Govinda javheri

Inspirational Children

3  

Govinda javheri

Inspirational Children

संस्कार

संस्कार

2 mins
385


👧मी राहत असलेल्या सोसायटीत पार्कींगमधे एक मुलगी येऊन बसते.

अंगावर चालणारी !

तिला विचारले “कितव्या इयत्तेत आहेस तू ?

ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे,

महानगरपालिकेच्या मराठी शाळेत !

मग म्हटल “तू शाळा सूटल्यावर रोज इथे काय करतेस ?

तर ती म्हणाली ,

‘आई वडिलांची वाट पहातेय् !

मी कुतूहलाने विचारले

“काय करतात आईवडील?

ती- “मोठमोठ्या बिल्डिंगा बनवतात !

तेव्हा मी ओळखले की हिचे आईवडील बिगारी आहेत. संध्याकाळी ते आईबाप आले तिला घेऊन गेले..!

दुसऱ्या दिवशी तोच प्रसंग….

बरेच दिवस मी त्या मुलीशी बोलतोय….

तिच्या बोलण्यातुन एकच समजलय मला ….

की तिच्या मते शाळा शिकल्यावर. आपले आईवडील जे बिल्डिंगा बांधतात ना, तशा बांधाव्या नाही लागणार तर त्यात राहणाऱ्या माणसांसारखेच आपणही त्यात रहायला जाऊ !!!

केवढा आशावाद...


तिच्याकडे शाळेत पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक बाटली दिली ….

एक चप्पल जोड दिला ..

फार आनंद झाला तीला .

परवा ती मला रडताना दिसली…

मी म्हटलं “काय झाले ग?

ती म्हणाली “तुंम्ही दिलेली बाटली हरवली गेली…..

मी म्हटले

“अग मग त्यात रडायचं कशाला ? दूसरी देतो तुला !

ती थोड़ी सुखावली…

तिला पुन्हा एक बाटली दिली..!!

तिने मुकाट्याने घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..!!!

आज ती पुन्हा आली माझ्याकडे , म्हटले

” आता काय झाले ?

तर ती म्हणाली

“काही नाही ,बाटली द्यायला आलेय..!!

मी म्हटले का ग ? काय झाले? तर ती म्हटली “माझी पहीली बाटली सापडली….!!!

तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी …!!

मी म्हटले “राहुदे ग…

पहिली खराब झाली की येईल तुला उपयोगाला !!!

पण तिला नाही समजले माझे बोलणे…..बाटली माघारी दिलीच.

माझे डोळे नकळत ओले झाले.अन तिला एक वही देऊ केली ,

ती पण नाही घेतली तिने..!!’

मी म्हटले “का ग ?

तर ती म्हणाली ” ह्या वर्षाला लागणाऱ्या वह्या

आहेत माझ्याकडे !!!!

काय समज आणि काय संस्कार आहेत !! ग्रेट !!

असो … धरण भरले की त्यातून जास्तिचे पाणी सोडून देतात… !!!! जनावरे पण एका वेळी हवं तेवढच खातात….!!!

पण…


शिकली सवरलेली माणसे मात्र अधाश्यासारखी साठवत जातात…किती नोटा मिळवल्या म्हणजे आपण सुखी होणार आहोत ??

स्वत:ला बंधने घालणार आहोत की नाही ?

लक्षात ठेवा खरा माणूस बनायला शिका. हपापलेल्या अन सुशिक्षीत माणसांपेक्षा मला ती मुलगी अन तिचे अडाणी पण समाधानी आई वडील खरे सुशिक्षित वाटतात,सुखी वाटतात! त्यांना मनापासून सलाम !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational