STORYMIRROR

Ramesh Dongare

Crime Others

3  

Ramesh Dongare

Crime Others

Second Inning (दुसरी खेळी )

Second Inning (दुसरी खेळी )

5 mins
168

आजही याकूब हुसेन आपल्या प्रिय पत्नीच्या फोटो समोर विमनस्क अवस्थेत अश्रू ढाळीत बसले होते.आज त्या घटनेला चार महिने होत आले होते, तरीही त्यांचे दुःख रति भरही कमी झाले नव्हते.त्यांच्या आईलाही त्यांची ही अवस्था बघवत नव्हती.ती स्वतः मुलाला दुःखातून बाहेर काढण्याचा आपल्या कडून आटोकाट प्रयत्न करीत होती.याकूब असाच काही दिवस राहिला तर त्याला वेड लागेल याची भिती तिच्या मनात घर करून होती.ती याकूबच्या मित्राना, आँफीसमधील सहकाऱ्यांना घरी बोलावून याकूबला या अवस्थेतून बाहेर काढण्याची विनंती करीत होती.पण तिच्या या प्रयत्नाना यश येत नव्हते.

याकूब हुसेन हे पुणे शहरातील (Anti Terrorism Squad ) एटीएस चे नामांकित वकील होते.आता पर्यत त्यानी सरकारच्या अनेक गुंतागुंतीच्या केसेस यशस्वी पणे हाताळल्या होत्या.त्यामुळे ते आठ ते दहा वर्षात महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते.पण गेल्या चार महिन्यात ते आपल्या रूमच्या बाहेरही आले नव्हते.घरात फक्त त्यांची आई व नोकर एवढाच त्यांचा परिवार होता.

आजही याकूब शैनाजच्या फोटो समोर बसून मनातल्या मनात कुढत होते.हे असं कसं घडलं.याकूब शैनाजच्या संसाराला कोणाची नजर लागली हेच समजत नव्हते.याकूबना शैनाज शिवाय जगणं ही कल्पना सहन होत नव्हती..चार महिन्यांपूर्वी घडलेल्या त्या घटनेने होत्याचं नव्हतं झालं

पंधरा वर्षांपूर्वी याकूब व शैनाज दिल्लीच्या उस्मानिया विद्यापिठात एकत्र शिकत होते.शैनाज ही मुळची जम्मूची व याकूब हे पुण्याचे.शैनाजला आई नव्हती. वडील मिलीटरी मधून रिटायर होऊन आपल्या वाडवडीलांच्या जम्मू मधील घरी सुखाने कालक्रमणा करत होते. शैनाजला एक जुळी बहीण होती.पण ती अतिरेकी संघटने मध्ये सामील झाल्याने वडीलानी तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकले होते.काँलेज मध्ये असताना याकूब आणि शैनाज यांचे प्रेम संबंध जुळले. याकूबने कायद्याची पदवी घेतली.शैनाजने जर्नालिझमचा कोर्स पूर्ण करून तिचा याकूबशी निकाह झाला.आणि ती शैनाजची शैनाज हुसेन झाली.

लग्नानंतर सर्व काही स्वप्नवत चालू होते.बघता बघता दहा बारा वर्षे अशीच आनंदात निघून गेली. पण ती चार महिन्यांपूर्वीची घटना म्हणजे नोव्हेबर मध्ये जम्मूहून शैनाजचे अब्बाजान पैगरवासी झाल्याचा मेसेज आला. याकूब हे पुणे येथील जर्मन बेकरीवर जो आतंकवादी हल्ला झाला आणि त्या मध्ये अनेक जण मूत्यू मुखी पडले. याकूब हुसेन हे ह्या खटल्या मधील सरकारचे एटीएसचे सरकारी वकील असल्याने सध्यातरी त्याना पुणे सोडणे शक्य नव्हते.तसेच जम्मूला जाऊन घराची व्यवस्था बघणे एवढेच काम असल्याने शैनाजला एकटीला जाण्याची याकूबने तिला गळ घातली. तिनेही त्यांची ही अडचण ओळखून ती एकटी जाण्यास तयार झाली.

शैनाजने निघण्याची सर्व तयारी केली.बँग ,पर्स व एक दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेतले. याकूबचे कुटुंब अनेक वर्षे पुण्यात रहात असल्याने पुढारलेले होते. पुण्याच्या संस्कृतीशी ते एकरुप झाले होते. त्यामुळे पुण्यात लग्न होऊन आल्या पासून तिने कधीच हिजाब (बुरखा) वापरला नव्हता. पुण्यात आल्या पासून घराबाहेर पडताना हिजाब वापरतात हे ही ती विसरून गेली होती. पण शैनाजचे बालपण जम्मूत गेले असल्याने ती तिकडे गेल्यावर मात्र तिकडच्या चालीरिती पाळत असे. तिकडे महिला हिजाब(बुरखा) शिवाय बाहेर पडत नाहीत म्हणून आठवणीने जम्मूला जाताना ती हिजाब(बुरखा) घ्यायला विसरली नाही.

दिनांक 18नोव्हेंबर रोजी याकूब स्वतः शैनाजला जम्मूतबी गाडीत बसवून देण्यासाठी पुणे स्टेशनवर गेले होते..दिं 19 रोजी शैनाजचा दिल्लीहून प्रवास छान चालल्याचा याकूबला फोन आला होता. दिनांक 20 नोव्हेंबरच्या त्या बातमीने याकूबचे सर्व जीवनच अस्ताव्यस्त करून टाकले. दिं.20 नोव्हेंबर रोजी अतिरेक्यानी जम्मू स्टेशनवर बाँम्ब स्फोट घडवून हल्ला केला.त्या हल्ल्याला भारतीय जवानानी चोख उत्तर दिले.त्या अतिरेकी हल्यात जम्मू स्टेशनवरील अनेक निरपराध नागरिकही मारले गेले.मिलीटरी कारवाई नंतर जम्मू पोलीसानी त्या भागाचा ताबा घेतला. पोलीसाना घटनास्थळी शैनाजची बँग मिळाली.त्या आधारे तो स्त्री देह हा शैनाजचा असल्याची खात्री पटविण्यासाठी याकूब याना जम्मू पोलीसानी बोलावून घेतले. शैनाजची बँग व कपडे याकूबने ओळखले. पण शैनाजचा चेहरा विद्रूपझाल्याने ओळखण्याच्या पलीकडचा झाला होता. शैनाजची बँग व कपड्यांवरून शैनाजला मृत म्हणून घोषीत केले.याकूबच्या स्वप्नांचा चुराडा झाला.या घटनेनंतर पोलीसानी शहराची नाकेबंदी करून संशयित अतिरेक्यांची धरपकड सुरू केली.

अशाच एके दिवशी सकाळी 9 वाजता एटीएसचे पोलीस निरीक्षक श्री वागळे स्वतः याकूबचे घरी आले. त्यानी एटीएसचे प्रमुख रणजितसिंह यानी महत्वाचे साक्षीसाठी त्याना आँफीसमध्ये बोलाविल्याचे सांगीतले.याकूब हुसेन यानी आँफीसमध्ये येण्याबद्दल असमर्थता व्यकत केली.यावर रणजितसिंहाचा निरोप होता जर ते आले नाहीत तर त्याना उचलून जीपमध्ये ठेवा व घेऊन या.हा ही निरोपही श्री वागळे यानी दिला. याकूब हुसेन हे सरकारी नोकर होते.तसेच वरिष्ठांचा आदेश मानणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते.तसेच काही तरी महत्वाचे काम असल्याशिवाय असा आदेश देणार नाहीत अशी त्याना पूर्ण खात्री होती.

याकूब हुसेन हे चार महिन्यांनंतर प्रथमच घरा बाहेर पडत होते.जीप मध्ये जेंव्हा थंडगार वारा अंगाला लागला तेंव्हा त्यांच्या मनात जगण्याची नवी आशा पल्लवित झाली. काहीतरी चांगले घडणार आहे याचा मन संकेत देत होते. काही वेळातच जीप एटीएस च्या कार्यालयात आली.

एटीएसचे प्रमुख रणजितसिंह यानी याकूब याना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.याकूब यांच्या मनस्थितीची त्याना कल्पना होती.मोठ्या आदराने चहा पाणी झाल्यावर जम्मू पोलीसांकडून आलेली फाईल त्याना वाचायला दिली.दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जम्मू स्टेशनवर अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी जी धरपकड केली त्यावेळी एका बुरखाधारी महिलेला पोलीसानी ताब्यांत घेतले असून ती अतिरेकी संघटनेची सदस्य असावी असा पोलीसाना संशय आहे.पण ती महिला स्वतःचे नांव शैनाज असे सांगत असून पुण्याच्या एटीएसचे सरकारी वकील याकूब हुसेन यांची पत्नी असल्याचे सांगत आहे. तिच्या खरेपणाची खातरजमा फक्त याकूब हुसेनच करू शकतील म्हणून पोलीस फोर्स बरोबर तिला पुण्याला पाठवत आहोत. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता होणार नाही याची गोपनीयता पाळावी.अशाही सुचना देण्यात येत आहेत.

हे ऐकल्यावर याकूब यांच्या चेहऱ्यावरची आता पर्यत आलेली मरगळ कुठल्या कुठे निघून गेली.त्यांचे सर्व शरीरही अनामिक चैतन्याने भारून गेले.त्याच बरोबर आपण दफन केलेली ती कोण होती. विचारांचा सगळा गोंधळ झाला होता. रणजितसिंहानी त्यांच्या खाद्यावर हात ठेवून धीर दिला.प्रसंग मोठा बाका होता.शैनाजच्या चेहऱ्यावरील सर्व लकबी, देहबोली त्याना परिचित होती. त्यानी वरिष्ठांना तिची भेट घडवून आणण्याची विनंती केली.

एटीएसच्या कार्यालयात ज्या ठिकाणी जहाल अतिरेकी ठेवतात त्या अंडासेल मध्ये वरिष्ठ त्याना घेऊन गेले.शैनाजला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता 10 ते 15 फुटांवरून त्यानी शैनाजला दाखवले. मध्यंतरीच्या अतिरिक्त ताणामुळे ती मलूल झाली होती.पण तोच चेहरा तेच हावभाव, त्याच लकबी.मध्यंतरीच्या काळामध्ये घडलेल्या अद्भभूत अविश्वसनीय घटनेनंतर प्रत्यक्ष तिला पाहून त्याना धक्का बसला.वरिष्ठांनी याकूब याना सावरले व आपल्या केबीन मध्ये घेऊन आले.

याकूब यानी केबीन मध्ये आल्यावर तिच्या कडे मिळालेल्या वस्तू बघण्यासाठी मागीतल्या.मिळालेल्या वस्तू पैंकी पुणे ते जम्मूतबी रेल्वेचे रिझर्वेशन व काळ्या रंगाचा हिजाब(बुरखा)वरिष्ठांनी ड्राँवरमधून काढून याकूब त्याना दाखविला. याकूब यानी ज्या दिवशी रेल्वेचे रिझर्व्हेशन केले ती तारीख चेक केली ती बरोबर होती. म्हणजे रिझर्वेशन शैनाजचेच होते.तसेच तिच्या कडे जो हिजाब(बुरखा) मिळाला त्याच्यावर कोपऱ्यात इंग्रजी अक्षर Y असे होते. Y हे अक्षर शैनाजने लोकरीने विणले होते.Y म्हणजे याकूब .जप्त करण्यात आलेल्या वस्तू शैनाजच्या असल्याची त्याना खात्री पटली तसेच शैनाज ही आपली पत्नी असल्याची खात्री मनोमन पटली.याकूब यानी वरिष्ठांना सांगून शैनाजला एकांतात भेटण्याची परंवानगी मिळवली.

याकूब अंडासेल मध्ये शैनाजला भेटले.जम्मू स्टेशनवर उतरल्यावर अतिरेक्यांचा हल्ला झाल्यावर बँग तिथेच टाकून आपण जीवाच्या भितीने स्वतःला.वाचविण्यासाठी बुरखा घालून कसे लपलो व सर्व शांत झाल्यावर जम्मू पोलीसानी संशयित अतिरेकी म्हणून अटक केली या बाबतची सविस्तर माहिती दिली.

याकूब हूसेन यानी शैनाज ही आपली पत्नी असल्याचे त्यानी एटीएस च्या अधिकाऱ्यांना पटवून दिले.वरिष्ठानी हिजाब मुळे अविश्वसनीय घटना घडून याकूब व शैनाज यांचे मधूर मिलन झाले म्हणून हिजाबचे अभार मानण्यास सांगितले.अशा रितीने याकूब आणि शैनाज यांच्या जीवनाची सेकंड इनिंग सुरू झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime