श्रावण धारा
श्रावण धारा


आल्या आल्या श्रावण सरी स्वागत त्यांचे करू या..
मंत्रमुग्ध होऊनी निसर्गाचा आस्वाद घेऊ या..
मंद्धुंद या धुक्यांच्या मैफिलीत
प्रेमरंग उधळू या...
निसर्गाच्या या कलाकरीला
यथेच्छ अभिवादन करू या...
श्रावण सरींच्या तालावर
मनसोक्त ठेका धरू या..
श्रावण सरित चिंब चिंब होऊनी
नव्याने जीवन फुलवू या..
ओढूनिया धूक्यांची चादर
धरतीच्या कुशीत निजू या..
हिरव्या हिरव्या पानांवरचे
दवबिंदू गोळा करू या..
जीवन आहे क्षणभंगुर ते
दवबिंदू सम जगू या..
निसर्गाची ही कलाकृती
डोळ्यांमध्ये साठाऊ या..
होऊ द्या शब्द मुके अन्
मनाची मनाशी साद घालू या..
दिलखुलास होऊनी
प्रेमगीत गाऊ या..
सोनेरी या प्रेम क्षणाचे
साक्षीदार आपण होऊ या..
गार गार वाऱ्याची
मध्येच झुळूक घेऊ या..
हिरव्या हिरव्या रानातील
हिरव्या नदीचे तरंग पाहू या..
सोनेरी या श्रावणसरी सोबत
इंद्रधनुष्यला बोलावू या..