शाश्वत बरसातीची अखेर
शाश्वत बरसातीची अखेर
मला गर्दीची प्रचंड आवड. अर्थात हल्लीच्या चार-सहा महिन्यात ..पुर्वी अलिप्तवाद माझा आत्मा होता ..असो.का कोणास ठाऊकगर्दी खुप जवळची वाटायची .दुःखाच्या एखाद्या आभाळाएवढ्या पर्वताला गर्दीच्या दिशेने भिरकवले तर ते अल्पकाळात सपशेल शरणागती पत्करणार अबोलपणे,या ठाम मताचा मी....आजही भिंतीला टेकुनगर्दीचा आस्वाद घेत होतो हमेशा सारखा .."तुझं पिल्लूगेलं मघाशी",कानात झालेल्या या स्फोटाने हादरून सैरावैरा झालो ..तडक तिकडे पोहोचलो .मघाशी पर्यंत इथेधावण्याचा विचार माझ्या मनाच्या तळाशीहीनव्हता .पण आता मी इथे होतो .मेलो तरी तुझे तोंड बघणार नाही, या घराची पायरी चढणार नाही, तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी या जगात नाही ,वगैरे वगैरे आवेग कुठे शमले विधात्यालाच ठाऊक..माझं पिल्लु माझ्या समोर झोपलं होतं ..कायमचं..पांढऱ्या फडक्यात..निर्जीव बनून ...सुटली एकदाची वेदनेतुन ..शेवटी तर हाल हालझाले ..विझुन गेली पार ऐन तारुण्यात..कुजबूज कानावरआदळली..अन् उलगडा होऊ लागला ..माझ्या हरलेल्या भुतकाळाचा..असे होते तर सारे?
मला स्वतःचाच ज्वालामुखीएवढा प्रचंड राग आला..क्षणभर स्वतःला पेटवुन घ्यावे अन् रस्ता फुटेल तिकडे धावावे असे वाटू लागले.का वागलो मी तिच्याशी असा ? का घातली तिच्या वेदनेतभर???? एकमेकांच्या प्रेमात कसे व कधी पडलो होतो आजही आठवत नाही ..फक्त प्रेमात होतो एवढं नक्की ..काॅलेज मधून घरी जाताना हीला प्रचंड भुका लागल्या होत्या .जवळ पैसेही जेमतेमच होते .तेवढ्यात जे काही आले ते हीने रेल्वेत मागायला आलेल्या छोट्या मुलाच्या हातावर ठेवले ..उपाशी घरी गेली .बसं..हिच्यात जीव अडकला तो कायमचा..त्यात ही चळवळीत काम करायची ..समाजासाठी..मग तर कायमी फुल टू लट्टू..."माझी परी गेली ग....."कोणीतरी हंबरडा फोडला..मी पिल्लाकडे बघितले ..अशी नव्हतीच ही...विझलेली..अस्तित्वहीन..ते छोटे छोटे काजल घातलेले बोलके डोळे ,त्यावर नीट बसवलेला छानशा फ्रेमचा चष्मा..ते छोटेसे नाक..चाफेकळी वगैरे काही भानगड नव्हती . पण मला ते विलक्षण आवडायचे..,लांब केस,चेहऱ्यावर किंचित सावळेपणाची छटा.आणि डोळे दिपवणारी प्रसन्नता..पायात पैंजण..मदहोश करणारा घोगरा आवाज ..शारिरीक आकर्षण नव्हतेच ते मुळी ..ते एक अंतरीचे नाते होते. निष्पाप. तसे नसते तर बारा पंधरा सुखवस्तु स्थळे सोडूनही माझ्यासारख्या फाटक्या, गडद सावळ्या ,बसक्या नाकाच्या ,रुंद कपाळाच्या ,थुलथुलीत देहावर कशाला प्रेम करत बसली असती ???
खुप बडबडायची लहान बाळासारखी..पावसासारखी हसायची..मनमोकळं..लाडात आली की कुशीत शिरायची..घास भरव म्हणायची ..गोष्टीचा हट्ट धरायची. म्हणायची..मी आले ना या आपल्या घरी की आईंचा उपवास पण मीच करणार ..त्यांनी फक्त आराम करायचा आता .कधी कधी स्वप्नातल्या घराचं वर्णन करायची .म्हणायची..एकच छोटसं टुमदार घर.फक्त त्याच्या खिडकीतून चंद्र दिसावा..अन् आजुबाजुला घराच्या निसर्ग ...अचानक अबोल होऊन गेली एके दिवशी छोट्याश्या भांडणाच निमित्त करून ..कारण ते नव्हतेच..भांडणे अगोदर होतच होती .हे वेगळेच होते काहीतरी ..ती मला, माझ्या फोनला, टाळु लागली ..सुरूवातीला काही दिवस मेसेजला तुटकसे रिप्लाय द्यायची ..नंतर ते ही बंद ..नात्याला कुणाची तरी नजर लागली जणु. एक रिकामेपण आले आयुष्यात..एकदा तिला गाठुन खडसावले तरीही ती शांत .नको तसले आरोप केले तरी ती निश्चलच..मला खुप राग आला या सगळ्याचा.. मरेपर्यंत तुझे तोंड बघणार नाही अशी मी प्रतिज्ञा केली..."चिठ्ठी..."कोणीतरी असे म्हणत एक कागद माझ्या खिशात कोंबला. मी वास्तवात आलो..
मघापासुन समोरच्या भिंतीकडे शुन्यात बघत मी भुतकाळात रमलो होतो ..आजुबाजुला नजर फिरवली ..एव्हाना सर्व नातेवाईक जमले होते...मी चिठ्ठीवर नजर फिरवु लागलो..एवढा वेळ रोखलेले अश्रू , हुंदके एकसाथ बाहेर पडु लागले ..माझ्या प्रिय लाडक्या ,नकट्या गोब्यास...काय बोलु रे मी? खूप चिडलायस ना माझ्यावर? माहितीये मला..वर्ष होउन गेलं शेवटच्या भेटीला आपल्या ..चक्कर आल्याचं निमित्त झालं..ब्लड कॅन्सर ..शेवटची स्टेज ..वर्ष उरलय..ते ही खूप वेदना सहन केल्या तर..डाॅक्टर रिपोर्ट बघून सहज बोलुन गेले ..उध्वस्थ झाले रे मी..खुपशा भांडणानंतरदेखील क्षणभरही माझ्यापासुन दूर राहु न शकणारा तु कायमचा कसा रे माझ्याशिवाय ह्याचीच खूप भिती वाटत होती .मनाचा हिय्या केला. ठरवलं..तुला स्वतःपासुन दुर ठेवायचं. माझ्या शिवाय जगायला शिकवायच.. कधीकधी वेदना खूप असह्य व्हायच्या. वाटायचं तुला येऊन बिलगावं.. पण मी माझ्या मनाला आवर घालायचे ..तुझ्याएवढाच त्रास झालाय रे मला..
तु माझ्याशी भांडलास..तरी मला तुझा राग नाही आला अजिबात ..तुला अजूनही माझ्यावर रागावणं नाही जमत ..रडू नकोस ..तुला आपली चळवळ खूप पुढे न्यायचीय..तिला रस्ता दाखवायचाच.आईला जपायचय..आपल्या स्वप्नातील घर बांधायचय..खचु नकोस .मी असेन तुझ्या श्वासात..तुझ्यात....तुझ पिल्लु..."तयारी झालीय उचला आता", कोणीतरी मोठ्यांदा ओरडले. खळबळ झाली ..आवाज वाढला मी ही उठलो ..आकाशाकडे बघितले ..खच्चुन ओरडलो..'तु बरसात होतीस . शाश्वत बरसात..आपल्या प्रेमाच्या साम्राज्यावर अविरत बरसणारी..तु गेलीयस आता ..तो बघ सूर्यकिरणाचा तुकडा येतोय मशाल बनुन..'आवेग ओसरल्यावर मी धावु लागलो. गर्दीच्या शोधात..मेंदुवर दुःखाचा पर्वत घेऊन ....

