STORYMIRROR

Asmita Meshram

Tragedy

3  

Asmita Meshram

Tragedy

लतीची माय

लतीची माय

8 mins
325


नेहमी सारखी सुंदर सकाळ होती ती .. कुणी ओसरी वर भांडी घासत होत तर कुणी दांत.. कुणी अंगणात झाडू मारीत होती तर कुणी सडा शिंपीत होती .. मांगवाड्यातली नेहमीची सकाळ..

लतीच्या मायची नेहमीची कामावर जाण्या अगोदरची आवरा आवर सुरु होती.. तेवढ्यात बाहेर परत भांडणाचा गोंगाट सुरु झाला..

"या मांगवाड्यात भांडण, शिव्यागाळ तर दररोज चा झालाय आज काळ.. कधी पोरांवरून , तर कधी काचऱ्या वरून " तिने स्वयंपाक खोलीच्या खिडकीतुन जरा डोकावून पहिला.. गुडे बाई आणि गणीची माय यांचा परत आरडा ओरडा सुरु झाला होता.. कालतर दोघींची केस पकडून मारपीट झाली होती..

गुडे बाई थोडी रागीट आणि वर्चस्व गाजवणारी होती.. वाडीतल्या सगळया बायकांवर जणू आपला हक्क समजायची.. या सगळया मध्ये लतीची माय कधीच मिसळू शकली नाही.. तिला त्यांचा असा अरेरावी करणं, कुणाच्या मागे वाईट बोलणं आणि लावा लाव्या कारण नाही पटायचं.. जेव्हा घरी होती तेव्हा पण आणि आता पण..

अगोदर पासूनच ती त्यांच्या पासून चार हात दूरच राहिली.. तिच्या मागे या बायका काही बाही बोलायच्या तरी तिने लक्ष नाही दिलं..

"अशा वातावरणात आपल्या मुलांना जास्ती दिवस नाही ठेवायचा .. पण कुठे जायचं ? " 

तेव्हढ्यात " माय वं " लतीच्या हाकेने ती भानावर आली..

" माय, आज यांचा परत भांडण सुरु झालं आणि हे दिवसभर सुरु राहणार.. मला अभ्यासपण धड करता येत नाही"

"अगं, हे असचं राहणार, माग काय तू अभ्यास नाही करणार. तू तिकडे लक्ष नको देउस. भय्यासोबत दार बंद करून बसायचं आणि पुस्तकात डोकं घालायचं.. अभ्यास महत्वाचा आहे मग बाहेर लक्ष का बर जात? " असं म्हणून तिने झोपेतून नुकत्याच उठलेल्या आपल्या पोरीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला..

लती तिला बिलगून म्हणाली " माय वं, हा भय्यान , ऐकत नाही माझं.. जरा बाहेर गोंगाट ऐकलं तर लगेच भायेर पळतो नाहीतर , पक्या अन विक्या संग खेळायला ! "

तिच्या कपाळाचा मुका घेत ती म्हणाली "आज काम वरुन आल्यावर बोलते मी त्याच्याशी.. दोघे पण वेळेवर जेवण करा आणि रात्री साठी उरवून ठेऊ नका"

कानाला कापड आणि हांतात डब्याची पिशवी.. जाताजाता आतल्या खोलीत तिने डोकावून पाहिलं, तर भय्या अजूनही गाढ झोपेत होता..


"लते.. चाल निघाले मी बाळ !" असं म्हणून ती बाहेर पडली..

शेजारची जनाक्का अंगण झाडीत होती.. "जनाक्का , लेकरांकडं लक्ष ठेवशील ग " या तिच्या वाक्याला जनाक्कान मान हलवून होकार दिला..

गडूबाई आणि गणीची माय आता हमरी-तुमरी वर आले होते.. त्यांचा आवाज वळणापर्यंत येत होता..

अश्या वातावरणात राहूनही लती आणि भय्या वर याची छाप पडली नव्हती.. वाडीतल्या बाकीच्या मुलांपेक्षा ही दोघंपण अभ्यासात हुशार होती . शाळेतले मास्तरपण त्यांच्याकडे लक्ष द्याचे..

सहा सीटर रिक्षामध्ये बसल्यानंतर पण तिच विचार चक्र सुरु होतं..

जवळपास सहा वर्ष झाली होती लतीच्या बापाला जाऊन .. लती चार आणि भय्या दोन वर्षाचा होता. सुखी संसाराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक.. जीवापाड प्रेम करणारा जोडीदार देवानं हिरावून नेला .. कसंबस तिने स्वतःला सावरलं आणि दोन लेकरांसाठी कंबर कसली.. दहावी पास होती. त्यावर कंत्राटी पदावर तिला नगरपालिकेत कारकुनाचं काम मिळालं. 

कधी घरचा उंबरठा न ओलांडलेली.. तिने माणसाच्या मध्ये जुद्दीने काम करायला सुरु केलं.

एक बरं त्याने स्वतःच तीन खोल्यांचा छोटास घर बांधल होता जे आज तिला पुरेस होतं.. गावावरुन कधी कधी सासू नाहीतर आई बाप यायचे ज्यांचा तिला खूप आधार वाटायचा..

पण गेल्या एक दोन वर्षापासून , वाडीतल्या बायका तिच्या कड जरा विचित्र नजरेनं बघायच्या.. तिने आता तिशी ओलांडली होती.. दिसायला सावली पण सुंदर होती.. गेल्या काही वर्षाच्या धकाधकी मुळे चेहरा निस्तेज झाला होती..

एखाद्या दिवशी नवीन साडी नेसली तर टोमणे मारायच्या.. मुद्दाम तुसडेपणानं बोलायच्या.. गेल्या काही महिन्यात पासून जरा जास्तच झाला होतं..

त्यातल्या त्यात जनाक्का जरा बरी होती.. समजून घ्यायची .. लेकरं घरी एकटीच असतात दिवसभर.. त्यामुळे त्या बायकांकडे लक्ष नं देणं हेच भल्याचा होतं..

तेव्हढ्यात "पालिका हापिस .. " या रिक्षावाल्याचा ओरडण्याने तिची तंद्री भंगली..

आज पालिकेत जरा जास्तीचा गर्दी होती.. साहेबांकडे येणाऱ्या सगळ्या फाईली चावळून , नोंद करून ठेवणे , मग साहेबाच्या टेबलवर ठेवणे.. त्यांनी तपासल्या फाईलींची नोंद करून , पुढे देणे .. आणि बरंच...

याच कामाने तिचा घर चालत होतं म्हणून ती जवाबदारीने सर्व करायची..

बघता बघता जेवणाची वेळ झाली.. तिला भूकेची जाणीव झाली..

बाजूच्या खानावळीत आपल्या नेहमीच्या टेबलावर जाऊन डब्बा उघडला.. "मुलं जेवली असतील ना ? "

तिच्या मनात विचार आला.. तेवढ्यात समोर गणेश उभा

"हरकत नसेल तर बसू का ? " त्याने विचारले

"गणेशराव , तुम्हाला किती वेळा सांगितलं .. तुम्ही असा.. नको.. कृपाकरुन" तिने खाली मान घातली

त्याचा चेहरा पडला.. "बरं, काही हरकत नाही.." असा म्हणून तो तो दुसरी कडे गुपचूप जाऊन बसला..

पण तेवढ्या वेळात बऱ्याच जणांच्या नजर त्याच्या कडे वळल्या होत्या.. ती जरा बावरल्या सारखी झाली..


गणेश एक सज्जन माणूस होता.. पस्तिशीच्या जवळपास, त्याची बायको पण काही वर्षापूर्वी वारली होती, त्याला एक सात वर्षाची मुलगी होती जी त्याच्या सोबत आपल्या आजीच्या देखरेखी खाली वाढत होती..

एकाच ठिकाणी कामामुळे ते एकमेकांना गेल्या दोन अडीच वर्षा पासून ओळखत होते .. बऱ्याच वेळा अडीअडचणीच्या वेळी त्याची बरीच मदत हवायची..

हळू हळू त्याच्यात बोलणं वाढलं होतं..

बऱ्याच वेळा दोघे एकत्र जेवण पण करायचे.. पण कामाच्या ठिकाणी या गोष्टीची कुजबुज सुरु झाली होती.. लोक बघून हसायची .. कधी कधी टोमणे मारायची.. 

"काय आज गणेश राव नाही वाटतं "

"गणेश राव दिसले का कुठे " ..

त्यामुळे ती थोडी हादरली होती.. तिला असा वाटायला लागला आपण काहीतरी मोठी चूक करत आहोत.. तिने त्याच्या सोबत बोलणं कमी केला .. बंदच केलं..

पण गणेशराव समजूतदार होते.. तिचा सोज्वळ स्वभाव त्यांना आवडला होता.. माणुसकीच्या नात्याने तो तिला जेव्हा जमेल तेव्हा मदत करायचा प्रयत्न करायचा.. पण नवरा नसलेल्या बाई ला पर-पुरुषाबरोबर बोलताना पाहून समाजाच्या डोळ्यात केर तर जाणारच..

आपण काय पुरुष .. आपल्याला काही फरक पडणार नाही पण तिला बिचारीला सहन करावं लागणार.. म्हणून तो पण बाजूला झाला होता..

त्याची पुढच्या महिन्यात दुसऱ्या गावाच्या ठिकाणी बदली होणार आहे हे सांगायला आज तो आला होता..


जवळपास

पाच - साडे पाच वाजले असतील.. ती फाइल्सची नोंदणी करण्यात मग्न होती.. तेवड्यात धावत पळत तिच्या शेजारचा जनाक्काचा मुलगा सदाशिव आला.. "काकू , भय्याला क्रिकेट बात डोक्याला लागली , डोकं फुटलं, खूप रक्त गेलाय, त्याला सरकारी दवाखान्या नेलंय .. तुम्हाला सांगायला आलोय.. "


हे ऐकून तिला भोवळ आल्यासारखे झाले.. हात पाय गळाले.. डोळ्या समोर भैय्याचा रक्ताने माखलेला चेहरा आले.. आणि ती एकदम रडवेली झाली ...

"काय ?? कधी ?? " 

"झाला अर्धा तास .. त्याला सरकारी इस्पितळात नेला आहे "

तिने लगेच पिशवी उचलली .. पण काम तर खूप बाकी आहे .. साहेब ओरडतील .. काय करू ..?? तिला काही सुचेना ..


गणेश बाजूच्या टेबलावर होता.. त्याने सगळं ऐकले होता..

"चला मी तुम्हाला दवाखान्यात सोडतो .. कामाची काळजी करू नका.. " त्याचा मित्र दुसरा कारकून बाळा याला इशारा करून म्हणाला "बाळा .. इकडचा बघ मी येतो.. साहेबाने विचारला तर सांग.. मी येतो थोड्या वेळात"


ती मुकाट्याने गणेश च्या मागे निघाली...

त्याच्या दोन चाकी गाडीवर बसून सरकारी इस्पितळात पोहचली...

भय्या ला कपाळावर चार टाके लागले होते .. नशीब बलवत्तर म्हणून डोळा वाचला होता .. लतीचे डोळे रडून रडून सुजले होते...

डॉक्टर ने पट्टी बांधून काही औषध लिहून दिली आणि दोन दिवसानंतर परत बोलावलं ...

"तुम्ही रिक्षात बसून घरी निघा , मी लता सोबत औषध आणून देतो .. चल ग लता ताई.. " गणेश ने औषध विकत घेतली आणि लती ला घरी आणून सोडलं..


ती बाहेर आली "गणेशराव तुमचे खूप उपकार झाले" असा म्हणून तिने हात जोडले..

"काळजी करू नका.. जो पर्यंत भय्याला बारा वाटत नाही तोपर्यंत येऊ नका कामावर ... साहेबाच मी सांभाळतो आणि तुमचा काम पण बघून घेईल ... एक दोन दिवसात एक चक्कर मारेन हवं असेल तर .. येतो मी" असं म्हणून तो गेला ..


वाडीतल्या बायकांत वेगळीच कुजबुज सुरु झाली "हाच वाटतो तो हाफिस मधला.. " "ग बाई .. घरापर्यंत आला आज " वाडीत आज वेगळीच ठिणगी उडाली होती ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

भय्या आता थोडा सावरला होता.. आज पाचवा दिवस होता. ती आज सकाळीच त्याला डॉक्टर घेऊन गेली होती.. 

"जखम थोडी सुकत आली आहे.. टाके पण निघाले आहेत... काळजी करू नका.. " डॉक्टरचे हे शब्द ऐकून तिला थोडा हायस झाला होता ...


संद्याकाळी गणेशराव आले , भैय्यासाठी फळ घेऊन .. भैयाची विचारपूस केली ...

"साहेबाना सांगितलं आहे सगळं .. मी आणि बाळा दोघे मिळून काम बघत आहोत.. तेव्हा कामाचा टेन्शन घेऊ नका.. पुढच्या महिन्यात माझी बदली होत आहे .. त्या दिवशी सांगायचं राहून गेलं..." घटकाभर थांबून तो निघून गेला..

जाताना त्याला ज्यापद्धतीने आजूबाजूचे लोक बघत होते ते पाहून थोडंसं विचित्र वाटलं पण ते काही नवीन नव्हतं..


रात्री भय्याला झोपून दोघी मायलेकी बोलत बसल्या होत्या ...

" माय वं.. ते गणेश काका खूप चांगले आहेत ग.. "

ती नुसती हसली..


बाहेर काही तरी गडबड वाटत होती पण.. दोघीनीं दुर्लक्ष केलं.. तेवढ्यात जनाक्काचा आवाज ऐकू आला "अगं बायांनो जाऊ द्या .. तिचं लेकरू आजारी आहे.. "


तिला अस वाटलं लोकांचा घोळका दारासमोर आला आहे.. ती सहज दरवाजा उघडून बाहेर आली तर वाडीतल्या बायकांचा घोळका बाहेर उभा होता आणि जनाक्का त्यांना अडवत होती..


"काय झालं,.. ?" तिने विचारलं

"तू आत जा गं बाई " जनाक्का तिच्यावर ओरडली ..

तिला जाणवला काही तरी वेगळंच दिसतंय हे.. बायकांच्या डोळ्यात वेगळेच भाव होते.. ती थोडी घाबरली , तिच्या मनात एक विचार आला अन अंगावर भीतीने काटा उभा राहिला.. तेवढ्यात लतीपण बाहेर आली ..

"तुझ्याशीच काम आहे हरामखोर छिनाल .. " गडू बाई दांत विचकटत ओरडली..

"लते.. तुझ्या माय ला आत घेऊन जा.. "जनाक्का ओरडली

तशीच ती घाबरली .. तिला काही सुचण्या अगोदर गडूबाई ओरडली "घ्या गं हिला बाहेर" 

चार पाच बायका आल्या आणि त्यांनी लतीच्या मायचा हात पकडून बाहेर ओढली..

झटक्याने ती खाली पडली .. लती जोरात ओरडली "माय व "

जनाक्का ओरडली "अगं बायांनो .. सोडा तिला.. येड्या कि खुळ्या तुम्ही "

गडूबाई "काय गं ये भवाने.. इकडं नवरा न्हाई आणि तिकडं नटून थाटून काय माणसं पटवायला जाती .. व्हय गं ??"

"अहो काय बोलताय हे" ती भेदरलेल्या आवाजात बोलली "अस काही नाही.. जाऊ द्या मला "

"कानावर तर आगोदरच आला होता आमच्या .. माणसा संगत हस्ती काय , चाय पिती.. एकमेकांचा डब्बा खाती.. " दुसरी बोलली

"अन आता घर पर्यंत माणसं घेऊन आलीस कुत्रे... लय मस्ती चढली तुला " तिसरी बोलली

"अगं बायांनो .. बघता काय .. हाणा हिला.. जन्माची अद्दल घडली पायजे .. नाहीतर आपल्या वाडी वेश्या वस्ती बनवेल ही.. आपल्या पोरीबाळी ला नादाला लावेल ही .. चपलाने मारा हिला "

आणि बघता बघता बायकांनी तिला चारही बाजूने घेरून मारायला सुरु केली.. कुणी चपला ने , लाथा बुक्क्याने , कुणी केस ओढून .. कुणी थोबाडीत ...


लती मोठ्याने रडत होती "सोडा माझ्या माय ला .. सोडा.." पण त्या अकरा बारा वर्षाच्या पोरीचा आवाज कुणाच्या कानावर पडत नव्हता ... ती आपल्या माय ला शोधत होती पण ती दिसत नव्हती ..


जनाक्का बाजू ला डोक्यावर हात मारून बसली.. आजू बाजूला बरीच माणसा जमली होती पण कुणीही मदतीला आलं न्हाई..

जवळपास १०-१५ मिनिट हे भयाण नाट्य सुरु होतं.. ती आता निपचित पडली होती.. लाथाबुक्क्याचा मार तिला आता जाणवत नव्हता .. जो जसा ओढेल तशी ती खेचली जात होती.. तिचे डोळे पांढरे पडले होते .. साडी निघाली होती.. ब्लाउज फाटला होता.. लती तिच्या अंगावर जाऊन पडली तेव्हा कुठं बायका थांबल्या ..

"ये ऐक हलकट .. इथे राहायचा तर असला धंदा बंद कर. समजहलीस .. " असा म्हणून गडूबाई तिच्यावर थुकून निघून गेली..


जनाक्का ना तिच्या अंगावर एक चादर टाकली आणि एकदोन जणांनी तिला उचलून घरात नेलं..

लती तिला सारखी "माय व माय व " करून उठवत होती..

पण तिला कशाचाच भान नव्हतं.. ती नुसती एक टक बघत होती..

जनाक्का "लते , जा पाणी आन "

लती ने तिच्या चेहर्यावर पाणी शिंपडलं .. तेव्हा तिची पापणी हलली .. तिने लतीकड पाहिलं

आणि मोठयाने हंबरडा फोडला .. काळजाला भिडणारा ...

आणि इकडे बायकांचा घोळका आपसातच कुजबुजत हसत होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy