STORYMIRROR

नावात काय आहे ...

Romance

4  

नावात काय आहे ...

Romance

सलाम-ए-इश्क़ भाग-२

सलाम-ए-इश्क़ भाग-२

4 mins
293

आदीचा चेहरा खुलला होता. अभिमान आदिला बघतच राहिला....


- ‘आपण आपल्या आदिला इतकं खुश खूप वर्षांपासून पाहिलंच नाही’ .


...अभिशी शलाकाची ओळख करून दिल्यावर excuse me! म्हणून अभी निघून गेला ..त्याला आज आदीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काहीवेळ दुरूनच बघायचा होता. 


अभिमान गेल्यावर थोडं रील्याक्स होत शलाका म्हणाली-


‘सो मिस्टर इत्यादी शिर्के.....इतक्या दिवसांनी भेटलास फायनली....झालं असं की माझे ‘अहो’ ह्या संस्थेचे मेंबर आहे सो.. त्यांच्या सोबत मी आले होते आणि त्यांच्याकडे सर्व अवार्डींची नाव होती, त्यात मग नाव दिसलं....म्हटलं अरे हा तर आपला इत्यादी...तुला स्टेजवर बघून कधी एकदाची भेटतेय तुला असं झालं होत, मग नवऱ्याला सांगितलं- तू तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर ...मला माझ्या मित्राशी निवांत बोलू दे...तुझी आणि त्याची मी नंतर ओळख करून देईल......मलाच तू १०/१२ वर्षांनी भेटत आहेस ..... आणि मी निघाले ... आले...सो ..’


तिने थोडावेळ बोलणं थांबवत आदित्यकडे बघितलं..तो हाताची घडी घालून तिच्याकडे पाहून मिश्कील हसत होता.....हातातल्या क्लचने त्याला हलकेच मारत ती म्हणाली-


‘आदि.....I Know तू का हसत आहेस.....आणि आता तुझं ते सुपर क्युट स्माईल देऊन म्हणशील.... ‘भाईसाब ये गाडी कहा पे रुकती है?” हो ना’?


गालातल्या गालात खूप छान हसून तो म्हणाला...’नाही ग! आज नाही बोलणार , आज ही गाडी कितीही वेळ चालली तरी हरकत नाही.खूप वर्षांपासून कुठलीच गाडी ह्या स्टेशनवर थांबलीच नाही.’


‘आदि माझी बडबड जाऊ दे...तू सांग तू कसा आहेस...तुझी वायफी....बच्चू ....I mean family.’


‘ माझी वायफी जरा अजून immature आहे आणि बच्चू अजून खूप लहान आहेत पण हळूहळू सगळ्यांना जाम आवडायला लागलेत ते.....’

 त्याचं मघाच गोड स्माईल कुठेतरी विरल्यासारखं झालं.


गोंधळलेल्या शलाकाला काहीच समजलं नाही इकडे तिकडे पाहत ती म्हणाली


-‘म्हणजे रे .....कुठेय ते,मला भेटायचं....’


कार्डकेस मधून एक कार्ड तिच्या हातात देत तो म्हणाला.... 


‘THE SOCIAL ENGINEERING Pvt.LTD’ माय वायफी...आणि त्यावर जे प्रोडक्ट्स आहेत ते बच्चू....’ 

एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला.


‘आदि काय रे प्लीज भेटवं ना ’


‘शलाका मी लग्नच नाही केल ग!’


“काय?????व्हॉट रबिश” 

जवळ जवळ किंचाळत ती म्हणाली.


आजूबाजूला असलेल्या एकदोन माना त्यांच्याकडे वळल्या...तसं

 ‘SORRY !!!’ म्हणत तिने जीभ चावली.


‘आदि लग्नच केलं नाही ह्याला काय अर्थ आहे......WAIT, WAIT……….डोंट टेल मी की आशु नाही म्हणून दुसरं कुणीच नाही.........’


‘तसंच असं नाही.......पण नाही मी कुणाला इमॅजिन केलं माझ्या आयुष्यात तिच्याशिवाय....ज्या आयुष्याला तिने अर्थ दिला ते मी नाही कुणाबरोबर शेअर करू शकणार....माझ्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल एवढी पझेसिव्ह होती ती...कसं कुणाचं सर्वस्व होऊन जाऊ?...’ 

एव्हाना त्याचे डोळे भरून आले होते. 


त्याच्याकडे रोखून बघत थोड्या रागानेच ती म्हणाली-


‘आदि मूर्ख आहेस का रे तू? तुला माहिती आहे का काय बोलतोय ते? तुझ्या ह्या एक्सक्युजला काहीच अर्थ नाही. मूव्ह ऑन आदि ,आशूची लाइफ खूप पुढे निघून गेली असेल.’


‘You are taking me wrong शलाका. मी आशूची वाट बघतच नाहीये...माझ प्रेम materialistic नाहीये.मला फक्त आता कुणीही नकोय माझ्या लाईफमध्ये.मला नाही सांगता येत ग कुणाला मला काय वाटतंय ते पण हो आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर तिची मोहोर असल्यासारखं वाटतं आणि मी काही जगावेगळ नाही ना करत आहे , राईट? बघ तुझा सल्लू पण unmarried आहेच की..’ उसनं हसू आणत तो म्हणाला.


‘पण ....आदि .....’ 

समोर सुमेधला तिच्या नवऱ्याला पाहून ती पुढे बोलायचं थांबली.


‘अरे काय आज गप्पा संपणार नाही वाटतं? सुमेधने आदिकडे हँडशेकसाठी हात पुढे केला.नंतर थोडी ओळख,ऑफिशियल गप्पा,कार्ड एक्सचेंज झाल्यावर मात्र शलाकाला निघावं लागलं.


पाठमोऱ्या शलाकाकडे पाहतांना त्याला वाटलं असाच काळ मागे मागे जावा आणि तिच्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या आशुने नेहमीप्रमाणे हळूच मागे वळून पहावं आणि डोळ्यांची उघडझाप करून माझं आवडतं एक ‘बटरफ्लाय’ स्माईल द्यावं. 

त्याने क्षणभर डोळे बंद केले डोळे उघडले तेव्हा समोर फक्त लोकांची गर्दी होती. एवढ्या गर्दीतही तो एकटाच होता.


आदित्य खूप वेळापासून चक्क एका मुलीशी बोलतोय हे पाहून विभाताई सुखावल्या होत्या पण पिहू मात्र जाम वैतागली. त्यांचे जेवणं एव्हाना झाले होते.आता आदित्य नचीसोबत जेवत होता. त्यांची वाट बघत बाकीचे गप्पा मारत बसले होते.

भूमी जरा फोनवर बोलत दूर उभी होती. पिहू पाय आपटतच भूमीकडे गेली. इशार्याने तिला फोन ठेवायला सांगितला आणि हात पसरून तिच्या गळ्यात पडून नाटकी रडायला लागली-


‘”मेरा पेहला प्यार अधुरा रह गया रे फतबी!!”


तिचे हात गळ्यातून सोडवत भूमी तोंड वेंगाडत म्हणाली-‘फतबी? यक what is this फतबी?’


“अरे यार भूमी फिल्मे नही देखती क्या?.....कुछ कुछ होता है!.....राहुल,टीना,अंजली,गर्ल्स होस्टेल...फतबी....आठवलं का?’


‘अगं पण त्या फतबीच काय?” भूमीने गोंधळून विचारलं.


‘भूमे फतबीच काही नाही ग मेरा पेहला प्यार अधुरा रह गया ह्यावर concentrate कर न यार,ते आदि सर एका लेडीशी कितीवेळ बोलत होते....हाय मे तो लुट गयी,बरबाद हो गयी” वैतागून गाल फुगवत पिहू म्हणाली.


“अगं ये अकलेचा कांदा तिच्या गळ्यातलं एवढ मोठ्ठ मंगळसूत्र दिसलं नाही का? डोळे आहे का बटण?स्टुपिड....म्हणे ....फतबी...माय फूट”

 तिला एक जोराची टपली मारत ती म्हणाली.


“अरे हो....मंगळसूत्र होत की....हे भगवान तेरा लाख लाख शुक्र है|” वर बघत हात जोडत ती म्हणाली.


रात्र बरीच झाली होती.कार्यक्रम संपला होता.हवेत गारवा वाढला होता.वर आकाशात मळभ दाटले होते.आदीच्या मनात मात्र आठवणींचे टिपूर चांदणे पसरले होते.


त्यात मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघाला होता.


#क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance