नावात काय आहे ...

Romance

4.0  

नावात काय आहे ...

Romance

सलाम ए इश्क़ - भाग ३

सलाम ए इश्क़ - भाग ३

5 mins
384


आदी त्याच्या रूममध्ये त्याच्या आवडत्या आरामखुर्चीवर डोळे मिटून बसला होता. रूममध्ये अंधार. काळाची चक्र जणू वेगाने मागे फिरत होती.आदिने जे आठवायचं नाही असं खूप वेळा मनोमन ठरवलं नेमकं आज तेच त्याच्या बंद डोळ्यात साठत होत.आठवणी अश्रू बनून गालावर ओघळत होत्या. काळ मागे गेला ....खूप मागे.....कदाचित १४ वर्षांपूर्वी....!!


सेकण्ड इयरचा क्लास कधी नव्हत तो आज पूर्ण भरला होता. प्राचार्यांच मार्गदर्शनपर लेक्चर होतं आणि नेहमीप्रमाणे उपस्थिती अनिवार्य होती.प्राचार्य पुढील वर्षांचा इंजिनिअरिंगचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल माहिती देत होते-

“Attendance in each semester is compulsory otherwise you likely to get detained.” 


“Excuse me sir…may I come In ?”- 


प्राचार्य बोलतच होते तेवढ्यात शांतता भंग करणारा आवाज आला. पूर्ण वर्गाचं लक्ष तिकडे गेलं. फिक्कट निळी जीन्स,पांढरा फॉर्मल शर्ट, हेवी शूज..खांद्यावर ढगाळ सॅकचा बेल्ट, बाईकमुळे बेफिकीर विस्कटलेले केस, पुढच्या बटनावर डकवलेला गॉगल, हलकीशी दाढी..अगदी बिनधास्त, बेफिकीर असा तो .....! येणाऱ्या विद्यार्थ्याला बघत प्राचार्य म्हणाले-

“Come in Mr. Shirke ,I was talking about detention and you came….तुम्ही एकमेव होतात शिर्के फर्स्टइयरला detention मध्ये येणारे आणि पहिल्याच वर्षी पेरेंट्सला प्राचार्यांच्या ऑफिसला आणणारे.या या ....come In…”


वर्गात एकच हशा पिकला.


"सॉरी सर” आदित्यने केसांवरून हात फिरवला, आणि मिश्कील हसत, खाली बघत म्हटला. तो आत आला. वर्गात बसायला एकही बेंच रिकामा नव्हता, पण शेवटच्या बेंचवर एक सीट रिकामी होती आणि आतल्या बाजूने एक मुलगी बसली होती. प्राचार्यांनी त्या सीटकडे हात दाखवला तसा पूर्ण वर्ग पुन्हा हसला. आदित्य त्या मुलीशेजारी बसला. प्राचार्यांनी पुन्हा लेक्चर सुरु केले. थोडा वेळ बसतो न बसतो तोच आदित्यची चुळबुळ सुरु झाली. तो बेंच खिडकीशेजारी होता ....धावतपळत जिना चढून आल्याने त्याला उकडत होत ...त्याने तिच्या मागून हात लांब करत खिडकीचा दरवाजा सरकवला, तसा एक चुकार वाऱ्याचा झोत आला आणि तिची ओढणी त्याच्या चेहऱ्यावर उडाली, तिने बिचकून, हळुवारपणे ती ओढली.

ती त्याच्या आधीच विस्कटलेल्या सिल्की केसांवरून अलगद खाली येत होती.त्या अबोली झिरमिळीत ओढणीच्या पलीकडे त्याला दोन भेदरलेले मोठाले टपोरे डोळे नाजूक उघडझाप करतांना दिसले. ह्या दोन अबोली क्षणांमध्ये त्याचे ...गहिरे काळे डोळे आणि तिचे दोन मधाळ टपोरे डोळे यांची नजरानजर झाली. तिच्या हृदयात एक गोड धडधड झाली. त्याच्या स्ट्रॉंन्ग मस्क्युलाइन डीओचा गंध तिच्या श्वासात भरला, ती ओशाळली हळूच ‘सॉरी...” म्हणत अंग चोरून बसली.


तो मात्र हरवल्यासारखा, अविश्वासाने काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला...गोलाकार नाजूक चेहरा आणि नाजुकशे ओठ, चेरी लिप्स, अचानक घाबरल्यासारखे झाल्याने लाल झालेलं नकट नाक? होय नकटच नाक! यू-कट केलेले खांद्यापर्यंत केस, क्रीम कलरच्या कमीजवर अबोली रंगाच बारीक नक्षीकाम केलेलं आणि आणि ह्या मधाळ डोळ्यांना जादू येते की काय? आणि ती डोळ्यांची नाजूक उघडझाप Butterfly eyes. पहिला प्रश्न त्याच्या मनात आला... ‘ही फर्स्ट ईयरला होती कॉलेजमध्ये? आपल्याला कशी दिसली नाही?’ थोडंसं गडबडून जाऊन एकदोन क्षणांत जे झालं ते लपवत उगाचच बोलायचं म्हणून तो म्हणाला ... 

“by the way केव्हापासून चालू आहे ही बडबड?’


तिने फक्त रागाने त्याच्याकडे बघितले आणि पुन्हा लेक्चर ऐकू लागली.


“टिकली....” पुन्हा तिच्या कानाशी कुजबुजत तो म्हणाला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्याने तिला इशाऱ्याने बोटाने कपाळाकडे दाखवले.

तिने हाताने कपाळावर चाचपडले..तिची टिकली थोडी नाकाकडे सरकली होती. तिने ती बोटानेच पुन्हा व्यवस्थित केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा लेक्चर ऐकायला लागली.


लेक्चर संपताच वर्गात एकच गोंधळ झाला. तिने घाईने बेंचवरची सॅक उचलली आणि ‘त्याला excuse me …”  म्हणत जवळजवळ ढकलूनच ती बाहेर निघाली. तो गोंधळला. तेवढ्यात समोरून एक बॉयकट केलेली, काळी जीन्स आणि डार्क ब्लू टी शर्ट मधली मुलगी पळतच त्यांच्याकडे येत होती. ती येऊन जवळपास धडकणारच तशी तिच्या खांद्याला धरून थांबली.


“सॉरी....सॉरी......पुन्हा होणार नाही असं, अगं ऐक ना त्याचं काय झालं... मी लवकर आले ना सो मी आपल्या नेहमीच्या जागेवर बसले होते पण तुला उशीर झाला क्लासटीचर ओरडत होते.

’पुढचे बेंचेस अगोदर फिल करा...रिकामे सोडू नका ...मग..माझ्या शेजारी ती वडापाव येऊन बसली.” 

‘Excuse me..मी काय म्हणतोय .....मला ...”

तिला मधेच थांबवत दोघींकडे पहात आदित्य म्हटला.


त्याला पुन्हा थांबवत ती म्हणाली... “कोण तू? थांब जरा...तर मी काय म्हणत होते.....” ती जरा आठवायचा प्रयत्न करून म्हणाली.

“आशुडे ! जाऊ दे न यार पुन्हा नाही होणार असं... तुला सोडून नाही बसणार गं! मी तुझी बेस्टू ना...LIC बेस्टू....जिंदगीके साथ भी जिंदगीके बाद भी... आता फक्त रागाऊ नको काय...कारण..”


“एक प्रश्न होता विचारू?” तिला पुन्हा थांबवत आदि म्हणाला.

'काय? ’ तिने खांदे उडवत चिडून विचारलं.

"भाईसाब..ये गाडी कहा पे रूकेगी?” तो हात जोडत नाटकी स्वरात म्हणाला.

त्या दोघींनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले आणि एकमेकांकडे सूचकतेने.... ‘हा का उभा आहे इथे ..’ डोळ्यानेच विचारलं. एव्हाना त्याला कळलं तिचं नाव ‘आशु’ आहे.


 ‘ही तुझी बॅग...अरे यार तू घाईत माझी सॅक उचलली...मघापासून तेच सांगतोय पण हे भाईसाब....ऐकतच नाहीये...” हातातली बॅग आशूला देत तो म्हणाला.

‘ये भाईसाब काय? माझं नाव शलाका आहे शलाका & टेल मी हू आर यू’ भाईसाब म्हटल्याने चिडून ती म्हणाली.

“BY The Way I am आदित्य शिर्के..’ त्याची बॅग आशुकडून घेऊन आशूच्या डोळ्यांमध्ये थेट बघत तो म्हटला.


त्याच्याशी पुन्हा अशी थेट नजरानजर झाल्याने ती कमालीची लाजली. गाल गुलाबी झाले पण डोळ्यात आणि नाकावर लटका राग आणत तिने फक्त ‘ओके’ असं जुजबी बोलत उगाच बॅग उघडून त्याच्याकडे बघणं टाळलं.

"ओके...मिस्टर शाकालाका..बूम बूम .... जरा रस्ता देता का...?’ शलाकाकडे पाहून गमतीदार हसत तो म्हणाला आणि दोघींमधून रस्ता काढत पुढे निघाला. पुढे जाताना पुन्हा एकवेळा वळून त्याने आशुकडे बघितलं केसांवरून हात फिरवून एक स्माईल देऊन तो निघाला.


‘कोण आहे हा स्टुपिड...’ त्या पुन्हा एकमेकींकडे बघत एकाच वेळी म्हणाल्या आणि खुदकन हसल्या. तो पुढे गेल्यावर त्याच्याकडे बघत शलाका म्हणाली.

‘जाम चालू दिसतंय शिर्क्यांच कार्ट..आशु तो चक्क फ्लर्ट करत होता तुझ्याशी....The अश्विनी शितोळे हिच्याशी.’

‘ये काय ग ! काहीही म्हणतेस मूर्ख दिसतोय तो. ऐकलं नाही का प्रिन्सि काय म्हटले, डिटेनलिस्ट मधला होता आपल्याला काय करायचं’

वर्ग रिकामा झाला होता, लेक्चर संपल होतं पण माहित नाही कुठेतरी नवीन अध्याय सुरु झाला होता.


*************************

आदित्य बाहेर आला तेव्हा सुजित खाली त्याची वाट बघत होता. आदित्यला रमतगमत येताना पाहून सुजित चिडला.

‘साल्या कुठे लाईन मारत होता रे?’ तो समोर आल्यावर सुजित त्याच्यावर चिडला.

‘अबे लाईन काय साल्या तू लवकर आला, मला मात्र पोरीशेजारी बसावं लागलं ना, पण एक सांग कोण आहे रे ती आशु? आदीची कॉलर दोन्ही हातांनी सरळ करत, थोडंस चिडत पण हसून सुजित म्हणाला-

‘अबे मजनू के चाचा ...प्यार व्यार अंधश्रद्धा आहे बाबा ...तू डिटेनलिस्टमध्ये टॉपला आणि ती टॉपरलिस्टमध्ये तिसरी भाई जे लास्टला सबमिशन कॉपी मारले, ज्या नोट्समधून अभ्यास करून तू सात सब्जेक्ट काढले ना ते सगळं ह्या टॉपर म्याडमच होतं मी तिच्या डिविजनमधून कुठून कुठून...कुणा कुणाकडून ढापून आणलेलं समजलं? आणि भाई ती बाशिंग टाईप आहे फ्रेन्डशिपबँड टाईप नाही आणि भावड्या प्यारव्यार के चक्करमध्ये तू पडू नको काय? तू आपलं आज प्रिया, उद्या रिया, परसो सिया... यही ठीक है’


‘सुज्या कित्ती बोलतोस भावड्या जेवढं विचारलं तेवढंच सांग ना च्यायला लगेच काय सिरीयसली घेतो चल.” एक मिश्कील स्माईल देत सुजितचे केस विस्कटत आदि म्हणाला.


'अरे पण कुठे जायचंय?’तो सुजितला ओढून घेऊन जाऊ लागला.

एक डोळा मारत आदी म्हणाला ‘चल फिक्र को हवा में उडाके आते है.’

मस्ती करत दोघेही कॉलेज गेटबाहेर निघाले. आता एक दिवस कॉलेज केलंय मग नेहमीप्रमाणे २ आठवडे लेक्चरला बंक मारायचा, असं ठरवून ते मूव्हीला निघाले पण तो आता खरंच कॉलेज बंक करणार होता?


इकडे लेक्चरमध्ये लक्ष लागत नाही असं कुणाच्यातरी बाबतीत पहिल्यांदा घडत होत.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance