Vitthal Jadhav

Tragedy Fantasy Others

2.8  

Vitthal Jadhav

Tragedy Fantasy Others

सी एच बी

सी एच बी

4 mins
217


    गावातली पोरं एकेक करून कुठतरी चिटकत व्हती. काही पुण्याला गेल्ती. हमाली करायचे. काही रिक्षा चालवीत होते. तर काही हाॅटेलात कामं करायचे. पोटापुरते कमवत होते. घरी यायचे, सणावाराला. नवे कपडे, खायला घेऊन यायचे. सगळ्या घरादाराला गल्लीला कौतुक वाटायचं. एकदोन फौजीत गेलते. ते घरी आले की लढाईच्या गप्पा निघायच्या. अंगावर रोमांच उभे राहत. पवाराचा बाळू वर्गात जरा असा तसा होता. म्हंजी कच्चा होता. काय लक्की लागली कुणास ठाऊक? पण त्ये गापकन् ग्रामसेवक झालं तिकडं नंदूरबारला. खावटीवर लई भरभरून बोलायच. सगळे वर्गमित्र इकडं तिकडं उद्योगाला लागले.

   "आरं, कव्हा संपतय तुव्हं शिकायचं?'' - दौलतची म्हतारी रोजचं बोंबलायची.

  "हे बघ. आता बीए झालं. की मंग एम्.ए. अस्तय. त्ये झालं की लागलंच कुठं ना कुठं."

   "व्हय का? त्या तुह्या वर्गातल्या कदमाच्या भावश्याचं लगीन जमलय." - दौलतची आई सुचक बोलत व्हती.

   " त्याचं डीएड् झालय. त्यो लागलाय तिकडं कोक्णात. आता काय मोकळाय लग्न करायला.''

   असं वारंवार घडत होत. रोज दौलतला टोमणे ऐकू यायचे. दौलत काॅलेजला गेला होता. निकाल हाती घेतला. बी.ए. ला पंचावन्न टक्के मिळाले. खुशीत होता. बीडच्या एसटी स्टँडवर आला. गावातला डिगू नेता त्याला भेटला. "काय दौलतराव, काय करताय?"

    "पारनेर गाडीची वाट पाह्यतोय. गावाकं यायचयं."

   "येईलच् गाडी आता. टायमिंग झालाय. च्या घेवू क्की."

    "मी नाही घेत चहा. हे हाताचे साल्टे जातेत. सर्दीय जरा. नाकातूनबी पाणी येतय." - दौलत खिशातून रूमाल काढत होता. आवाज बदलला होता.

   ''त्ये बघा गाडी. नेमकी तिकडंच लाग्ती. मागच फूल्ल व्हती. मंग जागा राहात न्हायी. इमानदारीच्या.... ला फाळकं. आपुन बसलो हिथं वाट बघतं!"

   गाडी फूल्ल होती. पिंपळनेरला दोघांनाबी जागा मिळाली. डिगू नेता हळुहळू विषय काढीत व्हता. "तुमचं शिक्षाण कितीक्ये आजुन?" 

   "बरचय. शिकायचंय. एमए मराठी करणार. मग बीएड केलं की माध्यमिक शाळेला मिळेल कुठतरी."

  "व्हय, सांगा की, आपुण जाऊ तात्याकडं. त्यांच्या लई शाळायेत. एका झटक्यात् वढीत्येल. त्याला काय सांगुस्तर दम."

   "बरं सांगू की..''

  दौलतराव स्वप्न रंगवत होते. एम.ए. मराठी, बी.एड्. प्राध्यापक. लग्न, संसार, लेकरंबाळं, गाडी, घर सगळीकडं मन फिरून आलं. प्रवाशी चढत होते. उतरत होते. कलमा सुरू होता. तिकडं अजिबात लक्ष नव्हतं.  

  "ओ, दौलतराव, उतरा कि स्टाॅप आलाय की आपला." 

  ''हो, हो'' करतच दौलतराव भानावर आले. उतरले. सूर्य कलला होता. घरचा रस्ता धरला. वाटेत छब्बीचं घरं लागलं. दौलतची वर्गमैत्रिण होती. माहेराला आल्ती. दौलतचे रेंगाळले पाय. जड झाल्ते. त्यात पायाचा काय दोष? मेंदू देईल ती आॅर्डर पाय पाळतात बिच्चारे! क्षणभर विचार केला. बोलावं का दोन शब्द तिला, पुर्वीसारखे. पण आवरलं मनाला! तिचा मालक होता की तिथं. जाऊ द्या. दृष्टीआड षष्ठी. नाही झाली हिंमत. परत ती मलाच नावं ठिवील. बोलला नाहीस. तसंच निघून गेलास. ठिवीनाका नाव... बरंच समाजभान आलय आपल्याला! किती भ्याकाड आपण! दोरीलाबी साप समजतोत. 

    घरातून पळून जावा का काय? असं झाल्त. बाप बोलतच नव्हता. आय जास्तचं बोलायची. तिला हाताखाली सून आन् बापाला पोराची नवकरी. उगं घोर लावून घेतला व्हता. नुसत्या एम.ए.वर नोकरी लागणार नव्हती. बीएड्, सेटनेट, पीएच्.डी. पाहिज्येल. तसं काही बघाव म्हणून दौलतनं बीएड करायचं ठरविलं. फीसला पैसे नव्हते. शेटजीच्या इथं पेंड वाह्याचं काम धरलं. धा-पाच मामाकून आणले. ते भागलं. बीएड झालं. आता माध्यमिक शाळा मिळलं वाटलं. जाहिराती बघितल्या. सगळ्या कायम विनाअनुदानित. दोन चार जागेवर चौकशी केली पण छ्या. 

   ''तुझं व्हतय का न्हायी, नवकरीचं काम?"

  एवढंच आयच्या तोंडातून निघलं की काळजात धस्स व्हायचं. परेशानी आणि वय संगच वाढत होत. नगरयेलागत. ल्हान्या भावाला पोरी सांगून येत व्हत्या. ते कमीतं व्हतं. घरात धापाच द्यायचं. तेलामिठाचं भागत व्हतं. बापाला वाटायच थोर्ल्याचं आगुदर उरकावा. मंजी सुईस्कर व्हईन पण झालं उल्टच. होय नाही करता लहान्याच दिलं वाजून. त्याला सासरवाडीचा आधार मिळाला. गेलं पुण्याला बिगारकाम करायला. मिस्तरीच्या हाताखाली.

    सकाळीच गावातल्या छत्रूला गाठलं. उसने मागितले. खर्चीचं भागलं. नगरला नंबर आल्ता. हाटेलातून भज्याचा वास आल्ता. पैसेच नाहीत. सेट देऊन पाह्यली. निघाली ना! नेट गुतली तसीच. पीएचडीची आरसीसी झाली. फीसला पैसे नव्हते. बाप लई चल्लाख. म्हणाला, ''बास तुहे नखरे''

   ''पोर्ग प्राध्यापक होणारेय. लाखभर महिण्याला येत्येन.'' केली हवा.

   पाव्हणा भुराळला. दिलं उजवून. आता खायला तोंड वाढली. नवंनवं काही दिवस मजेत गेली. ...दोन लेकरं झाली. हुंड्यात फीसचं भागल. 'सीएचबी तत्व लेक्चरर' बिरूद मिळालं. 

अनेक शिष्टमंडळ नेली. संस्थाचालकाचे उंबरे झिजवली. द्यायचं कबुलही केलं. वाट्याची एक एक्कर फुकली. स्पर्धात्मक बोली लावली. कुठच काही साधेना. संसाराची आबळ व्हाया लागली. 'आम्हाला फसिवलं.' म्हणत पाव्हणा भांडला. रागातच पोरीला घिवून गेल्ता. ‘नवकरीला लागा. मग या न्यायला.' असं काहीबाही फोनवर बोलायचा. दौलत सहन करत होता. एक दिवस त् दावं घेऊन निघाला. लिंबाच्या झाडाकडं! मनातच घोळत व्हतं. बरं झालं कदमाचा आप्पानं पाह्यलं. म्हणून वाचला होता जीव.

     जागा निघत नव्हत्या. नोकरी मिळत नव्हती. होती ती बायको सोडून गेली. दोन्ही पोरं दौलतकडंच. भावबी वायला निघला. घरात भांडणाला ऊत आलेला. रोज निस्ती कुदाकुदी. काळवंडलेला चेहरा. संतोषच्या बंगल्याच काम चालूय. मित्र त्याचा. जादा शिक्षणाच्या भानगडीत पडला नाय. त्यानं झेरॉक्स, स्ठेसनरीचं दुकान टाकलं. दुकानावर बांधला व्हता बंगला. त्याला झोपाळाबी टांगला होता. राजाराणीसाठी. दौलत पाहतच व्हता. सीएचबीत. कंत्राटी प्राध्यापक म्हणून घेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy