Asmita Goswami

Inspirational

5.0  

Asmita Goswami

Inspirational

पाऊस - मी आणि आठवणी

पाऊस - मी आणि आठवणी

3 mins
16.7K


आज बऱ्याच महिन्यानंतर माझ्या आजोळच्या घरी गच्चीवर निवांत उभी ...

दुपारची वेळ पण आभाळ काळ्या करड्या ढगांनी गच्च.. जणू वाट पाहतायेत कि कधी मी थेंब थेंब होऊन धरणीच्या कुशीत जातो…

नुकताच पाऊस पडून गेल्यामुले वातावरणातला ओलावा आणि मातीचा मंद मंद सुवास एक वेगळाच आभास देतो...हवे मधला ओला गारवा माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी आणतो.. दूर दिसत असलेली डोंगर रांग ... आजू बाजूची हिरवळ डोळ्याला सुखावून जाते...गार वारा मला जणू न्हाऊ घालितो.. ओठांवर आपोआप कवितेच्या ओली येतात ...

"पाऊसाची सर नुकतीच बरसली .. आणि

आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवाळली.."

बाजूच्या मैदानात क्रिकेट घेळणारी मुलं ... रस्त्या वरून छत्री सांभाळत जाणारे एक आजोबा आणि त्याच्या समोरून चार पाच शाळकरी मुलींचा घोळका .. हसत खिदळत स्वतः मध्ये रममाण.. त्यातली एक माझ्या कडे पाहते आणि सुंदर हसते.. कोण ती..

ती मी.. लहानपणीची ..

नुकतीच शाळा सुटलेली .. आज बसने न येता मैत्रिणींसोबत पाऊसाची मजा घेत येणारी मी.. आज सकाळी पाऊसमुळे प्रार्थना पटांगणावर न घेता वर्गातच झाली... आज या ऋतूतील पहिला पाऊस .. सगळे मस्ती च्या मूड मध्ये .. मला पावसाळ्यात शाळेत खूप मज्जा वाटायची .. एक वेगळाच वातावरण असते..

वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि अभ्यासापेक्षा गोंधळ जास्ती.. आज मराठीच्या सरांनी पाऊसावरची सुंदर कविता शिकवली…

"पाऊस पहिला जणू सोनूला बरसून गेला... बरसून गेला.."

तेव्हढ्यात पारिजाताका फुलांचा सुंदर सुवास येतो.. मी गच्ची वरून खाली पाहते तर अंगणातल्या पारिजातकाच हिरवा डौलदार झाड जणू पांढऱ्या नारंगी रंगाचा शेला ओढून उभा आहे.. पाऊसाची रिमझिम थांबली आहे आणि घरातून रेडिओ वर गाण्याचा मंद आवाज येत आहे..

"येरे घना येरे घना... न्हाऊ घाल माझ्या मना.. "

खाली एक मुलगी आणि एक आजी फुलं वाचण्यात मग्न आहेत.. कोण आहेत हे..

आह !

ती मी .. बालपण आणि तारुण्याच्या उंभरत्यावरची .. माझ्या प्रेमळ मायाळू आजी सॊबत.. माझी आजी .. छानछान गोष्टी सांगणारी .. मायेनं एक एक घास भरवणारी...

तिला आणि माझ्या आई ला पारिजातकाच्या फुलांचा गजरा खूप आवडायचा... त्या दोघीं साठी गजरा बनवणं माझ्या बालपणी चा आवडता छंद ! आईने बनविलेला गरम गरम चहा पीत आजीच्या गोष्टीना खूप रंग चढायचा .. मी तिच्या कुशीत लोळत ... काय ऐश होती...

तेव्हढ्यात पाऊस परत सुरु झाला.. यावेळेस जोरात.. मी गच्चीवरून खाली जाण्यासाठी वळले .. पण थांबले.. आज परत भिजण्याची ईच्छा झाली...

सायकलची ट्रिंग ट्रिंग...

एक तरुणी पाऊसात निघालेली.. बहुतेक कॉलेजला.. जाताना माझ्याकडे एक नजर फिरवून हसली...

ती होती मी .. ऐन तारुण्यात पदार्पण झालेली मी..

मैत्रिणीनं मध्ये रमणारी .. कुणाची आपल्याला चोरून पाहणारी नजर जाणवताच हरखून जाणारी .. आपल्या आवडत्या व्यक्तीची नजरानजर होताच ... छातीच धडधडणं आणि गालावरची लाली एकच वेळेस...

पावसाळ्यात शरीर सोबत मनही भिजून चिंब होतं.. जणू सळसळ वाहणाऱ्या प्रेमाच्या झऱ्यात न्हाऊन निघतं..

आता कॉलेज ला जाण्याची घाई.. मैत्रिणीच्या सानिध्यात गप्पांच्या कट्ट्यावर पोचण्याची घाई... क्लास बंक करून घोळक्याने उगाच कॉलेज मध्ये फिरत राहावे .. मधून मधून नजर इकडे तिकडे करत कुणाला तरी शोधात राहावे...

माग पाऊसाची रिमझिम सुरु होते आणि अचानक ती नजर गवसते .. लाजून मान खाली आणि चेहऱ्यावर लाली... जाणीव होताच नजर दुसरी कडे उगाच वाळवणं ...

"हळुवार दाटतो मेघ नभी..

हळुवार पसरतो गारवा…. स्पर्श नवा हर्ष नवा"

मनातल्या पिंजऱ्यामधील आठवणींच पाखरू .. पाऊसाची चाहूल लागतच मोकळा होतो… पाउसा... तुझ्याशी जुळलेल्या अगणित आठवणी.. मनाला सुखावणाऱ्या..

मागून माझी आई मला शोधत गच्चीवर आली "अग नयन, पाऊसात अशी भिजत का उभी ... चल तुझ्या बाबानी मस्त गरम गरम भजे बनवलेत .."

निघताना नभाकडे बघून मी "प्रिय पाउसा... तू असाच येत राहा .. प्रियकरा सारखा .. मी वाट पाहेंन तुझी.. चटका सारखी...

तू असाच येत राहा.. माझी माझ्यासोबत भेट घालवून देण्यासाठी .... "


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational