्यांच्या मनात हृदयात स्थान मिळवण्या साठी धडपडत आले.. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करत आले.. पण यांनी मला कधी आपल्या सोबत इथे राहू दिला नाही.. नेहमी “आई बाबां जवळ रहा.. त्यांची काळजी घे .. तुझ्यावर खूप उपकार आहेत त्यांचे नाहीतर तु कुठे पडली असतीस कुणास ठाऊक “ अश्या शब्दात बोलतात.. त्यांचे शब्द खूप टोंचतात पण आई बाबामुळे मे सगळं सहन करत आले.. जस आहे तसं आयुष्यं स्वीकारल.. तीन दिवसा पूर्वी यांच्या ऑफिस मध्ये सोबत काम करणारे अजय दादा आले.. त्यांनी सांगितलं की हे कायद्याने वेगळ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.. ऑफिस मधल्याच कुणा मुली सोबत प्रेम संबंध आहेत.. “ असं बोलून ती ऑक्सिबोक्सी रडू लागली .. 


हे ऐकून अनू एकदम खजील झाली .. तिच्या डोळ्यात पण पाणी आले.. 

“ताई .. ते ऐकून आई बाबाना एकदम धक्का बसला .. त्यांना बहुतेक अंदाज होता पण खात्री नव्हती.. हे घरी जास्त फोन पण करत नाहीत.. केला तर नीट बोलत नाहीत.. आईने यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आजारपणामुळे त्यांना प्रवास जमत नाही म्हणून मला एकटीला पाठवला म्हणाले तु जा आणि आपलं संसार सांभाळ.. पण ताई जो माणूस माझा कधी नव्हता , ज्याला माझी किळस येते त्याला मी कसं आपलं करू.. आल्यापासून माझ्यावर चिडलेत .. परत जा असं म्हणाले.. 

ताई.. मला सांगा माझा काय दोष ? “ असं म्हणून ती थांबली.. 


काहीवेळ गप्प बसून म्हणाली “ताई .. मी खूप विचार केला.. खूप दुख होतंय पण आता मे निश्चय केला आहे.. जो माणूस आपलं नाही त्याच्या मागे नाही धावायच.. का त्याच्या इतक्या गयावया करायच्या.. इतक्या वर्षात मी स्वतःच अस्तित्व विसरले .. स्वतः साठी कधी विचार केला नाही.. पण आता करणार.. यांना ज्यात आनंद आहे त्यांना करू दे .. त्यांना त्यांच्या वाटेच सुख मिळू दे .. त्यांच्या आवडीची व्यक्ति सोबत आयुष्यं घालवण्याचा त्यांना पण अधिकार आहे आणि आपल्या आवडी प्रमाणे जीवन जगण्याचा मला पण अधिकार आहे.. माझ्या बाबांसारखी मला पण समज सेवेची आवड आहे..मी सोशल वर्क मध्ये ग्रॅजुएट आहे.. आता पर्यंत माझा आयुष्ययात ध्येय नव्हतं .. जणू माझ्या जगण्याला काही अर्थ नव्हतं .. पण या पुढं असं नसेन..काही दिवसा पूर्वी गावात एनजीओ चे लोक आली होती.. त्यांचा काम पाहून मला पण जाणवलं की मला पण तर माझ्या बाबां सारखी समजसेवेची आवड होती  

त्यांचे आई बाबा मला मुलीसारखा जपतात.. आता पर्यंत त्यांची मुलीसारखी काळजी घेत आले आणि पुढे ही घेणार मग मी त्यांची कायदेशीररित्या सून राहो की नको.. 


ताई.. माहिती नाही तुम्हाला एवढं सगळं कसं बोलून दाखवलं .. हे सगळं इतक्या वर्षा पासून मनात भरून राहील होतं .. बहीण नाही आई नाही मैत्रीण नाही .. आज तुम्ही बहीण म्हणालात आणि मी मनाची वाट मोकळी केली .. माफ करा .. तुम्हाला उगाचं.. “

अनूचे डोळे पाणावले होते.. तिला का कुणास ठाऊक अपराधी वाटत होत जणू तिच्या या अवस्थेला ती जवाबदार आहे.. 

“रेणुका, तु खूप धाडशी आणि खंबीर मुलगी आहेस.. फक्त एवढं लक्षात ठेव .. कोणत्याही स्त्रीला तिचं अस्तित्व जपणायसाठी, आयुष्यात स्वतःच्या हिंमतीवर उभं राहण्यासाठी कोणा पुरुषाची गरज नसते .. ती स्वयंभू असते .. “

एवढं बोलून अनू उठली आणि परत जाण्यासाठी निघाली.. जाता जाता वळून म्हणाली “रेणुका .. मीच ती त्याच्या ऑफिस मधली मुलगी .. 

मला माफ कर तुझ्या या अवस्थेला बहुतेक मी पण कुठे तरी अनायसेपणे जवाबदार आहे .. पण माझ्यावर विश्वास ठेव मला हे सगळं माहिती नव्हतं.. 

काही क्षण स्मशान शांतता पसरली..  


स्वतःला सावरून अनू म्हणाली “उद्या तुला कधीही एकटं पडल्यासारख वाटलं .. मनातल कुणा जवळ बोलावसं वाटलं तर नेहमी लक्षात ठेव ही तुझी बहीण नेहमी तुझ्यासाठी उभी असेल .. कधीही स्वताःला एकटं नको समझु नकोस.. “

एवढं बोलून तिने आपला कार्ड ज्यात तिचा मोबाइल नंबर होता तो बाजूच्या टेबलवर ठेवला “जमलं तर मला माफ कर.. मी तुझ्या कॉल ची वाट बघेन.. काळजी घे “ 

तिथून निघाली.. रेणुका तिच्या पाठमोरी आकृति कडे पाहताच राहिली 

अनूचं डोक सुन्न झालं होतं .. ती तडक घरी गेली अनं खूप रडली .. कारण तिला अपराध्या सारखं वाटत होतं .. त्याने आपल्याशी खोटं बोलला पण आपण का बरं फसलो .. दुसरी बाजू समझन्याचा का प्रयत्न नाही केला .. याचा तिला राग येत होता.. 

चिमण्याच्या चिवचिवांटाने तिची तंद्री भंगली .. एव्हाना बराच उजाडलं होतं.. 

पण आता याची जाणिव झाली की ती चुकली नव्हती.. आज ती नसती तर दुसरी कुणीतरी त्याच्या आयुष्यात असती.. जो व्यक्ति शरीराच्या सुंदरते वरून माणसाची पारख करतो तो व्यक्ति कधीही कुणाला सुखी ठेऊ शकत नाही .. उद्या मी विद्रूप झाले तर माझा पण तिरस्कार करेल .. 

एखाद्या वेळेस त्याची बाजू बरोबर पण असेल, त्याच्या पण काही अपेक्षा असतील पण जे झाले ते फक्त त्याच्या सोबतच झालं नव्हतं रेणुकाच्या वाटेला नाशिबाचे भोग जास्त होते ..” 

तिचा निश्चय झाला होता .. डोळे मिटून ती शांत बसून राहिली बराच वेळ पर्यंत.. मिटलेल्या डोळ्यातनं असावं निघतं राहिली .. 


काही महिन्यानंतर...

आज अनू खूप खुश होती .. ऑफिस मध्ये प्रमोशन घोषित झाले होते आणि तिच नाव डिक्लेर करताना तिच्या मॅनेजर मॅडम ने तिची खूप प्रशांसा केली होती .. आज एकदम नवा उत्साह तिच्यात संचारला होता .. पण तिच्या आनंदाचे कारण वेगळे होते .. 

आज सकाळी सकाळी तिला रेणुकाचा कॉल आला होता .. एनजीओ च्या कामानिमित्त ती शहरात आली होती .. संध्याकाळी दोघी भेटणार होत्या .. म्हणून तिने मॅनेजर ला आज लवकर निघणार असं सांगितलं होतं .. 

“offcourse , today is your day… enjoy” असं बोलून मॅनेजर ने परवानगी दिली होती.. 

गेल्या काही महिन्यात बराच काही बदललं होतं .. रेणुका ने एक एनजीओ जॉइन केल होत आणि त्या कामात तिने स्वतःला वाहून घेतलं होतं आणि मुख्य म्हणजे ती खूप खुश होती.. ती आज पण त्याचाच आई बाबांजवळ राहत होती पण एक स्वावलंबी स्त्री म्हणून .. 

अनूने त्याच्या सोबत breakup केला होता.. अगोदर काही दिवस ती खूप अस्वस्थ होती.. तिचं पहिलं प्रेम होतं ते .. ऑफिस मध्ये त्याला बघून तिला भूतकाळ आठवायचा .. सुट्ट्या जास्त होऊ लागल्या .. तिच्या कामावर वर पण त्याचा परिणाम दिसू लागला .. म्हणून ती 1-2 आठवड्यासाठी आई बाबांकडे गेली होती .. 

“पोरी .. तुझ्या आयुषयची ही सुरुवात आहे .. तुला दुबळे करणारे असे कित्येक क्षण येतील.. म्हणून खचून जायचं नाही .. खरी परीक्षा तर ती असते .. तु रडशील , तुला एकटं वाटेल .. ते सर्व ठीक आहे कारण तुला मन आहे पण म्हणून काही हार मानयची नाही .. त्याला सामोरं जायचं आणि ती लढाई जिंकायची .. मग ती कितीही मोठी की लहान असो .. 

ती एक वेळ असेल .. जी टिकणार नाही अनं निघून जाईल .. आणि जेव्हा तु मागे वळून पाहशील तुला वाटेल ती गोष्ट एवढी मोठी नव्हतीच.. तुझं खंबीर हृदय त्याहून जास्त मोठं आहे.. अश्या घटना येतातच आपल्या आयुष्याच्या प्रगती पुस्तकावर “अ“ शेरा देण्यासाठी .. 

बेटा .. आपल आयुष्यं असं जग ज्याला पाहून कुणा एक व्यक्तीला तरी प्रेरणा मिळेल .. त्याच्यात जगण्याची उमेद जागी होईल अशी स्वयंभू हो .. ” तिच्या बाबाचे हे शब्द तिच्या साठी संजीवनी ठरले .. 

आणि आजचा दिवस .. तो तिच्या समोर जरी आला तरी तिला काही फरक नव्हतं पडत ...

परिस्थितीवर मात करून तिने तिच्या आयुष्याच्या प्रगती पुस्तकावर एक “अ “ शेरा मिळवला होता .. 

तिला स्वतःचाच अभिमान वाटत होता .. 

संध्याकाळ झाली होती .. ती लगबगीने निघाली .. जवळच्या कॉफी शॉप मध्ये त्या भेटणार होत्या.. 

तिला रेणुका दुरूनचं दिसली .. 

“रेणु..” तिने हाक मारली ..

रेणुका ने तिच्या कडे पहिलं .. 

“ताई” म्हणून हसली.. 

आज रेणुका वेगळीच दिसत होती ..आत्मविश्वासाची वेगळीच चमक.. स्वाभिमानी , स्वावलंबी.. आणि स्वयंभू ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational