स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
"तिलाही कधीतरी समजून घ्या""
स्वतःच सगळं काही हक्काचं , मायेचं सोडून स्त्री दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक स्त्री ही तिचं प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करत असते. काही स्त्रिया अपवाद असतात तो विषय वेगळाय. लग्नानंतरचा तिचा प्रत्येक बदल ती स्वागतार्ह मानते. तिच्यातला तो नाजूक पणा ती कुठेतरी दाबून धरते.....तिच्या वागण्यातला तो अल्लड पणा ती कुठेतरी विसरायला लागते. प्रत्येक नवीन माणूस , प्रत्येक नातं ती मनापासून जपण्याचा तिचा हेतू असतो. लग्नानंतर सगळ्या गोष्टी तिच्या साठी नवीन असतात , पण तिथं ती स्वतःला एकरूप करायला शिकते. आणि आपली हक्काची नवीन जागा समजून, स्वतःच स्वतःची समजूत काढत , आयुष्य जगण्यात रंग भरते. सकाळी उठल्या पासून ते झोपे पर्यंत ती सगळ्यांच मायेन करते. कधीच तक्रार करत नाही .
नवरा कामाहून आला की लगेच हातात पाण्याचा आयता ग्लास टेकवते. पण एकदा पुरुष मंडळी तुम्ही अस करून बघा ना , ती बाजारातून आली नाहीतर बाहेरून कुठून तरी आली की तिच्या हातात पाण्याचा आयता ग्लास टेकवा , तुम्ही हे एकदा जरी केलं तरी ही गोष्ट तिच्या साठी शंभर वेळा केल्यासारखी होईल. आणि येणाऱ्या प्रत्येकाला की खूप कौतुकाने सांगेल, "आमचे हे मी बाहेरून आल्यावर माझ्या हातात पाण्याचा आयता ग्लास टेकवतात. " तिचा आनंद गगनात मावेनासा होईल. स्त्रिया प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात , पण प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला पाहिजे तेवढं कधीच समजून घेत नाही. (सगळीच पुरुष मंडळी सारखी नसतात. कृपया नोंद घ्यावी). मान्यय तुम्ही तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात. पण तुमच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहे ती .....पाण्यात मीठ जस चटकन विरघळाव तस तुमच्या मायेच्या ओळव्यात पटकन भिजून जाते ती....पण तुमच्या मायेचा ओलावा कधीतरी सुकून जातो आणि तिच्या मनाला आलेली मायेची ओल कधी अश्रूंच्या ओळव्यात रुपांतरीत होते समजतच नाही. एक स्त्री म्हणून जगणं खरंच खूप कठीण असतं. आपल्या आईबाबांची लाडाची परी , कधीतरी आपल्या लोकांच्या आनंदासाठी आपले पंख स्वतःच कापून टाकते. आणि आपल्या स्वप्नांना पूर्णविराम देते. जगण्यातला आनंद बघणं सोडून ती आपल्या लोकांच्या आनंदामध्ये सुख बघून आयुष्य एका नवीन वळणाने जगायला शिकते. समोरच्या आयुष्यात आनंद बघूनत्यात सुख बघण्याची एक नवीन कला तिच्या मध्ये नकळतपणे रुजते. स्त्री म्हणजे जणूकाही कुंकवाचा करंडाच , कुंकवाचा करंडा लक्षात घेता त्यात "हळद, कुंकू आणि तांदूळ" या तीन गोष्टी येतात. या तिन्ही गोष्टी लक्षात घेता," हळद : आपल्याला झालेल्या जखमेवर ती मायेने हळद लावते मग ती जखम शारीरिक असो किंवा मानसिक......" "कुंकू : वेळ आल्यावर ती तिच्या काली रुपाला जाग करते......" "तांदूळ : येणाऱ्या प्रत्येकाला दोन घास खाऊन जा हा मायेचा आदर घालते. खरंच स्त्री साठीची कुंकवाच्या करंड्याची उपमा किती अप्रतिम आहे ना ......स्त्री शक्ती तू महान आहेस
