STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Inspirational Others

2  

Sagar Jitendra Bangar

Inspirational Others

नवरात्रीचे नव-विचार

नवरात्रीचे नव-विचार

1 min
176

होय मुली, काळ्यात देखील सौंदर्य आहे. कोण म्हणतं गोरं तेच सुंदर. तू काळी, सावळी, नकटी, ठेंगणी, ग्रामीण, गरीब, कुरळ्या केसांची कशी ही असो तू सुंदरच आहेस ! आधी तू स्वतःवर प्रेम कर. तुझ्या रंगावर, दिसण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. ते तुला सौंदर्याच्या चुकीच्या संकल्पनांमध्ये अडकवून ठेवतील. तुला जे पाहिजे ते कपडे तू परिधान कर. तुला जसं वाटतं तसं तू वावर आणि तुला हवं तसंच तू वाग. कुणाला Impress करण्यासाठी नाही तर स्वतःला Express करण्यासाठी तुझं व्यक्तिमत्त्व वापर.


कोणाची बायको, मुलगी, बहीण असण्या आधी तू 'तू' आहेस. तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे हे तू कधीच विसरू नको; मग बघ तुझं जगणं कसं अधिक सुंदर आणि समाधानी बनतं ते !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational