शोध तिचा लागेना...!
शोध तिचा लागेना...!


वेळ होती सकाळची, आधीच घरातुन बाहेर पडायला उशिर झाला होता. त्यामुळे घाईगडबडीत कसंबसं बसस्टॉपवर पोहचलो होतो, पन नेमकी काही क्षणाने माझी बस हुकली आणि नंतरची बस ही पंधरा मिनीटाने होती. आज मला क्लासला जायला उशिर होईल हे मला समजले होते. याच विचारत मी मग्न होतो त्यामुळे बसस्टॉपवरील होणार्या इतर हालचालींवर लक्ष्य नव्हतं, पण कळत नकळत माझे लक्ष्य हे मागे उभ्या असलेल्या मुलींकडे गेले. तिथे तीन मूली बसची वाट पाहत उभ्या होत्या, तितक्यात एका मुलीच्या पर्समधून दहा रुपये पडले. खरंतरं मी जेव्हा पहिल्यांदा मागे वळून पाहिले होते तेव्हापासून माझी नजर ही तिकडेच होती. मला खुप वाटले मी जाऊन त्यांंना सांगावे की, तुमच्या पर्समधून दहा रुपये पडले पण तितके बोलण्याची हिम्मत देखील मी करू शकलो नव्हतो. तेवढ्यात त्या तिघींमधून एकीचे लक्ष्य त्यावर गेले आणी तिने ते उचलून तिला दिले.
त्यानंतर काही क्षणात बस आली आणि मी बस मधे चढलो पण बसमधे चढत असतांना माझे सर्व लक्ष्य हे त्यांच्या हालचालींकडे होते. जेव्हा मला कळले की, त्यादेखील बसमधे चढणार आहे तेव्हा माझे हृद्याचे ठोके अचानक वाढले आणि माझ्या चेहर्यावर एक स्मितहास्य आले होते. तो पंधरा मिंनटाचा प्रवास हा कधी न संपावा असा होता कारण त्या तिघांमधून एकीच्या मी प्रेमात पडलो होतो. त्या संपूर्ण प्रवासात मी तिच्याकडे पाहत बसलो, दोन-तीन वेळा आमची नजरा-नजर देखील झाली. जसजसे माझे बसस्टॉप जवळ येत होते; तसतसे माझ्या मनात ती कुठे उतरणार? हे पाहण्यासाथी उत्सुकता देखील वाढत होती. माझी बस ही आधीच्या स्टॉप पर्यंत येऊन पोहचली होती त्यामुळे मी थोड़ा निराश देखील झालो कारण ती कुठ उतरणार होती? हे मला कळणार नव्हते. जसे माझे स्टॉप आले माझे पाय हे दरवाजाकडे वळले आणि मी बसमधून उतरलो. मी माझ्या मार्गाला लागणारच तितक्यात ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी देखील उतरल्या, ते पाहुन मी थक्क झालो आणि काही क्षणासाठी हरपलो. त्या तिघींजण बस मधून उतरूण मार्गस्थ झाल्या आणि मी येड़ा त्याच आनंदात होतो. आता काय मनात अजून एक ईच्छा जागृत झाली ती म्हणजे त्या जाता कुठयं हे जाणुन घेण्याची? त्यामुळे मी देखील त्यांच्यामागे मार्गस्थी झालो. मार्ग तर दोघांचा एकच होता, पण वाटतं देवाने माझ्या नशिबात अर्धाच मार्ग लिहिला होता. थोड़या अंतरावर माझा क्लास आला होता त्यामुळे नायलाजस्तव मला क्लासच्या दिशेला पाय वळवावे लागले. मी थोड़ा नाराज होतो पण मला याचा आनंद होता की, आमचे स्टॉप हे एकच होते आणि त्यामुळे आता मला दररोज क्लासला उशिर होईल...
सुमारे 12:30 वाजता माझा क्लास सुटला आणि परतीच्या मार्गाला लागलो. स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होतो आणि मनात एकच विचार चालु, उद्या परत दिसेल नां...? तेवढ्यात समोरुन ती व तिच्या मैत्रिणी येतांना दिसल्या आणि मन परत लाजले. बसने प्रवास करत परत तेच तिचाकडे पाहणे सुरु केले आणि या वेळेस तिला माझावर संशय झाला व तिने हे तिच्या मैत्रिणींना सांगितले असावे. खरंतरं मला वेळेअभावी त्यांच्या मागे जाता आले नाही आणि कदाचित ही माझी सगळ्यात मोठी चूक असावी. मनातली उत्सुकता सावरत मी घराकडे निघालो पण संपूर्ण दिवस मात्र तोच विचार करत राहिलो.
दुसर्या दिवशी, वेळेवर आवरुन झाले होते व वेळेत घरुन बाहेर देखील पडलो होतो पण तरी बस ही हुकली. खरं सांगायच झालं तर बस ही मुद्दाम हुकवली कारण तिला परत भेटायचं होत. नेहमीप्रमाणे मी बस स्टॉपवर कानात हेडफोन टाकुन गाणे ऐकत बसलो होतो. काहीक्षणात ती तिच्या मैत्रिणींबरोबर बस स्टॉपवर आली. आज तीच्या चेहर्यावर एक वेगळच तेज दिसत होत जणू ते मला तिचाशी बोलण्यासाथी उत्साहीत करत होत पण मी स्वताला सावरलं. तेव्हा मी तिचाकडे असा पाहत होतो की, जणू त्या जागी फक्त आम्ही दोघेच होतो. मला आजुबाजुच्या लोकांचे देखील भान नाही राहिले होते.
त्यादिवशी देखील बसने तोच वेड़सरपणा जातांना, तिचाकडे पाहणे हे सुरुच... आणि तेव्हासुध्दा तिच आतुरता ती कुठे जाते? ते जाणुन घेण्याची पण तेव्हादेखील माझा हाथी निराशाच येणार होती कारण क्लासला हजेरी लावणे देखील तेवढेच महत्वाचे होते. नाहीतर घरी लगेच गैरहजरीचा कॉल गेला असता आणी हे मला नको होतं. पुढची भेट आमची ही परतीच्या वेळी होणार होती आणि आज मी तिच्या पाठोपाठ घरापर्यंत जाणार असा निर्धार देखील केला. मी ठरल्या प्रमाणे तिचा पाठलाग केला पण तो फक्त आर्ध्या रस्त्यापर्यंतच कारण मनात शंकांचे वादळ उठले होते आणि अशाप्रमाणे मी परत अपयशी ठरलो होतो.
शेवटी तिसर्या दिवशी ती कॉलेजचा यूनिफॉर्म परिधान करुन आली होती. त्यामुळे इतके तरी समजले की, ती रोज त्याच रस्त्याने पुढे कुठं जाते ते. मी त्याच्या वरुन अंदाज मांडला की ती माझ्याच बरोबरची असावी व आर्ट्स किंवा कॉमार्स या शाखेत शिकत असावी. त्यादिवशी मी खुश होतो. मला तिच्या बद्दल थोड़फार काहितरी कळले होते. असे अनेक दिवस उलटले आणि शेवटी ती सुध्दा माझ्या प्रेमात पडली होती हे मला निरीक्षणाने कळले होते. आता उशीर होता तो फक्त तिला प्रोपोज करायचा पण मित्रांनो तुम्हाला खरचं विश्वास नाही होणार असे माझ्या बरोबर झाले. नेहमीप्रमाणे मी तिच्या मागोमाग आणि ती तिच्या मैत्रिणींबरोबर माझ्या पुढे पण त्यादिवशी खरंतरं वेगळेच घडले होते. तिने तिच्या मैत्रिणींना पुढे जाण्यास सांगितले आणी तिने तिची चालण्याची गतीदेखील कमी केली. मला हे काय चाललयं काहीच समजेनास झालं होत, मी घाबरलो होतो. तरी हिम्मत करत मी तिच्या पाठीमागे चालत राहिलो पण ती थोड़ पुढे जाऊन एका जागेवर स्तब्ध उभी राहिली मग आता काय मी जास्तच घाबरलो आणि माझी चालण्याची गती वाढवली व थेट क्लास गाठला. मी क्लास मधून तिचाकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती तेथून निघाली आणि पुढे थांबलेल्या आपल्या मैत्रिणींना जाऊन भेटली. माझ्या निरिक्षणाणे हे समजले की, ती हसत तिच्या मैत्रिणींना काहितरी सांगत होती. तिच्या चेहर्यावरच्या हावभावावरुन हेच प्रतीत होत होते की, ती त्यांना माझ्या झालेल्या अवस्थेच वर्णन करत होती. थोडया वेळात त्यानीं ही तेथून पाय काढला व मार्गस्थ झाल्या. तेव्हा संपूर्ण क्लासभर माझ्या मनात त्याच घटनेचे अनेक प्रश्न घर करुन बसले होते.
मला त्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे परतीच्या मार्गाने जातांना तिचाशी बोलावे असा पक्का निर्धार केला होता. पण त्या दिवशी ती बस स्टॉपवर दिसलीच नाही. कदाचित ती लवकर गेली असावी, म्हणून मी निराशजनक घरी परतलो व उद्या तिचाशी बोलू अस ठरवलं. नेहमीप्रमाणे मी स्टॉपवर उभा तिची वाट पाहत पन ती आलीच नाही. कदाचित काहितरी झाल असावं? असा दिलास दिला पण नंतर बरेच दिवस ती ना स्टॉपवर दिसत होती ना परतीच्या वेळी थांबायचो त्या स्टॉपवर. मी पुर्णपणे निराश झालो होतो आणि मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने मनावर एक भोजे लाडल्यासारखे वाटायचे. काही दिवसांनी मला माहीत झाले की, ती मुलगी ही माझ्या पेक्षा एका वर्षाने मोठी होती व ती बारावी कॉमर्स शाखेत शिकत होती आणि तो दिवस त्यांच्या कॉलेजचा शेवटचा दिवस होता.
मी आजदेखील जेव्हा जेव्हा त्या स्टॉपवर उभा राहतो तेव्हा माझी नजर ही तिच्या शोधात असते. जरी माझ्या हाती निराशा येते तरी मी तिचा शोध हा कधीच सोडणार नाही. जेव्हा मी माझ्या मित्रांंना मी माझ्या या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे तेव्हापासून ते जेव्हा कधिही भेटले तेव्हा एकच विचारता तुझ्या कॉमार्सवाली च काय झालं? भेटली का नाही? आणि मी हसत त्यांना नकार देतो.